Wednesday, April 29, 2015

गाडी कि सर्विसिंग…

मेरी एक प्यारीसी दोस्त है स्नेहा... कुछ हफ्ते पहले किसी काम से वो मेरी गाड़ी ले गयी थी... तब उसने मेरी गाड़ी की हालत देखी... काफी टाइम से सर्विसिंग न करने की वजहसे उसकी हालत थोड़ी बिगड़ गयी थी... क्या करे यार हम मम्मी लोग को घर के कामकाज से फुर्सत मिले तब ये सब काम हो न... :( 
एक दो हफ्ते बाद... वीकेंड पे स्नेहा ने फिर से गाड़ी मांगी और बोला की कुछ काम है... मैंने सोचा यार होगा कुछ काम... तो मैंने देदी अपनी गाड़ी...
पता है लड़की ने क्या किया??????? 
मुझे बिना बताये मेरी गाड़ी की मस्त सर्विसिंग करायी... एकदम चमका दिया गाड़ी को और वापस देके चली गयी... मुझे बिलकुल अंदाजा नहीं था की लड़की ऐसा कुछ करेगी... थोड़ा गुस्सा आया... थोड़ा बुरा लगा... और बहुत अच्छा भी लगा... :) गुस्सा इसलिए के मेरे लिए इतना कुछ क्यों कर दिया.... ;)
Anyways... तो मेरी प्यारी गाड़ी के लिए कुछ लिख डाला मैंने :)
क्या यार स्नेहा... ये तूने क्या कर दिया...?
बिना मुझे बताए... मेरी गाड़ी का सर्विसिंग करा दिया...
पिछले एक महीने से... मैंभी यही सोच रही थी...
इसी चक्कर में मेरी गाड़ी... मुझसे थोड़ा रूठ भी गयी थी...
 
मेरी तरह इसके भी... दो चार स्क्रू ढीले हो गए थे...
बिना बदले टायर भी... इतने सालोंसे चल रहे थे...
कभी कभी बंद हो जाती... पर अबतक अच्छा साथ निभाया है...
मेरा हर छोटा बड़ा काम... इसकी वजह से पूरा होता आया है...
खुद की तरह इसका भी... थोड़ा काम ही ख़याल रखती थी...
अपनी मालकिन की तरह... इसको भी अब आदत सी हो गयी थी... 

यार... उसके टूटे फाइबर से... मस्त खड़खड़ आवाज आती थी...
हिंजवडी-माण गाँव के रस्ते की... हम दोनों को आदत हो चुकी थी...
ब्रेक का इस्तेमाल तो... मैं वैसे भी नहीं करती थी...
लगते ही नहीं थे दोनों... तो गाड़ी अपने आप ही सँभाल लेती थी...
पॉलिश तो दूर की बात... यहाँ ऑइल भी कभी कबार ही चेंज होता है...
साल में सिर्फ एकहि बार... दशहरेपे ही इसका स्नान होता है...

पर जब से तूने सर्विसिंग करायी है... इसका तो अंदाज ही बदल गया है...
सरासर मुझे पेहचानने से... इसने इन्कार कर दिया है... :(
बस एक मेक ओव्हर से
... ये इतना अकड़ गयी है...
मुझ बिचारी मलकिनको... बिलकुल भाव ही नहीं दे रही है... :(

क्यूँ न रूठे वो मुझसे... मैं ख़याल ही नहीं रखती हूँ...
अब आगे से ऐसा नहीं होगा... यह प्रॉमिस आज करती हूँ... :)
अब तो हर क़्वार्टर के बोनस के साथ... इसकी सर्विसिंग जरूर होगी...
वीक में एक बार तो... अपनी गाड़ी चमक उठेगी...

६ साल में ३६ हजार किलोमीटर... इसने इतना साथ निभाया है...
हर मुश्किल रस्ते को... मंजिल से मिलाया है...
ऐसेही हमें... और कई सालों तक साथ चलना है...
अपने साथ साथ मुझे... गाड़ी का भी अछेसे ख़याल रखना है... :)
Sneha..You made me realize... I must take care of my Gadi...
Only because of her... Shilpa is EverReady.... :)

Thanks so much My Dear Gadi... :)

- टिंग्याची आई 
कधी कधी वाटतं… नशीब या पोरीने माझी कॉलेज टाईम ची गाडी नाही पाहिली… नाहीतर न सांगता माझ्या दारात नवीकोरी Activa उभी केली असती हिने…. :);)

Wednesday, April 8, 2015

सावली…

मुक्ता बर्वेची एक कविता आहे "साऊली…" त्यात ती स्वतःच्या सावलीला सांगते कि "तू थोडी सुट्टी घे मला एकटीला रहायचंय कारण माझा स्वतःचा शोध सुरु आहे…."
मस्त आहे… आवडते मला तिची हि कविता…. 
तर यावरूनच सुचलेली माझी हि कविता…. 
मीही माझ्या सावलीला सुट्टी घे असं सांगतेय पण काही केल्या ती मला सोडून जायला तयार नाहीये…. ती शेवटपर्यंत माझ्या सोबतच राहील एखाद्या जिवलग मैत्रिणीसारखी… :)
मुक्ताच्या कवितेला कोणत्याही प्रकारे विरोध करायचा नाहीये मला… 
हा आणखी एक वेगळा विचार मांडलाय इतकच…
एक दिवस म्हटलं माझ्याच सावलीला… 
तू सुट्टी घे ग थोडे दिवस… मला माझाच शोध घ्यायचाय… 
हरवलेला "स्व" पुन्हा एकदा शोधून आणायचाय… 
इतकी वर्षं माझ्या सोबत फिरतेस… कंटाळली असशील तूही मला…
हरकत नाही सोडून जायला… त्याची आता जणू सवय झालीये मला…
सुख, दुःख, हसू, रडू… अगदी प्रत्येक क्षणी मला साथ दिलीस…
माणसांच्या गर्दीत जेव्हा एकटी होते… तेव्हा तूच माझ्या सोबत होतीस…
पण आज तू जा… 
करू देत शोध एकटीलाच… अनंतापर्यंत…. 
वाटलं होतं इतकं सांगितल्यावर जाईल मला सोडून ती… 
पण छे… अजूनही तिथेच होती ती… 
माझ्या अस्तित्वाला चिकटलेली… 
मग आणखी एकदा सांगून पाहिलं… दूर झटकून पाहिलं…
पण ती अजूनही तशीच… 
एका नको असलेल्या आठवणीसारखी… नको म्हटलं तरी आठवत राहणारी… 
जुन्याच एका जखमेसारखी… आजही क्षणोक्षणी ठणकणारी…. 

शेवटचा पर्याय म्हणून… 
स्वतःभोवती मीच घोर अंधार करून घेतला…
अस्तित्वाचा कण न कण काळोखात झाकून टाकला…
सावलीवर आणि स्वतःवर… विजय मिळाल्याचा आभासही करून घेतला… 
पण….
कुठूनसा एक किरण धाव घेत आला…
पुन्हा एकदा माझ्या सावलीवर प्रकाशझोत टाकून गेला… 
ती होती… आहे तिथेच होती… 
मला सोडून ती कधी गेलीच न्हवती… 

तेव्हा जाणवलं…. 
माझा "स्व" तर माझ्या सावलीतच दडलाय…
आणि मी मात्र त्याला शोधण्याचा खेळ मांडलाय… :)
या सावलीनेच तर मला जगायला शिकवलंय…
कधी मोठं तर कधी स्वतापेक्षा छोटं व्हायला शिकवलंय… :)
तिच्याशिवाय माझा हा शोध… कदाचित पूर्ण झाला नसता…
हरवलेल्या "स्व"चा… कधीच माग सापडला नसता….  

त्या दिवसापासून… 
सावलीच माझी खास मैत्रीण झाली आहे…
या जुन्या मैत्रिणीशी पुन्हा एकदा गट्टी जमली आहे…
Thanks for always being with me Dear Shadow... :)
- टिंग्याची आई

Saturday, April 4, 2015

लाडकं घर….

माझ्या एक ताई आहेत… त्यांचं नावही शिल्पा आहे…
त्यांचं नागपूरला एक छानसं घर होतं… शिल्पाचं लग्न झाल्यावर ती पुण्याला शिफ्ट झाली आणि आई बाबा नागपूरलाच…. काही वर्षांनी बाप्पाच्या आशीर्वादाने तिला दोन गोंडस जुळ्या मुली झाल्या… पोरींच्या पायाने सुख घरात धावू लागलं… पण दोघींना एकत्र सांभाळणं कठीण होऊ लागलं तेव्हा आई-बाबा दोघांनाही पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं आणि नागपूरच घर एकटं पडलं… १-२ वर्षांनी घर विकायचा अवघड निर्णय घेतला गेला… कठीण होतं पण शेवटी निर्णय घेतला आणि एका बिल्डरला जागा विकून टाकली…
अवघ्या काही महिन्यातच त्या घराच्या जागी एक टॉवर उभा राहिला… तेव्हा शिल्पाने त्याचा फोटो फेसबुकवर शेयर केला होता… आणि आता त्या ठिकाणी आपलं घर आणि त्यातल्या आठवणी नसल्याची खंत व्यक्त केली होती…
त्यावरूनच सुचलेलं हे काहीतरी… माझ्याच मनातले विचार… कोकणातलं घर imagine करून लिहिलंय…
 
इथे… हो इथेच होतं… माझं लाडकं घर…
या टॉवर खाली आता नाहीसं झालंय… माझं लाडकं घर…

आम्हा भावंडांचा जन्म… याच वास्तूत झाला होता…
आमच्या प्रत्येक सुखानेही… इथेच जन्म घेतला होता…
भलं मोठ अंगण… भोवतीचं ते काटेरी कुंपण…
मधोमध उभं असायचं… तुळशीचं छानसं वृंदावन…
पकडापकडी, भातुकली… कितीतरी खेळ इथे रंगायचे…
जीवापाड प्रेम करणारे बहिण-भाऊ… जीव तोडून एकमेकांशी भांडायचे…
लाडक्या लेकीच्या लग्नाचा कळस… याच अंगणात मांडला होता…
मुलीची पाठवणी करताना… इथेच बाबा ढसाढसा रडला होता…

बैठकीची जागा म्हणजे… आमच्या गप्पांचा अड्डा होता…
सगळं टेन्शन विसरायला लावणारा… भावनांचा कट्टा होता…
स्वैपाक घर तरी जणू… अन्नपूर्णेच मंदिरच दिसायचं…
आईच्या हातचं मधुर जेवण… देवीच्या प्रसादासारखंच लागायचं…
कपाटातली सगळीच भांडी… नेहमी लख्ख चकाकणारी…
खास होती लिंपलेली चूल आणि तिच्यावरची भाकरी…
परसदाराला सुगंधित करायचा… सडा सुगंधी जाईचा…
फक्त तिच्याच गजऱ्याने नटायचा… अंबाडा माझ्या आईचा…
गर्द सावली देणारं होतं… भलं थोरलं पळसाच झाड…
शेजारी अमृताच्या गोडीने भरलेल पाणी देणारा आड…
तिथे जवळच होती… माझी फेवरेट जागा बसायची…
आज पूर्ण झालेली बरीच स्वप्न… मी तिथेच बसून पहायची…
 
आई-बाबांची नीटनेटकी… तर आमची सदा विस्कटलेली खोली…
पायाला अन मनालाही गारवा देणारी… पायाखालची जमीन ओली…
आम्ही घरच्यांनीच रंगवलेल्या… मोठाल्या मातीच्या भिंती…
त्यावर उठून  दिसायच्या… आजीनं नुसत्या चुन्याने काढलेल्या कलाकृती…
जुन्या आठवणींनी गच्च भरलेली… माळ्यावरची अडगळ…
घराला अन घरातल्या माणसांना… सावली देणारं कौलारू छप्पर…
अंधुकशा प्रकाशात… आशेचा रोज नवा किरण दिसायचा…
सुख असो वा दुःख… इथे येणारा प्रत्येकजण तृप्त असायचा…
छोटसच होतं पण आठवणींनी गच्च भरलेलं…
नुसत्या दगड मातीने न्हवे… तर हळव्या भावनांनी बांधलेलं…
 
आयुष्यातले बरेच चढ-उतार… या घराच्या साथीनेच पार पडले…
अन अशाच एका क्षणी आम्ही पुढे निघून आलो… अन घर मात्र मागे एकटे पडले…
आलीच होती नड अशी… म्हणून घराचा व्यवहार केला…
काळजावर दगड ठेऊन… लाडक्या घराला कायमचा निरोप दिला…
 
माझं घर हरवलं… आता तिथे मोठ्ठा टॉवर झालाय…
डोळेभरून आठवणी आणि जीवाला बोचणी लावून गेलाय…
निदान एकतरी आठवण सापडेल… म्हणून सारा टॉवर हिंडून पाहिला…
थकल्या मनाला सावली द्यायला… तो पळस सुद्धा न्हवता राहिला… 
या घराने आमच्यासोबत… सुख-दुःखाचे अनेक फेर धरले…
आता फक्त त्याचे प्रतिबिंब… पापण्यांमधल्या पाण्यावर उमटले…
आलीच आठवण घराची… तर आता आईच्या कुशीत डोकं ठेवते…
अन तिच्या पदराच्या छायेत… पुन्हा घराची ऊब गवसते…
घराची एक एक आठवण… माझी पावलोपावली सोबत करतेय…
आता माझ्या पिल्लांच्या सोबतीने… मी एका नव्या घराला आकार देतेय…
:)
Miss you my dear ladak ghar... 

-टिंग्याची आई
Specially Dedicated to dear Shilpa Page and her Family... :)

Wednesday, April 1, 2015

कांचन… तुस्सी जा रहे हो??? :(

कांचन… आमच्या महिला मंडळाची (म्हणजे infy मधला ग्रुप :) एक महत्वाची सदस्य…. माझ्या आणखी एका कवितेत तुम्हाला आधीच भेटली आहे… "आज ती सहज म्हणून गेली…"
त्यावेळी ती कंपनी सोडून गेली होती… आणि आज तर ती देश सोडून निघाली आहे…. एका नव्या देशात म्हणजे ऑस्ट्रेलिया मध्ये बस्तान बसवायला…. तब्बल १० वर्षांसाठी… म्हणून जरा जास्त वाईट वाटतंय… 
आता महिला मंडळ तसं विखुरलेलंच आहे म्हणा… हिंजवडीच्या चार ठिकाणी चौघींच्या कंपनी असल्या तरी हमी होती कि २-३ महिन्यातून एकदा का होईना सगळ्या भेटून मस्त दंगा मस्ती करू…. पण आता जरी भेटलो तरी कांचन शिवाय इतकी मजा येणं थोडं कठीणच…. :)

ती निघालीये… म्हणून तिच्यासाठी हि कविता आम्हा सगळ्यांकडून… 
Just to say…. "नको ना जाऊ म्हशे…. !!!"
कानपाट… (कांचन पाटील म्हणून कानपाट :)
निघालीस एकदाची… या गरीब देशाला आणि आम्हाला सगळ्यांना सोडून…?
तिकडे जाऊन त्या ऑस्ट्रेलिया वाल्यांना त्रास द्यायला…?? 
(आम्ही सुटलो एकदाचे… ;)
कंपनी सोडून गेली होतीस… तेव्हाही तसं खूप वाईट वाटलं होतं…
पण तरीसुद्धा त्रास देतच राहशील… हे तेव्हा आम्हाला ठाऊक न्हवतं… ;)
ऑस्ट्रेलियाचं गुणगान गाता गाता… आख्खं वर्ष निघून गेलं…
आणि बघता बघता तुझं विमान… सिंहगड रोडवर येऊन पोचलं…
गेलं एक वर्ष… तसं सोबत न्हवतोच आपण सगळ्याजणी…
पण जितक्या वेळा भेटलो… तेव्हा मज्जा केली एकदम येड्यावाणी…
आज भेटतोय… खर तर तू जाणार आहेस म्हणून…
निदान आता तरी पार्टी देशील… ऑस्ट्रेलिया वारीचं निमित्त म्हणून… :p 
हिंजवडीच्या चार कोपऱ्यात… जरी चौघींच्या चार कंपनी असतील…
तरी मनांना जोडणारे बंध… ऑस्ट्रेलियाला गेलीस तरी असेच घट्ट राहतील…

आज पुन्हा विचारते… 
आता ऑनलाईन शॉपिंग करायला आम्हाला कोण शिकवणार…?
इंग्लिश+मराठी+हिंदी सगळं मिक्स एकदम confidently ते पण फास्ट कोण बोलणार…?
अन हे असलं बोलणं करेक्ट कळणारी मी आता सगळ्यांपुढे कशी मिरवणार…?
माझ्या Manager ला आणि मला ढीगभर शिव्या कोण घालणार…?
अरुणच अजूनही गावठीच असलेलं इंग्लिश कोण ग सुधारणार…?
माझ्या सोबत डबल सीट बसून माझ्या बिचाऱ्या गाडीला कोण बर त्रास देणार…?
तू कितीही बारीक(…??) झालीस तरी आम्ही जाडी म्हणून कोणाला चिडवणार…?
दर महिन्याला भेटायचा आणि पार्टीचा बेत कोण आखणार…?
फक्त आठवण आली म्हणून काहीही करून येच अशी हक्कानं मला कोण हाक मारणार…? :(
(तू लाख म्हणशील ग पण आता ते मला परवडायला नको का… ;)

असो…. आमचं पोरींचं आपलं असंच चालायचं…
ग्रुप मध्ये कुणी यायचं तर कुणी असं निघायचं…
पण तुझ्यासारखी भन्नाट पोरगी परत सापडणं कठीणच आहे…
तरीही तुझ्यासारखीच एखादी पोरगी ग्रुपमध्ये यावी अशीच आमची इच्छा आहे…

प्रश्न फक्त एकच पडतो… 
दहा वर्षांनंतर…………………
१० किलोने वाढलेली कांचन दिसेल कि १० generations पुढची कांचन आम्हाला भेटेल….?? :)

बाकी काहीही असो…. 
कुठेही गेलीस तरी तू अगदी अशीच रहावी… (कारण तू सुधारणार नाहीस आम्हाला माहितीये ;)
आमची लाडकी म्हैस नेहमी खुश असावी… 

जा कांचन जा… जीले अपनी जिंदगी…. 
Will miss you a lot KanPat..... Love you so much...
- टिंग्याची आई आणि महिला मंडळ मेम्बरं मधुरा, पारो….