Tuesday, December 31, 2013

Happy New Year.... :)

Here is a Special New Year Wish... खास तुमच्यासाठी….
होऊ देत २०१३ ची सांगता… With a Glass of Chilled Beer...
स्वागत करू नव्या वर्षाचे… With A Biggest Cheer...
नव्या वर्षी होऊ देत… तुमची सगळी Tensions All Clear…
३६५ दिवस तुमच्या सोबत असोत… तुमचे सगळे Dear… 
प्रत्येक दिवस फ़ुल्ल एन्जॉय करा… कोणाच्या बापाची नको Fear…
आयुष्यातली सगळीच वळणं सुखरूप असोत… Boss डालो टॉप Gear…
तुमच्या सगळ्या इच्छा… आपला लाडका बाप्पा करो Hear…
लवकरच पोहोचवेल तो तुम्हाला… तुमच्या यशाच्या एकदम Near…
सगळ्याच पिक्चरचा पाहायला मिळो… तुम्हाला पहिला-वहिला Premier…
नवी उंची गाठाल नक्कीच… In Your own Career…
आपल्या नियम आणि तत्वांशी… रहा तुम्ही always Adhere…
नाहीच वाटणार कोणताही प्रॉब्लेम… नको इतका Severe…
काळजी घ्या स्वतःची, आपल्या माणसांची… and always be Sincere…
तुमची सगळी दुखं होऊ देत… आपोआप Disappear…
या नव्या वर्षी हसत-खेळत रहा… नको तुमच्या डोळ्यांत एकही Tear…
टिंग्या आणि त्याच्या आईकडून तुम्हा सगळ्यांना A Very Very Happy New Year...!!!! :)
Hope this year brings you a new Souvenir...
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…. :)
- टिंग्याची आई

Friday, December 27, 2013

निरोप……

काही दिवसापूर्वी एक कविता लिहिली… तो Onsite ला निघालाय… त्यात एक कडवं होतं ज्यात तो तिला निरोप द्यायला जातो… तिला एकदाचं डोळे भरून पाहायला…. त्यावरूनच सुचलेली हि कविता… त्यांच्या निरोपाचा प्रसंग… विस्तारित वृत्त…. ;-)
आजही आठवते ती संध्याकाळ…. निरोपाची होती…
निघण्यापूर्वी एकमेकांना डोळेभरून पहायची… शेवटची संधी होती…
आठ दिवसापूर्वीच त्याची… निघायची तारीख कळली…
शॉपिंग आणि Packing…. सगळी तयारीही तिनेच होती केली…
Excitement वगैरे सगळं ठीक… पण आज जीवावर आलं होतं…
एकमेकांना सोडून जाणं… दोघांनाही अवघड झालं होतं…
सगळी तयारी झाली… निघायचा दिवस उद्यावर येउन ठेपला…
आज सारी काम बाजूला सारून… तो तिला येऊन भेटला…
न बोलावता तीही आज… त्यांच्या फेवरेट जागेवर हजर होती…
नेहमीसारखीच निशिगंधेची फुलं घेऊन… त्याची वाट पाहत उभी होती…
दरवेळी हमखास विसरणारा गुलाब… तो आज आठवणीने घेऊन गेला…
हळुवार तिच्या हातात देताना… नेमका त्याचा काटाच तिला बोचला…
काटा तिला लागला… पण कळ त्याला आली…
पापण्यामधलं पाणी अडवत… ती फक्त शांत हसली…
माझ्याविना हि कशी राहील…? याचा विचार तो करत होता…
अन त्याला न पाहता दिवस कसा सरणार…? हा प्रश्न तिला पडला होता…
कोणीच काही बोलेना… दोघेही तासभर नुसतेच बसून होते…
हातात गुंतलेले हातच… दोघांचं मुक्याने सांत्वन करत होते…
पाण्याने टच्च भरलेले तिचे डोळे… अस्पष्ट दिसणारी जमीन न्याहाळत होते…
अन त्याचे दोन्ही डोळे… तिला जमेल तितकं डोळ्यांत साठवत होते…
"नको ना रे जाऊ…" तिने एकदातरी म्हणावस त्याला वाटत होतं…
"मला नाही जायचं तुला सोडून…" हे तिला त्याच्या तोंडून ऐकायचं होतं…
एवढी इच्छा असूनही… कोणीच काही म्हटलं नाही…
आतल्याआत घुसमटणार मन… आज पहिल्यांदाच बोललं नाही…
न राहवून हळूच तिने… त्याच्या खांद्यावर डोकं टेकलं…
तिला घट्ट मिठीत घ्यावं… त्यालाही अगदी त्याच क्षणी वाटलं…
 
अजून थोडासा वेळ… तसाच शांतपणे निघून गेला…
एकमेकांसोबतचं त्याचं एकटेपण… आज चंद्र लांबूनच बघून गेला…
हातातला हात सोडवत… शेवटी एकदाचा तो जायला उठला…
इतका वेळ अडवून ठेवलं… पण आता मात्र तिचा बंध फुटला…
दोन्ही टपोऱ्या डोळ्यातून… घळ घळ पाणी वाहू लागलं…
केवीलवाण त्याचं प्रतिबिंब… त्या अश्रुंसोबत वाहू लागलं…
मन घट्ट करून… त्याने तिला मिठीत घेतलं…
त्याचंही मन चिंब भिजेपर्यंत… तिने मनमोकळ रडून घेतलं…
अश्रूंना बांध घालत… शेवटी दोघांनी एकमेकांना सावरलं…
हसत हसत निरोप घ्यायचा… मनाशी पक्क ठरवलं…
नको इतक्या जड अंतकरणाने… तिने त्याचा निरोप घेतला…
लवकरच परत यायला… तो तिचा निरोप घेऊन निघाला…
तो अंधारात दिसेनासा होईपर्यंत… ती तिथेच उभी राहिली…
निरोपाची हि संध्याकाळ दोघांसाठीही… पुन्हा भेटेपर्यंत जणू तिथेच होती थांबली…
- टिंग्याची आई

Thursday, December 26, 2013

तब घर याद आता है…

On special request by Arun... Thank you Arun for being the inspiration of this poem.... :)
Feel karke likhe hai... hope you like it... ;)
हर सुबह का सूरज… तुझे देखे बिना निकलता है…
बिना कुछ खाये-पिए… तेरा बेटा ऑफिस चल पड़ता है…
सोचता हूँ माँ होती यहाँ… तो मेरा कितना खयाल रखती…
मेरी हर छोटी बड़ी चीज का… प्यार से ध्यान रखती…
पर जितना भी हम सोचे… सिर्फ तेरी याद ही आती है…
तेरे ममताभरे आँचल कि कमी… मखमल से भी पूरी न हो पाती है…
जब सर पे तेरा हाथ नहीं सिर्फ खुला आसमाँ होता है…
माँ… तब घर याद आता है…

आपहीने सिखाया था पापा… शराब बुरी चीज होती है…
फिर भी हर Friday यहाँ… बोतले खाली होती है…
दुआ भी करते है उस बिच… आपका फोन ना आए…
अपने होनहार बेटे को… पापा इस हालत में कभी ना पाए…
ऐसीही कुछ गलतियाँ… आजकल जानबूजके हो जाती है…
कोई संभालने वाला हो… तो हर उलझन सुलझ जाती है…
जब गलतियों पे हक़ डाँटने वाला कोई नहीं होता है.… 
पापा… तब घर याद आता है…

हर राखी का त्यौहार… तेरी बहुत याद दिलाता है… कुरियर से आई राखी… भाई अपने आप ही बाँध लेता है…
तेरी हर मांग, हर शिकायत… आज भी प्यारी लगती है…
आज भी जब बिना भूले… हर बड़ेपे तेरीही फर्स्ट विष होती है…
फेसबुक मेल या फोन… पगली बातें तो बहुत होती है…
दर्द तो तब होता है… जब तुझे एक जादू कि झप्पी देनी होती है…
जब किसी प्यारीसी गुड़िया को प्यार करनेका मन करता है…
बेहना… तब घर याद आता है…
इस अनजाने शहर में हर दिन… कोई न कोई झोल होता है…
लड़ तो अकेले भी लेंगे हम… पर किसीका हाथ चाहिए होता है…
वैसे तो घरवालोंसे हमेशा… हर चोट बखूबी छुपाते है…
पर कोई चुपकेसे मरहम लगा दे… ये भी तो हम चाहते है…
हर सिक्रेट जिससे शेयर करे… वो भाई ही तो होता है…
बचपन का हर झगड़ा… अपना प्यार ही तो बढ़ाता है…
लेकिन जब दिल किसीको गले लगाना चाहता है…
भाई… तब घर याद आता है…
वीकेंडपे रूम कि खाली दीवारें… बहुतही सताती है…
जहाँ कभी मैं अकेला न था… उस छत कि याद दिलाती है…
कोई अपना नहीं है ये… पर अपनों से कम नहीं है…
जहा माँ-पापा है… और जहाँ कोई गम नहीं है…
एक आशियाना है ये… अपनों को डोरी में बांधे रखता है…
दुःख हो या सुख… यहाँ हर कोई मुस्कुराता रहता है…
छोटीसी कुटीया या बड़ी हवेली… अपना घर अपना होता है…
लौट जाऊ उस खुशियों के आँगन में… दिल हर रोज यही सपना देखता है…
जब कोई अपना पास नहीं होता है… 
तब घर से दूर आए इस पंछी को…
अपना घर याद आता है… हर पल घर याद आता है.…
:)
- टिंग्याची आई

Monday, December 23, 2013

तो Onsite ला निघालाय…

Dedicated to one of my friends who just went onsite.... :) best of luck and take care Pravin K....
 
सगळे वीकेंड्स कुर्बान करत…त्याने आजवर दिवसरात्र काम केलंय…
प्रसाद म्हणून Manager काकांनी…हातावर हे Onsite चं दान ठेवलंय…
म्हणे… बस झालं Offshore आता… जरा Onsite लाही जाऊन बघावं…
फोनच्या पलीकडच हे जग…आपण स्वतः एन्जॉय करून पहावं…
म्हणूनच… नव्या आकाशाला गवसणी घालायला…
एक उंचच उंच भरारी मारायला…
तो Onsite ला निघालाय…
लवकर परत येईन असं…आईला वचन त्याने दिलंय…
दोघांचीही काळजी घ्या…असं बाबांनाही सांगितलंय…
जमेल तेवढं घरचं सामान…जाण्याआधीच त्याने भरून ठेवलंय…
आपल्या सगळ्या मित्रांना…घराकडे लक्ष द्यायलाही सांगितलंय…
बाप्पाच्या आशीर्वादाने आपलं नशीब आजमवायला…
नव्या जगाच्या नव्या रंगात रंगायला… 
तो Onsite ला निघालाय…
थोड्याच दिवसापूर्वी लाडक्या बहिणीचं…थाटामाटाने लग्न लावून दिलंय…
ताईच्या सुखासाठी दादाने… कर्जाचं ओझं लादून घेतलंय…
लाडक्या ताईच माहेरपण… तो दरवेळेस मिस करेल…
ती सासरी परतताना… तिथे असतानाही डोळे भरेल….
पण आता कर्जाचा डोंगर भुईसपाट करायला…
अन डॉलरला आपल्या तालावर नाचवायला....
तो Onsite ला निघालाय…
त्याच्या त्या प्रिय मैत्रिणीला… काल संध्याकाळीच भेटून आलाय… 
तिच्यासारखाच सुंदर गुलाब… तिला सवयीप्रमाणे देऊन आलाय…. 
तिच्या डोळ्यातले दोन टपोरे थेंब… त्या पाकळ्यांमध्ये विरघळलेत…
अन हातातला हात सोडवताना… त्याचे पाय पुन्हा एकदा अडखळलेत… 
या गोड प्रेमातला कटू विरह अनुभवायला… 
दूर जाऊनही हे नात आणखी घट्ट करायला….
तो Onsite ला निघालाय…
एखादं नवं घर… नवी गाडी… डोळ्यांत बरीचशी स्वप्न साठवली आहेत… 
आजवर मनातच राहिली… पण आता सत्यात उतरताना दिसत आहेत… 
वाटतं, सगळ्यांपासून दूर राहून… पैशाशिवाय दुसरं काय मिळणार आहे?
पण आपल्या माणसांचीच स्वप्न पूर्ण करायला… त्याला Onsite ला जायचं आहे…
कुणीतरी म्हटलंय ना…. 
"कुछ पाने के लिए… कुछ खोना पडता है… 
दर्द तो जरूर होता है… फिर भी दिलको समझाना पडता है…" 
:)
- टिंग्याची आई

Tuesday, December 17, 2013

स्वप्न….

पाहिलंय का तुम्ही स्वप्न कधी… 
खूप मोठठ यश मिळवल्याचं…? 
काळजाच्या अगदी जवळचं… 
कुणी आपलं माणूस हरवल्याचं…?

खूप वर्षापूर्वी गेलेली आजी… 
आली होती का पुन्हा भेटायला… ?
शाळेतल्या सगळ्या मैत्रिणी मिळून… 
पुन्हा बसल्यात का आठवणी वाटायला…?

एखादी जिवाभावाची मैत्रीण… 
मनसोक्त गप्पा मारत बसलीये का…?
लिओ नार्डो ची ती मोनालिसा… 
कधी स्वप्नात येउन उगाचंच हसलीये का…?
कॉलेजमध्ये जिच्यावर लाईन मारली… 
तिनेच स्वप्नात येऊन राखी बांधलीये का…?
तिच्यावर केलेल्या कवितांनी गच्च भरलेली वही…
चुकून स्वप्नात तरी कधी हरवलीये का…?

सुखा-समाधानाने नांदत असता…
वाटलीच असेल भीती दुःखाची…
आणि पूर्ण झालेल्या स्वप्नांनाही…
वाटते भीती आपल्याच वाईट स्वप्नांची…. :)

म्हणे प्रत्येक स्वप्न खरं होत नाही…
अन खरं व्हायचं… तर कोणाला सांगायचं नाही…
पण सांगितल्याशिवाय रहावतच नाही…
म्हणूनच कदाचित कुठलं स्वप्न पूर्ण होत नाही…. :)
शेवटी स्वप्न म्हणजे…. 
आपल्या मनाचाच तर आहे खेळ 
कधीही… कसही पडावं… त्याला धड काळ ना वेळ…
आपण सुखी असता… स्वप्नात दुःख दिसावं… 
अन पोटभर हसत असला तरी… स्वप्नात एकटं रडत बसावं…

पण खर सांगू… 
हि स्वप्न नसली तर आयुष्य पुढे कसं बर जाणार…?
आणि हीच स्वप्न पूर्ण व्हायच्या आशेपोटी अलगद पुढे सरकत राहणार… :)
So... Keep Dreaming.....

- टिंग्याची आई

Wednesday, December 11, 2013

प्रेमाला भाषा नसते….


 
एक मराठमोळा कोल्हापुरी पोरगा… 
अन एक टिपिकल केरळी पोरगी… 
कोणास ठाऊक कशी पण दोघांची अवचित जमली जोडी…. 
नकळत भेट घडली…. 
भाषेची अडचण अशी कधीच नाही पडली…. 
आंखो से इशारे और आंखोसेही इजहार हुआ…. 
like-wike करते करते न जाने कब Love हुआ… :)
त्याची बोली अस्सल कोल्हापुरी… "चा मारी" शिवाय जमत न्हवतं…. 
अन तिचं ते मल्याळी त्याच्या डोक्यात काही केल्या शिरत न्हवतं… 
तिचं fluent इंग्लिश आणि त्याचं आपलं मिन्ग्लीश… 
मनातलं सगळं सांगायला त्यांना तेवढंच पुरेसं होतं… 
कधी कधी प्रश्न पडे त्याला…. 
"कसं सांगू प्रिये… मन कसं हवेत पाखरावाणी तरंगतंय….
क्षितिजावरच्या चांदणीचा तूच समजून… हळूच मुका घेऊन येतंय… 
नजरेसमोर २४ तास… तूच तू असतेस… 
झोपेचा तर पत्ताच नाही… पण स्वप्नात फक्त तूच दिसतेस…"
न सांगताच हे सगळंच… तिला अचूक कळायचं… 
तिचंही मन प्रत्येक क्षणी त्याच्याच तर मागे पळायचं… 
देश वेगळा, वेश वेगळा… 
एकमेकांत गुंतलेला जीव सोडला, तर common असं काहीच न्हवतं… 
दो दिल एक जान असं हे जोडपं, डिट्टो 'एक दुजे के लिये' होतं….
तिचा हात हातात घेऊन…. 
मनातलं सगळं तो धडाधड मराठीतच बोलून टाकायचा… 
अन तिच्या डोळ्यांत नेहमीच…. 
सर्वकाही समजल्याचा भाव असायचा… 
आपलं पहिलं वहिल प्रेम… 
दोघे छान एन्जॉय करत होते… 
रोज संध्याकाळी क्षितिजावर बसून… 
चांदोबाशी प्रेमाच्या भाषेत गप्पा मारत होते…
निधड्या छातीने त्यानं हे प्रकरण… 
आपल्या बापाला जाऊन सांगितलं… 
अन तिने आपल्या घरच्यांवर… 
अतिप्रभावी असं अश्रू-अस्त्र वापरलं… 
नाही-होय करत दोन्हीकडचे तयार झाले… 
केरळहून वऱ्हाड थेट कोल्हापूरला आले…. 
दोन संस्कृतींच्या मिलनाचा हा आगळा वेगळा सोहळा… 
अगदी थाटामाटात पार पडला… 
जगावेगळा कोल्हापुरी पाहुणचार… 
केरळकरांना अगदी मनापासून आवडला…. 
आज बाप्पाच्या आशीर्वादाने… हे जोडपं सुखाने संसार करतंय… 
चिमुकल्याच्या पावलांनी सुख… घरभर दुडूदुडू धावतंय…
सांगायचं एवढंच होतं… 
प्रेम म्हणजे प्रेम त्याला कशाचेही बंधन नसते… 
आपलं प्रेम व्यक्त करायला कधी कधी भाषेचीही गरज नसते…. 
- टिंग्याची आई 
Specially dedicated to one member of our office महिला मंडळ…. :)

Sunday, December 8, 2013

पोरका….

त्या भयाण काळरात्री…
आई तू आम्हाला सोडून गेलीस…
तुझ्या लाडक्या छकुल्याला… 
एका क्षणात पोरका करून गेलीस… 

श्री रामाची गोष्ट आपली…
अजून अर्धवटच राहिली आहे…
घेतलं होतंस स्वेटर विणायला…
अजून ते तरी कुठे पूर्ण झालं आहे…?

शाळेत मिळालेली बक्षीस…
मी कोणाला आणून दाखवणार…?
परीक्षा आलीये तोंडावर…
आता माझा अभ्यास कोण घेणार…?

कोण करील लाड माझे…
अन कोणाकडे मी हट्ट धरू…?
खूप खुप रडावसं वाटतंय ग…
पण सांग आता कोणाच्या कुशीत शिरू…?

"आईविना पोर…" म्हणत…
आजी सारखी डोळ्यातून पाणी काढते…
तिच्या कापऱ्या आवाजात…
कशीबशी माझ्यासाठी अंगाई म्हणते…

तुझ्याच कुशीची सवय लागलीये…
आई… मला झोपच येत नाही…
का सोडून गेलीस अशी…?
या प्रश्नाचं उत्तरंच सापडत नाही… :(

आपल्या बाबाचं हसू तर…
कोणास ठाऊक कुठे हरवलंय…
तू गेल्यापासून सारखं जाणवतंय…
आम्ही खूप काही गमावलंय… 

बाप्पाने तुला नेण्याआधी…
मला एकदा जरी विचारलं असतं…
माझ्या लाडक्या आई ऐवजी…
मी मलाच न्यायला लावलं असतं… 

आपल्या बाप्पाकडेच राहतेस ना…
मग एकदातरी ए ग परतून…
नसेलच जमत  हे तुला…
तर निदान मलातरी घे बोलावून…

येशील का ग एकदाच परत…
तुझ्याविना काळजाचा ठोकाही चुकतोय….
"पोरका" या शब्दाचा अर्थ…
रोज नव्याने सामोरा येतोय… 
ये ना ग आई… 
तुझा लाडका तुला हाक मारतोय…. येशील ना…?

- टिंग्याची आई