Wednesday, March 27, 2013

"...."

Chating करताना हमखास वापरले जाणारे… अगदी  प्रत्येक वाक्यात येणारे… काहीच न बोलता बरच काही सांगून जाणारे हे " … " आपल्यातल्या प्रत्येकालाच नकळत लागलेली हि सवय… यांच्या शिवाय जणू आपलं वाक्यच पूर्ण होत नाही… :)


काय बर लपलेलं असत या "…" मध्ये?
काय बर सांगतात हे "…"
कशी बर असतात हि इवलीशी फुलं… ?

कधी Hi… सोबत गोड साद घालणारी…
तर कधी Hey… सोबत तितकाच गोड प्रतिसाद देणारी…
कधी Hhmm.... सोबत मूक संमती देणारी…
तर कधी Noo... सोबत थोडीशी नाराजी दाखवणारी…

बोलता बोलता कधी त्याच्यावर लटकेच रागावणारी…
तर कधी Sorryyyy… सोबत तिची मनधरणी करणारी…
कधी Bye... सोबत हळवा निरोप घेणारी… 
तर कधी GoodBye... सोबत कायमचा राम राम करणारी…. 

कधी कधी खूप काही अर्थ लपवणारी….
तर कधी अगदीच अर्थहीन वाटणारी…. 
कधी दूर गेलेल्या व्यक्तीला जवळ बोलावणारी… 
तर कधी जवळच्या माणसातल अंतर सांगणारी…. 

कधी व्याकूळ मनाची विरह व्यथा सांगणारी… 
तर कधी भेटीची ओढ व्यक्त करणारी… 
कवितेच्या प्रत्येक ओळीतला अर्थ वाढवणारी… 
न सांगता सगळं काही सांगून जाणारी….  

अगदी प्रत्येक वाक्यात By Default... येणारी… 
शब्दांशी खेळत खेळत खूप काही बोलणारी…. 
In short....
It's a communication between two  hearts...
A Lot To Say... with no more words....

- Shilpa
This one is dedicated to one of my best friends... :)

Tuesday, March 26, 2013

टिंग्या माझा शहाणा झालाय…

 
एक एक दिवस सरता सरता… 
बाळ माझा हळू हळू मोठा झालाय… 
Good Boy सारखा वागतो आता… 
टिंग्या माझा शहाणा झालाय…

रडत नाही बिलकुल आता… 
सकाळी आई ऑफिसला निघताना… 
गच्चीतून Bye Bye करत पाहतो… 
आईची गाडी भूर जाताना… 

सगळा खाऊ हातानेच खातो… 
आता नाही लागत भरवायला… 
नुसता संधी शोधत राहतो हिरो… 
आईला मागे मागे पळवायला… 

बाईंनी शिकवलेली सगळी गाणी… 
आता अगदी न चुकता म्हणतो… 
बाबांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं… 
अगदी त्यांना हवी तशीच देतो… 

संध्याकाळी आई आल्यावर… 
नेहमीसारखीच घट्ट मिठी मारतो… 
गोड गोड पापा देऊन… 
आईचा सगळा शीण क्षणात घालवतो… 

भूर फिरायला जाताना… 
आजीला उचलून घे म्हणत नाही… 
आईच्या गाडीवर पण मस्त उभा राहतो… 
घाबरत बिबरत आज्जीबात नाही…

आईच्या डोळ्यांत चुकून पाणी दिसलच… 
तर आता होत नाही कावरा बावरा… 
टिवल्या बावल्या करून हसवतो असा… 
आईच्या डोळ्यांत थेंब येतच नाही दुसरा… :)

सगळ्या कामात मदत ( लुडबुड ) करत… 
आई सोबत सगळी काम आवरतो… 
अन दिवसभर दमलेल्या आईला… 
रोज टिंग्याच अंगाई गाऊन निजवतो… 

- टिंग्याची आई… Love You Tingya...

Monday, March 25, 2013

टिंग्या ऐक ना रे…… टिंग्याला बर न्हवत तेव्हा ….

लास्ट वीकेंड टिंग्याला खूप बर न्हवत (मार्च १६-१७)…. खूपच जास्त वीक झाला होता टिंग्या माझा… जास्त खाणे नाही पिणे नाही अगदी उठत देखील न्हवता अंथरुणावरून… इतकं शांत शांत आम्ही सगळे त्याला पहिल्यांदाच बघत होतो…प्रत्येकाचा आपापल्या परीने त्याला हसवायचा… दोन घास भरवायचा… आणि खेळवायचा प्रयत्न सुरु होता… पण टिंग्या काही उठायला तयारच न्हवता…. :(
आज टिंग्याला बर वाटतंय… खेळायला सुरुवात झालीये….
म्हणूनच हे सगळ लिहायचं धाडस केलंय टिंग्याच्या आईने…. :)

अरे टिंग्या… सकाळ पासून मामा येऊन बसलाय….
बघ येताना तुझ्यासाठी वडापाव घेऊन आलाय….
जरा उठून थोडासातरी वडापाव खा ना रे…
हळूच आपल्या मामाला पप्पू म्हणून हाक मार ना रे ….

अरे मेघा काकीचा सकाळपासून दहा वेळा फोन आलाय…
चिनू दादा बघ कसा… तुझ्याकडे यायला रुसलाय…
त्याला घेऊन काकांना एकदा इकडे यायला सांग ना रे.….
दादा कधीचा हाक मारतोय… एकदातरी ओ दे ना रे….

कोल्हापूरच्या आज्जीची…. कंबर खूप दुखतेय….
तरीसुद्धा तुला बघायला येणारच… असं म्हणतेय…
फक्त एकदाच तिच्याशी फोनवर गप्पा मार ना रे…
लवकरच छान बरा होईन…  अस तिला सांग ना रे…

शीतल मावशी पण तिकडे…. तुझीच काळजी करत आहे…
सार्थक दादा तुला आपली नवीन सायकल देणार आहे….
डॉली ला घेऊन सायकलवरून फिरायला जाऊया म्हण ना रे…
म्हातारी आणि भोपळ्याची गोष्ट तिला पण एकदा सांग ना रे….

apple, banana, strawberry… आजोबांनी कित्ती काय काय आणलंय…
खात नाहीस काहीच… म्हणूनच आज्जीने छान उप्पीट बनवलंय…
अजून काय आणायचं तुला… उठून आजोबांना सांग ना रे…
आज्जीच्या मागे दडून… आईशी लपाछपी खेळ ना रे…

सांगितलंय बाबांनी… परत तुला कधीच ओरडणार नाहीत…
हवा तेवढा दंगा कर…. गप्प बस म्हणायचे नाहीत…
आता तरी ऊठ…. अन थोडासा दंगा कर ना रे….
बाबांची सगळी पुस्तकं खाली काढून…. तूच त्यांचा अभ्यास कर ना रे…

पापण्यांच्या काठावर साचलेलं पाणी मागे सारून… बघ आई कशी बळेच हसते….
जेवत-बिवत नाही बिलकुल…. नुसतीच तुझ्याकडे बघत बसते….
आईच्या हातचा मऊ मऊ वरण भात… थोडासा तरी खा ना रे….
तुझ्यातलाच एक घास…. तूच तिला भरव ना रे….

समोरच्या आज्जीनी संध्याकाळी… तुझी चांगली दृष्ट काढली…
मल्हारच्या आईने छान रामरक्षा म्हणून दाखवली….
तुझ्या आईच्या हाकेला…. आज श्री राम खरंच धावला रे.…
थोडंस का होईना बर वाटून…. आईच्या कुशीतून कित्ती गोड हसलास रे…

तू हसलास… आणि आईने डोळ्यातल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली…
खूप खूप पापी घेत… बघ कशी तुला घट्ट मिठी मारली….
पूस तिचे डोळे…. आणि पुन्हा एकदा तिला छान हसव ना रे….
आतुरलेत कान तिचे… फक्त एकदाच तिला मम्माई म्हणून हाक मार ना रे….

- टिंग्याची आई
देव बाप्पा परत कध्धी कध्धी माझ्या टिंग्याला असं आजारी पाडू नको ह… प्लीज… या वेळी संकष्टीला तुला एक मोदक जास्त देईन… :)

आई दुष्काळ म्हणजे काय ग…?


दुष्काळ दुष्काळ म्हणजे…
नक्की काय असतं ग आई… ?
पुस्तकातल्या एवढ्याशा धड्यात… 
खास काही समजलच नाही… 

काय उत्तर द्याव यावर… 
आईला क्षणभर काहीच सुचेनासं झालं…. 
नकळत आईच्या डोळ्यांत… 
टचकन पाणी आलं…. 

तरीही उत्तर दिलं… 
बाळ… दुष्काळ म्हणजे खरतर… 
शेतकऱ्याच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण… 
करपून जात नशीब ज्याचं… 
दुष्काळाचे चटके करताना सहन…. 

नदीच्या प्रत्येक थेंबासोबत… 
शेतकऱ्याच रक्तही आटतं… 
रखरखणार मोकळ आभाळ… 
पोराबाळांच्या डोळ्यांत दाटतं… 

भेगाळलेली कोरडी जमीन… 
नजर जाईल तिथवर पसरलेली…. 
वर्षानुवर्ष वाट पाहणारी म्हातारी आजी…. 
सुख काय असतं… नेमकं हेच विसरलेली…. 

अगदी थेंबभर पाण्यासाठी… 
तरसणारी एक एक घागर… 
कवा पावल माहित नाही तरीही…. 
देवीला न चुकता घातलेला कोरडाच जागर…. 

छातीवर दगड ठेऊन… 
रोजच कोंड्याची भाकर थापणारी आई… 
दुधापायी गेलेल्या वासरासाठी… 
गोठ्यात हंबरडा फोडणाऱ्या गाई… 

पावसाच्या एका थेंबासाठी तरसणारा… 
काळ्या मातीचा कण अन कण… 
रोज नव्या कर्जात बुडून… 
आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोचलेलं शेतकऱ्याच मन…. 

वर फाटक आभाळ… 
अन पायाखाली कोरडी धरणी… 
असाच काहीसा असतो हा दुष्काळ… 
आपलाच गुन्हा… का बर म्हणावी हि देवाची करणी…?

आई… थांबवता नाही का येणार हे… 
आपल्या लाडक्या बाप्पाला सांगून…?
बाळा… तोही आता थकलाय रे… 
आपली रोजची गार्हाणी ऐकून… 

थांबवायचं असेल हे सगळ…. 
तर आपणच पाऊल उचलायला हवं… 
त्यांचं दुखं आणि आपलं सुख… 
थोड थोड वाटून घ्यायला हवं… 
कण कण साठवून अन थेंब थेंब जिरवून…. 
या निसर्गाला पुन्हा वाचवायला हवं… 

- टिंग्याची आई 

Thursday, March 21, 2013

आज…टिंग्या आणि चिनू दादा भेटले…

लास्ट वीकेंड आम्ही काकीकडे रहायला गेलो होतो… तस बघायला गेलं तर बऱ्याच दिवसांनी भेट होत होती आमची आणि चिनू दादा आणि टिंग्याची सुद्धा… खूप मज्जा आली… आम्ही जशी या भेटीची वाट पाहत असतो तसंच हि पिल्लं सुद्धा एकमेकांची वाट पाहतात… :)
दादा आणि टिंग्याच्या फोनवरच्या गप्पा तर चालूच असतात पण आज त्यांनी एकत्र घालवलेला दिवस इथे रेखाटलाय टिंग्याच्या आईने… :)
 








खूप खूप दिवसांनी आज…
टिंग्या आणि चिनू दादा भेटले…
जणू चंद्र आणि सूर्य…
माझ्या अंगणी एकत्र उगवले…

एक एक करून सगळी खेळणी,
दादा टिंग्याला खेळायला देत होता…
(बाकी कोणाला हात सुद्धा लावू देत नाही बर का दादा…)
तर दादासाठी नेलेली बस अन कार घेऊन…
टिंग्या दादालाच खेळायला सांगत होता…

दुपारचा खाऊ खाताना… आपल्या ताटातली अर्धी चपाती…
दादाने टिंग्याला खायला दिली…
टिंग्याने पण आपली आवडती भाजी...
दादाला स्वतःच्या हाताने भरवली…

बागेत फिरायला जाताना आज…
काकीला दादानेच रस्ता दाखवला…
आज मम्माईला सोडून टिंग्याने…
फक्त दादाचाच हात होता धरला…

आपल्या भावाला कोणी त्रास देतंय का…
इकडेच दादाचं सगळ लक्ष होत…
बागेतल्या मोठाल्या पोरांना हे चिमुरड…
दादा बनून आज चक्क दम देत होत…

दिवसभर खेळून दमलेली पिल्ल…
एकमेकांच्या कुशीतच छान झोपी गेली…
आईच्या रोजच्या अंगाईची…
आज दोघांनाही गरज नाही लागली…

आज कळल… आम्हा मोठ्यांपेक्षा कितीतरी जास्त…
हि पाखरं या भेटीची वाट पाहत असतात…
समाधानाचे दोन थेंब... पापण्यांचा बांध ओलांडून.. आपसूक गालांवर सांडतात…
जेव्हा खूप दिवसांनी ही भावंडं अशी एकमेकांना भेटतात…

Love you Dear Chinu dada and Tingya..... :)
 - टिंग्याची आई

संपवलंस ना सगळंच…

गेल्या २-४ दिवसात एका मुलाने कंपनीत आत्महत्या केली…  हा प्रकार जगाला नवीन नाहीये… पण पहिल्यांदा डोक्यात येत ते म्हणजे… त्याने अस करायला नको होत.… प्रश्न सगळ्यांनाच असतात… कदाचित त्याचा प्रश्न खूपच गंभीर असेल, कदाचित सुटलाही असेल त्याच्या सोबत तो प्रश्न…. पण मागे उरलेल्या आई बाबांचं, बायको अन पोराच काय… त्यांचा खरच काही दोष होता का?
अनेक प्रश्न… सगळेच अनुत्तरीत…

शेवटी संपवलंस ना सगळंच…
अवघ्या एकाच क्षणात… 
सगळी गणित सोडवून मोकळा झालास… 
तूच लिहिलेल्या त्या शेवटच्या पानात… 

आयुष्याचा शेवट करून… 
तुझा प्रश्न तू निकालात काढलास… 
पण आयुष्यभर तुझ्यासाठी खपलेल्या बाबाचा… 
जाता जाता नेमका कणाच मोडलास… 

दोन ओळींची suicide नोट… 
त्यांच्या किती प्रश्नांची उत्तरं देईल… 
प्रश्न चिन्हानीच डबडबलेले डोळे… 
त्यांची आयुष्यभर साथ देतील… 

सोडून गेलास जिचा हात… 
तिचं तर सगळ आयुष्यच कोसळलंय… 
तुझ्या बरोबर पाहिलेलं तिचं एक एक स्वप्न… 
तिच्याच विश्वासाच्या झालेल्या मातीत मिसळलय…. 

तिच्या डोळ्यातला थेंब अन थेंब विचारतोय… 
का असा अर्ध्यावर सोडून गेलास… 
तिच्या आयुष्याचा एकमेव आधार… 
असा कसा न सांगता हिरावून नेलास…?

कुणी काय उत्तर द्यावं तूच सांग… 
पिल्लाच्या "बाबा कधी येणार?" या प्रश्नाला… 
कोण बर भरून काढेल आता… 
त्याच्या आयुष्यातल्या या पोकळीला…?

अगदी शेवटच्या क्षणापर्यंत… 
हा सगळा विचार केला असशील…. 
पण टाहो फोडणाऱ्या त्या आईला… 
आता सांग परत कसा रे दिसशील…?

खरच इतका अवघड होता प्रश्न?
उत्तर सापडलंच नसतं का?
तुझ्या संपलेल्या Difficult Life पेक्षा… 
आता घरच्यांचं आयुष्य खरंच सोप्प असेल का…?

वाटत.. तो एकच क्षण… 
तू स्वतःला सावरायला हवं होतंस… 
पिलाच्या चिमण्या डोळ्यांत… 
फक्त एकदाच डोकावायला हवं होतंस… 

तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं… 
अगदी त्याच क्षणी तुला मिळाली असती… 
Difficult का असेना पण सगळ्यांसोबत Life जगला असतास… 
कदाचित… 
बाप्पाच्या कृपेने तुझीसुद्धा नाव नक्कीच तरली असती…. 

- टिंग्याची आई
खरतर या गोष्टींचा बोलून आता काही उपयोग नाही पण तरीही… कुठेतरी हुरहूर आहे… त्याने असं करायला नको होत… 

Tuesday, March 19, 2013

A Trip to ZOOOOO... Ravivaaar 3/3/13

रविवार दिनांक ३ मार्च २०१३ आम्ही सगळे Zoo बघायला गेलो होतो…. काका काकी चिनू दादा… बाबा आणि टिंग्या अन टिंग्याची आई…. 
त्यावेळचा प्रसंग रेखाटण्याचा हा एक छोटासा प्रयत्न…. 
It was so much of fun..... :)
छान छान रंगीबेरंगी कपडे घालून
सकाळी सकाळी सगळे तयार झाले…
दोन Activa गाड्यांवर स्वार होऊन…
टिंग्या अन चिनू दादा ZOO बघायला निघाले…

एका गाडीवर काकी आणि मम्माई…
आणि दुसरीवर बाबा अन काका..
मध्ये बसलेले चिमुरडे युवराज म्हणती…
आई-बाबा जर सावकाश गाडी हाका….

एकदाचे पोहोचलो…. आता पुढची मजा…
सांबर, काळवीट, हरीण काहीही दिसो….
सगळ्यांना टिंग्या हरिणच म्हणत होता…
दुपारचं पोटभर खाऊन पिऊन…
वाघोबा निवांत झोपला होता…

मोठ्ठी मगर… खूप साप… अन छोटुस कासव…
आपापल्या जागी निवांत पडून होते…
आख्ख्या Zoo मध्ये कुठेच न्हवते तरी…
टिंग्याला ससा आणि उंदीर मामा दिसत होते…

भल मोठ्ठ एक अस्वल…
कोपऱ्यात एकटच रुसून बसलं होत…
आणि मंकीच एक छोटंस पिल्लू…
आपल्या आईच्या मागे मागे हिंडत होत…

थंडगार सावलीत दोन मोठे धूड हत्ती…
ऊस खात मस्त झुलत होते…
अन त्यांना पाहून पोरांचे चिमणे डोळे…
आनंदाने अगदी टच्च भरले होते…

एवढ्या दूर दूर चालून सुद्धा…
दादा आज्जीबात थकला नाही…
याच्या कडेवरून त्याच्या कडेवर करत…
टिंग्या हिरो… जरा सुद्धा चालला नाही…

उन्हातानाच पायी चालून चालून…
शेवटी सगळे खूपच दमले…
अर्धेच Alimals पाहून झाले तोवरच… (दादाचा नवीन शब्द)
काकांना… भर दुपारी चंद्र, सूर्य, तारे सगळेच एकदम दिसले…. :)

आता सगळ्यांना चांगलीच भूक लागली होती…
म्हणूनच लगेचच बाहेर पडलो…
पोरांच्या चेहऱ्यावर काठोकाठ भरलेला आनंद आणि
समाधानान भरलेली आमची मन सोबत घेऊन निघालो…

क्वचितच मिळणारा लाख मोलाचा हा आनंद…
मनाच्या गाभाऱ्यात खोलवर जपून ठेवलाय…
काका, काकी, मम्माई सगळ्यांनीच…
फेसबुकवर पिल्लांचा तोच हसरा फोटो लावलाय…
पुन्हा एकदा अशाच एका दिवसाची वाट पाहत…
आमच्यातला प्रत्येकजण… आपापल्या रुटीनला लागलाय…
Really Loved that Day... :)
- टिंग्याची आई

Monday, March 18, 2013

टिंग्याच्या शाळेत जाऊन बसावं….

टिंग्याच्या शाळेत जाऊन बसावं…. Love you टिंग्या…
काल संध्याकाळी टिंग्या आपली छोटीशी स्कूल bag आवरत बसला होता… काहीतरी भरायचं पुन्हा काढायचं असा खेळ चालू होता… आई बघत होती लक्ष देऊन काय चाललंय साहेबांचं… शाळेला जायची तयारी….  आणि तेव्हाच हे काहीतरी सुचलेलं… :)
पहा कसं वाटतंय तुम्हाला… हलक फुलक… टिंग्या सारखंच स्वीट स्वीट… :)


नाही होय करत करत…
टिंग्या एकदाचा शाळेत जायला लागलाय…
छोट्या छोट्या गमती जमतीमध्ये…
आता खूप चांगला रमलाय…

कधी कधी आईला उगाचच वाटत…
आपणही टिंग्याच्या शाळेत जाऊन बसावं…
त्याचीच छोटीशी सवंगडी बनून…
त्याच्याशी अडम तडम खेळावं…

चिऊ काऊ… ससा अन कासव…
बाई रोज नवी गोष्ट सांगत असतील…
गोष्टीतले सगळे प्राणी पक्षी…
भोवती फेर धरून नाचत असतील…

बाईंच्या समोर टिंग्या माझा…
कसा शहाण्यासारखा वागत असेल…
एखाद खेळण कुणी दिलं नाही…
तर मस्त ढिश्शुम ढिश्शुम करत असेल…

घरात तर खूप गप्पा चालू असतात…
शाळेतपण असाच पोपटासारखा बोलतो का?
मम्माईची आठवण आली म्हणून…
अचानक कावरा बावरा होतो का?

काय करत असेल? कसा खेळत असेल?
कित्ती प्रश्नांचा आई उगीचच विचार करत बसते…
संध्याकाळी ऑफिसमधून आल्या आल्या…
डायरीत याच प्रश्नांची उत्तरं शोधत असते…
(टिंग्याच्या शाळेत रोज बाई डायरीत लिहितात काय काय केल ते दिवसभर…)

टिंग्या हळू हळू मोठा होताना…
आईला त्याच्या इतक लहान व्हावसं वाटतंय…
चिमण्या डोळ्यातलं चिमण स्वप्न…
तिला एकदा स्वतः जगावस वाटतंय…

आई म्हणे… एक एक पायरी चढत…
टिंग्या एक दिवस खूप मोठा होईल…
मम्माईच्या कुशीतून हळुवार निघून…
मोकळ्या आकाशात उंच भरारी घेईल….
त्यावेळी सुद्धा…. मम्माई अशीच भरल्या डोळ्यान… त्याच्याकडे कौतुकाने पाहील…
Love you Tingya... :)

- टिंग्याची आई

पानगळ सुरु झालीये…


जुने मित्र… जुन्या आठवणी….
का कुणास ठाऊक…. आता सगळ्यांनाच नको वाटायला लागलंय….
मित्रांचं असनही कधी कधी मित्रांनाच खुपायला लागलंय……
मित्रत्वाच्या विश्वासाची साउली हळू हळू विरळ होत चाललीये……
कुठेतरी जाणवतंय… मैत्रीची पानगळ सुरु झालीये…

आपली परकी सगळीच नाती…
जितकी जवळची तितकीच नकोशी वाटू लागली आहेत…
गळ्याभोवतीचे मायेचे हातच… पाठीत खंजीर खुपसत आहेत…
कधी काळी घट्ट विणलेली ही वीण… हळू हळू सुटत चाललीए…
दुरावलेलं मन म्हणतंय…. नात्यामधेही पानगळ सुरु झालीये…

पडणार्याला सावरणारा हात…
आजकाल अगदीच दुर्मिळ होत चाललाय…
या स्वार्थी दुनियेच्या पाशात प्रत्येकजण गुरफटत चाललाय…
माणसा-माणसातली ओढ… जरा कमी होत चाललीये…
पावलो पावली जाणवतंय… माणुसकीची पानगळ सुरु झालीये…

प्रेमात घेतल्या जाणाऱ्या आणा-भाका…
आता कोणासाठीही इतक्या Matter करत नाहीत….
साता-जन्माच्या शपथा…. आता इथे कोणालाच रुचत नाहीत…
कोणाच्याही प्रेमाविना जगायची… लोकांना सवय होत चाललीये…
क्षणा क्षणाला जाणवतंय…. प्रीतीची पानगळ सुरु झालीये…

आईची माया… बाबाचं प्रेम…
आजच्या या career oriented जगात कुठेतरी हरवत चाललंय…
या मायेविना त्यांच चिमणं बाळ दिशाहीन भरकटत निघालंय…
म्हातारी आई सुद्धा तिच्या पोटच्या लेकरांना आज जड झालीये…
तिच्या डोळ्यातलं पाणी म्हणतंय… माया-ममतेची पानगळ सुरु झालीये…

एक एक करून हि सगळी पान गळतील…
तेव्हाच तर तिथे एखादी नवी पालवी येईल…
नव्या कोऱ्या पालाविसोबत एक नवी आशा जन्म घेईल…
कित्येक व्याकूळ जीवांची प्रार्थना… आत्ता कुठे बाप्पाने ऐकलीए…
एका नव्या विश्वाची निर्मिती करायलाच कदाचित…. बाप्पानेच ही पानगळ सुरु केलीये…….

- टिंग्याची आई
Inspiration :- सध्या सुरु असलेली खऱ्याखुऱ्या पानांची पानगळ… :)

Thursday, March 14, 2013

आई….

आईची मुलं हळू हळू मोठी होतात… स्वतः आई बाबा बनतात… लेक तिच्या सासरी संसारात गुंतलेली असते तर चिरंजीव आपल्या मुला बाळामध्ये रमलेले असतात… आईलाही हे काही नवीन नसतं…. आणि आईवरच प्रेमही कधी कमी झालेलं असत असही नाही… पण वाटतंय कुठेतरी आईसाठी एखादा दिवस काढावासा वाटतो… तिच्यासोबत एक रम्य संध्याकाळ घालवाविशी वाटते…. बघू कधी जमतंय… :)



सगळ्यात प्रिय व्यक्ती म्हटलं… 
कि पहिल्यांदा आठवते ती आई… 
पण आजच्या धावपळीच्या आयुष्यात… 
बघ जरा… आई कुठे हरवली तर नाही… ?





पाहिलंय का कधी तिच्या… त्या दोन निस्वार्थी डोळ्यांत… 
कुरवाळलेत का कधी… तिचे सुरकुतलेले हात… 
जाणवलीये का कधी वाढलेली … तिच्या आवाजातली थरथर … 
घातलीये कधी नेहमीप्रमाणे विसरलेली… रात्री चादर तिच्या अंगावर… ?

खटकलीये का कधी तिच्या… दातांची उठणारी पंगत… ?
हल्ली सगळीच काम होतात तिची… थोडी थांबत थांबत… 
चमकलाय कधी डोळ्यासमोर… तिच्या केसांतला वाढता पांढरेपणा… 
काही सांगून गेलाय का… तिचा किंचित वाकलेला कणा…?

आठवतंय कधी नेली होती…तिच्यासाठी तिची आवडती भेळ… 
कधी खेळला होतास निवांत बसून… तोच जुना ५-३-२ चा खेळ…
कधी बर दाबली होतीस… तिची रोजचीच दुखरी कंबर… 

गेल्याच आठवड्यात वाढलाय… तिच्या चष्म्याचा नंबर…. 

अगदी आजही आवडते ना…  तिच्या हातच्या मेथीची टेस्ट… 
का बर कोणी न्हवतं सोबत… जेव्हा होती तिची मोठी MR ची टेस्ट… :(
भरलीये कधी Vaselline ने… तिच्या टाचेतली ती खोल भेग… 
दिवसेंदिवस वाढत चाललीये… तिच्या चेहऱ्यावर एक एक रेघ… 

कधी मारली होती आठवतंय… तिला धावत जाऊन घट्ट मिठी… ?
हात हातात घेऊन चालला होतास… बाजूला ठेऊन तिची ती काठी…. ?
Account मध्ये Transfer न करता… कधी ठेवलेत पैसे स्वतः तिच्या हातात…. 
फक्त एखादीच नोट काढून घेईल… उरलेले ठेवेल पुन्हा तुझ्याच खिशात…. 

ऑफिसमधून जरा लवकर जाऊन… 
आज आईला एकदा भेटून बघ…. 
आजची एक छान संध्याकाळ…
तुझ्या प्रिय आईसाठी जग…. :)

- टिंग्याची आई
I Love You Mummy... :)

Wednesday, March 13, 2013

मैत्रीण…

कशी असते एका मित्रासाठी एखादी जवळची मैत्रीण…. मित्रांच्या लेखणीतून अलगद कागदावर उतरलेली मैत्रीण अशीच असेल कदाचित….
कशी असते बर मैत्रीण…?
आईच्या मायेने तुम्हाला कुशीत घेणारी… 
वेळ पडली तर चार गोष्टी सुद्धा सुनावणारी… 
तुमचं मन मोकळ होईपर्यंत… प्रत्येक गोष्ट ऐकणारी… 
खांदा ओलाचिंब होईपर्यंत… तुमचा एक एक अश्रू झेलणारी… 

प्रत्येक वेळी न सांगता पाठीशी उभी राहणारी… 
येणारा प्रत्येक वार… तुमच्या आधी स्वतःवर घेणारी… 
अगदी आठवणीने…  तुमची विचारपूस करणारी… 
तुमच्यासाठी कधी कधी छान कविता देखिल करणारी… 

तुमचं Top Secrete मनात खोलवर जपून ठेवणारी… 
थरथरणाऱ्या शब्दांना… आत्मविश्वासाची धार देणारी… 
पापण्यांमध्ये दडलेले दोन थेंब अचूक वेधणारी… 
तुमच्या स्वप्नांमध्ये अगदी तुमच्या इतकीच रमणारी… 

कधी ताई बनून तुमची कान उघडणी करणारी… 
तर कधी आई बनून सगळे गुन्हे पोटात घालणारी… 
न कंटाळता रात्र रात्र तुमच्याशी गप्पा मारणारी… 
तुमची एखादी प्रिय वस्तू हक्कानं मागणारी… 

आयुष्यातल्या कितीतरी महत्वाच्या क्षणांचा भाग बनणारी… 
तर एखाद्या क्षणी अगदी नकोशी वाटणारी… 
चांगलं वाईट सगळंच अगदी आनंदाने स्वीकारणारी…
कोणतीही अपेक्षा न ठेवता अखंड साथ देणारी… 

देव्हाऱ्यातल्या नंदादिपासारखी…  मैत्रीसाठी शांतपणे तेवणारी…. 
जरी दूर गेली असली… तरी पावलोपावली आठवणारी… 
तुटलं जरी नात… तरीही दोर घट्ट धरून ठेवणारी… 
सुटत चाललेली वीण सुद्धा… अगदी आयुष्यभर सांभाळणारी… 
अशीच असते ना एखादी जवळची मैत्रीण… ??

- शिल्पा 
Dedicated to all my dear friends..... :) Thank You All for being part of my life... 

Sunday, March 10, 2013

आईचा बर्थ'डे… :-)

एका पिल्लाच्या आईचा बडे होता परवा…. बाबा अजूनही onsite च्या गावालाच आहेत…  पण मस्त केक पाठवला होता त्यांनी…. म्हणूनच अजून मस्त Celebrate झाला आईचा बडे…. 
 
आज सकाळपासूनच माझी आई…
भलतीच खुश खुश आहे…
आज ना माझ्या dear आईचा…
Happy वाला B'Day आहे…

न सांगता आज मोठा काका…
भला मोठ्ठा केक घेऊन घरी आला…
काका आणि घरच्या सगळ्यांना मनस्कार करून…
मगच आईने तो केक हातात घेतला…

आपल्या "सौ" चा बडे म्हटल्यावर…
बाबानेही तिच्यासाठी स्वीट स्वीट केक पाठवला…
तो पाहून आईच्या चेहऱ्यावर एक मोठ्ठी Smile आली…
जणू बाबा स्वतःच घरी परत आला…

दिवसभर LATPOT वर आज…
आईला सगळेच wish करत होते…
New New फोन तुडूंब भरेपर्यंत…
बडे चे मेसेज आईला येत होते…

दिवसभर इतक्या सगळ्या Wishes…
तरीही आई कोणाचीतरी वाट पाहत होती…
कदाचित तीच ती तिची एकटीच "प्रिय…" मैत्रीण…
आईचा नंबर नुसताच डायल करून… पुन्हा तसाच ठेऊन देत होती…

आज सगळ्यांनी काही न काही गिफ्ट दिलं…
पण आई… मी ग तुला काय देऊ?
बाबा सारखा मी मोठ्ठा होईपर्यंत…
एक घट्ट मिठी… आणि हन्ड्रेड गोड गोड पापे देऊ?  चालेल ना तुला?

आई… बाप्पाकडे माझं एक छोटुस मागण आहे…
बाबा सोबत असताना असते अगदी तश्शी…
माझी आई रोजच अशी  हसत राहू देत…
तिची आवडती सगळी माणस तिला लवकर भेटू देत…
मग हवतर तिचा Happy वाला  B'Day रोज रोज येऊ देत….  :)

Happy Birth Day Dear...
:)

- टिंग्याची आई

मी अजून त्या पिल्लाला पाहिलं नाहीये प्रत्यक्ष पण वाटत कुठेतरी जोडलेलो आहोत एका अनोळखी नात्याने… म्हणूनच हे लिहायचा प्रयत्न…