Thursday, January 31, 2013

टिंग्या आणि चिनू दादा...

आमचा चिनू दादा आम्हाला खूप आवडतो... पण या बाबा लोकांच्या ऑफिसमुळे आम्हा मुलांना हव तेव्हा भेटताच येत नाही.... एवढी लांब लांब घर आहेत... एक चिंचवडला तर एक सिंहगड रोडला... :(
कधीतरी फोनवरच होतात मग गप्पा.... आम्ही बोलणारच नाही आता या मोठ्या लोकांशी.... कट्टी... :P

आम्हा मोठ्यांमुळे पिल्लांना देखील हव तेव्हा भेटता येत नाही... :( कधी कधी खरंच खूप वाईट वाटत... सॉरी पिल्लानो.... :)
( चिनू दादा आणि शौर्य च्या गप्पा... टिंग्या च्या आईच्या लेखणीतून.. त्यांच्यासारखंच स्वीट स्वीट... )
चिन्मय दादा आणि शौर्य 
टिंग्या: कसा आहेस रे चिनू दादा...
कित्ती दिवस झाले आपण भेटलोच नाही....
आई-बाबांना तिकडे यायला मुळी वेळच नाही.....
दादा: इकडे पण अगदी तसच आहे बघ....
बाबांचं ऑफिस आणि आईचं काम सारख चालू असतंय...
सगळेच बीझी.. सांग आपला विचार कोण कशाला करतय...?

टिंग्या: अरे दादा सांग ना जरा मम्माईला...
मला सारखी टिंग्या टिंग्या म्हणते...
स्कूल मध्ये माझी इमेज खराब होते..... (मैत्रिणी आहेत न तिथे.. ;) )

दादा: आईचं पण नेमक हेच चालू असत...
मला उगीचच सारखी 'चीमडी' म्हणते.. (एवढ चांगलं नाव असताना... )
रागवलं मी यावर.. तर नुसतीच हसत बसते... 

टिंग्या: दादा... मला पण आता शाळा आवडते...
पण तिथे एक मुलगा मला जाम त्रास देतो...
मला ज्याने खेळायचं असतं.. नेमकं तेच खेळण घेतो....
दादा: पुढच्या वेळी मी येईन ना तिकडे...
तेव्हा आपण दोघे मिळून त्याच्याकडे जाऊया...
ऐकलं तर ठीक नाहीतर ढिशूम ढिशुम करूया.... :)

टिंग्या: तुझी स्कूटर आणि माझी सायकल घेऊन...
दोघेच आपण मस्त भूर फिरायला जाऊ....
कोणी आल तर ठीक... नाहीतर एकटेच जाऊ... :P 
दादा: चालेल.. मला येते स्कूटर आता...
आणि तुलाही येते सायकल चालवायला....
आपलं आपण जाऊ... कुणाची गरज नाही आपल्याला.... ( दादा रुसलाय बर का... )

टिंग्या: आता तूच सांग रे चिनू दादा....
आपल्या आई बाबांना कळत कस रे नाही...
फोनवर नुसत बोलता येत.... तुला अन मला भेटता येत नाही...
दादा: का कुणास ठाऊक आपण एवढे लांब राहतो....
कित्ती इच्छा असली तरीही आपल्याला भेटता येत नाही.... :(
नुसत्या Facebook वरचे फोटो आणि काकीच्या कवितांमधून.. दादाला शौर्य कळत नाही....

टिंग्या: काळजी करू नको तू दादा....
आपल्या कपिल मामाला... मी कालच सांगून ठेवलंय...
मला तिकडच्या घरी घेऊन यायचं... त्याने कबूल केलंय...
दादा: OK... पण काका काकीला हे आज्जीबात सांगू नको...
मी पण आण्णांना घेऊन डायरेक्ट बागेत येणार आहे...
तिथेच भेटून.. भरपूर मज्जा करून... मी काका, काकी, आई आणि पप्पांना टूक टूक करणार आहे...

- टिंग्याची आई/ चिनुची काकी 



Tuesday, January 29, 2013

कळे ना दोघींनाही....

जीवा-भावाच्या दोघीजणी...... तशा न्हवत्या जिवलग मैत्रिणी.... मन मोकळ करून कधी एकमेकींशी बोलल्याच नाहीत.... एकमेकिंवरच प्रेम कधी दाखवलंच नाही... एकीने दाखवलं तर दुसरीला ते पटलं नाही.... आणि दुसरीने प्रयत्न केला तर पहिलीला कळलंच नाही..... कोण जास्त प्रेम करतय ती कि मी... हीच वेडी स्पर्धा... त्यांची त्यांनाच कळली नाही कधी... एकमेकींच्या डोळ्यातलं पाणी दोघीनाही कळायचं.... मनातलं पहिलीच्या दुसरीला उमजायचं.. असं हे प्रेम दोघींचं.... एक धाग्याने घट्ट बांधलेलं.... कळेलच कधीतरी दोघींनाही.... :)

का कसे हे बंध जुळती.. कळे ना दोघींनाही....
ना कधी हे रंग जुळले.. तरीही जुळली नाती.... कळे ना दोघींनाही....

एकमेकींसाठी असल्या.. जरीही प्रश्न न सुटलेला....
नकळत तरी कसा हा.... जीवही जडला... कळे ना दोघींनाही....

सोडविण्या का व्यर्थ प्रयत्न.. कोडे  न उलगडलेले...
डोळे भरुनी पाहण्या तरीही... का हे मन व्याकूळलेले ..... कळे ना दोघींनाही....

अप्रत्यक्षपणे दोघीजणीही... करिती सोबत क्षण क्षण...
अजूनही तिच्याच साठी का हे.... काळीज तुटते कण कण.... कळे ना दोघींनाही....

एक धागा अजूनही आहे.... अंतरातूनी घट्ट जुळलेला....
अनामिक हे नाते याचा.... अर्थ का अजूनही न कळलेला... कळे ना दोघींनाही....

पायवाटही एकच जरीही.... प्रवास विरुद्ध दिशेला.....
फिरुनी पुन्हा या वाटा जुळतील... वेडी का ही आशा जीवाला.... कळे ना दोघींनाही....

कधीतरी त्या दोघी भेटतील..... सुख दुःखाच्या गोष्टी करतील....
बालमैत्रिणी पुन्हा खेळतील..... खोटे हेवे-दावे  विसरतील..... 
                                               तेव्हाच कदाचित..... हे नाते कळेल दोघींनाही..... :)

- टिंग्याची आई 
एक गाण म्हणून सुचलं होत... सुचतील तसे शब्द गोवले आहेत.... :)

आमची मेघा काकी...

 लग्न करून सासरी आले... तेव्हा अनेक मायेची माणस मला मिळाली.... खूप प्रेम.. माया.. अगदी माहेरची माणसच जणू मला पुन्हा एकदा भेटली .... त्या प्रिय मंडळीपैकीच माझं आणि टिंग्याच आवडतं माणूस... म्हणजे आमची मेघा काकी.... :)

गोरी गोरी सुंदर छान...
जणू अबोली अवचित फुलली...
मोगऱ्याचा सुवास ओंजळीत घेउनि..
साऱ्या घरा देई प्रेमाची साउली..

तिच्या काळ्याभोर डोळ्यांत..
नेहमीच विनम्रता आहे.
मधुर मनोहर वाणीमध्ये..
जणू अमृताची धार वाहे...

घर असो वा न्यायालय...
तरबेज आमच्या वकिलीनबाई..
कोणताही Challenge द्यावा..
आजीबात मागे हटणार नाही...

तिच्या हातची. चव काय सांगू....
बत्तीसलक्षणी सुगरण जणू....
अन्नपूर्णा आहे आमच्या घरची...
तिचे गुण आणि काय वर्णू...

कधी ताईच्या मायेने....
तर कधी आईच्या.. मज जवळ घेई....
अन आपल्या आईच्या आठवणीने...
कधी लहानाहुनी ती लहान होई.....

वादळात होता तिचा वटवृक्ष सापडला...
तरी न उन्मळून पडला...
माती म्हणून तिचाच तर आधार होता..
धैर्याचा मेरु तिनेच कधी न ढळू दिला....

संथ सरीतेसारखी हि वाहत राहे...
संसारा सोबत घेउनि...
सुख दुःखाचे कित्येक रंग मिळती..
सावरते सर्वांना स्वतः त्यात रंगुनी....

कुठे खळखळ प्रवाह वाहे....
तर कुठे डोह खोल साचलेला...
अखंड धावत राही पुढे...
भिडण्या तिच्या प्रिय सागराला.....

समजून घेते ती सगळ्यांना...
अगदी टिंग्या आणि त्याच्या आईलाही....
छान छान खाऊ नेहमी आणते....
म्हणूनच काकी खूप आवडते टिंग्यालाही...

काका... अज्जीबात त्रास द्यायचा नाही ह..
आमच्या मेघ काकीला...
Every Weekend आम्हाला भेटायला यायचं...
नाहीतर नाव सांगेन मी बाप्पाला......

अशी लाखात एक आहे...
माझी प्रिय थोरली जाऊबाई..
बाप्पाच्याच कृपेने मला मिळाली..
My Dearest मेघा ताई... :)

- टिंग्याची आई
काका... आवडेल का  आमच्या मेघा काकीला हे..? :)

Friday, January 25, 2013

शृंगार.... :)

ऑफीस आणि घर सांभाळताना हल्ली नटन मुरडण तसं होतच नाही सहसा... आणि तशी काही भारी हौसही नाही... :) पण कधी कधी मुद्दाम नट्टा पट्टा करायची हौस येते.... मग अगदी सगळा साज शृंगार चालू होतो... अधून मधून ह्यांचही लक्ष असत.. आणि नेहमीसारख्या आंबट गोड.. खट्याळ Comments सुद्धा.... :)
कविता म्हणावं असं नाहीये... एक Write Up म्हणून वाचा हव तर.... :)


रोज सकाळी सकाळी ऑफीसच्या गडबडीत कसतरी आवरायचं....
आणि संध्याकाळपर्यंत झालेल्या अवतारातच... घर गाठायचं....
पण आज ठरवलंय मी... थोडंस का होईना आज नटायच आहे...
"अहो ऐकलंत का..?" आज तुमची सौ चक्क शृंगार करणार आहे.....

नेहमीसारख्याच आजही मी चांगल्या हातभर बांगड्या घालाव्या...
किती तो आवाज.. So Disturbing.. अशा Comment तू टाकाव्या.....
"काय नव्या नवरीचा चुडा भरलाय Madam नी.." असं हमखास म्हणावस...
आणि रात्री अचानक जाग आल्यावर.. माझ्या हातातल्या त्याच बांगड्याशी.. निरागसपणे खेळावस...

लांब सडक केसांची आज मुद्दामच वेणी मी घालावी...
न आवडून तू हि मग कप-बशी.. थोडी जोरातच आद्ळावी... :)
सगळ उमजून देखील... मी सुद्धा थोडेसे नखरे करावे.....
गजरा माळायच्या बहाणे.. हलकेच केस माझे.. तू पुन्हा मोकळे करावे....

कधी जाणून बुजून तर कधी अलगद... नेसलेल्या साडीला घडी पडावी... 

(साडीला घडी पडली कि नवी साडी मिळते असा गोड समज असतो...)
मिस्कीलपणे मी विचारावं.. "अहो.. मला साडी घेताय कि काय नवी....??"
कुठे जायचं राणी सरकार... स्वामिनी.. वामा.. कासट.. कि चालेल हस्तकला...?
असाच काहीसा Dialogue मारशील.. साड्यांनी गच्च भरलेलं कपाट दाखवत मला....

साडीला Matching सेट शोधण्यात मी अख्खा तास घालवावा...
तुला विचारावं तर.. " होतोय कि Match.." हाच Reply प्रत्येक वेळी मिळावा....
अजिबात Match होत नसला तरी... शेवटी तू गिफ्ट दिलेला सेटच Final होतो..
पण दागिन्यांच्या एवढ्या पसाऱ्यात... माझ्या प्रिय मंगळसुत्राचाच पहिला नंबर लागतो... :)

पैजण, जोडवी, मेखला.. बाजूबंद.. अगदी काहीही शिल्लक ठेवलं नाही...
पण एवढ्या साज शृंगाराला.. कपाळावरच्या कुंकवाशिवाय शोभा नाही....
म्हणूनच मग एक छानशी चंद्रकोर... अन भांगात लाल चुटूक कुंकू भरावं....
कशाला हवाय आरसा... तुझ्या डोळ्यांतच माझं हे रूप मी न्याहाळाव....

नटून थटून उभ्या तुझ्या सौ कडे बघून तू छान Smile करावं...
अन तुझ्या डोळ्यातलं समाधान... आपसूक माझ्या डोळ्यांतून सांडाव...
ज्या हातांनी आजवर मला सावरलस... त्याच हातांनी ते दोन थेंब तू टिपावेस...
तुझ्या ओंजळीत माझा चेहरा घेऊन म्हणावस... "टिंग्याची आई.. आज खरंच खूप छान दिसतेस..."

- टिंग्याची आई
:)

Wednesday, January 23, 2013

माजो कोकण...

ही कविता वाचूक तुमका कोकणी येउक व्हया... :)
वयाची १६ वर्षा कोकणात घालवलंय मिया.. थोडो तरी  अभिमान वाटूकच व्हया.....
माजी एक  मैत्रीण असा.. कांचन.... तिनेच Trigger दिल्यानी ह्या कविता लिहुक..
छोटीशीच असा बघा कशी वाटता तुमका..... :)
एक कोकणी प्रयत्न खास कांचन साठी... :)

कोकणातलो हापूस म्हणजे..
सगळ्या आंब्यांचो राजो असा...
आमच्या आंब्याक नावा ठेउची..
हिम्मत.. सांग कुणाचे अंगात असा....

कधीतरी टेस्ट करून बगा...
आमची पेशल सोलकडी...
भल्याभल्यांचे तोंडाक पाणी सुटता..
खाऊन हकड्ची अळवाची वडी.....

कोणाक लगीन करुचे असा..
तर कोकणातल्या पोरीशी करा...
चेडवा लक्ष्मीच्या पावलान येउन...
अगदी सुखात ठेवात तुमच्या घरा...

कोकणाचो सौंदर्य का काय ता...
लेखक लोकांस पण लय भावलो...
म्हणूनच तर एवड्या मोठ्या पुरुशोत्तामान (पु. ल. नी)
कोकणातल्या अंतू बर्व्यावर मस्त धडो लिवलो...

आमच्या कोकणातली मजा..
हय रव्हल्या शिवाय कळूची नाय...
इथल्या मातीची खरी ऊब..
तुमका पुस्तकातून  मिळूची नाय.....

आमच्या कोकणातली माणसा..
पिकलेल्या फणसासारखी असतंत...
वरून लागतीत हजार काटे...
पण आत रसाळ गरेच मिळतत....

पैसो-अडको तसो कमीच हकडे...
पण मायेचो वैभव मोठो असा..
आलेल्या माणसाक जीव लावूचो...
एवडाच आमका माहित असा...

- टिंग्याची आउशी

:)
Dedicated to my dear Kanchan... :)

Monday, January 21, 2013

लवकर ये...

एका पिल्लाचे बाबा भूर गेलेत... पिल्लू आणि त्याची आई इथेच आहेत.. दोघांनाही बाबाची खूप आठवण येते.... म्हणूनच राहून राहून आई डोळ्यातून पाणी काढते.... बाबालाही पिल्लाची खूप खूप आठवण येते.... पिल्लाला घेऊन उभी आई त्याला रोजच समोर दिसते....
हा अनुभव माझा नसला  तरी.. फक्त एक प्रामाणिक प्रयत्न केलाय या भावना शब्दांत उतरवायचा... फक्त त्यांच्यासाठीच.... :)
नक्कीच जमलेला नाहीये ..... :)

आज उठल्यापासून पिल्लान..
नुसतं तुझंच नाव काढलंय...
कालपासून तुझ्या वाटेकडे..
अगदी डोळे लावून बसलंय.....

फुललेल्या प्रत्येक फुलामध्ये..
आज तुझच प्रेम दडलंय...
नात्यांच्या या सुंदर माळेत...
मी तुझंच नाव गुंफलय...

देव्हाऱ्यातल्या ज्योतीसोबत..
रोज माझ काळीज जळतय...
विसाव्यासाठी मनही माझ...
तुझीच साउली शोधतंय...


बघ आज कसं अचानक...
हे आभाळ दाटून आलंय...
तुझ्या डोळ्यातलं पाणी..
आज पुन्हा माझ्या डोळ्यातून वाहिलंय...


आकाशी उडत्या पाखरासोबत..
पुन्हा एकदा "परत ये" असा निरोप तुला धाडलाय....
कालचा विस्कटलेला भातुकलीचा डाव...
आज मीच पुन्हा मांडलाय....

तुझ्या विरहाच दुखं...
या पापण्यांमध्ये काठोकाठ साचलंय...
तुझ्यासाठी आणलेलं फुल..
माझ्या हातातच सुकलंय...

भरकटलेल प्राण पाखरू..
फक्त तुलाच शोधतंय...
तुझ्या आठवणींत गुंतलेल मन..
रात्र रात्र जागतय...

"बाबाला लवकर पाठवून दे... "
पिल्लू रोज बाप्पाकडे इतकंच मागतंय..
पिल्लाच्या डोळ्यात तूच दिसतोस...
तेव्हा काळजात खोलवर कुठेतरी दुखतंय...

तुझ्याविना... कसतरी...
पिलाने मला आणि मी त्याला सांभाळलय...
लवकर ये... तू आलास कि...
धावत येउन तुझ्या कुशीत शिरायचं...
असं आम्ही मायलेकरानी ठरवलंय...

- शिल्पा  :)

Wednesday, January 16, 2013

शाळेत का ग धाड्लस.. ?

टिंग्याला मी हल्लीच शाळेत घातलंय.. नुसतं खेळच असतात नो अभ्यास.. :) उगीचच माझ्या मनानेच काहीतरी लिहिलंय खर टिंग्या काय विचार करत असेल त्यालाच ठाऊक..... :)
 
मला न विचारता...
काल माझं ADMISSION घेतलस...
इतक्या लवकर आई तू मला....
शाळेत का ग धाडलस...?

खेळायचं असत ग खूप मला...
आणि झोपायचं असत हव तेव्हा...
शाळेत बाई सारख्याच ओरडत राहतील..
मग सांग.. मी दंगा करायचा केव्हा...??

जातेसच ना सोडून मला..

रोज रोज तू ऑफीसला...
खरच गरज आहे का ग...
मला शाळेत पाठवायची एकट्याला...??

एकटा एकटाच खेळत असतो....
मी आजीला बिलकुल त्रास देत नाही..
खर सांगतो आई तुला.....
मला शाळेत आजीबात जायचं नाही....

(आता आईचा थोडाफार समजवायचा प्रयत्न... ) 
अरे सोन्या.. तू शाळेत गेलास ना तर...
आपला बाप्पा HAPPY HAPPY होईल... (बाप्पा म्हणजे आमचा weak point बर का..)
पुढल्या ख्रिसमसला santa तुला....
आणखीन मोठ्ठ गिफ्ट देईल.....

बर्र...... ( शहाण माझ बाळ ते... )
भेटतील का तिथे नवे मित्र
आणि मिळेल का खेळायला घसरगुंडी...?
मारता येईल का ग मला...
शाळेला हवी तेव्हा दांडी....?


मामा म्हणतो शाळेत गेल्यावर..
मला खूप खूप मज्जा येईल....
तुझ्यासारखाच खाऊचा डब्बा..
आजी मला रोज करून देईल....

काकी पण काल सांगत होती...
चिनू दादा सुद्धा रोज शाळेत जातो...
छान छान गाणी आणि गोष्टींसोबत...
मस्त मस्त Drawing पण काढतो...

एवढ सगळेजण सांगताय आता..
तर एकदा मी जाऊनच येतो....
पण नाही आवडलं... तर जाणार नाही...
तुला आत्ताच सांगून ठेवतो...... (Direct धमकी :P )

PROMISE करतो आई तुला...
उद्यापासून न चुकता शाळेत जाईन...
खूप खूप शिकून मी पण...
बाबा सारखा मोठ्ठा होईन......

- टिंग्याची आई 
:)

Monday, January 14, 2013

एखादी मैत्रीण हवी असते.....

नाती असतातच आयुष्यात... पण मैत्री सारख नात लाखात एक असत....
I am blessed with your friendship dear... :)


कधी कधी एखादा ISSUE resolve होत नसतो..
दिवस दिवसभर एकही CLUE सापडत नसतो.....
तेव्हा सौम्या सारखी एखादी मैत्रीण मला हवी असते.....
नुसत्या PRESENCE नेच तिच्या... अर्धे ISSUES भूर पळवून लावते....

जेव्हा life मध्ये SOLID झोल झाल चालू असतो...
कसलातरी major कांड झालेला असतो.....
तेव्हा प्रियांका सारखी एखादी मैत्रीण मला हवी असते.....
फूल टू "नवी मुंबई" STYLE मध्ये.. सगळंच TENSION गुल करून टाकते....

जेव्हा MANAGER उगाचच डोक्यावर पडल्यासारखा वागतो...
उठ सूट प्रत्येकजण मलाच ताप देत सुटतो....
तेव्हा कांचन सारखी एखादी मैत्रीण मला हवी असते.....
सिंहगड रोडची पुणेरी पोरगी कोल्हापुरी डायलॉग मारून... सगळा वैताग क्षणात विरघळून टाकते..... :)

जेव्हा जेव्हा कॉलेजची खूप खूप आठवण येते......
ती मस्ती.. ती धम्माल पुन्हा एन्जॉय करावीशी वाटते...
तेव्हा अस्मीता  सारखी एखादी मैत्रीण मला हवी असते.....
मी आठवण काढायचा अवकाश... नेमकं त्याच वेळी न चुकता फोन करते...

शरीराने आणि मनाने जेव्हा मी थोडीशी थकलेली असते...
मनातलं सगळ सांगायला.. एक संधी हवी असते....
तेव्हा अश्विनी सारखी एखादी मैत्रीण मला हवी असते.....
हसत खेळत.. फोनवर गप्पा मारत.... सहजच मला पुन्हा एकदा Refresh करून टाकते.....

कधी कधी कविता काही केल्या सुचायलाच तयार नसते...
न सुटणाऱ्या प्रश्नांची उत्तर शोधण्यात मन गुरफटते.....
तेव्हा माझ्यासारखीच एखादी मैत्रीण मला हवी असते..... :)
माझ्यातल्याच मला शोधायला.. अगदी साउलीसारखीच सोबत करते.....

- शिल्पा
या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत... एकदम unique पीस आहेत सगळ्या... ;-)

Monday, January 7, 2013

मी अजूनही तशीच आहे...

'तो'.. 'ती'ला सोडून गेलाय कुठेतरी... ती अजूनही वाट पाहतेय ...
त्याची वात पाहून ते कोमल फूल सुकलय जणू... पण तरीही ती त्याची वाट पाहतेय.... कोरड्या डोळ्यांमध्ये अजूनही एक तेज बाकी आहे.. त्याला पाहायला आसुसलेली ती... :)


कट्ट्यावरच्या मुलांशी जाता जाता बोलते. तुला आवडत न्हवत...
पण चिडून तरी का होईना.. निदान परत येशील अस सारखं वाटत...
मित्रच ते शेवटी.. त्यांच्या बोलण्यात फक्त थोडी काळजी दिसते आहे...
बाकी काही नाही.... मी अजूनही तशीच आहे...

अखंड चालणारी बडबड माझी. अजूनही तशीच चालू असते..
तूच ऐकतो आहेस. समजून मी एकांतातही बोलत असते...
पण गोडवा त्या शब्दांतला आता थोडा कमी झाला आहे....
बाकी काही नाही.... मी अजूनही तशीच आहे...

डोळ्यातून भावना व्यक्त करायची सवयही अजून गेली नाही...
कसं जमत ग तुला...? तूच म्हणाययचास कि नाही...
आता तसं मला जमत नाही..कारण या डोळ्यात थोडासा कोरडेपणा आहे...
बाकी काही नाही.... मी अजूनही तशीच आहे...

हातातल्या रेषा वाचायचा प्रयत्न मी अजूनही करते...
त्यात चेहरा तुझा गवसतो का फक्त हेच पाहत असते....
पण शेवटी हि ओंजळ माझी रिकामीच राहिली आहे..
बाकी काही नाही.... मी अजूनही तशीच आहे...

रात्रीच्या वेळी स्वप्नांची. आजही गर्दीच असते..
उघड्या डोळ्यांनी त्यांना पहायचा मी प्रयत्न करते..
का कुणास ठाऊक.. हल्ली झोप माझ्यावर रुसली आहे...
बाकी काही नाही.... मी अजूनही तशीच आहे...

पहाटेच्या मंद प्रकाशात मी आजही बाहेर पडते...
तुझ्या आठवणींच धुकं.. दोन्ही बाजूंनी दाटून येते...
त्याला हसून सामोरी जाते आणि प्रेमाने कवटाळते आहे...
बाकी काही नाही.... मी अजूनही तशीच आहे...

संध्याकाळी मी रोजच.. समुद्रकिनारी फिरायला जाते...
नेहमीच्या जागी पुन्हा वाळूच... तेच घरट बांधते...
पण अजूनही ते पूर्वीसारखच अर्धवट आहे.....
बाकी काही नाही.... मी अजूनही तशीच आहे...

खोल दरीत पाहिलं कि तिची ओढ अजूनही भासते...
मी घातलेली साद फिरून मलाच प्रतिसाद देते....
त्या हाकेतली आर्तता मात्र.. आता थोडी वाढली आहे....
बाकी काही नाही.... मी अजूनही तशीच आहे...

स्वताच्या मनाशी मी अजूनही बोलत असते....
हात धरून त्याचा माझ म्हणण ऐकायला लावते ..
मी कितीही प्रयत्न केला तरी ते तुझ्याच मागे धावते आहे....
बाकी काही नाही.... मी अजूनही तशीच आहे...

भावनांना शब्दात उतरवायचे कसे.... आजवर मला माहित न्हवते...
पण आत्म्याला बोलत करायला.. आता थोडफार जमते...
फक्त तुझ्या आठवणी कागदावर उतरवायचं काम.. हे वेड मन करत आहे...
बाकी काही नाही.... मी अजूनही तशीच आहे... अगदी तशीच आहे......

- शिल्पा
इतकी खास नाही जमली.. :(

Sunday, January 6, 2013

माझी आय म्हणती....

माझी आय म्हणती....
विन्जीनियार व्हायला डोस्क लागतंय.... ते तुज्याजवळ नाय...
तू बांधल्याल घर कवा पडल... त्येचा पत्त्या बी लागणार न्हाय...

माझी आय म्हणती....
डाक्टर व्हायला डोस्क लागतंय.... ते तुज्याजवळ नाय...
पेशंट सोडून नरसलाच फाडशील... तुजा काय नेम नाय...

माझी आय म्हणती....
वकील व्हायला डोस्क लागतंय.... ते तुज्याजवळ नाय...
आरोपी, साक्षीदार, कलम सगळच इसरशील.. फिर्यादी मात्र बोंबलत जाय...

माझी आय म्हणती....
माणूस व्हायला प्रेमळ मन लागतंय.. ते तुज्याजवळ हाय..
लेकरा माणुसकी जप म्हंजी तुला कायबी कमी पडणार न्हाय... देव सदा तुज्या पाठीशी हाय....

-टिंग्याची आय  :)
खूपच बालपणी लिवली होती...२००९ वगैरे....  :)