Thursday, December 29, 2016

अभंग अपेक्षा....

आमचे हे नेहमी म्हणतात .... "माणसाने कधीही कुठली अपेक्षा ठेवू नये... अगदी कुणाकडूनही नाही...."
माझ्यापेक्षा चार-पाच पावसाळे जास्त पाहिलेत त्यांनी आणि आजवरच्या अनुभवावरून त्यांनी हा नियम बनवून घेतलाय आणि स्वतःवर लागू सुद्धा केलाय... :)

पण माझं थोडं वेगळं आहे... मला वाटतं माणसाने अपेक्षा ठेवलीच नाही तर जगणं थोडंसं मुश्किल होईल.... 
समोरून येणारा ओळखीचा माणूस आपल्याकडे बघून स्माईल करेल एवढी माफक अपेक्षा तर असतेच ना... अन ती नाही ठेवली तर आपल्यातरी तोंडावर हसू कसं येणार नाही का... ????

सकाळी डोळे उघडल्यावर समोर आई दिसेल अशी अपेक्षा असते म्हणूनच तर पिल्लू हसत हसत डोळे उघडतं... 
आपल्याला येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर बाई आपल्यालाच विचारणार अशी अपेक्षा असते म्हणून आपण आधीच हात वर करून तयार असतो.... 
खेळात आपण जिंकणार अशी अपेक्षा असते म्हणून तर आपण डबल जोर लोळवून खेळतो... 
आजचा दिवस चांगला जाईल हि अपेक्षा असते म्हणून तर आपण आनंदाने दिवसाची सुरुवात करतो.... 
शिखरावर नाही निदान मध्यावर तर पोहचू अशी अपेक्षा ठेवूनच प्रत्येकजण चढाईला सुरुवात करतो.... 
कुणी ओळखीचं वळणावर भेटेल याच अपेक्षेने आपण प्रत्येक वळण मागे टाकतो... 
कुणीतरी डोळे पुसणारं आपलं माणूस सापडेल म्हणूनच तर आपण आसवं ढाळतो... :)
आणि हो... दुःखाच्या गर्दीतून कधीतरी सुखही समोर येईल याच अपेक्षेवरच तर आपण आयुष्य जगत असतो... :)

छोट्या मोठ्या... बऱ्याच अपेक्षा... कधी क्षुल्लक... कधी खूपच गंभीर... महत्वाच्या... 
अपेक्षा हि अपेक्षा असते... कधी आपलीच इच्छा असते तर कधी एक आशा... 

अपेक्षा नेहमीच ठेवावी माणसाने पण ती पूर्ण झालीच पाहिजे अशी अपेक्षा मात्र ठेऊ नये...  :)
अपेक्षेचा भंग झाला कि मग सगळंच बिनसतं... म्हणून मला वाटतं.... नेहमी तुमची अपेक्षा अभंग ठेवा... अपेक्षा भंग नसेल तर होणारा त्रासही नसेल... मनाची नाराजी पण नसेल... पण एक नवी आशा मात्र दरवेळी असेल आणि तीच तुम्हाला प्रफुल्लित ठेवेल... 

एखादी अपेक्षा पूर्ण नाही झाली तर या वेळी नाही... पुढच्यावेळी सही म्हणून तीच अपेक्षा नव्याने ठेवा... हीच ती अभंग अपेक्षा... अभंग मुद्दामच सुरुवातीला ठेवला तो भंग होणार नाही मग अपेक्षा भंग होण्याचा प्रश्नच नाही... :)

मान्य आहे हे सर्व सांगणं लिहिणं जितकं सोप्प आहे तितकंच ते अमलात आणायला खूप अवघड आहे... पण काय आहे ना... ये दिल बडा बेवकूफ आहे... इसपे हाथ राख के कहो... ऑल इज वेल... बेचारा मान भी जाता है... :)

म्हणूनच अभंग अपेक्षा ठेवा.. पूर्ण झाली तरी आणि नाही झाली तरी तुमच्या वाट्याचं समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल... :)

आणि हो...माझी कोणतीही पोस्ट वाचणाऱ्या दहा जणांपैकी एकाला तरी मी मांडलेला विचार आवडेल आणि काहीतरी कंमेंट मिळेल... याच अपेक्षेपोटी मी प्रत्येक पोस्ट टाकते... आणि समजा नाहीच आवडलं कुणाला तर तीच अपेक्षा ठेवून मी पुढची पोस्ट टाकते... :)
तर मग एका नव्या अपेक्षेने एका नव्या वर्षाची सुरुवात करा मीही करतेय... 
Happy New Year २०१७ :) 

- टिंग्याची आई 

Tuesday, December 20, 2016

हक्काचा विसावा....

अनुची आज खूपच गडबड चालू होती... सुट्टीचा दिवस होता... म्हणजे रजाच घेतली होती तिने तरीही सकाळपासून भलतीच धावपळ सुरु होती... आज तिच्या लेकीचा म्हणजे मनूचा बडे होता... पोरगी भलतीच खुश होती आणि म्हणूनच अनुसुद्धा... लेकीचं फेव्हरेट गिफ्ट दिलं होतं तिच्या लाडक्या आईने... एक छानसा परीचा ड्रेस... नाहीतरी अनुच्या आयुष्यातली परीच होती ती... सुखाची जादू करणारी परी...
बडे संध्याकाळीच करणार होते घरच्या घरी पण तरीही अनुने आज सुट्टी घेतली होती...
एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी....
अनु.... एक शिकली सवरलेली... नोकरी करत घर सांभाळणारी मुलगी... स्वतःचा ३ रूमचा फ्लॅट तिथे ती आपली आई आणि लेकीसोबत राहते... एक सिंगल पॅरेन्ट असूनही लेकीच्या कोणत्याही बाबतीत तिने काहीही कमी पडू दिलेलं नाहीये....
हो... सिंगल पॅरेन्ट... गेली चार वर्ष झाली ती मनूला एकटीच संभाळतेय... अमित... मनूचे बाबा... एकटाच राहतोय त्यांच्या जुन्या घरी...
दोघेही चांगले कमवणारे, चांगल्या कंपनीत कामाला आहेत... तसं त्यांचं लव्ह मॅरेज... घरचे समजूतदार म्हणून त्यांनी छान थाटामाटाने लग्न लावून दिलं... वर्ष दोन वर्ष छान संसार चालू होता... एक छान पिल्लूही दिला बाप्पाने मनूच्या रूपाने... पण नंतर काय बिनसलं देव जाणे... दोघेही नकळत दुरावत गेले... नात्यातला दुरावा इतका वाढत गेला कि दोघांना सोबत राहणं असह्य झालं आणि त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला... लेक अवघी २ वर्षांची होती म्हणून अनुकडे राहिली आणि अमितला अधेमधे भेटायला मिळायचं...
चार वर्ष झाली तरी अजून ऑफिशियल डिवोर्स मिळाला नाहीये आणि त्यासाठीच दोघं धडपड करत आहेत... :(
गेली चार वर्षं अगदी रोज म्हटलं तरी अनु अमितचा विचार करते... तिच्यावर आणि मनूवर इतकं प्रेम करणारा तिचा अमित असा कसा वागू शकतो हेच तिला कळत न्हवतं....  रोजची रात्र जणू काळरात्र बनून यायची अन थकलेल्या शरीराला अश्रूंत भिजलेली झोप शांत करून जायची... मनू होती म्हणून आजवर अनु तग धरू शकली... नाहीतर तिचं काय झालं असतं त्या बाप्पालाच ठाऊक...

थोडंफार काहीतरी झाल्यावर नातं तोडणाऱ्यातली अनु न्हवती... फार विचार करून निर्णय घेणारी आणि समंजस त्यामुळे तिच्या या निर्णयाला घरच्यांनी फार विरोध केला नाही... लेकीला आणि आईला सोबत घेऊन अनु राहत होती... सोपं न्हवतं असं एकटं आयुष्य जगणं पण तरीही ती जगात होती... लढत होती... एकटी... चिमुकल्या लेकीला पाठीशी घेऊन...

अमितही काहीसा अनुसारखाच पण बऱ्याचदा त्याचा राग मात्र त्याला तोंडघशी पाडायचा... कदाचित हा रागच त्यांच्या नात्याच्या या अवस्थेला कारणीभूत होता... घरातून कायमचं निघून जाणाऱ्या अनुच्या पावलांना माघारी फिरण्याची विनंती सुद्धा त्याने केली नाही... स्वतःमध्ये आणि कामामध्ये त्याने इतकं स्वतःला गुरफटून घेतलंय कि अनुचा काय त्याचा स्वतःचाही आवाज तो ऐकू शकत नाहीये... वेळ हा फक्त कामासाठीच आहे असं काहीसं त्याचं मत आहे...

गेल्या चार वर्षांत तो मनूला भेटायलाही फार वेळा आला न्हवता.. दार दुसरा तिसरा शनिवार अनु त्याच्यासाठी राखून ठेवायची.. पण तो मात्र फार कमी वेळा आला त्यांना भेटायला... "माझ्यासाठी नाही पण त्या लेकराची सुद्धा ओढ वाटू नये त्याला...?" हेच तिच्यासाठी मोठ्ठ प्रश्नचिन्ह होतं... नेहमीपेक्षा कामात आता तो जरा जास्तच गुंतला होता म्हणे... घरी येण्या जाण्याचाही नेम नाहीये... आणि हो जॉब मध्ये खूप प्रगती केलीये म्हणे... एवढं काम एवढा व्याप तरीही आश्चर्य म्हणजे कोर्टाची एकही तारीख त्याने आजवर चुकवली न्हवती...
वाढदिवसाची वगैरे तारीख हमखास विसरणार अमित कोर्टाची तारीख मात्र कसा काय लक्षात ठेवणे होता कोणास ठाऊक... हजारो प्रश्न रोज अनुच्या डोक्यात थैमान घालत पण उत्तरं मुळीच सापडत न्हवती.. आणि आता तर ती शोधायची इच्छाही मेली आहे असं तिला वाटायचं...
आज मनूला मुद्दाम ती बरोबर घेऊन आली होती... कदाचित बाबाला बडेच्या दिवशी तरी लेकीशी बोलावसं वाटेल म्हणून... आणि शंकाही होतीच कि त्याच्या लक्षातही असेल कि नाही... याच सगळ्या विचारात अनु गाडी चालवत होती... शेजारी बसलेल्या मनूचे प्रश्न चालूच होते... कुठे जायचंय.. कोण कोण येणारे.. वगैरे वगैरे...
त्या जीवाला तर बाबा म्हणायची साधी सवय पण न्हवती... आपल्याला एक बाबा आहे आणि दूर कुठेतरी राहतो एवढंच काय ते तिला ठाऊक... अनूनेही त्याच्या बद्दल बोलणं, सांगणं बऱ्याचदा टाळलं होतं... "बाबा खूप चांगला आहे" एवढंच ती सांगायची...  पण त्या चिमुकल्या जीवाला बाकीच्यांनी जे काही सांगितलं त्यावरून बाबा म्हणजे कुणी फारशी चांगली व्यक्ती नसते असाच तिचा ग्रह झाला होता...
मनूच्या प्रश्नांना जमेल तशी उत्तर देत प्रवास चालू होता... अवघा ४-५ किलोमीटर चा प्रवास तोही अनुला दरवेळी मैलोन मेल लांब वाटायचा...

कोर्टाच्या दारातच अमितची गाडी दिसली.. तो आजही वेळे आधी पोचला होता... आणि त्याच्या वकीलांशी बोलण्यात बिझी होता... अनुने गाडी मुद्दामच थोडी लांब लावली... आणि मनूला घेऊन ती थेट आपल्या वकिलांकडे गेली....

अमित समोर दिसला तशी आतून एक कळ उठली... नकळत तिचं मन धावत जाऊन त्याला एक मिठी मारून आलं... त्याचा स्पर्श रोमारोमात भरून गेला... डोळे काठोकाठ भरून आले... आणि त्याच्याशी तोंडभर हसावं म्हणून मन आशेनं त्याच्याकडे पाहू लागलं... पण... अमित मात्र तितक्याच निर्विकारपणे तिच्याकडे पाहून फक्त "hi..." म्हणाला... क्षणार्धात हळवी अनु गळून पडली आणि आणि डिवोर्स घ्यायला आलेली इतकी वर्षे एकटी संसार करणारी... लेकीला एकटी सांभाळणारी अनु सावरून उभी राहिली.....

निदान मनूला तरी त्याने मिठीत घ्यावं... कडेवर घ्यावं अशी आशा होती... पण त्याने तेही केलं नाही... बाबाकडे जा म्हटल्यावर मनू गेली त्याच्याकडे... तिचा एक पापा घेऊन नेहमीप्रमाणे एक चेक अमितने तिच्या हातात दिला.... आणि मनू आईकडे परत आली... दरवेळी एक चेक तो माणूस द्यायचा... चेक वटवणं तर दूरच पण आजवर अनुने त्यावरची रक्कम सुद्धा कधी पाहिली न्हवती...
थोडीफार कागदपत्रांची कामं आटपली आणि मग दोन्ही पार्टी बोलायला म्हणजेच अर्ग्युमेण्ट ला सज्ज झाल्या... आजवर सांगितलेल्या त्याच तयच गोष्टी पुन्हा गिरवल्या जात होत्या... चार वर्षांपूर्वीची भांडणं आज पुन्हा नव्याने उकरून काढली जात होती... वकील आपापल्या परीने प्रत्येक कारणाचा अर्थ लावून त्या दोघांची बाजू मांडत होते... अमिताही बोलत होता अगदी मुद्देसूद... जणू सगळं काही त्याच्या हुबेहूब लक्षात होतं...
"तू बोलायला लागलास कि नुसतं ऐकत बसावसं वाटतं..." असा नेहमीच म्हणायची अनु...
पण आज ती नुसतीच शांत होती... सगळं शांतपणे ऐकत उभी होती... आणि हातात घट्ट धरला होता बावरलेल्या मनूचा हात....

अनुला असं शांत पाहून अमित अचानक गप्प झाला... कदाचित त्यालाही काहीतरी जाणवलं... सगळेच गप्प झाले होते... तेव्हा डबडबलेले डोळे वर करून अनुने अमितकडे पाहिलं... आज तिला अनावर झालं होतं.. डोळ्यातून संतापाची धार घळघळ वाहू लागली होती.... खूप राग आला कि अनु अशीच वागते लक्षात होतं अमितला....

थरथरत्या आवाजात अनु बोलू लागली... 
अमित... किती सहजपणे बोलून जातोस रे तू.. हे नातं नको आहे म्हणून किती प्रयत्न करतोस... हे नातं जुळवायला सुद्धा तू इतका उतावळा न्हवतास... आणि हेच नातं जपतानाही इतका उत्सुक कधीच न्हवतास रे तू... 
कोर्टाच्या सगळ्या तारखा तू न चुकता लक्षात ठेवल्यास रे पण साधा आपल्या लग्नाचा वाढदिवस असो किंवा मग लेकीची डॉक्टरची अपॉइंटमेंट कुठल्याच तारखा तू कधी लक्षात ठेवल्या न्हवत्यास... 
दार वेळी कोर्टात येताना वेळेआधी हजर राहतोस पण कधी मला दिलेली वेळ पाळली नाहीस किंवा कुठलंही काम कधी वेळेवर पूर्ण केला नाहीस... आणि ज्या वेळी मला खरंच तुझी गरज होती तेव्हाही तू ती वेळ हरवलीस... 
किती जबाबदारीने सगळे पुरावे गोळा केलेस... चार वर्ष झाली ते रीतसर सांभाळलेसही... पण तुझं माझं नातं कधीच सांभाळलं नाहीस... ती तुझी जबाबदारी न्हवतीच का रे? 
आज इथे वकिलांसमोर जितकं तू माझ्या विरुद्ध बोलतोयस... हे नातं कसं योग्य नाहीये हे जीव तोडून सांगतोयस... यातलं कणभरही तू कधी मोकळेपणाने माझ्याशी बोलला नाहीयेस... माझ्या कडून इतक्या चुका व्हायच्या असं म्हणतोस तू आज पण यातली एक जरी तू मला वेळीच समजावून सांगितली असतीस तर कदाचित आज चित्र खूपच वेगळं असतं... 

का असा वागलास तू??? तुझी अनु तुला खरंच नको आहे का????
अमित.... आपण आत्ता इथे जितकं बोलतोय त्यापेक्षा निम्मं जरी एकमेकांशी बोललो असतो तर आज हि वेळ आली नसती.... एकमेकांविरुद्ध असे पुरावे गोळा करण्यापेक्षा जर आपल्या नात्यातला गोडवा आपण जपला असता तर आज असे एकमेकांच्या विरुद्ध उभे राहाव लागल नसत... कोर्टाच्या तारखा अशा लक्षात ठेवण्यापेक्षा जर आपण एकमेकांच्या आवडी निवडी लक्षात ठेवल्या असत्या तर आज हा संघर्ष करावा लागला नसता... 
कोर्टाचे कायदे असे समजून घेण्यापेक्षा जर आपण कधी एकमेकांना समजून घेतलं असतं तर आयुष्य या वळणावर येऊन थांबलं नसतं.... वेगळं होण्यासाठी कोर्टाचा रस्ता धरण्यापेक्षा जर आपण एकमेकांकडे दोन पावलं जरी चाललो असतो तर आपल्या नात्याची अशी विटंबना झाली नसती रे.... 
आणि हो... कोर्टासमोर असं तुझं माझं करण्यापेक्षा आपल्या लेकराला कुशीत घेतलं असतं तर त्या जीवाची ही अशी परवड झाली नसती.... 
आज पहिल्यांदाच ती अमितला इतकं बोलत होती.... आणि तोही काही न बोलता शांतपणे सगळं ऐकून घेत होता... 
अनु उभ्या उभ्या थरथरत होती... बोलताना ती रडत होती हे तिचं तिलाही लक्षात आलं न्हवतं... हाताला धरलेली मनू तिला कधीची घट्ट बिलगून होती... आपल्या आईला तिने आजवर कधीच असं पाहिलं न्हवतं... एव्हाना अनुच्या पायातलं बळ सारून गेलं होतं... चार वर्षांत साठलेलं सगळं नकळत बाहेर पडून गेलं होतं... आजवरचा प्रत्येक हुंदका आज मोकळेपणाने बाहेर पडला होता... 

सगळं बोलून झाल्यावर ती शांत झाली... भिजल्या डोळ्यांनी पाहत होती अमितकडे... कोणत्याही उत्तराची अपेक्षा न्हवती... फक्त तिचा हरवलेला अमित शोधायची धडपड... 
निघायचं म्हणून तिने शेवटचं त्याच्याकडे पाहिलं... त्याच्या डोळ्यांत बघताच अनु थक्क झाली... त्याच्या त्या भरल्या डोळ्यांत अनु संपूर्ण दिसत होती... एकही शब्द न बोलता त्याने सरळ अनुला घट्ट मिठी मारली... काय करावं तिलाही सुचेना... गच्चं भरलेले डोळे रिकामे होई पर्यंत तो तिला बिलगून होता... त्याची ओढ अनुला जाणवत होती... सगळं विसरून पुन्हा त्याला मिठीत घ्यावं म्हणून तिचे हात सरसावले.. इतक्यात त्याने मिठी सोडली अन इकडे तिकडे न बघता तो निघाला... गेला सुद्धा... 
कोर्टाचे पेपर्स, पुरावे.. काहीच न घेता तो एकटाच रिकाम्या हाताने निघून गेला... 

गाडीत बसून अमितने सरळ घर गाठलं... अनु क्षणभर स्तब्ध झाली आणि तीही काही न घेता तिथून निघाली... मनूला घेऊन ती घरी कधी पोचली तिचं तिलाही नाही कळलं... 

आज असंख्य प्रश्नाची उत्तरं नाही पण बरंच काही गवसलं होतं... आज तिला बऱ्याच वर्षांनी शांत वाटत होतं... 
अमितही घरी पोचला... आणि गाडीतलं गिफ्ट आणून आधीच घरी असलेल्या गिफ्टच्या गठ्ठ्यात ठेऊन दिलं... आजवर मनू साठी वेळोवेळी आणलेली गिफ्ट्स होती ती... 
फक्त इतकंच म्हटला... "हॅपी बर्थडे पिल्लू...."
आणि नेहमीप्रमाणे तो त्या दिवशीही अगदी ढसाढसा रडला... 
कोर्टाची ती वारी तशी शेवटचीच ठरली... चुकलेल्या दोन वाटा पुन्हा एकदा एक वळणावर भेटल्या पुन्हा कधीही वेगळं न होण्यासाठी.... 
का.... कशा .... किती वेळ लागला... काहीच महत्वाचं न्हवतं... 
पण... दोन जीवांना पुन्हा एकदा त्यांच्या हक्काचा विसावा मिळाला... हेच खूप मोठं समाधान... :)

- टिंग्याची आई 
आमची काकी वकील आहे... तिच्यासमोर कधीतरी घडलेला असाच काहीसा प्रसंग... त्या दोघांचं काय झाल माहित नाही... 
पण माझ्या या गोष्टीचा शेवट मी मला हवा तसा केलाय... :) आवडेल अशी आशा आहे... 

Monday, November 14, 2016

त्याची सवयच आहे...

येतो येतो म्हणायचं आणि यायचंच नाही.... 
कितीही वाट पाहिली तरी याला फरकच पडत नाही.... 
त्याला हवं तेव्हा तो येणार... जणू त्याच्या मर्जीचा तो मालकच आहे.... 
दरवेळी वेडी आशा लावायची....  त्याची सवयच आहे...

परवा वाटलं आज नक्की येईल... अहो कोपऱ्यावर दिसला... 
अन हट्टानं बघा कसा तिकडच्या तिकडे मागे फिरला.... 
कुणास ठाऊक कुठे गेलाय... मन अजूनही त्याच्या मागेच आहे.... 
मुद्दाम माझं मन मोडायची.... त्याची सवयच आहे.... 

डोळ्यांत पाणी दाटलं तरी हा दर्शन काही देत नाही... 
कित्ती निरोप धाडले तरी... तो काही धावून येत नाही... 
का बर रुसलाय आमच्यावर... ठाऊक त्याचं त्यालाच आहे... 
उगा रुसवा धरायची... त्याची सवयच आहे.... 


ए म्हटलं फक्त एकदाच... चिंब भिजवून जा सारा आसमंत.... 
तुझ्याविना निष्प्राण झालीये धरणी... तिला कर पुन्हा जिवंत.... 
किती केल्या विनवण्या... पण ओंजळ अजून कोरडीच आहे... 
काय करावं या पावसाला... हि त्याची सवयच आहे.... 

कोरड्याच मातीची शपथ घातली तो परत यावा म्हणून... 
प्रत्येक रोपटं वाट पाहतंय... पुन्हा नव्याने जगायचं म्हणून.... 
बघा... थेम्ब कसे धावत आले आहेत... कदाचित त्याने यायचं ठरवलंच आहे... 
व्याकुळ जीवाला शांत करायची... त्याची गोड  सवयच आहे... 

उशिरा का होईना आलाय... मन मोकळं बरसतोय... 
धरत्रीच्या कणाकणात... नव-चैतन्य जागवतोय..... 
प्रत्येक थेंबात... एक नवी कविता तो रचत आहे.... 
शब्दांना चिंब भिजवण्याची.... अशी मधुर सवयच आहे.... 
                                            त्या बेधुंद कोसळणाऱ्या पावसाची.... :)

- टिंग्याची आई 

Thursday, July 21, 2016

भाग्यकारक घटना घडेल....

"सकाळ्च्यापरी राशींमध्ये रमणाऱ्या लोकांचं भविष्य नक्कीच चक्रात अडकू शकतं यात काही वाद नाही..." :)
पेपर मध्ये रोज न चुकता येणारी एखादी गोष्ट म्हणजे राशिभविष्य... अवघ्या दोन ओळीत आपल्या अक्ख्या दिवसाचं भविष्य सांगितलं जातं... प्रत्येक राशीची किमान २-३ करोड माणसं आणि त्या सगळ्यांच भविष्य ही लोकं किती confidently छापतात याचंच आश्चर्य वाटतं... कधी कधी वाटतं रोज ह्या राशीचं भविष्य त्या राशीला आणि त्या राशीचं आणखी कुठल्यातरी राशीला.... जाम कसरत करावी लागत असेल या मंडळींना... :)
कधीतरी तीन चार दिवसाचे पेपर गोळा करून बघा... किमान चार राशींचं तरी भविष्य डिट्टो सेम टू सेम सापडेल...
असो... तर हा वादाचा मुद्दा व्हायच्या आधी मेन विषयाला हात घातलेला बरा.... :)
तर माझा तसा काही राशिभविष्यावर वगैरे फारसा विश्वास नाहीये.... कसं आहे की "फारसा" म्हटलं की बरं असतं आपलं मधोमध Neutral... म्हणजे कधी वाटलंच तर इकडे किंवा तिकडे सरकत येतं... ;)
पण तरीही वाचतो आपलं कधी कधी पेपरातलं भविष्य... सन आणि मून साईन असं काहीतरी असतं म्हणे त्यात.... हे पेपरवाले कुठल्या बेसिसवर लिहितात भविष्य माहीत नाही... मग मी आपल्या दोन राशी हाताशी ठेवल्यात... ज्या दिवशी ज्या राशीचं भविष्य चांगलं असेल ती रास आपली... ज्या दिवशी दोन्ही चांगल्या असतील त्या दिवशी डबल आनंद... पण ज्या दिवशी दोन्हीचं भविष्य वाईट असेल त्या दिवशी मी पेपर वाचलाच नाही असं समजतो... :) उगीच कशाला डोक्याला शॉट लावून घ्यायचा... ;)

परवा असंच सकाळी सकाळी पेपर घेऊन बसलो होतो... वाचायला हो... उगीच भलते गैरसमज करून घेऊ नका.... दिवस तसा रोजच्या सारखाच नॉर्मल होता... पेपर वाचता वाचता राशी भविष्यवर येऊन पोचलो... आणि त्या दिवसाचं भविष्य होतं खालीलप्रमाणे....
"भाग्यकारक घटना घडेल.... "
आजवर बऱ्याचदा या आशयाचं किंवा अगदी हेच भविष्य आलं होतं... पण म्हटलं आज खरंच काहीतरी घडेल कदाचित... भाग्यकारक...
म्हटलं आजचा दिवस याच आशेने सुरू करू.... अधून मधून असं आशावादी झालेलं बरं असतं म्हणे.... 

दिवस जसा रोजच्यासारखा सुरू झाला तसाच पुढे सरकत होता... नेहमीप्रमाणे चहापाणी आटपून डबा घेऊन ऑफिसला निघालो... वाटलं होतं ही आज काहीतरी भारी वगैरे बनवेल डब्याला... पण साधी भाजी पोळीच पदरी पडली होती आजही...  मग म्हटलं ऑफिस जाताना किंवा पोचल्यावर काहीतरी भाग्यकारक घटना घडेल.... 
आणि गाडी घेऊन नेहमीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने थांबत थांबत निघालो.... मग तर काय या हल्लीच्या ट्राफिक मध्ये धावण्यापेक्षा थांबतच चालतात गाड्या... त्या मानाने ट्रॅफिक थोडं कमी होतं म्हणायला हरकत न्हवती... तेव्हा क्षणभर हीच का ती भाग्यकारक घटना असंही वाटून गेलं मनाला... :D 

आज कामही तसं हेमीसारखंच वाढून ठेवलेलं होतं... म्हटलं एखादा ऍप्रिसिएशन ईमेल किंवा प्रमोशन वगैरे होतंय की काय.... पण ते सुद्धा नाही... आणि चक्क तो ईमेल जोशाच्या मेलबॉक्स मध्ये जाऊन धडपडला होता... थोडी अजून जरा निराशा वाढत होती पण नेटाने बाजूला सारत मनाला धीर दिला... समजावलं स्वतःला या छोट्याशा घटनेचा IP ऍड्रेस चुकला असेल कदाचित... :)
दिवस मध्यावरून कधीच मागेसरकला होता आणि आता वेळ होती मिटिंग ची... आज पण बॉस नेहमीप्रमाणे लेक्चर कम शिव्या देणार हे माहीतच होतं... आणि तेच झालं... पण आज जरा कमी शिव्या मिळाल्या त्यामानाने.. चला... वाटलं घडली आणखी एक भाग्यकारक घटना... :)

दिवस संपला तरी त्या घटनेचा पत्ता न्हवता... शेवटी मीच आशा सोडून दिली... घरी आलो... मुलांचं खेळून झालं होतं आणि अभ्यास सुरू होता... हिने जेवण वाढलं, सगळे मिळून छान जेवलो... सगळं यावरून पलंगावर पाठ टेकून पडलो होतो... इतक्यात शेजारच्या टेबलवर सकाळच्या पेपर मधलं तेच भविष्याचं पण फडफडत होतं... आणि माझ्या डोक्यात तीच गोष्ट पुन्हा फडफडली... "भाग्यकारक घटना घडेल..."
स्वतःशीच आणि स्वतःवर थोडासा हसलो.. हिला विचारलं आज काही खास घडलं का ग? 
तर हिचं नेहमीचं उत्तर... "झोपा आता... बास झालं..." आणि तेवढ्यावर मी गप्प झालो.. ;)
पुन्हा एकदा ते पण दिसलं आणि थोडा सिरियसली विचार करावासा वाटला... 
खरंच काही भाग्यकारक घटना घडली का आज आपल्या आयुष्यात...? संपूर्ण दिवस पुन्हा एकदा डोळ्यांखालून काढला आणि कन्फर्म केलं आज कोणतीही भाग्यकारक घटना घडली नाही..... आणि निवांत झोपायला तयार झालो... इतक्यात माझाच आवाज मला कुठूनतरी ऐकू आला... 

"काय मिस्टर काळभोर...?? नाही ना घडलं काही भाग्यकारक आख्या दिवसात.... मग आता तुम्ही रिकामे भविष्य वगैरे सगळं खोटं असतं म्हणायला....!!!
मी जरा सांभाळूनच म्हटलं... "अगदी तसंच काही नाही.. पण खोटंच असतं ते..."
आणि चक्क माझा आवाज माझ्यावर ओरडू लागला... जरा घाबरलोच होतो पण म्हटलं ऐकूया तरी काय म्हणतोय ते... 
माझा आवाज पुढे बोलू लागला.... 

अरे वेड्या या जगात आजकाल कशाची श्वाश्वती आहे सांग... आज तू सकाळी उठलास हीच एक भाग्याची घटना नाही का? ऑफिसला जाताना तुझ्या गाडीचा ऍक्सीडेन्ट न होता तू सुखरूप पोचलास ही काय कमी भाग्याची गोष्ट आहे...? ऑफिस मधेही तुला नेहमी इतकंच काम करावं लागलं आणि तुझी नोकरी अजूनही शाबूत आहे किंबहुना त्यावर विसंबून असणारी तुझी सगळी स्वप्न अजूनही शाबूत आहेत हे काय कमी आहे?
तुझी पोरंबाळं आज व्यवस्थितपणे शाळेत जाऊन आलीत त्यांच्या तब्येती धडधाकट आहेत हे काय कमी भाग्याचं आहे का?  तुझी बायको दिवसभर राबून तुझी आणि तुझ्या घराची काळजी घेते आणि तीही आनंदी आहे हीच एक भाग्यकारक घटना नाही का म्हणता येणार??
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा दिवस आनंदात घालवून समाधानाची झोप घेतोस इथे हीच आहे कदाचित ती "भाग्यकारक" घटना... 

मेंदू क्षणभर गदागदा हलला.. काहीतरी उमगल्यासारखं वाटलं... 
आपण सगळंच हवंय म्हणून हट्ट धरून बसतो आणि आपल्याला हवं असलेलं काही घडलं नाही की नशिबाला दोष देऊन रिकामे होतो... पण नशिबाने आपल्याही नकळत जे काही चांगलं आपल्याला दिलेलं असतं ते आपण लक्षातही घेत नाही... रोज अशाच एखाद्या भाग्यकारक घटनेच्या शोधात आपण जगत असतो आणि या भाग्यकारक आयुष्याचा आनंद लुटायचाच राहून जातो... 

त्या दिवशी ठरवलं.... रोजचा दिवस भाग्याचा आहे... या सुंदर आयुष्यात एक नाव दिवस जगायला मिळणं हीच खरी भाग्यकारक घटना आहे.. आणि खरं सांगू? त्या दिवशीकधी न्हवे तो गाढ झोप लागली मला...  

दुसऱ्या दिवशी पुन्हा पेपर वाचताना त्याच राशी भविष्यावर लक्ष गेलं... तर ते पान माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसत होतं... :)
आज माझ्या दुसऱ्या राशीत नेमकं तेच भविष्य सापडलं... "भाग्यकारक घटना घडेल....!!!!"
मग हसून म्हटलं ती घटना तर कधीच घडून गेली आहे.... जेव्हा मी या नव्या दिवसाची सुरुवात केली... आणि मुद्दामच तो पेपर सोबत घेऊन ऑफिसला निघालो... 

कुणीतरी म्हटलंच आहे... 
भविष्यात नक्की रमावं माणसानं पण राशिभविष्याच्या चक्रात न अडकता येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे स्वागत करत आनंदाने  जगावे.... 
कदाचित एखादी भाग्यकारक घटना नक्कीच घडेल.... :)

- टिंग्याची आई 

Wednesday, July 13, 2016

तू आल्यानंतर....

तू आल्यानंतर... एक माणूस भलतंच चेंज झालंय.... 
खास तुझ्यासाठी त्याने आपलं सगळं जगच बदलून टाकलंय.... 

साधा पार्किंग स्टीकर लावताना तो दहा वेळा विचार करायचा... 
गाडीची काच-बीच खराब होईल अशी भलतीच कारणं द्यायचा.... 
पण आता... Baby On Board चं भलं मोठठं स्टीकर त्याने स्वतः लावून घेतलंय... 
आणि हो... हल्ली कार चालवतानाही स्पीड त्याचं आपसूक कमी झालंय.... 

लाडक्या बाईक वर एखादा ओरखडा पडला तर हा कित्ती कित्ती रागवायचा... 
ह्याच्या गाडीला म्हणे कुणीही हात सुद्धा नाही लावायचा... 
आता टाकीवर तुझ्या पैंजणाचे ओरखडे पाहून गालातल्या गालात हसतो... 
आणि न चुकता तुला घेऊन रोज एक तरी चक्कर मारतो... :)

शाहरुखचा हा डायहार्ड फॅन... 
तू शाहरुखच्या बडे ला आलास म्हणून भलताच खुश झालाय... 
आणि त्याला सोडून आता तो तुझाच फुल्ल फॅन झालाय... 
"फॅन" सोडून चक्क "अँग्री बर्ड्स" आवडीने बघायला लागलाय... 
त्याच्या चिमुकल्या लेकाचा तोचखरा हिरो बनलाय... 

पहिल्यापेक्षा आईची आता जरा जास्त काळजी घेतो... 
जगातला सगळ्यात मोठा आनंद तिनेच दिलाय असं म्हणतो... 
आईविना कधीही न राहणारा बाबा आता एकटा राहायला शिकलाय.... 
(आई तुला घेऊन माहेरी होती ना एवढे दिवस... :)
तिच्या कुशीत निजलेल्या तान्हुल्याने त्याच्या संपूर्ण जगाचा ताबा घेतलाय... 

आधीचाच सेन्सिटिव्ह बाबा थोडा अजून हळवा झालाय.... 
नाकावरचा राग त्याच्या... तू येताच भूर पळून गेलाय... 
सगळ्याच जबाबदाऱ्या आता तो स्वतःच समजून घ्यायला लागलाय... 
तू आल्यानंतर बाळा.... आपला बाबा खूप खूप शहाणा झालाय... :)

- टिंग्याची आई 

Sunday, July 10, 2016

Last Day...

28th March 2014...
The day I wont forget and will remember for my lifetime... :)

Friday... usually very happy happy day for us... but this wasn't happy day for me and my dear ones.... because it was my last day in Infosys ... 
After a long journey of more than 6.5 years in infy... I had decided to leave.... So many reasons... Not to disclose... ;) It was a real hard decision though.... :) 

Leaving the organization was easy but leaving those loving, caring and understanding people behind and continuing my journey without them was a real pain.... In the new organization I may find such big big buildings, roads, atmosphere everything.... but not these people.. whom I will miss so
much... and missing at this moment too... :(

It was my decision to leave... but really speaking... My heart was not ready to accept till the time I returned my ID card which I was carrying for the last 6.5 years.... I gave away my identity.... YES... It really felt that way... for these many years I didn't even forget it at home and used temporary id card... never.... but this time I returned it permanently and took the temporary card for the first and the last time.... :(
You may feel it very emotional... but can't help... It was so dear to me...

Infy being my very first company I worked in...
It gave me my First PAGAAR.... :)
It gave me so many dearest friends....
It gave me a great carrier path..
It gave me my great name... Shilphosys... my friends at college used to call me when I got placed into infosys in 2006... :)
It gave me so many memories to cherish..
there were ups and downs... but I managed to go ahead...
It gave me a lot that words can not express..... :)
On the last friday.... everything was just normal... people in jolly mood... mumbai janta carrying bagpacks..... :) Just like everyday.... I entered from Infy gate but for the last time.... parked my gadi on the decided place... Used to park on the same place daily.... :) but today I was parking for the last time.... in this big big MLPL building....

While coming towards my building (The SDB6) on that kilometer long footpath.... I wanted it to be more longer today... I wanted to capture everything in my eyes today... all my last 6.5 years starting from Mysore training till today in Pune DC.. I wanted to live in this single last day....

with heavy heart I came to my cubicle.... my favorite place for working... writing poems... updating my blog etc. etc.. as usual didn't find my team mates in cube...
"Nivant ayenge yaar... kya hi hai..." :) this was Arun...
It was good for me that they were not there in cube... or else I had to smile and say good morning as I did every day... "aaj nahi ho pata yaar......"

And the Last Day in Infosys started.......
For the first time I was on infy n/w for full day... Otherwise Client network Jindabaad.... :)
woh e-separation ki ghai-gadbad... clearances ke chakkar.... mails fwd karo... so many things...
At around 10.30 cube was almost full... people were coming to meet Shilpa...
"Are shilpa.. mat jao yaar.... Please...."
And I was like.... "Jane do yaar.... ab na ho payega... chaa marii..... " :)
Aur fir wo arun ki 10.30 wali chai.... chaa maarii.... discuss kiya bhi to kya last day pe.... 
"yaar taai... ye issue aa raha hai... jara batao yaar please...."
Taai bhi kaha manti hai? last day pe bhi ekaad issue resolve kar ke hi manegi.... and I really did... :) Rimpi was always there to remind me.... "Its you last day shilpa... ab to kaam karna chod do..."  It
was best one Rimpi... :)

On that last day I was trying hard to smile...and people said.. "last day ki khushi to dekho... " it was difficult explain.... :)
Arun, Saurabh, Rimpi, Priyanka... everyone was behaving normal... but every one of us could sense that silence who was very rare visitor of our cube.....

Husshh..... fir kya.... thodi der bad ghanti baji lunch time ki.... madhura, Paro, Deepti... my dear mahila mandal.... 
This was the last lunch call.... as usual we met for lunch in FC2.. Madhura was not ready to laugh or even smile... and I was trying my best to make everyone laugh... Paro madam nivant... understood every joke i cracked that day... and deepti trying to get them as fast as she could... :)
even with high cholesterol levels Madhura ate Chinese food and Ice-creme with us.... just for me... Thanks and take care madhure.... :P
and then that awesome photo session.... :) plus the best ever chocolate brownie with hot chocolate sos... was like sone pe suhaga... :)

Today everyone was ready to stay late after lunch...and even in eve... just for me... It was the longest lunch time we had with our mahila mandal... No one was crying actually but the pain of not having a fun filled lunch next time was there...
"koi nhi yaar... chalta hai.... ek bar chaa maari bol do to sab thik ho jayega.. hai na paro?"

I was trying to meet everyone I knew... people were calling and asking me... 
"Shilpa... aapke cake cutting me pakka ayenge.. kab hai?"
"are yaar... mujhse hi puch rahe ho...? " :)

Time was running like anything... felt like... in last 6-7 years... these 9.5 hours were the fastest ones... :(   we discussed issues... read some interesting facts on FB, faking news.com.... tracked MH370 in news.. Jaggu, Claudia and Paul ko reply bhi kar diya... sab kuch as usual....
But... aaj ke baad ye usual nahi rehne wala tha... :(

Leaving Infy was one of the hard decisions... I have very dear friends still in there... we were not meeting everyday or even every month or so... but still.... pata tha.. My friend is still there.... you all
are still part of my life dear....

Everything was fine... and slowly... it was 6 in the clock... 
" chalo shilpa niklne ka time ho gaya..." 
It was difficult to find shilpa in office after 6 in the evening... but today.... she is still in.... 6.30 ho gaya fir bhi....??
no one asked today... not even vishwa... " Shilpa... ghar jao... aaj late nahi hua...?"
I had my relieving letter in hand... It was time to say good bye to my dear friends, colleagues and to Infosys Ltd....
everyone gave me greetings and all.. I was just smiling and reading them.... A lot was written on them in just few lines... each message was full of love, gratitude, friendship everything.... " I gained and learned a lot from you guyes....."

And finally loggin off from the system... for not to log in again as Shilpa_Limkar with the standard pattern of password... :) I was about to log off and arun said... nahi yaar.. rehne do please... win+L....
Thanks arun.... :)

I was ready to leave... took my bag and everything... did not take the ganapti and lakshmi ka photo.... kept it as it is... as my team wanted it to be there....

The final moment...
everyone was smiling and saying bye bye... but no one was actually....
And I broke through... Yes.. I was crying... I really did not want to leave these lovely people...
This was the end of the Last day in infosys.... :(

There is a lot to say.... but yaar.... mail ho ya post.. isko aur kitna lamba khichungi... :)
Thanks a lot all of you.... for making my journey so wonderful at Infy.... 
It was really great working and being with you...
-Tingyachi aai.
It is easier to attach to people.... but real hard to detach...
Love you and miss you all...:)

Sunday, June 12, 2016

Jobless...

It was a Monday morning.... 9 A.M. in the clock.. But Raghav was still in the bed.. snoozing his alarm for the tenth time.. He was awake since 6 A.M. as usual but today he did not want to come out of his so called sleep... children were already rushing for the school bus and Richa his wife was busy with the household work.....
Raghav... a 10 plus years experienced IT professional.... working in one of the top IT company till last Friday... Yes.. Last Friday.. That Friday had changed a lot of things in his life... may be you could say his entire life changed...

Raghav was a good performer... Always on top... Dedicated most of his time to work... he had been to abroad many times... even got a chance to be there for more than a year with family... and for last few years he was here serving his beloved company... life was easy.. Money helped him buy most of the happiness for his family... An A.C. Car, a Big house... Children going in High-Class school... everything... what he wanted in life...

Raghav loved his job... his work... his company...
But it was a bad day... a black day... company had run into losses and had to cut off high salaried employees... Raghav had a blind faith that he wont be laid off... he thought his position was vital for the organisation... But.. he din know that the Pink Slip was waiting for him on that Friday morning...

It was much more shocking for everyone... but the decision was made... and it was time for him to leave... reasons were given which definitely could not justify this decision.... and there was no point... he gathered whatever he could and in no time he was out in this world... "JOBLESS"

It took some time for him to accept this... For the first time in his career he was going back home in day light... The journey to  home in an A.C. car was uncomfortably long and uneasy.. Richa was also surprised to see him home this early... forget about early, he was never on time for his son's bday... She was little worried....

He broke the news to Richa the same day... and was expecting a lot of questions from her....
but what she just said is... "Dear.... Are you alright now...???" and he could just say... "I am trying my best..." Richa had always helped him stay calm and stable....

Even if Richa did not ask any questions he knew there were a lot many standing in front of them...
what about the home loan EMI... school fees... the hi-fi life style... car loans.. investments and many more... He did get a pay for two months but did not know how long it is going to last...

These days we all have become dependent on everything for everything... We plan so many things for future but preserve less... our wants increase but are never satisfied...

Raghav realized few things during this weekend. He understood how much he was wasting on non-important things.... and how many things were really important for him and his family for living... 
He understood how life can turn its back on you... how people can behave when you are helpless.... and how your loved ones keep loving you more n more even if you are Hopeless.... 
He understood his real value.... :)
The entire weekend he was into his thoughts...

He had no direction now... not knowing where to go.. what to do.. and how to do...
Life had thousands of question marks with no answers at all....  There was no point in asking Why me??? He had to stand for him against his own self....
And yes he was ready to fight back...

Though he was sure to get the new job in no time... but he decided not serve any company instead Start his own... 
A Big Risk... but he made up his mind.. he wanted to build a place where people will be happy in being dependent for their future plans.. where no one will be cut off from the flow just like that...
A big dream he wanted to convert to a reality... 
Richa was always with him and wanted him to follow his dreams... 

And then.. This "JOBLESS" was ready to create jobs for many more JOBLESS like him....
He is now on his new way trying to find his real destiny... with few great lessons from The Life... :)

That is why you say... "Everything happens for a good reason...."
Life is really unpredictable but does give you the best way you can enjoy the real life in your own life....
Wishing Luck for his Great Dream...
- Tingya's Mom
:)

Wednesday, April 13, 2016

पाणी आटलंय….

पाणी आटलंय….
नदीचं न्हवं… तिचं पाणी तर कवाच आटून गेलंय….
भल्या मोठ्या तिच्या पात्राला कोरडेपणाच ग्रहण लागलंय…
आता नुसतीच दगडं उरल्यात त्येस्नीबी पाझर फुटना झालाय…
अन दगडातला देव पण आमाला पावना झालाय….

पाणी आटलंय….
झऱ्याच न्हवं… त्येन तर वाहायचं कधीच सोडून दिलंय…
त्येचं मंजुळ गाणं… काळाच्या पोटात कवाच हरीवलंय…
जुन्या गोड पाण्याविना झऱ्याचा घसाबी आता पार कोरडा पडलाय…
भेगाळलेल्या धरणीच्या कुशीत त्यो आता कायमचा दडलाय…
पाणी आटलंय….
विहिरीचं न्हवं… तिच्या तळाला तर आता गाळ पण सापडणा झालाय…
जीव द्यायाला सुदा तिचा उपेग हुईना झालाय…
पोराबाळांच्या घशासारकी ती बी आता कायमची कोरडी पडलीया…
परत कदी पान्हा फुटल ही आशाच आता तिनं सोडून दिलिया…
पाणी आटलंय….
धरणाचं न्हवं… साठणार न्हाई पाणी असा जणू शापच त्येला दिलाय…
त्यात साठवलेला थेंब न थेंब कवाच वाफ बनून निघून गेलाय…
दुष्काळान विटलेल्या गावावाणी धरण बी ओस पडत चाललंय…
थेंबभर पाण्यासाठी धरणाच एक एक दार जणू आसुसलंय…
पाणी आटलंय डोळ्यातलं….
व्हय…. पाणी आटलंय आमच्या पोराबाळांच्या पापण्यातलं…
पाणी आटलंय आमच्या बायाबापड्यांच्या रिकाम्या घागरीतलं…

पाणी पाणी करून आता आमच्या रक्ताचं पाणी झालंय…
मारताना सुदा दोन घोट पाणी कुणाला मिळना झालंय…
पुढ्यात जीव सोडणाऱ्या जनावराला बघून काळजाचं पाणी पाणी हुतंय…
मेलेल्या माणसांची राख वाहायला तरी इथं कुठं पाणी सापडतंय…
रोजच्याच या मरणाचं दुख… कितीदा तरी गळ्यात दाटतंय…
अन असंच कवातरी मग आमच्याच डोळ्यातलं पाणी आटतंय….
नदी, झरा, विहीर, धरण…. आता सगळच पाणी आटलंय…
म्हणूनच काळजात उठणाऱ्या हुंदक्याला… आज पापणीच्या उंबर्यावरच गाठलंय…
कधीच न मिळणाऱ्या पाण्यासाठी आता वणवण करायची इच्छा न्हाई…
अन त्या बिचाऱ्या  परमेश्वराला बी दया  यील अशी आशा ऱ्हायली न्हाई…
तरीबी…
शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायचं ठरीवलय…
आणि घोटभर पाण्यानंच आता ही तहान भागवायची असं ठरीवलंय…

- व्यथा एका दुष्काळग्रस्ताची 

पाणी आटलंय खरंय… पण आपल्यातली माणुसकी पण आटली आहे का? कुठल्यातरी गावात कुठेतरी दुष्काळ पडलाय मग मी का पाणी वाचवायचं असं म्हणण्याइतपत आपली नैतिकताही आटली आहे का?
दुष्काळाच्या बातम्या वाचून हळहळणारे आम्ही पण साध एक वेळ नळ चालू न ठेवता ब्रश सुद्धा करत नाही… उन्हाळा आहे म्हणून आम्हाला कमीत कमी दोनदा तरी अंघोळ लागते… काल परवाच शिळं पाणी प्यायचं आमच्या जीवावर येतं… आणि कहर म्हणजे ते पाणी इतर कामासाठी न वापरता आम्ही ओतूनही देतो… आमचे कपडेही एकदा घातल्यावर धुतल्याशिवाय आम्ही परत हात लावत नाही… आणि भांडीसुद्धा नळाखाली खळखळून धुतल्याशिवाय स्वच्छ वाटत नाहीत… 

पण निदान आता तरी विचार करायला हवा…
आज पाणी आहे म्हणून तुम्ही सधन आहात… पण हा साठा संपायला वेळ लागणार नाहीये… नंतरची भयानक परिस्थिती टाळता येणार नाही कदाचित पण थोडी लांबवता तरी येईल… जे आपले जीवाभावाचे शेतकरी आज पाणी संकटात आहेत… दुष्काळाचं रूप घेऊन आलेल्या मृत्यूच्या विळख्यात अडकले आहेत… त्यांच्यासाठी निदान थोडं तरी पाणी वाचवूया… 
म्हणून म्हणते… 
तुम्ही जर हंडाभर वाचवलंत तर त्यांच्यापर्यंत घागरभर तरी पोहचेल… 
घागरभर वाचवलंत तर एखाद्याला कळशीभर तरी मिळेल…. 
कळशीभर वाचवलंत तर एखाद्या कोरड्या घशाला तांब्याभर तरी शांत करेल… 
तांब्याभर वाचवलंत तर निदान वाटीभर तरी कुठेतरी पोचेल… 
वाटीभर वाचवलंत तर निदान थेंबभर कुठंतरी त्यांच्यासाठी साचेल…. 
आणि वाहणारं थेंबभर पाणी जरी वाचवलंत तर त्यांच्या डोळ्यांतला एखादा थेंब तरी नक्कीच वाचेल…. 

चला… जमेल तितकं वाचवूया… जमेल तसं वाचवूया…. या पाण्यापायी जाणारा निदान एकतरी जीव वाचवूया…. 

Please Save Water…
- टिंग्याची आई

Sunday, April 10, 2016

भिशी….

भिशी म्हटलं कि आठवते लहानपणी मोठ्या हौसेनं आणि काटकसरीने भरलेली ती मातीची भिशी… :)
रोज नाही पण आठवड्यातून एकदा ते पण शनिवारी खाऊसाठी मिळालेल्या पैशातून वाचवलेले चार आणे आठ आणे आम्ही भावंडं न चुकता त्या भिशीत टाकायचो… कधी कधी तर खाऊ न घेता मन मारून अख्खा रुपया सरळ त्यात जायचा… त्या भिशीला हवं तेव्हा पैसे काढण्याला जागा न्हवती… संपूर्ण भरल्यावरच फोडण्यात खरी मजा यायची…. :)
दरवेळी आत जाणाऱ्या नाण्यासोबत छोटासा आनंद मिळायचा… आणि भिशी फुटताना होणारा एवढा मोठ्ठा आनंद ह्याच तर छोट्या छोट्या आनंदाने बनलेला असायचा…

आम्ही तीन भावंडं… ताई मी अन छोटा भाऊ… तिघेही साठवायचो त्यात पैसे… ताई थोडी मोठी आणि समंजस त्यामुळे तिचाच मोठा वाटा असायचा ती भिशी भरण्यात…. मी आपली खाऊच्या पैशातून जमेल तसे टाकायची… आणि आमचे धाकले बंधुराज म्हणजे महा हुश्शार… खाऊसोबत खास भिशीत टाकायला म्हणून आणखीन एक रुपया मागून घ्यायचा… पण तो तरी किती वेळा त्या भिशीत गेला होता देव जाणे… :)

दरवेळी रुपया टाकला कि वाजवून पहायचं किती भरलंय आणि कॅलेंडर वरची वाढदिवसाची तारीख बघायची… ज्याचा कुणाचा बडे असेल त्याच्यासाठी ती भिशी फुटायची… आम्ही पैसे कितीही कमी टाकले तरी बरोबर वाढदिवसाआधी ती भिशी भरायची…. 
आई बाबा आमच्या नकळत कधी त्यात पैसे टाकत माहित नाही… पण आम्ही मात्र स्वतः साठवलेल्या पैशातून वाढदिवसाचं गिफ्ट मिळवल्याच्या आविर्भावात जग जिंकल्याचा आनंद साजरा करत हिंडायचो… :)

आई सांगायची नेहमी… हि भिशी आपल्याला धीर धरायला शिकवते… आयुष्यात चांगल्या क्षणांना असंच साठवून ठेवायला शिकवते… सुख दुःखाच्या वेळी एकतरी चांगली आठवण अशी सांभाळून ठेवायची असते आणि आयुष्यात भेटणाऱ्या आपल्या माणसांना असंच जपून ठेवायचं असतं हेच ती भिशी सांगत असते… 

आमच्या सारखीच आईचीही एक भिशी होती… ती म्हणजे भांड्याच्या कपाटातला एक छोटासा डब्बा… तो डबा कधी तांदळाच्या पोत्यात लपलेला असायचा तर कधी गव्हाच्या गोणीमध्ये… पैसे लपवायचे म्हणून हे सगळ न्हवतं… तर कोणत्याही खर्चासाठी तिकडे लवकर हात जाऊ नये म्हणून… घर खर्चासाठीच्या पैशातून सगळे खर्च भागवून उरल्या सुरल्या पैशातच तिच्या भिशीचा हप्ता असायचा… मग कधी २० रुपये मिळायचे तर कधी ५ रुपयावारच समाधान मानावं लागायचं…
जितक्या हळू हळू ती भिशी भरायची त्याहून कितीतरी लवकर ती रिकामी व्हायची… कधी आमची आजारपण तर कधी शाळेची फी… कधी अचानक आलेले पाहुणेरावळे तर कधी आमची भिशी भरायला… :)

आईची हि भिशी आम्ही रिकामी होतानाच जास्त पहिली होती… पण ती मात्र नव्या उमेदीने पुन्हा सुरुवात करत असे… तेव्हा तिच्याकडे बघून वाटायचं कदाचित आईच या भिशीला संयमाचे धडे देत आहे… धीर कसा धरायचा हे जणू आईच त्या भिशीला शिकवत असायची… :)
असो… आमची आणि आईची या दोन्ही भिशीत जमीन अस्मानाचा फरक होता… :)
इतके दिवस बाप्पाच्या देव्हार्याजवळ जपून ठेवलेली ती भिशी पडेल फुटेल म्हणून फार काळजी वाटायची… रोज बाप्पाला साकडं घालायचं लवकर भरू दे रे बाप्पा आणि हो सांभाळून ठेव  भरेपर्यंत… 
पण गच्च भरल्यावर तीच भिशी फोडताना कसलीच काळजी वाटायची नाही… इतक्या दिवसांच्या मेहनतीचे फळ जे मिळणार असतं ना… 

इतके दिवस साठवलेला एक एक पैसा मोठी रक्कम बनून हातात पडायचा… बचतीचं महत्त्व तेव्हाच कधीतरी डोक्यात घट्ट बसलं होत ते आजवरही तितकच फिट आहे… :)

मोठ झालो तशा बऱ्याच भिशा भरल्या फुटल्या आणि मग कॉलेज मध्ये गेल्यावर भिशीची जागा बांसोबतच्या joint account ने घेतली कळलंच नाही… नंतर पुढे जाऊन नोकरीला लागलो आणि स्वतःच असं सेपरेट सेविंग acct काढलं… आता दर महिन्याला भला मोठा पगार जमा होतो तिथे आणि हो महिना अखेरीस रिकामं सुद्धा होत… :)

इतकं कमवायला लागलोय तरीही मुलाच्या भिशीमध्ये रोज न चुकता एक रुपया टाकतोय… आजही ती सवय काही गेली नाहीये… त्याची भिशी तशी भरता भरता बऱ्याचदा रिकामी सुद्धा होते म्हणा… कारण तिला तशी सोय आहे… हवे तेव्हा पैसे काढण्याची… प्लास्टिकची ही पिग्गीबँक पडली तरी फुटायचं टेन्शन नसतंच… 
आजकाल आपली नातीही अशीच काहीशी वाटतात… चांगले क्षण आजही साठवतो आपण पण खरतर ते हवे तेव्हा हवे तसे वापरतो… ते एक्स्ट्राचं झाकण काढून… गरजेनुसार… :)

असो… समाधान इतकंच कि लेकाला सुद्धा हि पिग्गीबँक ची सवय लागली आहे… अधून मधून आठवण येईल तसे तो पैसे साठवतो…. नाणी नोटा अगदी मिळेल तसे आणि मिळेल तेव्हा आठवणीने त्यात टाकतो… आणि दर बडे ला त्यातल्याच पैशातून त्याचं गिफ्ट आणलं जातं… साठलेल्या शे पाचशे रुपयात सुद्धा त्याची महागडी गिफ्ट्स येतात यातच त्याला भला मोठा आनंद मिळतो… :)

अशाच साठवलेल्या आंबट-गोड क्षणांची शिदोरी जशी आजवर मला पुरली आहे तशीच त्यालाही ती मिळत राहील अशी आशा आहे… :)
तोवर सेव करत राहायचं… Happy Saving…. 

- टिंग्याची आई



Saturday, March 19, 2016

भांडी…

भांडी…आम्हा बायकांचा जिव्हाळ्याचा अन जीव घेणारा विषय… :) भांडी घ्यायची भारी हौस असते आम्हाला आणि तीच भांडी घासायचा जाम वैतागही येतोच …. भांडी झाली म्हणजे निम्म काम आवरल्या सारखं वाटतं आम्हाला… भांडी घासणे हे दिवसातलं किंवा रात्रीचं शेवटचं काम आणि मग आम्ही निवांत होतो… :)

तर आता भांडी हा काय लिहिण्यासारखा विषय नक्कीच नाहीये… पण काय करणार प्रत्येक गोष्टीत काहीतरी इंटरेस्टिंग शोधायचं आणि नावडतं काम सुद्धा आवडीने आणि चोख करायचं हा आमचा स्वभाव गुणधर्मच आहे मूळी… थोडासा भाव खाऊन बघावं म्हटलं… ;)

हल्ली प्रत्येक घरकामाला बाई म्हणजे कामवाली मिळते तशी भांड्यालाही मिळतेच पण तरीही आहेत अजूनही माझ्यासारख्या काही हौशी मेंबर ज्यांच्यासाठी भांडी घासणे हे दिवसातलं सगळ्यात शेवटचं काम आहे… 
परवा रात्री खूपच जास्त कंटाळा आला होता कामाचा आणि मेन म्हणजे भांडी घासायचा… न्हवतेच घासणार आजीबात पण पुन्हा सकाळी उठून तीच भांडी घासायची म्हटल्यावर डबल वैताग… मग म्हटलं जाऊ देत तिकड घासून टाकू एकदाची… तेव्हाच भांडी घासता घासता एक विचार डोक्यात चमकला, या भांड्यांवरच म्हणजे या विषयावर काही लिहिलं तर….!!! आणि मग लिहून टाकला एक मस्त action सिनेमा रोज प्रत्येक घरात घडणारा…. :)
एन्ट्री…. भल्या मोठ्या घरात एक छानसं किचन… सुंदर फर्निचर, छान छान भांडी, छोटी मोठी बरीच कपाटात ऐटीत बसलेली… अन घरातल्या प्रत्येकाचं चहा पाणी, खाणं-पिणं, नाश्ता-जेवण या अन अशा हजार कामात… हळू हळू सिनेमाच्या पाट्या पडाव्यात तशी दिवसभर एकामागोमाग एक भांडी पडत राहतात…. सगळ्या पाट्या पडल्या कि मग बेसिनवर फोकस येतो आणि मोठ्या मोठ्या अक्षरांत स्क्रीनवर नाव पडतं आणि सुरु होतो रोजचीच संघर्षगाथा…. 

"गराडा…. 

भांड्यांचा…. एक संघर्ष गाथा…"

मग होते आपल्या हिरोईन ची एन्ट्री… नाही होय करत करत एकदाची ती भांडी घासायला तयार होते… आणि मग सुरु होते action… भांडी म्हणजे जणू व्हिलन्स… ते पण एवढे सगळे ज्यांच्याशी आपली हिरोईन एकटी लढणार असते… कुणी चिवट… कुणी तेलकट… कुणावर साचलेले थरच थर तर कुणी करपलेलं खंडीभर… या सगळ्यांशी टक्कर द्यायला ती एकटीच समर्थ असते… निव्वळ साबण आणि घासणी या दोनच हत्यारांच्या मदतीने ती या सगळ्या दुश्मनांचा फडशा पाडते… जसा साऊथ इंडियन सिनेमाचा हिरो एका दमात १०० गुंडांची वाट लावतो अगदी तस्सं… धिश्शूम ढीश्शुम आणि घसाघस…. एक एक  करून सगळी भांडी हरून बेसिन मध्ये एकामागोमाग एक admit होतात… आणि उरलेलं शेवटचं भांडं घासून झाल्यावर आपल्याच विजयात स्वतावरच खुश होते आपली लाडकी हिरोईन… अन इतक्यात होते इंटरवल… एवढा मोठा संघर्ष केल्यावर थोडा ब्रेक तर हवाच ना… :)
पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त… 

अन आता भरलेल्या बेसिनवर फोकस टाकत पुन्हा सुरु होतो पुढचा सिनेमा… 
व्हिलनला नुसतं मारलं म्हणजे सिनेमा कसा संपेल… आपली हिरोईन म्हणजे नुसती गुणीच न्हवे तर सद्गुणी आहे म्हणूनच त्या सगळ्या दुष्ट व्हिलन्सना धुवून स्वच्छ सुद्धा करते…. क्योंकी दुश्मन को भी इन्सान समझते है हम… डायलॉग… ;) तर अशा तऱ्हेने ती सगळी भांडी ती स्वच्छ धुवून छानपैकी जाळ्यात भरून ठेवते…. 

पण अजूनही काम संपलेलं नाही बर… एका सृजन योद्ध्या प्रमाणे तिला युद्धभूमी म्हणजेच तिचा किचन ओटादेखील स्वच्छ करावा लागतो… पिक्चरच्या शेवटी जसं सर्व काही छान आणि सुंदर घडत तसंच ती न विसरता सगळा ओटा चकचकीत करते… :)
आपल्या सिनेमाचा शेवटचा सीन तरी काय वर्णावा… सगळ आवरून पदराला हात पुसत ती किचनची लाईट बंद करते… आणि आता थोडीशी निवांत झोप घ्यायला ती समाधानाने बेडरूमकडे जाते…. आणि जाळ्यातली, कपाटातली सगळीच भांडी तिचं टाळ्यांच्या कडकडात अभिनंदन करत असतात पण आता तिला मात्र कशाचंच भान राहिलेलं नसतं… 
आणि शांतपणे बेडरूमकडे जाणाऱ्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर झळकत आमचं The End चं पोस्टर…. 

शेवट… पुन्हा उद्याची सुरुवात करण्यासाठी…


तर असाच काहीसा सिनेमा रोजच तिच्या किचनमध्ये रंगतो… :)
ती भल्या पहाटे उठते जेव्हा घराला सुद्धा जाग आलेली नसते… पण सूर्यही तिने  मारल्याशिवाय उगवत नाही यात ती आनंद शोधते… 
घरातल्या माणसांची सगळी कामं ती करते, अगदी न कंटाळता सगळ्यांच्या हाकेला ओ देते…. अन तिच्याशिवाय घरात कुणाला करमत नाही ह्यातच ती खुश होते…. 
आपल्या पिल्लांची सगळी कामं, खाऊ-पिऊ, न्हाऊ-माखू, रडणं-खेळण सगळंच ती न थकता प्रेमाने करते… आणि आपल्या पाखरांची माउली व्हायचं भाग्य मिळालं ह्यातच समाधान मानते…. 
पतीदेवांचही प्रत्येक काम… अगदी डबा, रुमाल, पेन सगळ काही हातात देण्यापासून सर्वकाही ती हक्काने आणि प्रेमाने करते… अन तिच्याशिवाय त्याचं पानही हलत नाही म्हणून स्वतःचाच हेवा करते… :)
घर अन घरातल्या माणसांसोबत त्यांच्या मनाचीही काळजी ती सतत घेत असते… अनआपल्या माणसांच्या मनात एक हक्काची जागा निर्माण करता आली याच भावनेत ती तृप्त होते… :)
तसं पाहिलं तर ती कुठल्याच कामाला नाही म्हणत नसते… पण कधी कधी अशाच एखाद्या कंटाळवाण्या कामातसुद्धा ती आनंद शोधते… 
Hats Off to Her.... :)

- टिंग्याची आई
त्या दिवसापासून रोज रात्री भांडी घासताना मीही हा सिनेमा जगते आणि the end झाल्यावर समाधानाने झोपी जाते… :)

Thursday, March 3, 2016

म्हातारी व्हायचं नाही...

"तू म्हातारी व्हायचं नाही हं आजीबात…."
इतका वेळ कशाततरी मग्न असलेला माझा टिंग्या अचानक मला म्हणाला… ऐकून तशी चमकलेच मी पण म्हटलं ठीक आहे करूया थोडीशी गम्मत लेकाची आपल्या… ;)
मी विचारलं… "का रे बाबा…?"
"नाही म्हणजे नाही… मला नाही आवडत तू म्हातारी झालेलं…" अगदी चिडून बिडून उत्तर दिलं त्याने…
मग मी आपला नेहमीचा समजवायचा सूर धरत म्हटलं… "अरे बाळा…. सगळेच म्हातारे होतात… मी आधी तुझ्यासारखी लहान होते मग आता मोठी झाले आणि हळू हळू म्हातारी होणार… बाबा, मी सगळेच म्हातारे होणार…"
"मग आजी आणि आजोबा…???" टिंग्याचा पुढचा प्रश्न…
"ते आणखीन म्हातारे होणार… " आणखी एक उत्तर… :)
"कुणीही झालं तरी चालेल पण तू म्हातारी व्हायचं नाही म्हणजे नाही…." टिंग्या आता केविलवाण्या स्वरात बोलत होता….
त्याला जवळ घेत मी पुन्हा विचारलं…. "का रे बाळा… मी का बर व्हायचं नाही म्हातारी….??"
त्या निरागस जीवाचं उत्तरही अगदी त्याच्या इतकंच निरागस होतं… रडवेल्या स्वरात टिंग्या म्हणाला… "मग…. मी जर पडलो…. धडपडलो…. माझा पाय अडखळला… तर… मला कोण सांभाळणार………?????"
काय उत्तर द्यावं क्षणभर मला सुचेनासं झालं… ते बोल ऐकून गलबलायला झालं…
त्या चिमुकल्या जीवाला कदाचित हे लक्षातच आल नसावं कि आई म्हातारी होईल तेव्हा तोही मोठा होणार आहे… अगदी बाबासारखा…

टिंग्याला उराशी घट्ट कवटाळत मी म्हणाले… "अरे बाळा… आई इथेच असेल तुझ्या जवळ कुठेही जाणार नाही… आणि तोवर तू पण छान मोठ्ठा होशील कि नाही बाबासारखा… मग स्वतःच सांभाळून चालशील… स्वतःच पडताना तोल सावरशील…."
आणखीनच कुशीत शिरत टिंग्या म्हणाला… "नाही हं… तरीही तू म्हातारी व्हायचं नाही… प्रॉमिस….????"
आता मात्र पंचाईत झाली ना राव…. मी कशी म्हणणार होते यावर … "पक्का प्रॉमिस…!!!" म्हणून विषय वळवला… ;) कात्रीतून पटकन सुटायची हि पद्धत  फार सोपी आहे….
"अरे टिंग्या… माझे केस पांढरे झाले आणि मी म्हातारी झाले तर घेशील का रे मला तुझ्या घरात ??"
"हो तर… का नाही…. घेणार कि मी तुला घरात…. " सगळ विसरून आता स्वारी खुशीत बोलत होती…. चला निदान त्या विचारातून टिंग्याला बाहेर काढण्यात आई यशस्वी झाली… :) पण हो स्वतः दुसऱ्याच विचारात हरवून गेली…. नेहमीसारखी….

टिंग्याला सांगावंसं वाटत होतं… तू मोठा होशील… तुझ्या नव्या जगाच्या शोधात या आईला सोडून कुठेतरी भूर उडून जाशील… पंखात बळ आलं कि पाखरं भूर उडून जातात… नव्या क्षितिजांच्या शोधात… नवीन घरटं बांधायला… स्वतःच… मग मागे राहिलेल्या घरट्याच काय होत असेल याचं पिल्लांना भान राहातच नाही…. मुलं मोठी होतात पण आई-बाबा कधीच मोठे होत नाहीत…." :)
खरंतर आपण म्हातारे होईपर्यंत जिवंत राहणार कि नाही कोण जाणे पण तरीही आपलं प्लानिंग चालूच असतं… मला उगीचंच बरं वाटलं… म्हटलं निदान म्हातारपणी पोरगा घरात घेईन म्हणतोय… सध्या तेवढं पुरे… :)
परवा फेसबुक वर एक पोस्ट वाचली…. आपल्या बाबांना अनाथ कम वृद्धाश्रमात सोडायला आलेल्या मुलाची… त्या आश्रमाच्या मालकाशी बाबांना गप्पा मारताना पाहून त्याने विचारलं "तुमची जुनी ओळख आहे का?" आणि त्यावर त्या मालकाने त्या मुलाला निरुत्तर करणारं दिलेलं उत्तर…. "हो… ३० वर्षापूर्वीची ओळख… ३० वर्षापूर्वी ह्यांनी इथूनच एक मुलगा दत्तक घेतला होता…."
वाचून जीवाला चटका लागला… सत्य आहे हे आजकालच… एक विदारक सत्य… :(
पण खरंच आपले म्हातारे आई बाप आपल्याला इतके जड झाले आहेत का? 

ज्यांनी पहिलं पाऊल टाकायला आपल्याला आधार दिला त्यांच्या अखेरच्या प्रवासात आपण सरळ सरळ त्यांना निराधार करायचं हा कुठला न्याय…?
हल्ली आम्हा वर्किंग लोकांना फारतर गरज आहे म्हणून या म्हाताऱ्या आई-बाबाला so called आमच्या घरात जागा मिळते… आमची मुलं लहान आहेत तोवरच त्यांना सांभाळायला आम्हाला आजी-आजोबा हवे असतात… म्हणजे आम्ही निर्धास्तपणे ऑफिसची काम करायला रिकामे अगदी पार्ट्या सुद्धा…. आणि हो काही चुकलंच त्यांचं तर मनसोक्त ओरडायलाही माही मोकळे….
एकदा का आमची मुलं मोठी झाली म्हणजे फारतर फुल टाईम शाळेला जायला लागली कि मग मात्र आम्हाला या म्हातार्यांची अडचण व्हायला लागते… ते बिचारे मात्र आपली आयुष्यभराची कमाई आम्हा लेकरांवर उधळून रिकाम्या हाताने फक्त आमच्या मायेचं मागणं मागतात आमच्या दारी लाचारपणे उभं राहून…. पण आम्हाला कुठ जमतंय तेवढं….!!! आपल्याच व्यापात नको इतके गुरफटलेले आम्ही… पुरवतोय न पैसा आजारपणाला मग आणखी काय हवंय…??  पण फक्त पैसा पुरवला कि सगळ संपतं का? रोज नव्याने येणाऱ्या त्यांच्या दुखण्यांना अंत नसेलही पण तुम्ही आपुलकीने केलेली चौकशी सुद्धा पुरेशी असते त्या बिचाऱ्यांना…
म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं असं म्हणतात…. मग आपण त्यांचे आईबाप व्हायचं सोडून साधी उसनी माया सुद्धा त्यांच्या पदरात घालू शकत नाही….????? अरे ज्यांच्याकडे हे मायेचं छत नाहीये ना त्यांना विचारा आईबापाची किंमत….


जिने नऊ महिने स्वतःच्या उदरात आपल्याला वाढवलं… तिला आपण साधं नऊ तासही सहन करू शकत नाही…!!!
ज्यांनी स्वतःच्या मजबूत खांद्यांवर आपलं ओझं आयुष्यभर वाहिलं… त्या खांद्यांना आपण साधा आधारही देऊ शकत नाही…!!!
जिने डोळ्यात तेल घालून आपली काळजी घेतली… ती आई आपल्याला डोळ्यासमोरही नको झाली आहे…!!!
ज्यांनी आजारपणात आपल्यासाठी रात्री जागून काढल्या… त्यांच्याच आजारपणात आपण मात्र फक्त पैसा पुरवून हात वर करतोय…!!!
जिने हाताचा पाळणा करून आपल्याला वाढवलं… त्या आईच्या थरथरत्या हातात हात द्यायलाही आपल्याकडे वेळ नाहीये…!!!
ज्यांनी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर न थकता काम केलं… त्या बाबांच्या थकलेल्या पावलांची आपण चार क्षण सुद्धा सोबत करू शकत नाही…!!!
ज्या आई-बाबाने पोरांच्या सुखातच आपला संसार धन्य झाला असं मानलं… त्यांच्या म्हातारपणी आपण त्यांना नव्याने संसार थाटायला मजबूर करतोय…!!!
ज्यांनी आपल्याला समृद्ध आयुष्याची वाट चालायला मदत केली… आज आपण त्यांची सोन्यासारखी मुलंच त्यांना थेट वृद्धाश्रमाची वाट दाखवतोय…!!!


हल्लीच नाना पाटेकर यांचा नटसम्राट सिनेमा पाहिला…. पोरांना जड झालेल्या म्हाताऱ्या आईबापाची अन त्यांच्या स्वाभिमानाची करुण कथा किंवा व्यथा म्हणावी… बघताना माझ्याही डोळ्यातून घळघळ पाणी वाहत होतं… नानांचा एक एक शब्द जिव्हारी बसत होता… पण प्रत्यक्षात असं काही वागणाऱ्यांना खरंच फरक पडला असेल…????

का झाली आहेत आपली मनं इतकी खुरटी…? कशाचाच फरक पडत नाही आपल्याला… धड आपल्याला मनमोकळ रडताही येत नाही आणि हसताही येत नाही… गुरफटलोय आपण स्वतामध्येच नको इतके…. आणि नको इतका गुंता झालाय… स्वतःचाच… अरे जिथे आपण जन्मदात्या आईबापाचे होऊ शकलो नाही तिथे दुसऱ्या कुठल्या नात्याचे कसं काय होऊ शकणार…?
असं म्हणतात कि सगळ्या कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात…. मग तुमची मुलही आहेतच कि… होतील तीही मोठी कधीतरी आणि मग कदाचित या सगळ्याचा हिशोब करतीलही… 


पण खरं सांगू… मला वाटतं… आईबापाला असं वाऱ्यावर टाकणार्यांच्या बाबतीत असं होऊ नये…. हो… नकोच व्हायला… कारण त्यांच्यामध्ये एवढं मोठं दुखं सहन करायची कुवतच नाहीये… ज्यांचे डोळे आईच्या वेदनेने पाझरत नाहीत ती मानाने कमजोरच असली पाहिजेत… कदाचित त्यांच्या मुलांनी त्यांना म्हातारपणी प्रेमाने वागवलं तर त्यांना आपली चूक तरी कळेल… भले ती चूक सुधारता येणार नाही…. 


याउलट….
आजच सकाळ मध्ये एक लेख वाचला…. ज्यामध्ये स्वतः एक वृद्धा आपल्या वृद्धसदनातील वास्तव्याबद्दल सांगत होत्या… हो वृद्ध सदन… त्यांनी मुद्दामच आश्रम असा उल्लेख टाळलाय… वृद्धसदन किंवा ओल्ड एज होम्स मध्ये तिथले वृद्ध स्वतःच्या मर्जीने वास्तव्य करतात… त्यांना उपयोगी किंवा गरज असणाऱ्या सगळ्या सोई इथे छान उपलब्द्ध करून दिल्या जातात… सोबत १-२ डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय सुद्धा असतात… गरज पडल्यास अम्बुलन्स सुद्धा हजर असते दारात…
घरी हे आजी-आजोबा दिवसभर एकटे असताना काही मेडिकल इमर्जन्सी आलीच तर खरंच आपण वेळेवर पोहचू कि नाही हेही आपल्याला सांगता येणं कठीणच आहे… मग वाटतं कि अशी वृद्धसदनं असणं गरजेचं आहे… हा झाला एक वेगळा विचार… पण आपल्या सोयीचा आहे म्हणून वेगळा विचार करणारेही लोक आहेतच कि… :)


फक्त इतकंच वाटतं… ज्या आई-बाबांनी आयुष्यातल्या प्रत्येक वादळाला तोंड देत आपलं संरक्षण केलं त्यांना आयुष्यातल्या शेवटच्या अंकात असं वाऱ्यावर सोडू नका…. 


असो…. 
माझं हे असंच होतं… एका विचारातून कधी दुसऱ्या विचारात गुंतत जाते माझं मलाच कळत नाही… :)
सध्या मी ह्याच आनंदात आहे कि म्हातारपणी माझं पोरगं मला घरात घेणार म्हणतंय…
टिंग्या अजूनही सांगतो मला अधून मधून अगदी रोज… "तू म्हातारी नाही व्हायचं…"
आणि मीही मग खुश होऊन म्हणते…. "अरे बाळा…. अभी तो मैं जवान हुं……!!!" :)

- टिंग्याची आई

Thursday, February 18, 2016

सोबत…

माळरानावर एक छानशी होती झोपडी आणि होतं एक झाड तिची अखंड सोबत करणारं… 
खूप वर्षापासून पाहत होतो आम्ही ती झोपडी अन झाडाची सोबत…. 
कुणीच न्हवत राहत तिथे म्हणून सगळे तिला म्हातारीचं घर म्हणत… 
राहायचं म्हणे कुणीतरी फार पूर्वी त्या एवढ्याशा झोपडीत
विसावायचं सुख कधी काळी त्या झाडाच्या सावलीत… 
खूप जूनं होतं झाड अन झोपडीही तितकीच वृद्ध वाटायची 
कधीही पाहिलं तरी ती दोघं एकमेकांच्या सोबत उभी दिसायची 
बघताना वाटायचं कित्ती कित्ती प्रेम दडलंय बर या दोघांत 
आयुष्यभर सोबत राहायचं जणू वचन दिलंय त्यांनी गेल्या जन्मात

कुणी सावलीत बांधली होती झोपडी
कि झोपडीला सावली मिळावी म्हणून कुणी रुजवला होता अंकुर देव जाणे… 
चार तपं लोटली तेव्हापासून ते असेच सोबत आहेत म्हणे 
दिली होती सावली एकेकाळी त्या झाडाने झोपडीत नांदणाऱ्या इवल्या सुखांना 
आजही झोपडी बिलगली आहे त्याच्या खोलवर गेलेल्या मुळांना 
थाटला असेलच कि संसार कुणीतरी त्या मुळांचा आधार घेऊन 
फुलली असतील कितीतरी सुखं त्या झोपडीच्या कुशीत राहून 
याच अंगणात खेळली असतील अन याच सावलीत वाढली असतील 
आणि याच फांद्यांचा आधार घेऊन पाखरं भूर उडाली असतील 
उंची वाढलेल्या स्वप्नांना कदाचित झोपडी ठेंगणी वाटली असेल 
अन अशाच एखाद्या वळणावर तिच्या लेकरांची साथ सुटली असेल 

असं काही सोडून दिलं कुणी परत फिरून सुद्धा पाहिलं नाही 
माळावरच्या त्या झोपडीला झाडाशिवाय आपलं असं कुणीच राहिलं नाही 
त्या दिवसापासून दोघंही एकमेकांची अखंड सोबत करत आहेत 
प्रेमाच्या अतूट नात्याची मंजुळ गाणी गात आहेत 

बराच काळ लोटला झोपडी आता बरीच थकली होती 
जळमटलेल्या भिंतींचा आधार घेत कशी बशी उभी होती 
झोपडीचं हे असलं दुखणं झाडाच्याने बघवत न्हवतं 
गळणाऱ्या पानांसोबत जणू ते तिच्यासाठी अश्रू ढाळत होतं 
बघता बघता झाडाने बहरायचंच सोडून दिलं 
लाडक्या झोपडी सारखं तेही पूर्णपणे सुकून गेलं 

हल्ली दोघेही जरा जास्तच वठ्ल्यासारखे दिसत होते 
पण आजही एकमेकांच्या हातात हात गुंफून उभे होते
वठलेल्या त्या झाडाच्या फांदीवर कुणी पाखरू येत न्हवतं 
आणि पडक्या झोपडीच्या कुशीत दुःख सुद्धा विसावत न्हवतं
तसा काहीच उपयोग न्हवता आता त्यांना जगाचा ना जगाला त्यांचा 
जगत होते फक्त एकमेकांसाठी त्यांना कधीच विसर पडला होता जगाचा 

पण… बघवलं नाहीच कुणालातरी…. 
मावळतीच्या सुर्यासोबत कुणीतरी एक ठिणगी झाडावर टाकली 
अन बघता बघता सबंध झाडाला ती भुकेली आग लपेटली 
उभ्याने पेटलेल्या आपल्या झाडाकडे झोपडी असहायपणे बघत होती 
आगीच्या द्वारातून गूढ काळोखाकडे घाला होता तिचा लाडका सोबती 
धडधडत होती आग ऊरी झाड नुसतंच अश्रू ढाळत होतं 
आयुष्यभर साथ देणाऱ्या झोपडीला शेवटचं डोळ्यात साठवत होतं 

आख्खी रात्र पेटत राहिलं पण कुणी साधं विझवायलाही आलं नसावं 
त्यांच्या नात्याचं हे मरण आकाशातल्या चंद्रालाही सहन झालं नसावं 
फांदी-खोडासकट सगळ्याची आता राख राख झाली होती 
उरल्या सुरल्या मुळांना छातीशी कवटाळून झोपडी आक्रोश करत होती 
हरवलं होतं तिचं झाड बिचारं आता नुसतीच राख धुमसत होती 
मागे एकटी पडलेली झोपडी विरह यातनेत मुसमुसुत होती 
इतक्यात वाऱ्यासोबत कुठूनशी एक जळती ठिणगी धावत आली
अन लागलेल्या आगीने जणू झोपडीची अंतिम इच्छा पूर्ण केली 
एकच ठिणगी पुरेशी होती… झोपडीने क्षणार्धात पेट घेतला 
आपल्या साथीदाराच्या ओढीने तिनेही अखेरचा श्वास घेतला 
समाधानाने जळत होती आता तिला कशाचाच मोह उरला न्हवता 
आता फक्त तिला तिच्या प्रिय झाडाचा ध्यास लागला होता 
माळावरचे ते दोन राखेचे ढीग आजही त्यांची आठवण करून देत आहेत 
असे हे जीवाभावाचे सोबती अस्तित्वापलीकडेही एकमेकांची अखंड सोबत करत आहेत :)

- टिंग्याची आई 
ज्यावरून हे सर्व सुचलं तो प्रत्यक्ष फोटो… 

Wednesday, February 10, 2016

"दुःख…"

दुःख… दोन अक्षरी शब्द तरीही खूप अर्थ सामावून घेणारा….
अन कधी कधी अगदीच निरर्थक वाटणारा… 
मोठं असो वा छोटं… दुःख म्हणजे दुःख असतं… 
इतरांपेक्षा नेहमी आपल्याला आपलंच दुःख मोठं असतं… 
आपलं दुःखं नेहमीच आपल्याला डोंगराएवढं वाटत राहतं…. 
पुढ्यात सुख असलं तरी आपल्या डोळ्यांत दाटत राहतं…. 

दुसऱ्याचं दुःख कितीही मोठं असो… आपल्यासाठी लहानच असतं…  
मी कसं सावरलंय अन किती सहन केलंय हेच आपल्याला दाखवायचं असतं… 
दुसऱ्यांना हजार वेळा सांगत… म्हणे आपण त्यातून मोकळं व्हायचा प्रयत्न करतो… 
अन दरवेळी सांगताना नकळत एक नवीन किस्सा रंगवून रिकामे होतो… 

पण खरं सांगू… 
असं एखादं जीवघेणं दुःख आलंच वाट्याला… तर दुसऱ्याचं दुःख ऐकावं… 
म्हणे दुसऱ्याचं दुःख ऐकलं कि आपण आपलं दुःख विसरतो 
पाझरणाऱ्या डोळ्यांना मग आपणच पुन्हा हसायला शिकवतो… 

दुसऱ्याचं खरंच डोंगराएवढं दुःख पाहिलं कि आपलं आपसूकच कणाएवढं वाटेल…
मनावर दाटलेलं मळभ हळू हळू का होईना पण नक्की सुटेल 
कितीही मोठं असलं तरी "दुःख" या शब्दाएवढंच त्याला छोटं समजायचं… 
सूर्याकडून एखादा किरण उधार घेत रोजच नव्याने उमलायचं… 

करावं सहन जमेल तितकं… त्यावरूनच मनाच्या जमिनीचा कस कळतो…
दुःखाचा कडू घोट पचावल्याशिवाय सुखाचा मधुर कण तरी कुठे मिळतो… 
तूच दिलंस दुःख, सहन करायची ताकदही दे… एवढंच त्याला हात जोडून सांगायचं… 
काळजातली कळ कंठात जिरवायचं सामर्थ्यही त्याच्याकडेच मागायचं… 
दुःख भरल्या ओंजळीत सुखाचं दानही तो स्वतःच घालेल … 
अन डोंगराएवढं दुःख इवल्याशा सुखाच्या छायेत समाधानाने विसावेल… :)

- टिंग्याची आई 

Wednesday, February 3, 2016

पाटी....

पुणेरी पाटी न्हवे…. ;)

पोस्टचं नाव वाचून आली ना डोळ्यासमोर अशीच एखादी दगडी पाटी…?? कधी काळी लहानपणी वापरलेली…!!!
आजकाल आपण फार मॉड झालोय त्यामुळे पोरांच्या शाळेची सुरुवात डायरेक्ट वही आणि पेन्सिल नेच होते… आणि असलीच एखादी पाटी तर मग ती ग्लिटर वाली किंवा Magnetic स्लेट का काय म्हणतात तसली…. त्यामुळे आपली पाटी आता जर outdated झालीये म्हणे…
पण मला बाई पाटी फार आवडते आणि आजही तितकीच महत्वाची वाटते…
पाटी….
बालवाडीत असताना पहिल्यांदा पाटी आणली होती मला पप्पांनी… नवी कोरी पाटी… माझी पाटी…
आईने पहिलं  अक्षर त्यावर लिहिलं होतं… ।। श्री ।।
अन सोबत छानसं "श्री गणेशा" अगदी कोरून काढल्यासारख…. :)
आणि दुसऱ्या बाजूला आमच्या शाळेची सुरुवात… "ग म भ न…" :)
सरकारी कॉलनीच्या एका रिकाम्या खोलीत भरायची आमची बालवाडी… तीच माझी पहिली शाळा… :)
तशी दिदीची जुनी पाटी बऱ्याचदा मिळायची काही बाही लिहायला पण त्यावेळी अक्षरांपेक्षा रेघोट्याच जास्त व्हायच्या… :)
असो…
तर पाटी मिळाली तो दिवस आजही आठवतो…. दगडी न्हवती पण दुसरी साधी पाटी… राजा पाटी… फ़ेमस ब्रांड… पत्र्याचे काठ असलेली… फार तर १०-१५ रुपयांना मिळायची तेव्हा… तिचा प्लास्टिक कव्हर फाडताना जाम भारी वाटलं होतं… सोबत पेन्सिल चा बॉक्सही मिळाला होता… पण एका वेळी एकच मिळायची… :(
खरतरं त्यातल्या खाल्ल्या किती लिहायला वापरल्या किती याचा हिशोब नाही…. ;)
नवीन पाटीचा तो विलक्षण सुगंध… वा… वा… निदान पहिले काही दिवस तरी काळाकुट्ट राहणारा तिचा रंग… पहिल्यांदा लिहिताना पेन्सिलचा तो पांढरट भुगा… सगळच अप्रतिम… 

पाटीवर लिहायला मिळायचं म्हणून आम्हाला अभ्यासाची हौस… :) एक बाजू अभ्यास करून भरली कि दुसरी बाजू… तेही मागचं लिहिलेलं आजीबात पुसू न देता… आणि रात्रीदेखील फार जपून ठेवावी लागायची बर का… 
आमची दप्तरं तरी काय हो… पप्पांच्या ड्रेस साठी सरकारी ऑफिसात खाकी कापड मिळायचं… त्याच्याच उरल्या सुरल्या तूकडयामधून पप्पा आम्हाला दप्तर शिवायचे…. आणि दादाची शाळेची चड्डीसुद्धा त्यातूनच भागवली जायची… :)
निव्वळ एक बंद तोच मानेत आणि दोन्ही खांद्यांमध्ये अडकून बरोबर पृष्ठभागावर दप्तर यायचं आणि ते उडवत उडवत आम्ही शाळा गाठायचो… मग तेव्हा पाटीवरचा अभ्यास पुसला जातोय कि नाही हे कुठलं लक्षात राहतंय आमच्या… ;)
शाळेत गुरुजींना जेमतेम अदुश्य झालेला अभ्यास दाखवला कि पुन्हा पती कोरी करून पुढचा अभ्यास सुरु… पाटी पुसायलाही सुरुवातीला फार कौतुकाने काही बाही केलं जायचं… ओलं कापड हवं पण ते दप्तरात ठेवणार कसं? म्हणून मग एक आयडिया… :) पप्पांच्या कामावरच्या जुन्या गाड्यांच्या सीटचा कापूस बऱ्याचदा कव्हर फाडून बाहेर डोकावायचा… मग त्यातलाच एक तुकडा घ्यायचा अन तो ओला करून एखाद्या डबीत ठेवून मिरवायचं… मग शाळेत सगळ्याचं लक्ष आमच्याकडेच… "कसलं मस्त आहे हे पाटी पुसायला…"आणि आम्ही मात्र तेवढ्यावरच किलोभर भाव खायचो… ;)
पण एवढ्याने पाटी पुसायचं काम संपत न्हवतं काही… त्या ओल्या पाटीला सुकवायला चिमणी आणि कावळ्याला बोलवावं लागायचं अन तेही अगदी सुरात… 
चिमणी चिमणी वार घाल…. 
कावळ्या कावळ्या पाणी पी… 
पण बऱ्याचदा हाताला सुटलेला घाम सुद्धा पाटी पुसायला पुरेसा असायचा… :)

किती सोप्प आहे ना पाटीवर खूप काही लिहिणं आणि ते सगळ पुसून पुन्हा नव्याने सुरुवात करणं… पण आपण आयुष्याची पाटी कोरी करायला कधीही धजावत नाही… हवं नको त्या सगळ्या क्षणांनी आपली पाटी नेहमीच गच्च भरलेली असते… कधी कधी वाटतं त्याच जुन्या कापसाच्या ओलाव्याने करावी हि पाटी स्वच्छ… आणि पुन्हा करावी नव्याने सुरुवात प्रत्येक नात्याची… पाटी कोरी असली कि लिहिलेलं जास्त ठळक दिसतं म्हणे… ठाऊक नाही कितपत जमेल किंवा जमेलही कि नाही… :)

तर मला दगडी पाटी फार आवडायची पण फुटायची भीती होती… म्हणून घेतलीच नाही कधी आईने… शाळेत आम्ही जमिनीवरच बसायचो मग दप्तरंही अशीच खाली विखुरलेली असायची… मधल्या सुट्टीत खेळताना एखाद्या दप्तरावर चुकून पाय पडला तर पाटी फुटलीच म्हणून समजा… असं रडू कोसळायच म्हणून सांगू… :( म्हणूनच मी दगडी पाटीचा मोह अगदी आजही आवरलाय… :)

तर अशी ही पाटी… अभ्यास करून करून… मागे पुढे लिहून पुसून कधी जुनी व्हायची कळायचंच नाही… 
अशाच जुन्या पाटीचा पत्रा लागून झालेली जखम अगदी आजही आठवते… :)
पाटी जुनी झाली कि पेन्सिल त्यावर काही केल्या उठायची नाही… कशाने इतकी तेलकट व्हायची देव जाने… मग चुलीजवळचा काळा कुळकुळीत कोळसा घ्यायचा आणि दिवसभर ती पाटी घासायची… काय लॉजिक होत माहित नाही पण पाटी पुन्हा लिहिण्याजोगी व्हायची एवढं खर… :)

जुन्या पाटीला अशी नवी करता करता घासून घासून शेवटी तिचा पुठ्ठा दिसायला लागला कि समजायचं नवी पाटी घ्यायची वेळ आली आहे… पण तोवर आम्ही पाहिलीतून पार चौथीत येवून ठेपलेलो असायचो… आणि मग काय आम्हाला तर वही-पेन चे वेध लागलेले असायचे… 
अवघ्या एक-दोन पाट्यामध्येच आमचं बालवाडी ते चौथीपर्यंत ५ वर्गांच शिक्षण पूर्ण व्हायचं अन आजकाल प्लेग्रुप ला सुद्धा ३-४ वह्या पुस्तकं ठरलेली असतात… :)

पुढच्या वर्गात गेलो म्हणून पाटी सुटली असं नाही ती होतीच सोबत अन आजही आहे… दहावीची गणितं सुद्धा पाटीवर सोडवल्याच आठवतंय मला… पाटीवर केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं आई म्हणायची म्हणून पाटी कधीच सोडली नाही आम्ही… अगदी बारावीचे derivative आणि Integration सुद्धा मी कधी कधी पाटीवर सोडवली होती… लक्षात राहणे वगैरे सगळ ठीक पण हा पाटीवरचा अभ्यास आवडायचा मला… मग इयत्ता कुठली का असेना पाटीवर अभ्यास ठरलेला… :)

आणि हो मी माझ्या लेकाच्या अभ्यासाची सुरुवातही पाटीवरच  केली बर का… मण्यांची पाटी त्याची फेवरेट आहे… आई इतकं सुरेख नाही जमलं पण त्याच्या अभ्यासाची किंवा रेघोट्यांची सुरुवात मीही "श्री गणेशा" नेच केली…. 
आता त्यच्या वह्या पेन्सिली पेन drawing बुक्स पुस्तकं या सगळ्यांत बिचारी पाटी हरवून गेलीये हे खरं… पण निदान सुरुवात तरी या लाडक्या पाटीवर झाली याचं समाधान आहे… 

कधी मलाच आठवण आली तर त्याची पाटी छान कोरी करून मीच काहीतरी लिहित बसते… 
एखादं आवडीचं गान… कधीतरी सुचलेली, खुपलेली, आवडलेली एखादी ओळ अन बरच काही लिहून काढते…. 
आयुष्यातल्या काही हरवलेल्या क्षणांची गोळाबेरीज करते… 
सुखांचा गुणाकार अन दुःखाचा भागाकार करून पाहते… 
हरवलेली काही नाती पुन्हा एकदा जमा करते… 
नको असलेले क्षण मुद्दामच वजा करून टाकते… 
मग कधी क्षमेचा एखादा हातचा देऊन किंवा घेऊन बघते… 
अशीच काही न सुटणारी अन काही सुटलेली गणितं मांडते… 
अन दोन्ही बाजू गच्च भरून थोडंसं समाधान बाकी  ठेवते…. 
आयुष्याचा अभ्यास तर करून झाला पण दाखवायचा कुणाला हा प्रश्न पडतो… चुका करणारी अन चुका काढणारी मीच असते… :)

अशी माझी भरलेली पाटी बघून मग टिंग्याच कुठून तरी ओलं कापड घेऊन येतो अन दोन्ही बाजू पुसून चिमणी आणि कावळ्याला त्याच सुरात बोलवून माझी पाटी पुन्हा एकदा कोरी करून देतो…. पुन्हा पुढची गणितं मांडायला…. :)

- टिंग्याची आई