Wednesday, June 24, 2015

वाईट वाटत तुझ्याकडे बघून....

संध्याकाळी जेमतेम सातची वेळ होती... 
ऑफीसमधून निघायची तिची धडपड सुरू होती...
नेहमीप्रमाणे आजही कॉल थोडा जास्त वेळ चालला... 
घरी वेळेत निघायचा, तिचा नेम चुकला...
घड्याळाच्या सरकत्या काट्यासोबत तिची चलबिचल वाढत होती...
कसही करून साटकायची तिची धडपड चालूच होती...
"I have to leave" अस... Onsite ला एकदा दोनदा सांगून झाल...
"बस चुकेल माझी..." उगीच खोटसुद्धा बोलून पाहिल...
तिची ही सगळी धावपळ... तिचा मित्र शांतपणे बघत होता...
तिच्या डोळ्यातल असहायपण... तो मूकपणे अनुभवत होता...
स्वताच मधे पडून... त्याने कॉल कसाबसा संपवून टाकला...
घरट्यात परतायला अधीर् तिने... सुटकेचा निश्वास टाकला...
"वाईट वाटत तुझ्याकडे बघून..." तो न राहवून म्हणाला...
"नाही वाटत मला..." तिने हसतच रिप्लाइ केला... 
का करतेस इतकी घाई...? घरच्यांना सांगत का नाहीस...?
I.T. च्या जगात चालत अस... म्हणून समजावत का नाहीस...?
घर-ऑफीस सांभळतेस... मग तुलाही समजून घेतलच पाहिजे...
घड्याळाच्या काट्याच बंधन... थोड तरी शिथिल केल पाहिजे...
नुसतीच हसत होती... बाकी तिची गडबड सुरुच होती...
पार्किंगच्या दिशेने... ती झपाझप पावल टाकत होती...
काही क्षण शांततेत गेले... मग तीच स्वतःहून बोलली...
मनात साठवून ठेवलेल काहीतरी... सहजच सांगून गेली...

अरे उशीर झाला मला की घरच्यांना काळजी लागते...
मी सुखरूप पोहचावे फक्त एवढीच त्यांची इच्छा असते...

सासर्‍यांच्या दारापर्यंत... निदान दहा फेर्‍या होतात...
मी घरी पोहोचेपर्यंत... त्या तशाच चालू असतात...
जमेल तस हळूहळू... सासूबाई सगळा स्वैपाक करतात...
दिवसभर कंटाळून... गप्पा मारायला माझी वाट बघतात...
कधी येणार आई...? म्हणत पिल्लू सुद्धा दाराशी वाट पाहतो...
अन खेळण्याच्या नादात... वाट पाहायचीच विसरून जातो... :)

अजुन कशी आली नाही...? म्हणून "हे" सुद्धा वाट बघतात...
उशीर होऊन चालत नाही... मग उगीच टेन्शन घेतात...
म्हणून असते माझी धावपळ... लवकर घरी पोहचायची...
दिवसभर वाट पाहणार्‍या घरच्यांना... संध्याकाळी लवकर भेटायची...
कारण उशीर झाल्यावर...
कधी कधी "हे" राग धरून बसतात... 
पोचेपर्यंत निदान दहा तरी मिस्कॉल असतात...
पिल्लू धावत कुशीत शिरत... पण बाबा रागावलेला असतो...
पटला नाही काही... तर तो असाच अबोला धरतो...
जळजळता कटाक्ष त्याचा... बर्‍याचदा सहन होत नाही...
सांगायला जाव काही... तर तो ऐकून सुद्धा घेत नाही...
उशिरा आल्याच अपराधीपण घेऊन... मी मुकाट घरात शिरते...
पिल्लाने मारलेल्या मिठीत... सगळ पुन्हा एकदा विसरून जाते...

बोलता बोलता सगळ... मनातल ती सांगून गेली...
अन् लवकर पोहचाव म्हणून... सुसाट वेगाने निघून सुद्धा गेली...
काय बोलाव यावर... त्याला सूचायला उशीर लागला...
पाठमोरया तिच्या आकृतीकडे... नुसताच कौतुकाने पाहत राहिला...

त्या दिवशी घरी काय झाल... ती काहीच नाही बोलली...
दुसर्‍या दिवशी नेहमीसारखी... हसतच ओफीसला आली...
असेल सगळ ठिकच... म्हणून त्यानेही काही विचारल नाही...
अन् रोज नव्याने लढणार्‍या मैत्रिनिला पाहून... आज त्याला मुळीच वाईट वाटल नाही... :)

- टिंग्याची आई

Thursday, June 18, 2015

सफर किल्ले दौलताबाद…

आपल्या पिल्लांमुळे कधी कधी आई बाबावर बरेच विपरीत प्रसंग ओढवतात… 
काही मजेशीर तर काही गंभीर… :)

तर असाच एक गमतीदार प्रसंग… टिंग्या मुळे माझ्यावर ओढवलेला… :)

(ऐतिहासिक भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व… NOM…)
२७ डिसेंबर शके २०१४ चा दिवस… आज किल्ले दौलताबाद च्या सफरीचा बेत आखण्यात आला होता… सबंध कुर्ले कुटुंब या सफरी साठी उत्सुक होतं… सगळी तयारी झाली आणि उन्हं खाली झाल्यावर जेमतेम तिसऱ्या प्रहरी गड चढायला प्रारंभ करण्यात आला… युवराज टिंग्याराजे आऊ साहेबांचा (म्हणजे टिंग्याची आई :) हात हातात घेऊन गडाची पाहणी करायला निघाले… 
किल्ले दौलताबाद हा एक अजय गड म्हणून वाखानण्यात आलेला आहे… युद्धाच्या दृष्टीने अगदी खोलवर विचार करून बांधलेला वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना… आज इतका काळ लोटला तरी गड चांगला जोपासण्यात आला आहे हे पाहून आऊसाहेब मनोमन सुखावल्या… (म्हणजे मीच ;)

गडाच्या महादरवाजा पासून पाहणीला सुरुवात झाली… युवराज टिंग्याराजे आज खूप खुशीत होते… अशी वास्तू ते प्रथमच पाहत होते… त्यांचा आनंद जणू गगनात मावत न्हवता… आऊ साहेबांना कौतुकाने ते प्रत्येक गोष्ट दाखवत होते… अगदी दगडी भिंतीपासून, मंदिरापासून ते उंचच उंच चांद मिनार पर्यंत सगळ काही… एक एक गोष्ट दोघे डोळे भरून पाहत होते… आज युवराजांकडे एवढं त्राण कोठून आले होते कोण जाणे… आदल्या दिवसाच्या प्रवासाचा शीण जणू कुठल्या कुठे पळून गेला होता… आज दुप्पट उत्साहाने युवराज किल्ला पाहत होते… 

जेम तेम तीन-साडेतीन वर्षाच ते नव्या जमान्याच गोंडस रुपडं त्या जुन्या पिढीच्या वास्तूला निरखून पाहत होतं… जणू नव्या-जुन्याची पुन्हा एकदा नव्याने भेट घडत होती… :)
दोन एक दरवाजे पार करून जवळ जवळ निम्मा गड सर करून झाला होता… आऊ साहेब आणि युवराज विश्रांतीसाठी थोडा वेळ तिथेच थांबले… सोबत युवराजांच्या आतेबहीण ताईसाहेब ही होत्या… बाकी सर्व मंडळी आणि आबासाहेब (टिंग्याचे बाबा) गड टापोटाप चढणार होती… म्हणून मग सगळे पुढे गेले… 
युवराज आणि ताई साहेब यांचे खेळ रंगले होते… सृष्टी सौंदर्य पाहण्यात आऊ गुंग होत्या…. 
इतक्यात…. 
युवराजांनी साद घातली…. "आऊ……… आमच्या पोटात दुखतंय… " 
आऊ क्षणभर घाबरल्या… काय झालं पाहतात तर……. 
"टिंग्याला शी आली होती…." :) :) :) ;)

आता काय करावं आऊना समजेना… साक्षात आणीबाणीचा प्रसंगच येउन ठेपला होता… आबासाहेब आणि मंडळी बरीच दूर पोहोचली होती… गड पुढे चढणे आता शक्य न्हवते… आणि खाली उतरावं म्हटलं तर युवराजांना पाऊल टाकवत न्हवतं… काय करावे कुठे जावे…? 

गडाच्या पायथ्याला सोय असल्याचं ठाऊक होतं… मग आऊनीच निर्णय घेतला…. 
पदर खोचला आणि युवराजांना पाठीवर (कोकरू) घेतलं … पायातल्या वाहणा हातात घेतल्या आणि झाल्या गड उतरायला सज्ज… 
क्षणात त्यांनी पायऱ्या उतरायला सुरुवात केली… एक एक करत झरझर पायऱ्या उतरूही लागल्या…. एक-दोन-तीन दरवाजे मागे पडले… 
युवराज मात्र त्या माऊलीच्या पाठीवर आनंदाने विराजमान झाले होते… 

बघता बघता आऊ गडाच्या पायथ्याला पोचल्यापण…
युवराज चपळाईने पाय उतार झाले आणि जाऊन काम तमाम करून आले… 
आत्ता कुठे त्यांना हायसं वाटलं आणि आऊच्याही जीवात जीव आला… ;) :)

पोरासाठी हिरकणी रात्रीचं कडा उतरली होती… आणि आज टिंग्याच्या आईनेही पोराला पाठीवर घेऊन मोठ्या हिमतीने गड उतरला…  

आबासाहेब आणि बाकी मंडळींना ही खबर गड उतरल्या नंतरच मिळाली…. 
आणि हा सर्व वृत्तांत ऐकून…. 
सगळे अक्षरशः पोट धरून धरून हसत होते… :D :D
टिंग्याने अशी त्याच्या आईची जबरदस्त फजिती करून टाकली होती… 
सगळं आठवलं कि आजही हसून हसून पुरेवाट होते… :)
तर असेच काही प्रसंग या पिल्लांमुळे सगळ्याच आई-बाबावर येत असतात पण आई-बाबा सगळं व्यवस्थित सांभाळून घेतात… आणि प्रत्येक वेळ बरोबर निभावून नेतात… अगदी टिंग्याच्या आईने नेली तशी… :):)
- टिंग्याची आई 
पोस्टच्या टायटल मधलं सफर ऐवजी Suffer असंच लिहावसं वाटत होतं… ;)

Monday, June 15, 2015

सिर्फ एक बार…

एक साल हो गया यार Infy को छोडे…

I still miss every moment I spent there..... :(

एक साल हो गया यार Infy को छोडे…
आज भी वहाँ का हर पल याद करती हूँ....
यारों मैं तुम सबको बहुत मिस करती हूँ....

बस हो गया गेट १ के बाहर.... यूँ परायों की तरह मिलना....
दिल में छुपी सारी यादों को.... छोटीसी मुलाकात में समेटना....
साला वो गार्ड.... ५ मिनट गाड़ी भी खड़ी करने नहीं देता है....
इतने साल जहां शान से घूमते थे.... उस इन्फी को जी भर के देखने भी नहीं देता है....
इसीलिए सिर्फ एक बार… मुझे अपने कॅम्पस में वापस आना है....
पीछे छूटा हुआ हर पल.... आज फिर एक बार जीना है....
SDB 6, 5th Floor, B Wing... Cube में सुबह ८.४५ को पहुँचाना है....
Documentum का एकाद Issue.... जरूर Resolve करना है....
Saurabh और Onsite(Jaggu) का.... कोई लोचा सुलझाना है....
Frustrate हुए अरुण को.... थोड़ा ज्ञान भी देना है....
घंटेभर की कॉल.... फिर १०.३० की चाय....
बाँट लो जीवन का सत्य और टेंशन को बोलो बाय....
अपने प्यारे क्यूब में बैठ के.... अपना ब्लॉग भी अपडेट करना है....
इसीलिए सिर्फ एक बार.... अपने क्यूब में वापस आना है....
कभी FC2 तो कभी FC3.... कभी पिझ्झा कभी चायनीज खाना है....
अपने प्यारे महिला मंडळ के साथ.... मुझे एक बार लंच करना हैं....
कोई सेल्फमेड रेसिपी.... तुम सबसे शेयर करनी हैं....
टिंग्याकि ढेर सारी मस्ती.... जी भर के तुम्हे सुनानी हैं....
मधुरा से मराठी में मारे जोक्स.... दीप्ती-पारो को समझाने है....
कांचन कि अंग्रेजी के किस्से.... दिल खोल के एन्जॉय करने है....
Easy Shop कि अधुरी शॉपिंग.... एक हि बार पुरी करनी है....
Chocolate Brownie with hot sos.... लास्ट time सबसे शेयर करनी है....
थोडासा मिठा और थोडासा खट्टा.... हर वो पल तुम्हारे साथ बिताना है....
सिर्फ एक बार.... अपने महिला मंडळ के साथ मुझे लंच करना है....
पिछले ६ सालों में जहां मैं कभी अकेली न थी....
हर चौराहे पर एक याद आज भी साथ खड़ी थी....
गिरना संभलना.... गिरके संभलना.... सब यहीं पर सीखा था....
हर मुश्किल घडी में.... एक फ़्रेन्ड हमेशा साथ रेहता था....
उन्ही यादों भरे रास्तो पर फिर से चलना है मुझे....
फिर चलते चलते.... अपने दोस्त के सहारे संभलना है मुझे....
ये बिल्डिंग.... ये फ़ूड कोर्ट्स.... कॅम्पस इन्ही से तो बनता है....
पर तुम सबके बिना तो.... TCS हो या Infy सब सेम ही लगता है....
साथ बिताया हर लमहा और तुम सबको बहुत मिस करती हूँ....
Infy के सामने से गुजरते हुए.... आज भी पलभर के लिए जब रूकती हूँ....
पगार तो बहुत मिलती है इधर.... पर कुछ अधूरा सा लगता है....
इसीलिए सिर्फ एक ही बार.... दिल infy में वापस आना चाहता है....
 
यार विजिटर पास पे ही सही.... but एक बार अंदर बुला दो....
कल शाम की चाय.... SDB १० वाली टपरी पे पिला दो....
 
Miss you so much Infy.... :)

- टिंग्याची आई

Monday, June 1, 2015

Thank You....

Star Buds is my Shourya's Pre-school... :)
 
Thank you Star Buds... Thanking you all is just needless... because "Thanks" is a very small word to explain what you mean to us and to express my feelings... :)

But really wanted to thank everyone in Star Buds for taking care and nurturing our children... So here is a small attempt... :)
Its been 3 years we are attached to the Star Buds Family. My son Shourya was just 1.5 years old when we took a decision and sent him to this pre-school... That was a really hard decision but definitely not wrong... Today I feel, choosing Star Buds was one of the best things we did for him.

Till he go to this school, toys were his only friends, Mamma's Angaai was the only song he used to listen and family members were only ones he wanted around... So Though.. Isn't it..?? :)

We decided to send him to school.. to get used to people, to have many friends and to be happy.. :)

First day of admission I still remember.. SriPriya mam (founder of Start Buds) was making a small baby sleep one her lap just like her own child.. I was happy to see someone who is caring a child so nicely... so that the child feel like at home... The decision was made and I did not even go for another option...

As we thought and expected... Star Buds has helped my child grow...
He is not just happy here... He is creative.. Clever.. Genius.. Smart... Perfect and an All Rounder... :) 
His first day at school was difficult for me but not for him.. :) He came home happily with bunch of things to tell me...

The Daily Diary told me if he ate properly, slept at what time and it helped me plan his day further... School became his favorite place to be.. 

Everyday there was something new and exciting... Shlok competetion, running, fancy dress, party, music, water play, functions and a lot many... Shoruya got his first prize of his life and that was a great surprise for me.. :) I am happy to say.. "I am Proud of you my Son.."

Not just for kids but we the family also had nice time with you all during the different events you arranged for us. We really enjoy a lot with our children... :)

Such small happy moments are our frequent visitors and thanks Star Buds for the same..

Shori has many friends now.. And the best friend list is quite a long.. Specifically Pawan, Madhura, Mrunal, Kavya, Rigved... and many more.. :) And I have also got added new names to my friends list... Mothers of all these little champs.. :) Thanks to you dear children... :)

My son started eating all the vegetables, Soups, Parathas.. And thanks to all the SUGRAN mavashis in the kitchen of Star Buds.. I am still not able to make my Idli-Sambar as perfect as you do.. This is what my son says.... ;)

He has started taking care of his belongings, his cleanliness and has started sharing things with others.. And the credit goes to all dear Didis and Mavashis at Star Buds... Rekha and Sukanya are the favorite of did of each child.. :)

He has learned to write, sing lot many rhymes and has gained confidence in himself.. A big thank you to all the Teachers of Star Buds for this...

Our kids feel like at home in this Home near our Home and Thank you so much SriPriya mam and Nagarajan Sir...

It becomes easier for working parents like us to help grow our children when people like you are there with us... We are happy to see our children in safe hands, they are being taken care nicely.. they are growing properly, they are eploring new things, learning on their own and most importantly they are Happy even if parents are not around...

Thank You Star Buds for everything... :)
Now it is time to say "Bye Bye" to Star Buds as we have taken admission to a big school because we had to... :)
But really speaking.. more than Shourya I am feeling bad while leaving this big and beautiful family..
But we must move on...
I know Star Buds will welcome us the way they do always.. even if we come as an Alumni..
God Bless You Star Buds....
Thank You Star Buds for making my Little Star a Shining Star.... :):):)

- Shourya's Mom