Saturday, August 30, 2014

आम्ही Watsapp वाले झालो…:)

 
कधी येतेस ग Watsapp वर…?
रोज एकतरी मैत्रीण विचारायची... 
किती मज्जा असते group वर... 
मला रंगवून रंगवून सांगायची... 

शाळा कॉलेजचे सगळे मित्र मैत्रिणी... 
Watsapp वर गप्पा मारायचे... 
शिल्पा पण आहे का ग्रुप मध्ये... 
बऱ्याचदा एकमेकांना विचारायचे... 

अजूनतरी मी मात्र आपला... 
साधाच फोन वापरत होते... 
आलीच कुणाची आठवण तर... 
डायरेक्ट फोनच करत होते... 

जितक्या दिवसांनी फोन व्हायचा... 
गोष्टी तितक्या लेट कळायच्या... 
कोण कुठे आणि कसं काय आहे... 
सगळ्या बातम्या फोनवरच मिळायच्या... 

पिल्लू खराब करेल फोन... 
म्हणून आजवर फोन घ्यायचं टाळलं... 
कधी घेतेस स्मार्ट फोन...
या प्रश्नावर मुद्दामून मौन पाळलं... 

नाही होय करत शेवटी... 
पावती फाडली चौदा हजाराची... 
हा घेऊ कि तो घेऊ म्हणत... 
Samsung, Nokia सोडून घेतला Moto G...
एवढा महागडा फोन घेतला… (माझ्यासाठी हा खरच खूप महाग आहे… :)
अन नंतर विचार करत बसले... 
होऊ देत खर्च चा मारी... 
म्हणून स्वतःवरच खळखळून हसले... 

त्या इंटरनेट चा पायी... 
फोनच बिल २०० रुपयांनी वाढवून घेतलं... 
कुणी केलं नेट सेटिंग... 
तर कुणी Watsapp download करून दिलं... 

मैत्रिणींचा ग्रुप जॉईन केला... 
सगळे भलतेच खुश झाले... 
आलीस बाई एकदाची Watsapp वर…??
म्हणून बऱ्याच जणांनी पिंग केले… (हो अगदी याच शब्दात…. ;)

नया है यह… करता करता... 
आम्हीही chatting करायला शिकलो... 
अहो खर सांगतो राव... 
आम्ही Watsapp वाले झालो…

सातासमुद्रापार बसलेली मैत्रीणसुद्धा... 
रोज न चुकता पिंग करते... 
दुरावलेल्या कितीतरी नात्यांना... 
पुन्हा साद घालावीशी वाटते... 

Chatting-Watting काय ते हल्ली... 
आमचं रोजच चालू आहे... 
सुख दुख आणि मजा मस्ती... 
Watsapp वर शेयर करणं सुरु आहे... 

झालीये आता सवय याची... 
बंद पडून हल्ली चालतच नाही... 
रोज कोणालातरी पिंग केल्याशिवाय... 
आमचा दिवस काही सरत नाही... 
I am Loving It... ;)
- टिंग्याची आई

मातृमुखी…

काल आम्ही एकाखेळण्याच्या दुकानात गेलो होतो… टिंग्याच्या एका फ्रेंड साठी बडे गिफ्ट घ्ययचं होतं… त्याचा नेहमीसारखा दुकानात दंगा चालू होता… एवढी सगळी खेळणी बघून त्याला हे घेऊ कि ते घेऊ असं झालं होतं आणि आम्ही दोघे त्याला काहीतरी सांगून गप्प करत होतो…. त्याचे प्रश्न चालूच होते… 
टिंग्या: आई मला कॅमेरा घ्यायचा का? 
मी: नको रे त्यात फोटो नाही निघत… 
टिंग्या: मला बेन १० घ्यायचं का?
मी: नको नको ते खराब झालंय म्हणे 
टिंग्या: ते हेलीकॉप्टर नाहीतर ती कार घेऊया?
मी: अरे बाळा त्यातलं पेट्रोल संपलंय रे… (खूप काही बाही सांगाव लागतं हिरोला :)
असा आमचा प्रश्नोत्तरांचा खेळ चालू होता… अखंड बडबड… नाही म्हटलं तरी गप्प बसेल तो टिंग्या कुठला?? :) आम्हा मायलेकराच्या या गप्पा चालू असताना शेजारी बसलेल्या आजीचं आमच्याकडे लक्ष आहे हे कळलंच नाही आम्हाला… कधी टिंग्याला तर कधी मला त्या न्यहाळत होत्या…. आणि एकदमच मला म्हणाल्या… 
"मातृमुखी" आहे तुमचा मुलगा… चांगलं असतं मुलाने मातृमुखी असलेलं खूप सुख मिळतं म्हणे आईला… 
आजी सहजच म्हणून गेल्या… मी फक्त हसूनच reply केला… काय बोलावं सुचलंच नाही मला… उगीचंच बरं वाटलं माझं मलाच… :) आजी निघून गेल्या… आमचीही खरेदी झाली… टिंग्याच्या गप्पा चालूच होत्या… अन माझ्या मात्र मनात एकच विचार घोळत होता… "मातृमुखी"… 
बरेच शब्द आहेत तसे… आईची कार्बन कॉपी… झेरॉक्स कॉपी… तर एखादी गावाकडची आजी म्हणते "आक्षी आईच्या तोंडातन पडलंय जणू पोरगं…" 
माझा टिंग्या सुद्धा माझी कार्बन कॉपी आहे… दिसायला, हसायला आणि दंगा करायला सुद्धा… :) आजी म्हणाल्या मुलगा मातृमुखी असला कि आईला खूप सुख मिळत… खरंच… टिंग्या माझ्या आयुष्यात आल्यापासून घरात सुख हा एक permanent मेम्बर झालाय… ज्या दिवशी टिंग्या आला त्याच दिवशी सुखाने माझ्या घराचं माप पुन्हा नव्याने ओलांडलं… त्याच्या पावलानीच सुख घरभर हुंदडत असत… कितीही टेन्शन अन प्रॉब्लेम्स असले तरी टिंग्याने मारलेल्या एका मिठीत सगळं विरघळून जातं… गेल्या साडेतीन वर्षांत एकही असा दिवस नाही जेव्हा मी आणि माझं घर टिंग्यामुळे खळखळून हसलेलो नाहीये… सुख म्हणजे तरी याहून वेगळं काय असत?
आमच्या लाडक्या टिंग्याने त्याच्या आईलाच नाही तर साऱ्या घरादाराला सुखी केलंय…. 
त्याच्या छोट्या छोट्या बाल लीलांनी सुखाची नवी परिभाषा आम्हाला शिकवली आहे… आणि आमचा टिंग्या असाच हसत खेळत राहावा हीच काय ती आमची सुखाची व्याख्या…. :)

शेवटी काय… मातृमुखी असो वा पितृमुखी… ही पिल्लं आपल्या आयुष्यात सुखच सुख घेऊन येतात…. सगळ्या घराला आनंदित आणि प्रफुल्लीत करतात… 
आमच्या या लेकरांना सुखी ठेव रे बाप्पा… 
Thanks tingya for being part my life.... Love you... :)

- टिंग्याची आई

एक दिवस कवितेच्या वहीशिवाय… :)

मी कधीही घराबाहेर पडताना पर्समध्ये एखाद वही पेन नक्की असतं… ऑफिस मध्ये, कधी पाहुण्यांकडे तर अगदी प्रवासात सुद्धा… कोण कधी एखादी ओळ सुचेल आणि ती वहीत उतरून ठेवावीशी वाटेल… :) एकदा अशीच ऑफिस मध्ये वही न्यायची विसरले तेव्हाची हि हलकी फुलकी गोष्ट… 
कोणास ठाऊक कशी... 
आज नेमकी कवितेची वही विसरले...
पर्स वगैरे बदलायच्या नादात... 
वही-पेन दोन्ही घरीच ठेऊन आले... 

ठीक आहे वाटलं होतं...
काहीच फरक पडणार नाही... 
फार फार तर काय होईल... 
आज कविता लिहायला जमणार नाही... 

अहो मी सोडून दिलं सहज... 
पण माझ्या मनाने मनावर घेतलं... 
किती नाही म्हटलं तरी... 
एक एक नवं कडवं सुचू लागलं... 

नुसतंच सुचत होतं... 
नेमकं लिहून काढता येईना...
वहीतच लिहायची सवय नडली... 
computer वर लिहायची इच्छा होईना...

अर्धवट राहिलेल्या बऱ्याच कविता... 
आज हट्ट धरून बसल्या... 
अन बऱ्याचशा नवीनही... 
रांगेत येउन उभ्या राहिल्या..... 

म्हटल आजचा दिवस थांबा... 
उद्या सगळ्यांना पूर्ण करेन... 
छान छान अक्षरात... 
तुम्हाला वहीत उतरून काढेन... 

विचार, मन आणि शब्द... 
कोणीच तयार न्हवतं ऐकायला... 
पावलंही वळत होती घराकडे... 
विसरलेलं वही-पेन आणायला... 

एक एक ओळ सुचेल तशी... 
मग मनातच साठवत गेले... 
घरी गेल्या गेल्या उतरून काढायचे... 
हे आधीच होते ठरवून ठेवले... 

घरी पोचताच पहिल्यांदा... 
लाडके वही-पेन बाहेर काढले... 
भराभरा लिहावं सगळं... 
म्हणून पुन्हा पुन्हा आठवले... 

पण झालं भलतंच...
वही हातात घेताच...
सगळे विचार भूर उडाले... 
लेखणीला पाहून हातात... 
जणू शब्द दशदिशा पळाले... 

काय चाललंय नक्की... 
माझं मलाच कळत न्हवतं... 
पण कवितेच्या वाहिशिवाय करमत नाही... 
हे आज पहिल्यांदाच कळलं होतं... 

बाकी कवितांचं काय... 
आज नाही तर उद्या सुचतील... 
कधी हट्टाने कधी सहज... 
सगळ्या या प्रिय वहीतच विसावतील... :) 

- टिंग्याची आई

Friday, August 22, 2014

घर वाट बघतंय…

काही दिवसापूर्वी एका पेपर मध्ये एक वाक्य वाचलं 'घर म्हणजे भिंतीत दडलेल्या भावना' तेव्हाच सुचलेलं हे काहीतरी… घर म्हणजे खरंच घरातलं एक माणूस असतं…. 
घर वाट बघतंय… एक True Imagination...

घर म्हणजे भिंतीत दडलेल्या भावना… 
आपल्याच सुख-दुखांच्या सावल्या...
घर म्हणजे आपल्याच घरातलं एक माणूस… 
कुणी एकटं असेल तर सोबत करणारं... आणि कोणी नसताना घर सांभाळणार...

गेली २-३ वर्ष झाली तुझंही घर एकटंच आहे... 
ओट्याच्या कोपऱ्यात त्या कबुतराने मांडलेल्या घरकुलात 
तुझाच संसार शोधतं आहे… 
अगदी उंबरठ्यापासून ते परसदारापर्यंत... तुझ्याच आठवणींनी गच्च भरलंय... 
त्याच क्षणांच्या आधाराने... घराने स्वतःला कसबस सावरलंय... 

अगदी आकार सुद्धा न्हवता... अजून तेव्हापासून तू या घरावर प्रेम केलंस... 
प्रत्येक विटेसोबत... एक एक नवं स्वप्न रचलंस... 
दूरदेशी राहायला गेलीस... आज इतकी वर्षं झाली... 
तुला घराची अन घराला तुझी... अगदी प्रत्येक क्षणी आठवण झाली... 

तुझी कामाची रोजची धावपळ...
पिल्लूची ती निरागस लुड्बुड... 
तुझ्या अहोंच त्याच्यासोबत लहान होऊन खेळणं... 
तुझं हसणं तुझं रडणं एकांतात बसून कविता करणं... 
अन बऱ्याचदा उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणं... :)
असे कित्येक क्षण या घराने जपून ठेवलेत... 
अगदी तू या घराला जपायचीस तसच… 
न थकता घरात अखंड वावरणारी तुझी पावलं
अन सोबत पैजनाचा मंजुळ नाद... 
कधी प्रेमाने कधी रागाने घरातल्या माणसांनी तुला घातलेली साद… 

झालीये आता सवय त्या समोरच्या दारालाही...
तुझं हे दार कायमचं बंद पहायची... 
अन त्या घरातल्या चिमुरड्या पिल्लूला...
आपल्या सवंगड्याशिवाय खेळायची ...
आठवतेय ती भिंत तू specially रंगवून घेतली होतीस... 
अन खिडकीजवळची कोपऱ्यातली जागा मुद्दामून रिकामी ठेवली होतीस... 
त्याच खिडकीत उभं राहून कविता रचायला...
आवडायचं तुला सूर्याची किरण अंगावर झेलत...
किंवा एखाद्या चहाच्या कपात अखंड डुंबत... 
अजूनही सूर्यकिरणे रोज येतात...
त्या बंद खिडकीतून डोकावायचा प्रयत्न करत तुलाच शोधत असतात… 
Gallery तली ती  संध्याकाळच्या कॉफीची जागा... 
तिच्या वाफा तुझा चेहरा कुरवाळत असायच्या....
अन तू मात्र दूरवर घरट्याकडे परतणाऱ्या पक्षाकडे पाहत बसलेली… 
आता कॉफी नसते… तुही नसतेस… पण नेहमीसारखा तोच पक्षी घरट्याकडे परतताना… 
तुझं घर तुझ्या परतण्याची अगदी न चुकता वाट बघतंय 

शेवटचं घरातून निघताना... तुला हुंदका आवरत न्हवता... 
घराचा कोपरा न कोपरा तुला अडवू पाहत होता... 
काही केल्या तुझाही पाय घरातून निघायला तयार न्हवता... 
मनात नसताना शेवटी दाराला भलं मोठ्ठ टाळं लावताना तुला भरून आलं होतं...
अन त्याच क्षणी आत घर मात्र ढसाढसा रडलं होतं...

पिल्लाच्या मागे धावणारी आई... 
आपल्या सख्याची काळजी घेणारी सखी... 
आणि घर सांभाळणारी कारभारीण... 
अशी तुझी कितीतरी रूपं या घराने पाहिली आहेत... 
तुझ्याच बऱ्याचशा जुन्या कविता... भिंती आजही गुणगुणत आहेत... 

तसं तुझं घर कधीच एकटं न्हवतं… 
या तुझ्या आठवणी सोबत घेऊन ते रोज नव्याने जगतंय... 
हरवलेले सगळे क्षण... तुझ्यासाठी वेचून ठेवतंय... 
तुझ्यासारखच रोज न चुकता... आठवण सुद्धा काढतंय... 
तुझ्या इतकीच तुझ्या परतण्याची... तुझं लाडकं घर वाट बघतंय…. :)

- टिंग्याची आई 

Saturday, August 16, 2014

मी डोंगर बोलतोय….

मी डोंगर बोलतोय…. जरा ऐकाल का माझं..? 
खूप वर्ष झालं सांगायचा प्रयत्न करतोय.... 
निदान एकदातरी ऐकाल का माझं...?
ज्याच्या पायथ्याशी तुमचं गाव वसलं होतं... तोच मी डोंगर...
ज्याने कित्येक पिढ्या पहिल्यात या गावच्या... तोच मी डोंगर... 
अगदी लेकरावानी वाढताना... पाहिलंय मी या गावाला... 
एक एक घरट वाढत... मोठा गाव होताना न्याहाळलंय मी याला...

इथं माथ्यावरून मला... एक एक घरकुल दिसायचं... 
प्रत्येक घरातलं सुख... माझ्याकडं बघून हसायचं... 
गावाकडं बघून... लयी समाधान वाटायचं... 
दिवाळी अन दसऱ्याला... जवा सारं गाव नटायचं...

कुशीत घेऊन या गावाला... मी लेकरावाणी माया केली... 
सुखी राहू देत माझी पोरं बाळं... हीच देवाकडं प्रार्थना केली... 
झाडं-झुडुपं फळ-फुलं... अगदी माझी दगड माती सुद्धा तुम्हाला दिली...
पण जमीन, वाळू, दगड, शेती... यापायी तुम्ही फक्त माझी हानी केली...
जपून रे बाळांनो... कळवळून मी सांगत होतो... 
कुणीतरी ऐकेल माझं... म्हणून नुसतीच वाट बघत होतो... 
दगड माती खडीसाठी... तुम्ही मला पोखरून टाकलं... 
लाकूड फाट्याच्या हव्यासापोटी... एक एक झाड मुळासकट उखडलं...
उरल्या सुरल्या झाडांच्या आधारे... जमेल तसं पाणी मी अडवत होतो... 
धसणाऱ्या ओल्या मातीला... कसबसं घट्ट धरून ठेवत होतो... 
त्या दिवशीही खूप प्रयत्न केला... पण माझा नाईलाज झाला... 
लाडक्या लेकराला वाचवायला... हा बाप असमर्थ ठरला... 
एक एक करत हळू हळू... दगड माती ढासळत होती... 
साखरझोपेतल्या चिमुकल्यांचा... झोपेतच जीव घेत होती... 
पोराबाळांना वाचवायचा... म्हातारी उगा प्रयत्न करत होती... 
गळाभर चिखलात रुतलेली...ती नंतर बचावकर्त्यांना सापडली होती...
वरूण राजाचा कोप झाला... 
सारा गाव चिखलात गाडला गेला... 
डोळ्यांदेखत लेकरांचा काळ झाला... 
हा डोंगर नुसताच बघत राहिला...

विशाल डोंगर म्हणून मिरवायचो... मात्र आता माझं पठार झालंय... 
माझं लाडकं माळीण गाव... आज इतिहासजमा झालंय... 
म्हणून म्हणतो लेकरांनो... 
निदान आतातरी थोडा विचार करा... 
तुमचाही असा घात होण्याआधी... 
या पर्यावरणाचं रक्षण करा... 
तुमच्या या आई-बापाचं रक्षण करा…. 

माळीण गाव दुर्घटनेत बळी गेलेल्या जीवांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली…
- टिंग्याची आई 

मन म्हणजे पाणी….

मन… किती साधा सोपा… आणि सरळ शब्द आहे... 
पण याला शब्दांत बांधणं... खूपच कठीण आहे... 
अणू-रेणू इतकं सूक्ष्म... तर कधी ब्रह्मांडाहून मोठं होतं... 
एका क्षणाला इथे सापडेल... तर दुसऱ्या क्षणी साता समुद्रापार पोचतं... 
जगातल्या कोणत्या वस्तूशी... या मनाची तुलना करावी...?
अशीच एखादी गोष्ट... जिला मनाची आकृती म्हणावी...?
आज पाण्याकडे बघून... असेच काहीसे वाटले... 
एक एक करत विचारांचे... मनात असंख्य तरंग उठले...

मन म्हणजे पाणी….
एका अशांत सागरासारखं... प्रत्येक क्षणाला उसळणारं... 
विचारांच्या लाखो लाटांनी... शांत किनाऱ्याकडे झेपावणारं... 
मन वाटे कधी नदीसारखं... अखंड वाहत राहणारं... 
प्रवासात लागणाऱ्या गावांप्रमाणे... आयुष्यातली माणसं जोडणारं... 
कधी वाटे स्वच्छंद झऱ्यासारखं... आनंदाचे तुषार उडवणारं... 
प्रेमासाठी व्याकूळ झालेल्या... जीवांची तहान भागवणारं... 
मन म्हणजे जणू धबधबा... उंचावरून खाली कोसळणारा... 
आपल्या शुभ्र जलधारांनी... आयुष्याचं सौंदर्य वाढवणारा... 
पण कधी वाटतं मन म्हणजे नाला... सगळी घाण वाहणारा...
चुकल्या-माकल्या असंख्य पापाचं... प्रायश्चित्त करणारा... 
तर कधी वाटे मन म्हणजे एक डबकं... गढूळ विचार साचलेलं... 
हळू हळू जमिनीत मुरून... नुसतंच चिखल म्हणून उरलेलं... 
कधी कधी वाटतं डोहासारखं... खूप खूप खोल असणारं... 
राग, द्वेष, मत्सर... या वासुकींना आश्रय देणारं... 
मन म्हणजे मृगजळ... क्षणात नाहीसं होणारं... 
न लाभलेल्या सुखांचा... खोटाच आभास निर्माण करणारं... 
मन म्हणजे नुसता एक ऊगळ... नुकताच जमिनीतून बाहेर आलेला... 
या विशाल जगाच्या पाठीवर... स्वतःचं अस्तित्व घडवायला निघालेला... 
खरतरं मन म्हणजे पावसाचं पाणी... असंख्य धारांनी बरसणारं... 
प्रत्येक थेंबात नवी आशा घेऊन... सुखाचा नवा अंकुर रुजवणारं... 
पण असंही वाटतं... 
मन म्हणजे  आपल्याच डोळ्यातलं पाणी... उत्कट भावना व्यक्त करणारं... 
सुखात असो वा दु:खात... आपली अखंड साथ देणारं... 
कधी कुणाच्या आठवणीने... कंठामध्ये दाटणारं... 
तर कधी कुणी भेटल्यावर... आनंद बनून डोळ्यांत साठणारं...  
मन म्हणजे पाणी... कोणताही आकार ऊकार नसलेलं... 
हृदय नावाच्या छोट्याशा खोलीत... कायमचं घर करून बसलेलं... 

- टिंग्याची आई

Friday, August 15, 2014

Life doesn't give ctrl+Z...

One fine morning... I was driving towards office on my bike..

In heavy traffic and equally heavy rains.. it was almost impossible to see anything....

I was making my way in the busy traffice... and was trying hold on to my temper... :)

In such a frustrated morning...

a note written on the back of one bike took my attention....

and I couldnt hold myself from thinking and writing this on the same...

the line goes like this...

"Life doesn't give Cntrl+Z..."  

Life doesn't give ctrl+Z...

Which will undo all the mistakes you made....


all those moments... when life betrayed...

Every happiness... was somehow delayed...

for all the sorrows... 'all right' everytime u said..


due to ups n downs.. life seemed little fade..

killing emotions... u remained stone dead...

all the relations.. sometimes felt decayed..


by dear ones... you were misled...

still you are standing just un-afraid...

and wanna show them... really well you played...

but... life doesn't give ctrl+Z...

even if you want... moments to be repaid...

each happy moment... u would like replayed...


a message of love.. wanna be conveyed...

all your life.. for whom you prayed...


the perfect click... on first page be displayed...

some happy chapters of life... you just wanna re-read...

but still... life doesn't give us single ctrl+Z.... :)


But life does give us... an option of 'Clear History...'

a chance.... to make our own Victory...

so... smile n just get going... that will resolve the mistry.... :)


~ Tingya's Mom... ;)