रोज आई गोष्ट सांगते ती बाळाला एवढी आवडत नाही... पण बाबांनी चार गोष्टी कशातरी एकत्र करून आठवेल तशी ऐकवलेली भेळ-मिसळ मात्र खूप आवडली आहे लेकाला आमच्या...... :)
पहा किती गोष्टी आठवतात तुम्हाला..... :)
ऐक ना ग आई....
काल रात्री बाबांनी मला...
एक छान गोष्ट सांगितली.
तुझ्या रोजच्या गोष्टी पेक्षा...
मला बाबांचीच गोष्ट खूप खूप आवडली...
तुझ्या गोष्टीत नुसतेच चिऊ काऊ...
आणि रोजच मोठ्ठा पाउस असतो...
काउच घर सारखं वाहून जात...
आणि बिच्चारा पुन्हा चिऊच दार वाजवत बसतो....
पण ना.. बाबांच्या गोष्टीत मात्र ...
चिऊ काऊ सोबत कोल्हा पण असतो...
भोपळ्यात बसलेली म्हातारी... आणि...
छोट्टासा उंदीर मामा सिंहाला वाचवतो....
ऐक ह....
एक असते चिऊ आणि एक असतो काऊ...
चीउच घर शेणाच आणि काउच असत मेणाच..
एकदा खूप खूप मोठ्ठा पाउस येतो....
आणि म्हातारीचा वाडा वाहूनच जातो....
म्हणून म्हातारी आपल्या लेकीकडे जाते..
परत येताना मोठ्ठ्या भोपळ्यात बसते...
जंगलात तिला मग एक कोल्हा भेटतो...
म्हातारीची सगळी बोर तो खाऊन टाकतो...
बोर खाऊन कोल्हा जंगलात पळून जातो...
सिंहाच्या गुहेत जाऊन दडून बसतो...
गुहेतला सिंह शिकार्याच्या जाळ्यात अडकतो...
मग छोट्टासा उंदीर मामा त्याला दोरी कापून सोडवतो..
पुढे राजाची टोपी उंदीरमामा पळवतो...
पावसात भिजत भिजत आपल्या बिळात घुसतो....
डोंगरावर मग ससा कासवाशी रेस लावतो....
कासव जात झोपून आणि.. ससाच रेस जिंकतो...
अग आई...
शेवटी एकदाचा पाउस गेला..
चिऊ आणि काऊ सगळे भूर उडून गेले....
आणि मला गोष्ट सांगता सांगता....
बाबा तर माझ्या आधीच झोपी गेले.... :)
- टिंग्याची आई
पहा किती गोष्टी आठवतात तुम्हाला..... :)
ऐक ना ग आई....
काल रात्री बाबांनी मला...
एक छान गोष्ट सांगितली.
तुझ्या रोजच्या गोष्टी पेक्षा...
मला बाबांचीच गोष्ट खूप खूप आवडली...
तुझ्या गोष्टीत नुसतेच चिऊ काऊ...
आणि रोजच मोठ्ठा पाउस असतो...
काउच घर सारखं वाहून जात...
आणि बिच्चारा पुन्हा चिऊच दार वाजवत बसतो....
पण ना.. बाबांच्या गोष्टीत मात्र ...
चिऊ काऊ सोबत कोल्हा पण असतो...
भोपळ्यात बसलेली म्हातारी... आणि...
छोट्टासा उंदीर मामा सिंहाला वाचवतो....
ऐक ह....
एक असते चिऊ आणि एक असतो काऊ...
चीउच घर शेणाच आणि काउच असत मेणाच..
एकदा खूप खूप मोठ्ठा पाउस येतो....
आणि म्हातारीचा वाडा वाहूनच जातो....
म्हणून म्हातारी आपल्या लेकीकडे जाते..
परत येताना मोठ्ठ्या भोपळ्यात बसते...
जंगलात तिला मग एक कोल्हा भेटतो...
म्हातारीची सगळी बोर तो खाऊन टाकतो...
बोर खाऊन कोल्हा जंगलात पळून जातो...
सिंहाच्या गुहेत जाऊन दडून बसतो...
गुहेतला सिंह शिकार्याच्या जाळ्यात अडकतो...
मग छोट्टासा उंदीर मामा त्याला दोरी कापून सोडवतो..
पुढे राजाची टोपी उंदीरमामा पळवतो...
पावसात भिजत भिजत आपल्या बिळात घुसतो....
डोंगरावर मग ससा कासवाशी रेस लावतो....
कासव जात झोपून आणि.. ससाच रेस जिंकतो...
अग आई...
शेवटी एकदाचा पाउस गेला..
चिऊ आणि काऊ सगळे भूर उडून गेले....
आणि मला गोष्ट सांगता सांगता....
बाबा तर माझ्या आधीच झोपी गेले.... :)
- टिंग्याची आई