Monday, June 25, 2012

मला पुन्हा एकदा कॉलेजला जायचंय....

कॉलेजमध्ये जे काही थोडे फार चांगलेच  अनुभव माझ्या वाट्याला आले त्यावरून.... मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय यावरून सुचलेलं...

तुम्ही खुप दिलंत मित्रानो... आयुष्यभर पुरेल इतकं :)



मला पुन्हा एकदा कॉलेजला जायचंय....

बारावीला चांगले मार्क्स मिळवून...महिनाभर धावपळ करत Engg ला अडमिशन घ्यायचंय...
नवीन कॉलेजच्या स्वप्नात आक्खी रात्र जाग वायाचीये...
पहिल्याच दिवशी दिमाखात कॉलेज मध्ये एन्ट्री माराय्चीये...
आणि ते नाव जग पाहून थोड कावर बावर व्हायला...
मला पुन्हा एकदा कॉलेजला जायचंय....

नवीन Drafter .. नवीन Sack ... सगळंच नवीन...
निदान पहिले काही दिवस तरी कॉलेज attend करायचंय....
सच्च्या मैत्रीला जागत.. मित्रांची एकदातरी Proxy मारायचीय...
रोज एखादा तरी क्लास बंक करून..बाहेर चहाची टपरी गाठायचीय...
college सुटल्यावर मात्र वर्गातच गप्पा मारत बसायचंय.....
Semister  सगळी वाया घालवून.. ३-४ chapters गाळत..
PL मध्ये जीव तोडून रट्टा मारायला...मला पुन्हा एकदा कॉलेजला जायचंय...

आता जुन्या झालेल्या मित्र आणि मैत्रिणी सोबत..
दोघी-तिघींनी आणलेला डब्बा १५ जणांनी वाटून खायचाय..
तेवढ्याने भूक भागली नाही म्हणतच..
सगळ्यांनी पुन्हा सुधीर मामाच्या टपरीत बन सामोशावर ताव मारायचाय...
बावड्यातल World Famous सरबत प्यायचं...
आणि उन्हात उभ राहून गोळा खायचाय...
संध्याकाळी परत टपरीवरचा कटिंग घ्यायला... मला पुन्हा एकदा कॉलेजला जायचंय...

जुने पुराने Journals ढापून.. सगळ्यात शेवटीच submission पूर्ण करायचय..
स्कॉलर पोरांच्या नोट्स चे झेरोक्स मारून.. सगळ्यांना वाटत फिरायचय..
काम सोडून ओरल घ्यायला नक्की कोण येणार याची information काढत हिंडायचंय..
अभ्यासाच्या नावाखाली मित्राच्या रूम वर.. Carrom नाहीतर पत्ते कुटत बसायचंय...
युनिट टेस्ट चा एखादा महत्वाचा Paper फोडून.. नाव माहिती असून सुद्धा...
HOD नि विचारल्यावर गप्प उभ राहायला...मला पुन्हा एकदा कॉलेजला जायचंय...

सगळे Days  साजरे करत.. Gathering चे ३-४ दिवस फुल एन्जोय करायचेत...
एक मेकांच्या slam बुक्स भरत.. EESA च्या कट्ट्यावर दिवस दिवस घालवायचाय....
रोजच संध्याकाळी ठरल्याप्रमाणे पार्किंग मध्ये...
एखाद्या मैत्रिणीची बंद पडलेली गाडी सुरु करायचीये...
सगळ कॉलेज रिकाम झाला तरीही..
उगीचच कोपर्यावर्ती रेंगाळायला... मला पुन्हा एकदा कॉलेजला जायचंय....

ग्रुप मधल्या कोणाचाही Campus selection झाला कि...
सगळ्यांनी मिळून celebrate करायचय...
भावी आयुष्याची स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहत...
निदान लास्ट year ला तरी अभ्यास करायचय......
शेवटच्या पेपर नंतर सायलेन्सर काढून... गाडी सुसाट पलवत धुंद व्हायचंय...
Farewell च्या  रात्री सब कूच भूलाके... वाजवणारा थके  पर्यंत नाचायचंय...
आणि त्याच रात्री २-३ वाजे पर्यंत बसून... चार वर्षातला प्रत्येक क्षण पुन्हा जगायचाय..
वीट आलाय आता या Professional जगाचा...
एक स्वच्छंद फुलपाखरू होऊन... आयुष्यातले ते सोनेरी क्षण अनुभवायला....
मला पुन्हा एकदा तरी कॉलेजला जायचंय.....

-Shilpax
For DYPCET EESA 2007... :-)

Tuesday, June 12, 2012

चिमुकल्याच जग...

चिमुकल्याच जग खूपच निराळ..
सगळ्यांसारखच पण तरीही सगळ्यांपेक्षा वेगळ
इवलस पाखरू दिवसभर धाउन धाउन दमत
आणि संध्याकाळी आईच्या कुशीत जाउन वीसावत
रात्री चिमुकल्या डोळ्यात चिमुकली स्वप्न साठलेली
सांडू नयेत म्हणून पापण्यांची दार मिटलेली...
चिमुकल्याच्या जगात बाबाच मेन हिरो असतात..
आणि मित्राचे बाबा व्हिलन च काम करतात...
आई सारखी सुंदर जगात दुसरी कोणीच नसते...
तिच्या कडे अगदी सगळ्याच चुकाना माफी असते...
आजी सारख्या गोष्टी पुस्तकाला सुद्धा सांगता येत नाही....
आजोबांची छडी त्याच्याशिवाय कोणाला होता येत नाही....
चिमुकल्याच्या जगात आकाशाला सुद्धा हात लागतो...
एका ठोशात डोंगर सुद्धा चूर चूर होऊ शकतो...
चिमुकल्याच्या जगात सूख दूख काहीच नसत...
फक्त निखळ आनंद आणि निरागस प्रेम असत....
चिमुकल्याच्या जगात भविष्य नावाचा काळच नाही..
भूतकाळच भूत तिथे चुकुन सुद्धा फिरका नाही....
चिमुकल्याच्या जगात देव बाप्पा सगळ ऐकतो..
हसतो... बोलतो... आपल्याला हव ते सगळ सगळ देतो....
चिमुकल्याच्या या सुंदर जगात पोटभर खाउ, सगळ्यांच प्रेम आणि रात्रीची शांत झोप असते...
रोजची सकाळ नव्याने येते आणि आयुष्यातला सुगंध उधळून जाते..

चिमुकल्या या जगात मलाही कधीतरी जावस वाटतय...
जगायच विसरलोय कुठेतरी.... पुन्हा आता जगावास वाटतय......

सांग प्रिये काय हवंय तुला?

सांग प्रिये मला, आज बर्थडे गिफ्ट काय  हवंय तुला
कॉलेज  मध्ये असतांना..पौकेट मनी अपुरा म्हणून तुला कधी काही घेतला नाही
आणि आता नोकरीचा पगार माझा मलाच पुरत नाही...
पण या वेळी ठरवलंय.. काहीतरी गिफ्ट द्यायचं तुला..
सांग आज काय हवंय तुला?

चंद्र आणि तारे तोडून आणायला मला जमनार  नाही.
आणि तिकडे टूर वर जायला आपल्याला परवडणार नाही
पण
तुझा चंद्र मी आणि तूच माझी चांदणी सांगू सगळ्या जगाला
सांग आणखी काय हवंय तुला?

दागिन्यांची हौस तुझी मला चांगलीच ठाऊक आहे
सोने-हिरे सोड ग, इथे चांदीचाही भाव गडगडला आहे
सिम्पल आणि स्वीट तू अशीच आवडतेस मला. म्हणूनच
आज नुसताच गजरा आणलाय तुझ्या केसात माळायला
सांग आणखी काय हवंय तुला?

भारीतली लिपस्टिक आणि भारीतला ड्रेस हवाय कशाला?
मला पाहून तुझ्या गालावर चढलेली लालीच सजवते तुला..
म्हणून डेनिम ची जीन्स नाही पण हि जरीची साडी आणली आहे...
तुला आज साडीतच या सजलेली पहायचंय मला.
सांग आणखी काय हवंय तुला??

तुझे सगळे हट्ट खरच पुरवायचेत मला
तुझ्या सगळ्या इच्छा , अपेक्षा आणि स्वप्न सत्यात उतारवायच्यात मला
त्यासाठीच हे सगळ करतोय. थोडासा वेळ देशील का मला?
आयुष्यातला प्रत्येक क्षण तुझाच आहे
तूच श्वास आणि तुझाच ध्यास...
तुझ्यावर विश्वास आणि तूच आधार...
माझे सगळे सर्वस्वच अर्पण केलय तुला
सांग सखे आज बर्थडे गिफ्ट म्हणून आणखी काय हवंय तुला...??

मी तुझी वाट पाहतोय ...

मी वाट पाहतोय ...

प्रेमाचा पसारा आणि मायेचा विसावा..
घट्ट धरलेला हात आणि अडकलेला श्वास..
मांडलेला डाव उधळून, रागावून तू निघून गेलीस..
पण भावनांचा गुंता थोडा अजूनही बाकी आहे...
सोडवायची इच्छा नाही.. कारण मी तुझी वाट पाहतोय...

तास-न-तास मारलेल्या गप्पा..
हातात हात घालून तुडवलेला एकाकी रस्ता ...
एकांतात ऐकलेली कित्येक गाणी आणि गोष्टी..
एकत्र अंगावर झेललेल्या त्या पावसाच्या सरी...
तुझ्या प्रेमात अजूनही चिंब भिजलेला उभा... मी तुझी वाट पाहतोय...

सगळ्यांच्यात असूनही वेगळे जगलेले कितीतरी क्षण...
तुझ्या लांब सडक केसात गुंतलेलं माझ  मन...
सगळ्या जगाची  नजर  चुकवून  हळूच  तुला  पाहणारी  नजर ...
रात्र -न -दिवस  माझं तुझ्यासाठी  आणि  तुझं माझ्यासाठी  धडधडणार  ऊर...
तुझ्याचसाठी  जगणाऱ्या   या  जीवाला  जगवत... मी  तुझी  वाट  पाहतोय ...

माझ्या  हातून  नकळत  घडलेली  चूक ..
नात्याला  आपल्या  तिने  भेदला  अचूक ...
तो  राग  आणि  संताप  आणि  चिडलेली  तू ...
विनवण्या  करणारा  मी .. कारण  हवी  होतीस  तू ...
दोघांच्याही  रडणाऱ्या  डोळ्यातला  ते  आटलेलं पाणी ..
मला सोडून जाणारी तुझी पाठमोरी आकृती .. परत  फिरशील  म्हणून मी  तुझी  वाट  पाहतोय ...

मारायला  सोप्पं वाटतंय  ग ... पण  मी  नाही  मारणार ...
तू  परत  आल्यावर  तुला  कुशीत  कोण  घेणार ..??
प्रत्येक  उगवत्या  दिवसागणिक  तुला  हाक  मारतो  आहे ..
रोजच  दिवेलागीण  झाली  कि  देवाकडे  पुन्हा  तुझी  साथ  मागतो  आहे ...
रोजचीच  ती  भयान  काळरात्र  उघड्या  डोळ्यांनी  जागवतो  आहे ...
परत  ये  सखे  मी  खरच  तुझी  वाट  पाहतो  आहे .....

मी तुला भेटणार आहे.....

सुंदर... निरागस  चेहरा .. पाणीदार  डोळे ..
लांबसडक  केस ... ओठांवर  हलकीशी  smile..
आणि  गालावरची  गोड  खळी....
अगदी  जशीच्या  तशी  अजूनही  माझ्या  मनात  उभी ...
दहा  वर्ष  पूर्वी  तुला  पहिली  होती  तशी ...

लहानपणापासून  एकत्र खेळलो .. हिंडलो.. बागडलो..
एकमेकांसाठी  आणि  एकमेकांशीही  कितीतरी  वेळा  भांडलो ...
अगदी  सगळी  गुपित  दोघांनी  share केली ...
तेव्हाच  कधीतरी  काळात  नकळत  आपली  मन गुंतली...
हातात  हात  घालून  फिरत  लहानाचे  मोठे  झालो ...
शाळा संपली .. भातुकलीचे  खेळ संपले .. आणि  आम्ही  collagela आलो ..

College मधलं Famous couple आपणच ...
दरवर्षी नाटकातले Hero-Heroin पण आपणच...
सगळ्यांना ठाऊक  होत .. आपण  होतो  एक-दुजे के लिये...
आपल्यापण  जिंदगी मधला सगळा काही होत.. सिर्फ तेरे लिये...
पण College संपल्यावर खरतर  सगळाच  बदलून  गेलं...
Life ने साला आपल्याला एक मेकांपासून खूपच दूर लोटलं....

कितीही दूर गेलो तरी होतो तुझ्याच पाशी...
आणि माझ्याविना तू तरी राहशील कशी ...??
तुझ्याविना 10 वर्ष 10 युगांसारखी वाटली ..
पण आज तू भेटणार म्हणून  डोळ्यात आसवं दाटली...
कशी  असशील , काय  बोलशील .. हजारो  प्रश्न  आहेत ..
तुला  पाहण्यासाठी  मन, डोळे सगळेच आसुसले आहेत...

खात्री  आहे  माझ  प्रेम  त्या पाणीदार डोळ्यात अजूनही टच्च भरलेलं असेल..
नेहमी सारखा आजही गालावरच्या  खलीने तुला सजवलेलं असेल ...
वेळे आधीच येऊन आज मी तुझी वाट पाहणार आहे...
बावरलेली येशील  तेव्हा तुला अलगद मिठीत घेणार आहे ..
लाजून मान खाली घालशील तेव्हा तूझा हात हातात घेऊन...
सखे तुला लग्नाची मागणी घालणार आहे .. आज मी तुला एवढ्यासाठीच भेटणार आहे...

अवेळी आलेला एक कॉल.....

आज दुपारी ऑफिस मध्ये,
कामाच्या गडबडीत नेहमी सारखाच गुंतलो होतो...
इतक्यात फोन वाजला.. उचलायचा न्हव्ताच  मुळी...
शेवटची रिंग वाजेपर्यंत उचललाच  नाही...
मग शेवटी एकदाचा उचलून कानाला लावला...
आणि जमेल तितक्या चिडक्या आवाजात हॅलो म्हणालो...
पलीकडून कोणी बोललच नाही...
माझी चीड चीड जास्तच वाढली...चार शिव्याही  द्यव्याशा वाटल्या....
पण पलीकडची  शांतता खूपच गंभीर वाटत होती...
चार दिवासापूर्वी आलेल्या ब्लॅंक मेसेज ची आठवण करून देत होती...
कोणीतरी जवळच असल्याची जाणीव वाढत चालली होती...
क्षणभर हरवलो... पण लगेच सावरलो.. चिडून फोने ठेवणार इतक्यात....
"कसा आहेस....? ? ?"
फक्त दोनच शब्द कोणीतरी बोलले आणि सगळच सांगून गेले...
मन कधीच जुन्या आठवणींच्या मागे धावत सुटले होते...थेट गावाच्या वेशीवर जाऊन  थांबले होते...
बाकुळीचा पार... नदीचा घाट... देवलाकडए  जाणारी पायवाट...
चंद्राच्या  सगळयात जवळची चांदणी... भातुकलीच्या खेळातली राजा राणी...
आणि मी निघताना साठलेल डोळ्यातल पाणी.... आज माझ्याही डोळ्यातून वाहत होत...
ऑफीस मधल्यांची  नजर चुकवून पटकन डोळे पुसले....
फोन घेऊन बाजूला निघून गेलो.. एकंतात.....
काही पुढे बोलन दोघांनाही जमत न्हवत...
खोलवर आत काहीतरी दुखत होत....
चालू होत फक्त श्वासांच संभाषण हुंदके देत होत गहीवरलेल मन....
पापण्यान मधल पाणी गलांवर ओघळत होत...
जुनी प्रत्येक आठवण जागी करत होत....
हजारो प्रश्न येऊन ओठांवर थांबले होते... म्हणूंनच कदाचित ओठ थरथरत होते...
मधूनच तिच्या काकनांची  किन कीन ऐकू येत होती...
जणू डोळ्यातल पाणी लपवायचा ती व्यर्थ प्रयत्न करीत होती...
कितीतरी क्षणांची गोळा बेरीज करायची राहिली होती....
अचानक सगळी न सुटलेली गनित समोर उभी ठाकली होती....
त्यातच पलीकडे अस्पष्ट अशी ती उभी होती....
तिला पाहायचा खूप प्रयत्न केला...
पण जीव नुसताच आठवणींच्या जाळ्यात गुरफाटत गेला...
त्याच क्षणी पालीकडून एक हुंदाका ऐकू आला...
मला पुन्हा एकदा वास्तवात परत घेऊन आला....
पुढचे हुंदके सहन करायची हिंमत माझ्यात न्हव्ाती...
म्हणूंच स्वताला सावरले...
हजार प्रश्नाना बाजूला सारून फक्त "बरा आहे.. " एवढेच म्हटले...
अश्रूंमधे भिजलेले ओठ पालीकडून फक्त मूक हसले...
आणि आमचे फोन वरचे ते संभाषण तिथेच संपले....

 --शिल्पा लिमकर

तू जवळ असलास कि...

खवळलेला समुद्रही कधी कधी छान वाटतो...
त्यात वाहून जायची भीती वाटत नाही...
धुळीचे लोट घेऊन धावत येणारा सोसाट्याचा वाराही आवडतो...
त्यात हरवायची भीती वाटत नाही...
कडाडणाऱ्या विजांसोबत आपणही लपंडाव खेळावासा वाटतो...
त्यात होरपलायची भीती वाटत नाही...
धो-धो कोसळणारा पाउसही ओंजळीत साठ्वावासा वाटतो....
तेव्हा घरापासून दूर असल्याची भीती वाटत नाही...
तू जवळ असलास कि तुझा हात हातात असतो...
तुझा आधार असतो.. म्हणूनच या जगाचीही भीती वाटत नाही.....

- शिल्पा लिमकर

बाईक राईड - पावसातली...

पाउस पडतोय बाहेर... बघ कशी येतेय सरी वर सर...
ऑफिस मध्ये बसून आनंद नाही घेता येत...
चाल उठ ना... आज थोड लवकर बाहेर पड...
पाउस जायच्या आधी पटकन निघ....
बाग वगैरे राहू देत सगळ... आज बाईक ची किल्ली तेवढी घे....
समान भिजेल असा खोटच मित्रांना सांग रे...
रेनकोट विसरलाच आहेस ना आज.. हेल्मेट पण घालू नको तसाच निघ...
बाईक ला किक मार आणि सुरु कर... तुझी बाईक राईड - पावसातली...

आडोशाला थांबलेल्या लोकांकडे एक कटाक्ष टाक...
लोकांना सवयच आहे तुझ्यावर हसायची... आज तू त्यांच्यावर थोडस हस...
आणि पावसाच्या सरी अंगावर झेलत तसाच पुढे चल...
रोजच्या वळणावर आज वळू नको...
सरळ पुढे चल....न पाहिलेल्या एका नवीन रस्त्यावर....एका नवीन क्षितिजा कडे...
कुठे थांबायचे कुठे जायचे काहीच नक्की नाही...
पण असाच पुढे बाईक पालवत राहा....
पावसाच्या असंख्य सुया टोचतील तुला... टोचू देत..
नाहीतर अशा अदृश्य सुया तोचातच असतात रोज तुला....
नेहमीच्या अश्रूंच्या जागी आज फक्त पावसाचे थेंब ओघळू देत...
कपाळावरच्या रेषा फुल धुवून जाऊ देत...
एकाकी रस्त्यावर सुसाट धावू देत गाडी तुझी...
पाउस थांबे पर्यंत.. मन अगदी चिंब भिजेपर्यंत....

आता कुठेतरी टपरी पाहून गाडी थांबव आणि चहा घे....
चिंब भिजलेला मन आणि शरीर त्यावर गरम गरम चहा... झक्कास combination ....
गरम श्वास हळू हळू शांत होईल.. चल आता माघारी...
किती लांब आलो .. कुठे आलो...कशाला फिकीर हवी आहे...
जायचे तर पुन्हा घरीच आहे.... :)

परत जाताना स्पीड थोड कमीच ठेव...
न्हालेल्या त्या धरतीला निरखून बघ....
तुझ्य्हा स्वप्नातल्या प्रेयसी सारखी ती सुद्धा सुंदर दिसेल...
मघाच्याच रस्त्यावर नवीन काहीतरी जाणवेल....
बघ काही जुन्या पाउलखुणा सापडतात का....
घरी ये परत तसाच.. कपडे बदल... चहाचा एखादा मग भरून घे...
आणि चार चौघांसारखाच पुन्हा खिडकीतूनच...
enjoy कर हा पहिला पाउस....
पुन्हा कधी आठवण दाटून आलीच..
कि निघ अशाच एका बाईक राईडला.. पावसातल्या.....
-शिल्पा लिमकर

हॉटेलातला पोऱ्या...

कोपर्यावरच्या शंकर शेठच्या हॉटेलात...
जेमतेम १०-१२ वर्षांचा....
सगळ्यांच्या हाकेला "आलो साहेब" करत धावणारा...
नाव-गावाचा पत्ता नसलेला...
कुणासाठी गोत्या तर कुणासाठी बाब्या...
टेबल - बाकड्यांशी खेळणारा... तो एक हॉटेलातला पोऱ्या..

मळका शर्ट आणि मळकीच चड्डी एक मळका फडका खांद्यावर टाकलेला...
बिन साबणाची आंघोळ तरीही चेहरा सदा खुललेला...
केसांना नसलं तरीही त्याला वळण नक्कीच छान होत...
आई-बाबा नसताना कुणी शिकवलं ठाऊक न्हवत..
एवढ्याशा देहात त्या प्रचंड उत्साह होता...
धरणी त्याची माय आणि आभाळच बाप होता....
पोरका असूनही नसलेला... तो एक हॉटेलातला पोऱ्या..

कोणीही काहीही हाक मारावी...
कधी कधी तर हाकेबरोबर एखाधी शिवी देखील हसडावी...
पण प्रत्येकालाच त्याने हसत हसतच ओ द्यावी...
एका हाकेला मात्र तो नेहमीच कान टवकारी....
शंकर शेठ त्याला जेव्हा त्याच्या नावाने हाक मारी..
घना म्हणजेच घनश्याम नावाचा..  तो एक हॉटेलातला पोऱ्या..

पाहते सूर्याला तोच उठवतो...
आचार्याने बनवलेला पहिला चहा त्याला पाजतो...
कदाचित मगच सूर्य नारायण त्याच्या कामावर निघतो...
चिमुकल्या पावलांनी पोरगा तुरु तुरु धावत असतो...
चपळाईने टेबल बाकड चकाचक करून टाकतो...
नुसता अर्धा चा आणि एक पाव पदरात पडतो....
तोच गट्टम करून कमाल लागतो... तो एक हॉटेलातला पोऱ्या..

भुकेलेल्यांना हव ते देऊन तृप्त करायचं...
आणि पोटातल्या कावळ्यांना पाणी पाजून शांत करायचं...
दिवस भर काम करून करून दमायच...
आणि वेळ मिळालाच तर चार घास खाऊन घ्यायचं...
नाहीतर संध्याकाळचा चा-पाव आहेच ठरलेला...
स्वताच असा काहीच नसलेला... तो एक हॉटेलातला पोऱ्या..

रमत गमत.. पेंगत टळलेली रोजचीच दुपार...
सांजवेळी पुन्हा एकदा टेबल बाकड पुसून पोरगा तयार...
चहा, नाश्ता जेवण सगळ on time आणून देणार...
झालीच जर गडबड चुकून तर मालकाच्या शिव्या खाणार...
जास्त काही झालंच तर एक दिवसाचा पगारही जाणार.... आणखी काय होणार...
दोन मुके अश्रू गिळून ते चिमुरड पुन्हा गाणी म्हणणार..
तरीही गिर्हाईकाचा पडलेला रुपयाहि परत करणारा.. तो एक हॉटेलातला पोऱ्या..

आई नाही बाप नाही...एकटाच लेकरू जस हरवलेलं कोकरू...
रोजचा दिवस येईल तसा ढकलत चाललंय...
दिवसभर त्या देबळ बाकड्यांशी खेळतंय..
आणि रात्रीच्या वेळी त्यातल्याच एका टेबलावर कसतरी झोपतंय....
थंडीच अंथरून आणि थंडीचच पांघरून...
रात्री पडायच्या भीतीने झोपतो देखील सावरून...
रात्रीच्या कुशीत शिरून.. स्वत साठीच एखादी सुरेल अंगी गातोय...
मिटलेल्या पापण्यांमध्ये एक सुंदरस स्वप्न साठवतोय... तो एक हॉटेलातला पोऱ्या..

Tuesday, June 5, 2012

खाटकाच पोर.....


आठवणींचा घन दाटून आलाय...

आठवणींचा घन दाटून आलाय...
त्याला कुशीत तुझ्या सामावून घे....
पाउस पडतोय तोपर्यंत...
मन मोकळ रडून घे.....

पिलान माझ्या आज टाकलं पाहिलं पाउल...

भिंतीचा हात हळू हळू सोडत...
तोल सावरताना थोडस धडपडतच..
बाबांकडे धाव घेता घेता.. खळखळून हसत...
पिलान माझ्या आज टाकलं पाहिलं पाउल......

अशीच ती तुझी वाट पाहत असेल....

पहाटे अगदी सुर्याच्याही आधी उठून ,

न्हाऊ केल्यान तीच कोवळं सौंदर्य खुलत असेल,

ओल्या लांब सडक केसात हळुवार हात फिरवून ,

तुझ्या आठवणींचा गुंता ती सोडवत असेल,

अशीच ती तुझी वाट पाहत असेल


बागेतल्या कळ्यांना स्वच्छंद खेळवून,

रोजच हा वारा तिच्या भेटीला येत असेल,

वसंतातील तीही एक नाजूक कळीच आहे अजून

पण वादळातही तुझ्यासाठी अखंड फडफडत असेल

अशीच ती तुझी वाट पाहत असेल


क्षितिजाकडे एकटक पहाते किनार्यावर उभी राहून,

खोटीच का होईना पण सागर आणि आकाशाची भेट झाली असेल,

अथांग या सागराला उराशी कवटाळून,

तुझ्या मिठीत आल्याचा आभास तिला होत असेल,

अशीच ती तुझी वाट पाहत असेल


संध्याकाळी उंबरठ्यावर एका पायावर भर टाकून,

चौकटीला टेकून, तुझ्या वाटेकडे पाहत असेल,

आसवानी भरलेल्या टपोर्या या डोळ्यातून,

तुझी हलकी तसवीर हळूच गाल कुरवाळत असेल,

अशीच ती तुझी वाट पाहत असेल


कोटी नक्षत्रांच तिने पांघरून ओढलं असेल,

त्या तेजस्वी चंद्राच्या उशीवर हळूच डोकं ठेवून,

तुझ्या स्वन्पांच्या नगरीत ती राजकुमारी बेधुंद होत असेल

अशीच ती तुझी वाट पाहत असेल


उठ, घे भरारी , पंखातलं तुझ्या बळ एकवटून

शोध तिची नजर जी तुलाच शोधात असेल,

ती तुझं विश्व आणि तूच तिचा आधार , संग तिला जाऊन,

बघ.. .. हे ऐकून तिच्या डोळ्यात तेज आणि कंठात प्राण आला असेल,

आणि

तुझ्या मिठीत येऊन ती पुन्हा एकदा जिवंत झाली असेल..

अशीच ती तुझी वाट पाहत असेल..

मला पुन्हा एकदा तुझ्याच प्रेमात पडायचं आहे....

पहाटेच्या मंद धुक्यात...
दारातल्या बकुळीच्या झाडाखाली...
प्रत्येक फुलाबरोबर....
एक एक आठवण वेचायची आहे....
मला पुन्हा एकदा तुझ्याच प्रेमात पडायचं आहे....

ऑफिस मधल्या कळकट कागदी धीगार्यातल्या...
एका छानशा गुलाबी पानावर....
तुझ्यावरच केलेली कविता लिहून...
तुला एक प्रेम पत्र धाडायचं आहे...
मला पुन्हा एकदा तुझ्याच प्रेमात पडायचं आहे....

आपल्या पिलाला आज थोड लवकर झोपवून...
सगळी काम जशीच्या तशी सोडून..
चांदण्यांनी गच्च भरलेल्या निशब्द आकाशाखाली....
सारी रात्र तुझ्याशी निवांत गप्पा मारत घालवायची आहे...
मला पुन्हा एकदा तुझ्याच प्रेमात पडायचं आहे...

संसाराच्या धावपळीतून..
अगदी थोडासा वेळ काढून...
तुझ्या केसांत हळुवार हात फिरवत...
बायकोची पुन्हा प्रेयसी व्हायचं आहे...
मला पुन्हा एकदा तुझ्याच प्रेमात पडायचं आहे....

हिरकणी..........

ऑफिस मेल box  मध्ये मराठी Email चुकुनच दिसतात...
otherwise बाकीचे मात्र ढिगाने असतात...
आज एक मराठमोळा असाच जागा झाला...
आणि त्याने हिरकणीचा किस्सा share  केला...

का कुणास ठाऊक तो mail मी २-३ वेळा वाचला...
delete न करता तसाच Archive केला...
बाळासाठी अंधारात गड उतरणारी हिरकणी काही केल्या डोळ्यासमोरून जाईना...
आणि माझ्यातली आई मला तो किस्सा विसरुही देईना....

हिरकणी सारखी नसले तरी मीही एक आईच आहे...
उंच आकाशी उडणारी घार पण चित्त मात्र पिलापाशी आहे....
रोज सकाळी बाहेर पडताना दरवाजा बंद होईपर्यंत पिलाकडे पाहते आहे....
आणि संध्याकाळ कधी होईल याच विचारात घर सोडते आहे.....

दिवसभरात १० वेळा बाळाला mobile वर पहायचं..
photos आणि videos यावरच समाधान मानायचं...
जमलंच तर घरी एखादा phone करून पिलाचा आवाज ऐकायचा...
आणि मायेने फुटलेला पान्हा जगापासून लपवायचा....

घड्याळाच्या काट्याकडे पाहतच काम करायचं दुसरीकडे लक्षही द्यायचं नाही...
Pending कामाच्या यादीत बाळाच्या खाउची वेळही विसरायची नाही..
संध्याकाळी जाताना गाडीच स्पीड कधी वाढत कळत नाही...
आणि traffic  ला मागे सारत रस्ता कधी सरला कळत नाही....

सगळ्यांनी विचारव.. कस जमत हे तुला...?
तान्ह्या बाळाला अस घरी सोडून यायला...?
चेहऱ्यावर माझ्या एकच Smile  असते त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला..
आणि आत हिरकणीच काळीज आसुसलेल.. बाळाला कुशीत घ्यायला..

का हे सगळ....? कशासाठी...? कधी वाटत सोडून द्याव सगळ काही...
फक्त बाळाची आई व्हाव बाकी नकोच काही....
पण....
खर तर आई आहे म्हणूनच रोज हे धाडस करते आहे ...
माझ्या पिलाच्या  भाविश्यासाठीच...हि आई रोज हिरकणी बनते आहे....

“वाळूचं घर”…...

समुद्र किनारी वाळूत बांधलेलं एक छोटंसं घर…
घर कसलं जणू छोटीशी गुहाच ..
छोटंसंच होतं पण स्वप्नांनी गच्च भरलेलं…
“त्या” दोघांनी स्वतःच्या हातानी बांधलेलं….हसत खेळत… गप्पा मारत..
एकमेकांच्या हाताला नकळत स्पर्श करत……

वाळूच्या प्रत्येक ओंजळीबरोबर एक एक स्वप्नं बघायचं…
दोघांच्या प्रेमाचा त्याला आधार द्यायचा…
विश्वासाच्या हळुवार हाताने पाया भक्कम करायचा….

घराच्या दारासाठी रोवलेला पाय तिचा… लवकर निघावा म्हणून त्याने घाई करावी ..
पण तिला मात्र त्याच वाळूत त्याच्या प्रेमाची ऊब भासावी..
त्यानेही मग सुंदरसं घर बांधावं.. उगीचच तिला आवडलं का? विचारावं …
तिनेही हसत हसत थोडं Correction सुचवावं…
आणि पुन्हा एकदा दोघांनी मिळून ते घर पूर्ण करावं…

मग वेळ येते रुतलेला पाय काढायची… दोघांचाही जीव त्यात गुंतलेला..
आणि पाय जणू समाजाच्या बंधनात रुतलेला…
सरळ नाही काढला तर सगळं घरच कोसळेल..
आणि तसाच राहू दिला तर आयुष्यच कठीण होऊन बसेल….

हळू हळू मग दोघेही तो पाय बाजूला काढतात…
तो वाळूने भरलेला तिचा पाय साफ करत असतो…
आणि तिचे डोळे मात्र ते घर न्याहाळत असतात..
तासान-तास मग दोघांनी ते घर पापण्यात साठवावं…
निघतानाही पुन्हा पुन्हा मागे वळून पहावं…

दोघे निघून गेले पण वाळूचं घर मात्र तसंच उभं आहे ..
त्यांच्या स्वप्नांना आसरा देत…
मग रात्रीच्या वेळी चांदण्यांनी अंगणात मोहक सडा घालावा..
चंद्रानेही आपल्या दुधाळ प्रकाशाने न्हाऊ घालावं …
अगदी राजवाड्याच्या दिमाखात किनार्यावर उभं रहावं…
समोरच्या विशाल सागरावर.. आपलं साम्राज्य गाजवावं…
आणि भरतीच्या वेळी मात्र समुद्रानेच…
त्या घराचं अस्तित्व आपल्या पोटात सामावून  घ्यावं…

एखाद्या मोठ्या लाटेबरोबर ते काठावरच्या वाळूत कुठेतरी हरवून जातं…
आणि दुसर्या दिवशी पुन्हा एकदा कालच्याच स्वप्नांना घेऊन कोणीतरी नव्याने उभं करतं…...
“त्या” दोघांच्या प्रेमाचं प्रतीक.. ते एक “वाळूचं घर”…...

Monday, June 4, 2012

चांदोबाचे प्रेम-पत्र.....

आकाशाकडे आज येता येता सहजच लक्ष गेलं,
रोजचंच ते पण आज थोडस वेगळ वाटलं,
काही गोष्टी रोजच्याच असतात...
पण असं वेगळपण कधीतरीच जाणवतं आणि मनात खोल कुठेतरी स्पर्श करून जातं..

आज त्या आकाशात असंच काहीतरी दिसलं...
निळ्याशार रंगात मन क्षणभर हरवून गेलं..
कल्पनांचं सत्र अगदी त्याच क्षणी सुरु झालं आणि उगीचच कविता लिहावसं वाटलं..... :)

सकाळच ते आकाश चांदोबाच्या ROOM सारखं दिसत होतं..
आणि चांदोबा अजून झोपलाच आहे असं वाटत होतं..
निळ्या रंगाच्या जमिनीवर चुरगळलेले कागदाचे बोळे पसरलेले,
आणि त्याच पसाऱ्यात चांदोबा कुठल्यातरी चादरी खाली लपलेले...

काय बर झालं असेल....?
अहो पाहिलं वहील प्रेम आणखी काय....
रात्रभर बसून चांदोबा आपलं पाहिलं वहील प्रेम पत्र लिहित होता..
प्रिय चांदणी साठी आपलं काळीज कागदावर उतरवत होता....
जमलंच नसेल नक्कीच... म्हणून तसाच झोपून गेला असणार....
म्हणूनच हा सगळा पसारा तसाच राहिला असणार....

मनात वाटलं...
पटकन जाऊन त्याच्या हातातल्या कागदावर एक छानस प्रेम पत्र लिहाव..
आणि तो उठायच्या आधीच चांदणीला ते पोचवून याव...
चांदोबा मात्र उठल्यावर पुन्हा  रोजच्या कामाला लागेल...
प्रेमपत्र विसरून संध्याकाळची वाट पाहिलं....

काय होईल नक्की? चांदणी accept  करेल.... ?
अर्थात....
संध्याकाळी चांदणी चांदोबाला भेटेल....
नेहमी पेक्षा आज थोडी जास्त जवळ बसेल...
नजरेतूनच ती चांदोबाला विचारेल...
माझ्यासाठी तारे तोडून आणशील का रे म्हणेल....
चांदोबाने आनंदाने जणू उडीच मारावी....पळत जाऊन पृथ्वीला एक प्रदक्षिणा घालावी....
दोघे मग रात्रभर हातात हात घालून क्षितिजावर बसतील...
आणि सकाळी पुन्हा एकदा रात्रीची वाट पाहायला... प्रकाशात हरवून जातील..... :)

- शिल्पा