Wednesday, February 13, 2013

Trust Me.......

पुरे झालं आता रोजचं...
हे कवितेतून उत्तर देण...
डोळ्यांत साचलेल्या पाण्याला...
शब्दांवाटे मोकळ करण....
हात हातात गुंतलेले...
आणि उगीचच परक्यासारख वागण..

कसलं हे समांतर धावणं...
नको असलेला तो दुभाजक...
ओलांडता ओलांडता.. स्वतःलाच सावरण....
जाऊ देत न कधीतरी तोल....
बघूया नक्की काय होतंय....
सावरणारा हात सापडतोय...
कि पुन्हा त्याच बाजूला ढकलले जातोय....

कसली स्पर्धा आणि कसलं काय...
मला कुठल मेडल मिळणार आहे...
इतके दिवस झाले....
आजही तुझ्या २ पावलं मागेच आहे....
एकदातरी समजवायचं होतंस ग...
मी आजही तुझं ऐकायला तयार आहे.... 

एक एक करत हळू हळू...
तुझा गैरसमज वाढतच गेला....
मीही कधी त्याला स्वतःहून...
पुसायचा प्रयत्नच नाही केला....
माझ्याविना नक्कीच आनंदी राहशील...
हा गोड गैरसमज... मग मीही स्वतःचा करून घेतला......

दिसत होत न डोळ्यातलं पाणी..
मग पुसायला हात का पुढ आला नाही....?
वीण दोघींनीही विणली होती...
म्हणूनच अजून तोडता आली नाही....
टोचत होता दोघीनाही तो शेवटचा कटाक्ष...
पण हात धरून थांबवायला कुणीच का पुढे झालं नाही..... 

अजूनही तितकंच प्रेम या डोळ्यांत आहे....
पण तिथे तुला प्रश्न चिन्हच दिसतंय....
जरा मनापासून पहा परत फिरून...
बघ... तुला हे कितपत पटतंय.....
मोठी असूनही... तुझ्याइतकं नसलं....
तरी या वेडीला आता थोडफार तरी कळतंय....

न उलगडलेलं कोड तर कधी...
आपल्यापुढे न सुटलेला प्रश्न उभा होता...
तिकडे तुझा जीव जायचा राहिला....
आणि माझा... मी तुझ्याच पायात सोडून.. निरोप घेतला होता....
"Please Hate Me" कुणी कितीही वेळा म्हटलं....
तरी मी अजूनही इतकंच म्हणेन....
जे तू कधीच केलं नहिस... "Trust Me".... बघ जमलच तर..... :)

- शिल्पा 
थोडंस नमत घेतलं कि लोक तुम्हालाच दोशी ठरवून रिकामे होतात… :)

अधिकार उरला नाही.....

माझ्या हातात नेहमी हिरव्या बांगड्या असतात.. आवडतात मला..... अगदी हिरव्यागार  :) परवा एकदा कंपनीतून बाहेर पडताना एक गार्ड बाईंनी विचारलं... "काय madam अगदी हिरव्यागार बांगड्या.... छान आहेत.. मलाही खूप आवडतात....." मी सहजच म्हटलं घालत का नाही मग? allowed नाही का इथे?
माझ्या मनात काहीच न्हवत अगदी सहज विचारलं होत मी.... हसतच पण तिने उत्तर दिल....
"तस काही नाही... पण आता तो अधिकारच उरला नाही मला...."
पुढे काय बोलाव मला सुचेना.... तिथून बाहेर पडले... आणि गाडीवरून घरी जाताना जे काही सुचलं तेच इथे मांडलय..... आवडाव अस बिलकुल नाही... पण तरीही लिहिलंय.....

लाल भडक कुंकू आणि हिरवा चुडा...
तिला मनापासून आवडतो...
नुसत्या मंगळसूत्राने नटलेला गळा...
तिला आजही तितकाच भुलवतो.....

त्या दिवशी तिनेही घातला होता...
गर्द हिरवा चुडा.. पण शेवटचा...
या सावित्रीने तिच्या सत्यवानाला...
ज्या दिवशी निरोप दिला अखेरचा...

आता तिच्या दागिन्यांना असूनही...
काहीच अर्थ उरला न्हवता...
तिच्या डोळ्यांत अखंड साचलेला अश्रू...
तेवढाच काय तो शिल्लक होता....

कुणाचा हिरवा चुडा पाहिला...
तर आजही आईच्या पापण्या ओलावतात...
तिचही काळीज आक्रोश करत....
जेव्हा लेकुरवाळ्या पंचमीला आपल्या माहेरी जमतात....

नेहमी त्याच्यासाठीच करायची...
तो शृंगार तिने पुन्हा कधी केला नाही...
कोणी विचारलं... तर म्हणे...
या कुंकवावर आणि चुड्यावर. माझा अधिकार उरला नाही.....

रायामुळेच मिळालेलं सौभाग्य...
त्याच्याविना हिरावलं...
त्याच्यासोबत पाहिलेलं...
तीच प्रत्येक स्वप्न तुटत गेलं....

अंगणात खेळणारा चिमुकला...
तिला त्याची आठवण करून देतोय...
त्याच्याविना बेरंग तिच्या आयुष्यात...
हा बाळकृष्ण सुखाचे रंग भरतोय......

पिल्लासाठीच रोजचा दिवस...
ती पुन्हा नव्याने जगते आहे....
रायाला अखेरच्या क्षणी दिलेलं वचन...
त्याच्या आठवणीना सोबत घेऊन पूर्ण करते आहे....

डोळ्यांत साठवलेला प्रत्येक क्षण....
तिची अखंड सोबत करतोय...
पिल्लाच्या भविष्यासाठी लढताना..
राया आजही तिचा दृढ विश्वास बनून जगतोय....

God Bless her and her child....

- टिंग्याची आई...

Monday, February 11, 2013

किस्मत....


यह किस्मत कभी कभी.....
कडी धूप जैसी लगती है....
छोटी छोटी खुशियो के लिए....
पल पल तरसती है.....

यह किस्मत कभी कभी.....
घनी छाव जैसी लगती है....
मा के ममताभरे...
आंचल सी लगती है.....

यह किस्मत कभी कभी.....
घीरे हुए बादल सी लगती है...
तेरी हर याद सिमटकर....
मेरी आंखो से बरसती है....

यह किस्मत कभी कभी.....
सुबह कि पेहली किरण लगती है....
जिंदगीके हर अंधेरेको...
चीर के निकलती है....

यह किस्मत कभी कभी.....
घने अंधेरेसी लगती है....
तेरा साथ ना हो तो....
हर पत्थरसे  टकराती है.....

यह किस्मत कभी कभी.....
गेहरे पाणी जैसी लगती है...
दिल कि गेहराईयोमे ...
खुद हि खो जाती है....

यह किस्मत कभी कभी.....
विशाल समंदर सी लगती है...
सतेह पर भलेही शांती....
पर अंदर कई राज छुपाये रखती है.....

यह किस्मत कभी कभी.....
तेरी प्यारीसी मुस्कान लगती है...
तेरे नन्हे कदमो से...
इस आंगण मी खुशियो के गुल खिलाती है...

यह किस्मत कभी कभी.....
तेरे साथ जैसी लगती है....
जिंदगीकी हर छोटी बडी लडाई...
जितने कि हिम्मत देती है...


यह किस्मत कभी कभी.....
तेरे प्यार जैसी हसीन लगती है....
दुनिया कि हर ख़ुशी....
मेरे आंचल मी आके खिलती है..... :)

- टिंग्याची आई

Thursday, February 7, 2013

प्रेम कसं असतं...?

















तिच्या हातात हात गुंतवून...
मावळनाऱ्या सूर्याकडे पाहत..
क्षितिजापर्यंत चालत रहायचं...
आणि ते गवसलं नाही म्हणूनच..
एकटेच मंद अंधारात हरवायचं.... हे प्रेमही असच असत का....?

सागरकिनारी उभ राहून....
एकटक त्या लाटांकडे पहायचं....
पायाखाली वाळू सरकत असते....
अन आपणही नकळत त्याच्या कुशीत शिरायचं....
आणि त्याने मात्र शेवटी किनाऱ्यावरच ढकलायचं... हे प्रेमही असच असत का...?

पौर्णिमेच्या रात्री आकाशात...
चांदण्यांचा सडा पडला असताना...
चंद्राची लाडकी चांदणीही असते...
ती जोडी दुरून अगदी लोभस वाटते....
पण चंद्राच्या नशिबी येत ... फक्त वाट पहायचं.... हे प्रेमही असच असत का...?

एखाद्या उंच कड्यावर जाऊन...
स्वतःला खोल दरीत झोकून द्याव...
धरणीवर कोसळण्याच्या भीतीपेक्षा...
तरंगण्याचा आनंदच जास्त वाटावा....
पण शेवट मात्र अनपेक्षितच व्हायचा.... हे प्रेमही असच असत का...??? 

पण खर सांगू...??

तुझ्या प्रेमात पडल्यावरच मला कळलंय.....
क्षितिजाच्या पलीकडे एका नव्या जगाचा रस्ता जातो....
सागराच्या कुशीतच तर मोती दडलेला असतो....
दूर असला तरी.... चंद्र चांदणीच्या काळजात दडलेला असतो....
आणि कड्यावरून कोसळलो जरी... खाली सावरणारा तुझा हात असतो....
                                                       हे प्रेमही असंच असत... अगदी तुझ्या इतकंच छान असत.... :)

- टिंग्याची आई..

'तो' आणि 'ती'.....

'तो' आणि 'ती' जणू ... बाप्पाने एकमेकांसाठीच बनवलेले...
प्रेमाच्या एका गोड नात्यात... अगदी घट्ट बांधलेले....
इतके भासती वेगळे..... तरी एकमेकांसाठी जगणारे....
सुख-दुःखाचे मोती.... ओंजळीत समाधानाने झेलणारे....

तिचा चहा एकदम स्पेशल.. भरपूर दूध आणि साय वरून...
त्याचा मात्र Pure Black tea.. दूध चार हात लांब सारून..... :)
त्याच्या प्रत्येक बडे ला.. तिने नवीन नवीन गिफ्ट द्यावं....
तिचा बडे मात्र त्याने.. लक्षात असूनही विसरल्यासारख कराव.... 

पिल्लासाठी तर कधी स्वतःसाठी... तिने फुल टाईम गाण म्हणावं....
कधीतरी चुकुनच एखाद आवडीच गाण... त्याने नुसतच गुणगुणाव....
चुकून सुद्धा कोणाच्या तोंडात शिवी... तिला आज्जीबात सहन होत नाही....
आणि त्याच्या साईटवरच  एकही काम... शीवीशिवाय होतच नाही....

तिची बडबड अखंड चालू.. शांत बसण जणू माहितच नाही....
त्याच्या गप्पा तशा मोजक्याच... वर Madam बोलायची संधीच देत नाही.....
तिच्या चेहऱ्यावर नेहमीच.. Close-Up Smile असते....
त्याच्या गालावरची कळी मात्र... फक्त तिला पाहूनच खुलते.....

तिने प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत... सुख शोधावं...
आणि त्याने मात्र.. तिच्या दुखांना आपल्या ओंजळीत लपवावं....
याच वेगळेपणात त्यांना... त्याचं खर प्रेम गवसलंय...
प्रेमाच्या अतूट रेशमी धाग्याने... त्यांना एकमेकांत घट्ट गुंफलय.....

या दोन टोकांनी मिळून... संसाराचा परीघ छान सांभाळलाय...
दुडूदुडू धावणारा बाल कृष्ण... त्याचा केंद्रबिंदू बनलाय.....
इथे अंगणातल्या तुळशीसोबत... पारिजातकही बहरलाय.....
चिमुकल्या या मनातल्या घरट्यात..... या पाखरांनी प्रेमाने संसार थाटलाय.... 

- टिंग्याची आई
For Someone Special... :)  

Monday, February 4, 2013

गड आला पण सिंह गेला....

या कवितेतील सर्व प्रसंग काल्पनिक आहेत.... छत्रपतीना सोडून बाकी सर्व काल्पनिक पात्र आहेत..... इतिहासातल्या कोणत्याही प्रसंगाशी जर साम्य आढळले तर तो एक योगायोग समजावा.... आणि काही चुका झाल्या असल्यास क्षमस्व..... :)

बाजीराव नावाचा महाराजांच्या सेनेतला एक मावळा होता.... त्याच्या मुलाची हि एक छोटीशी कथा.... बाजी तर शूर होताच पण आपल्या बापाचा आदर्श घेऊन त्याचा मुलगाही स्वराज्यासाठी लढला आणि त्याने आपल्या आयुष्याच सार्थक करून घेतलं.....

हर हर महादेव....!!!!!!!! जय भवानी... जय शिवाजी....!!!

 
भल्या पहाटे बाजीच्या घरी.... आज भलतीच गडबड उडाली....
सूर्याचे पहिले किरण घेउनि.... एका तान्हुल्याची किलकारी उठली.....
शिवबाचा मावळा घरामंदी आला... असा निरोप गडावर धाडला....
खुशीत येउनि जिजाऊनी नजराणा... संग मिठाईचा पाठीवला....

बानं स्वराज्यासाठी जीव वाहिला.... जसा होता शब्द राजांना दिला....
अन त्याच स्वराज्यासाठी... तो अखेर शहीद कि हो झाला....
आय बायांनी मिळून पोराला... बाच्या अंत्यदर्शना आणल...
तर चड्डीत खोचलेली तलवार सावरत... त्येन बाला "हर हर महादेव.." म्हणून दावल....

स्वराज्याचं बाळकडू आईन.. त्येला बालपणीच होत पाजलं...
पहिल्यांदा जावा भेटलं.... हे गुण तवाच महाराजांनी हेरलं...
पोरग स्वराज्यासाठी लढणार... वीर लढवैय्या होणार....
राजांची अनुभवी ती नजर.... अंदाज कसा चुकणार....!!

तलवार.. दांडपट्टा.. भाल... सगळ्यात पोरग तरबेज झालं...
सोळाव्या वर्षीच पठ्ठ्यान... फौजत नाव घातलं....
महाराजांसमोर घेतली शपथ... "गनिमाला पुरता ठेचीन..."
स्वराज्यासाठी जीव देईन.... तवाच वर जाऊन बाला तोंड दावीन....

गानिमिकाव्यात पोरग तरबेज झालं... प्रत्येक मोहिमेत आपला हुन्नर दाऊ लागल.. महाराजांना खात्री होती... बाजी परत येणार सर्जाच्या रुपान... अन तसंच झाल हुत.... 
एक दिवस....
शत्रून अचानक गडावर हल्ला केला.. महाराज मोहिमेवर होते... गडावर मोजकीच माणस होती....

असा कसा हो डाव टाकला.. राज नसताना हल्ला केला...
काय कराव कुणाला समजना.. तवा सर्जा लढाय पुढ झाला...
संग ५-५० ची एकच टोळी.. आज खरी कसोटी होती...
राजांचा आशीर्वाद शिरी.... अन ऊरात डोंगराएवडी हिम्मत होती...

आता उरला एकच उपाय.. गनिमीकावा... राज परिवाराला सुरक्षित स्थळी हलवून सर्जा आपल्या टोळी सोबत सज्ज झाला.... गडाच्या पायथ्याचा चप्पा चप्पा पोरांना ठाऊक होता.. तिथंच गनिमाला गाठला...

कड्याकपारीत गनीम गाठला.. जागच्या जागी ठार कि हो केला...
एकेकाची शिकार केली.. फौजचा पार चुराडा केला....
राजांची सेना नेटान लढत हुती.... शत्रूची सेना कापली जात हुती....

पण अचानक शत्रूची एक तुकडी मावळ्यांवर तुटून पडली.. धाडकन हल्ला झाला... मावळे धारातीर्थी पडू लागले.. काय झालं हे अचानक... अशी कशी बाजी पलटू लागली.... एक एक मावळा  होऊ लागला....
सर्जान हे पाहिलं अन बाजी प्रभूंचं स्मरण करून लढायला सज्ज झाला....

दोनी हाताला घेतल्या तलवारी.. मग पुढ बांधल्या दोन ढाली...
महाराजांना मुजरा करुनी... हर हर महादेवची आरोळी ठोकली...
१०-१५ जनांनी त्येला घेरला... कोल्ह्यांच्या तावडीत एकटा सापडला...
एकेकाला उभा त्येन चिरला.. बाजी परत सर्जा बनून लढला.....

अखेरचा गनीम आडवा पडेपर्यंत सर्जा लढत राहिला... रक्तबंबाळ झाला.... फतेह झाली तवाच धरणीवर पडला... आज सर्जान गड वाचीवला....

राजांना वृत्तांत कळला.. पार भेटीसाठी वेळ नाही उरला...
सर्जान जगाचा निरोप घेतला.. रणांगणावर त्यान जीव सोडला...
स्वराज्यान आणखी एक मावळा गमवला.. अन हे ऐकून आमचा राजा... अंतरात ढसाढसा रडला.....

राजांसाठी प्रत्येक मावळा म्हणजे जीव भावाचा सखा होता...
अशा प्रत्येक वेळी एकाच वाक्य त्यांच्या हृदयात आक्रोश करत असे...

"गड आला पण माझा सिंह गेला.. "

 

-- मराठमोळ्या टिंग्याची मराठमोळी आई 
:)

गणपती बाप्पा मोरया....


Weekdays मध्ये ऑफिसमुळे  कधी घरी नाही जाता येत... मग शुक्रवार ऐवजी शनिवारी सकाळी सकाळी लवकर उठून बाहेर पडाव लागतं... परवा एकदा असंच झालं......
आज मी फारच लवकर उठले होते.. पटकन आवरलं.. निघाले आणि स्वारगेटच्या बस मध्ये बसले...... तशा कोल्हापूरला बऱ्याच गाड्या असतात त्यामुळे थोडाफार उशीर झाला तर हरकत नसते..... पण काय करणार घरी जायची घाई झालेली असते न आम्हाला... :)
अप्पा बळवंत चौकात बस आली आणि दगडूशेठच मंदिर हलकसं दिसलं... लोक अगदी थोडेच उतरले आणि चढले देखील... आता दगडूशेठच दर्शन होणार होत.... पुण्यात आल्यापासून त्याचाच एकमेव आधार आहे.... कधीही काही वाटल कि दर्शन घ्यायला येतो आम्ही... आम्ही म्हणजे मी आणि माझी मैत्रीण अस्मिता.... :)
आजही तसच काहीसं वाटलं आणि मी स्वारगेट ऐवजी आप्पा बळवंत चौकातच उतरले.....
मंदिराकडे जाता जाताच दगडूशेठच अस्तित्व हळू हळू जाणवू लागलं... आणि मंदिरासमोर जाताच... त्याच दर्शन झालं.....
आज बाप्पा वेगळाच दिसत होता.... अजून अंगावर एकही दागिना घातला न्हवता.... उपरण देखील घातल न्हवत अजून... कदाचित पूजेला प्रारंभ झाला न्हवता..... जणू बाप्पा नुकताच अंघोळ करून पाटावर विराजमान झाला होता.... धोतरही अजून थोडफार ओलसर दिसत होत.... एकटाच बसला होता पाटावर... आजूबाजूला कोणीच न्हवत... कदाचित बाप्पाचू अंघोळ आटोपली आहे हे पुजारी काकांच्या लक्षात आल न्हवत..... :) बाप्पा मात्र अगदी निवांत बसला होता.... जणू वात पाहत होता बाकी पूजा अर्चनेची.... पुढे माझीच विचारचक्र फिरू लागली... आणि माझा बाप्पा चक्क बोलू लागला... :)
               "अरे किशोर... (भटजींच नाव बर का तिथल्या) झालीये माझी अंघोळ केव्हाची.. आवरताय ना आता..? अरे भक्त गण यायला सुरुवात झालीये हळू हळू... आवरा बर लवकर.... " आणि बाप्पाच सगळ आवरायला चार चौघे पुढे झाले....
             आपल्या बाप्पाकडे भरपूर दागिने आहेत हे तर तुम्हाला ठाऊकच आहे.... राणे बुवांनी पेटी उघडली आणि एक हार बाहेर काढला... बाप्पा म्हणाला.. " अहो राणे... रोज रोज एकच हार नको... मला आज ती मोत्यांची माल आहे ना... तीच घाला.. खूप छान आहे....किशोर तो मोठा हार तू घाल आणि हो... पोटावर व्यवस्थित येऊ देत हा...  तिकडे सरकला तर बर नाही दिसत.... अरे माधवा... बाजूबंद इतका सैल का रे बांधतात कोणी.....? वेड्या व्यवस्थित बांध बर.... माझे हात रिकामे नसतात रे पुन्हा पुन्हा वर सरकवायला...."
" अरे आज महेश नाहीये का रे? दिसला नाही सकाळपासून... चंदू आलाय का त्याच्या ऐवजी आज...? बर बर ठीक आहे.... :) राणे बुआ धोतराच्या निऱ्या व्यवस्थित करा बर का... त्या घड्या आणि ती जरी खूप छान दिसते... आणि हो आज धोतर लालच नेसवा मला सोनेरी धडीच...."
राणेंनी धोतर नेसवून घेतलं अगदी चापून चोपून.. बाप्पाला हव तस्स....
सगळे अलंकार एक एक करून बाप्पाच्या अंगावर चढत होते.. सगळ्याकडे बाप्पाच अगदी बारीक लक्ष होत... मधूनच तो होकार तर कधी लटकेच मान हलवून नकार देत असे एखाद्या अलंकाराला....
माधव कर्णालंकार घालत होता... " माधवा हळू रे...!!! कानात वळवळ होते माझ्या... गुदगुल्या होतात मला...." बाप्पा हसत हसत सांगत होता.... राणेंनी आता मुकुट चढवला.... बाप्पाने एकदा मुकुताकडे पाहिलं आणि म्हणाला... "राणे.. केवढा हा मुकुट... डोक दुखत हो कधी कधी माझ.... पण छान आहे हो... भक्तांनी खूप सुंदर बनवलाय..."
आता सोन्डेवरचे दागिनेही जागेवर बसले होते.... सर्वांनी एक एक शस्त्रे बाप्पाच्या हातात दिली.... आणि बाप्पानेही ती सगळी छान धारण केली.... डाव्या हातात छान मोदक पकडला... आणि उजवा हात बाप्पाने आशीर्वादासाठी वर केला..... बाप्पा आजही खूप छान दिसत होता.... किशोर भटाने दुर्वांची भली मोठ्ठी माळ बाप्पाला घातली आणि तेव्हा बाप्पाच्या तोंडावर शीतलतेच तेज पसरल्यासारख वाटलं....
              मलाही आज खूप समाधान मिळाल बाप्पाचा सगळा साज शृंगार पाहून... बाप्पा आता व्यवस्थित स्थानापन्न झाला..... मला वाटल आत्ताच जाव आणि बाप्पाचा एक गोड गोड पाप घ्यावा आणि त्याच्या मांडीवरचा मोदकाचा हात बाजूला सारून छानपैकी त्याच्या मांडीवर डोक ठेवाव आणि शांतपणे सगळ काही विसरून निवांत झोपून जावं..... तेव्हा बाप्पाही डोक्यावरून हात फिरवेल माझ्या आणि मला शांत झोपवेल.... त्याच्या कामात नक्कीच व्यत्यय येणार नाही.... भक्तगण दर्शन घेत राहतील... पण माझा बाप्पा मला काही जाग येऊ द्यायचा नाही.... :)
            क्षणभर खरच मी तिथे पोचले होते... कदाचित तो क्षण मी आणि माझा बाप्पा दोघेही खरोखर जगलो होतो... आज मला बाप्पाला सोडून जावंस वाटतच न्हवत... पण शेवटी बाप्पानेच एक cute smile दिली आणि पुढे जायची आज्ञा दिली....
           बाप्पाचं तर ऐकायलाच हव ना... म्हणून मग bag उचलली आणि हसतच घरी जायला निघाले... माझ्याच डोळ्यात मी बाप्पाला पाहत होते.. आणि कदाचित बाप्पाही माझ्या पाठमोऱ्या आकृतीकडे वाकून पाहत होता..... बाप्पला म्हटलं... " येते ह लगेच..." आणि मी निघाले.....

गणपती बाप्पा मोरया.....!!!!!!!!!!!!!

Sunday, February 3, 2013

कधी कधी वाटत.....

दोन प्रिय मैत्रीण... कधी जास्त बोलन नाही... गप्पा नाही... पण तरीही जिवलग.... :) खूप प्रेम होत दोघींचही एकमेकींवर... छान चालल होत सगळ... दोघीही संसारात सुखी होत्या..... अधून मधून काहीतरी चालायचं... पण तरीही सगळ ठीक होत.... :)
अचानक एक दिवस एकीने दुसरीला एक विचित्र शपथ घातली..... कधीही न भेटण्याची.. न बोलण्याची... खरच अगदी विचित्र शपथ.... दुसरीने प्रयत्न केला जाणून घेण्याचा.. पण छे... सगळेच प्रश्न अनुत्तरीत...
दोघीही वेड्या.. आजही झुरतात एकमेकीसाठी...... :)














कधी कधी वाटत.....
का घातलीस तू हि शपथ....
काय बर चूक झाली माझ्या हातून.....
तुझ्यावर प्रेम करून गुन्हा केला...
कि... माझ्यावर कधी तुझा विश्वासच न्हवता म्हणून.....

कधी कधी वाटत....
तसं बरंच झालं हे सगळ....
या शून्याला तुझ्या गणितात कधी किंमतच न्हवती....
सगळे गुन्हे माझ्या पदरात....
दुसऱ्या कोणाला चूक करायची संधीच मी दिली न्हवती....

कधी कधी वाटत....
काहीतरी कारण नक्कीच असेल....
म्हणून तर अशी हि जीवघेणी शपथ घातलीस......
चूक कोणाचीही असेना का...
माझ्याबरोबर स्वतःलाही हि शिक्षा द्यायला निघालीस.....

कधी कधी वाटत....
आत्ता येउन तुला गाठाव...
मनात उठणारे हजारो प्रश्न तुला विचारावे....
पण तेही नाही जमत.....
तुझ्याइतकं नाही... पण म्हटलं निदान हे तरी आपण सहन करावे....

कधी कधी वाटत....
बर झालं निदान कवितेचा आधार आहे.....
पण असं कवितेतून बोलण आणि किती दिवस चालणार....?
Unknown नंबरवरून Call करायचे....
अशाने भेटीची ओढ आणखीनच नाही का वाढणार...?

कधी कधी वाटत....
मोडून टाकावी  हि शपथ....
आणि तडक तुझ्याकडे निघून यावं....
तुला घट्ट मिठी मारावी....
अन अगदी पोट भरून रडून.. मन मोकळ करावं.....

कधी कधी वाटत...
ज्या दिवशी शपथ घातली.. त्या दिवसापासूनचा हिशोब होता...
पण ६ कि ७.. गणित नक्की कुठे चुकतंय....
कशी म्हणावी हि रस्सीखेच...
जिथं माझ्या मायेचं माप नेहमी तुझ्याच बाजूला झुकतंय.....

कधी कधी वाटत.....
बाप्पाच्या त्याच मंदिरात....
माणसांच्या घोळक्यात अचानक समोर जेव्हा दिसशील.....
तेव्हा नजर चुकवून तशीच निघून जाशील...
की धावत माझ्या मिठीत येउन..... तूच तुझी शपथ मोडशील....

कधी कधी खरंच असं वाटत..... :)


- शिल्पा