Friday, September 27, 2013

किती सहज म्हणून गेलीस…

कॉलेजमध्ये असताना दिवस कसे भरभर निघून जातात कळतच नाही… गप्पा, भांडण दंगा आणि तितकंच मनापासून केलेलं प्रेम… निघताना दिलेली Promises वगैरे वगैरे… आजही जेव्हा त्याला तिची आठवण येत असेल… किती सहज निरोप घेतला होता सगळ पुन्हा एकदा आठवत असेल… तेव्हा असंच काहीसं तो म्हणत असेल… :)
सवय लागली होती ग… तुला रोज भेटायची…
तुझा हसरा चेहरा… निदान एकदा तरी पहायची…
तुझ्या निळ्या डोळ्यातला भाव… मला कधी कळायचा नाही…
पण तुझी भेट झाल्याशिवाय… दिवस काही केल्या सरायचा नाही…
"भेटले नाही म्हणून विसरणार नाही…" किती सहज म्हणून गेलीस…
कॉलेज संपून झाली आता ५ वर्ष…आजवर facebook वरच्या फोटोतच काय ती भेटलीस…


कट्ट्यावरच्या गप्पा आपल्या… कितीतरी विषयांवर रंगायच्या…
फोनवर बोलता बोलता… चक्क रात्री जागून निघायच्या…
कधी कडू कधी गोड… तर कधी नको इतकं भांडून घेतलं…
पार्किंग मध्ये बसल्या बसल्या… प्रत्येक टेन्शन सारखं वाटून घेतलं…
"रोज एकदातरी कॉल नक्की करेन…" किती सहज म्हणून गेलीस…
पण change झालेला नंबर द्यायची… तसदी सुद्धा घेतली नाहीस…



माझ्या प्रत्येक वाढदिवसाला... काही ना काही गिफ्ट दिलंस…
अन तुझ्यासाठी नेहमी माझ्याकडून काहीतरी लिहून घेतलंस…
तू दिलेलं गुलाबाचं फूल सुद्धा मी अजून मी अजून जपून ठेवलंय
कवितेलाही Inspired By म्हणून तुझंच नाव लिहिलंय
"सगळ्या आठवणी जपून ठेवेन…" किती सहज म्हणून गेलीस…
अन निघायच्या गडबडीत कवितांची ती वही माझ्याकडेच विसरलीस…

तू तिथे मी… अशीच काहीशी होती ग आपली जोडी…
कळलंच नाही कधी वाढत गेली या नात्यामधली गोडी…
तुला सोडून दुसरा कुठला… विचारच कधी केला नाही…
तुझ्याविना आयुष्य जगावं लागेल… तेव्हा कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नाही…
"निदान आता तरी शोध कोणी जोडीदार…" किती सहज म्हणून गेलीस…
तुला न कळलेलं माझं प्रेम… माझ्याच रिकाम्या ओंजळीत सांडून गेलीस…


सोबत जगलेले सगळे क्षण… दोघांनीही मनात जपून ठेवले…
जितके जमले तितके मीही… मुद्दाम कवितेत गोवले…
आजही आठवते मला… डोळ्यांत पाणी भरून उभी तू…
सांजवेळीच्या मंद प्रकाशात… थरथरलेल्या आवाजात निरोप घेणारी तू…
"विसरणार तर नाहीस ना मला?" किती सहज विचारून गेलीस…
आजही तसाच तू परत फिरायची वाट पाहतोय मी… अन तू मात्र माणसांच्या गर्दीत न जाणो कुठे हरवलीस…


~ Shilpa

Wednesday, September 25, 2013

Mood Change.... :)


क्यों रुक जाती है किसी पन्ने पर यूँ जिन्दगी।
किसी सूरत में आगे बढ़ना ना चाहे ये जिन्दगी।
आयेगा फिर लौट के यही पन्ना, यही आस दिलाती है जिन्दगी।
इसी झूठी आस के साथ, हर पन्ना पलटती है जिन्दगी।

किसी अंजाने मोड़ पर.… क्यों थम जाते है लमहे…
जितना भुलाना चाहे… उतना याद आते है ये लमहे।
किसी एक लमहे की चाह में, आगे बढ़ते रेहते है लमहे।
हर प्यारा लमहा, फिर पीछे छोड़ देते है ये लमहे।

दिल के जख्मो को यूँ इस तरहा छुपाये मत रखना
कोई आयेगा मरहम लगाने , राह मत तकना
ये जख्म ही तो तुम्हारी अपनी अमानत है
इन्हिकी बदोलत किसीकी जिन्दगी आज सलामत है…

हमारी आँखों की नमी को आसू मत समझना,
कोई बूँद अगर बेह जाए, तो हमें कमजोर मत समझना,
वैसे तो एक समंदर हमने दिल में छुपाए रखा है
कभी फुरसत में मिलना, आज भी हर एक आसू हमने संभाल के रखा है.…
मला न भेटण्याचा… तुला रोज एक बहाणा सुचतो…
मी आपला स्वतःलाच समजावतो… आणि तुला मात्र त्यातच कवितेला नवा विषय मिळतो… :)

When People around you don't need you....
Just Wait...
But when they need you...
Don't just wait... :)

- Shilpa

Thursday, September 19, 2013

आपणच आहोत दोघे...

आपणच आहोत दोघे इथे… एकमेकांना सावरायला… 
एकाने घर विस्कटलं… दुसऱ्याने हवं आवरायला… 

एकाला रडू आलं… तर दुसऱ्याने कुशीत घ्यावं… 
कधी तू माझे बाबा… तर कधी मी तुझी आई व्हावं… 

भरती ओहोटी दोन्ही… तितक्याच सामर्थ्याने झेलावी… 
झेपावणारी प्रत्येक लाट… किनाऱ्याला अलगद येउन भिडावी… 

वाटेल कधीतरी अगदीच कोरड्या वाळवंटासारखं
सुखही पाठशिवणीचा खेळ खेळेल… एका फसव्या मृगजळासारखं… 

आपणच देऊ एकमेकांना… प्रेमाची शांत साउली… 
अखंड गारवा असू द्यावा… आपल्या या मायेच्या राउळी… 

दाटून आलंच कधी आभाळ… तर एकमेकाला धीर द्यावा… 
बेधुंद कोसळणाऱ्या पावसातही… तुझा हात हाती हवा… 

संतापला एक तर… दुसऱ्याने राग घालवायला हवा… 
कोसळणाऱ्या जोडीदाराला… खंबीर होऊन आधार द्यायला हवा… 

प्रेमाचा प्रत्येक क्षण… दोघांनीही मनाच्या कुपीत जपावा… 
तू माझ्या अन मी तुझ्या श्वासातला… एक अखंड श्वास व्हावा… 

तुझ्याच मिठीत माझं… एक एक स्वप्न पूर्ण झालंय… 
कोटी आभार त्या बाप्पाचे… ज्याने सौभाग्याचं हे दान मला दिलंय…

दृष्ट लागण्या जोगे सारे… गालबोटही कुठे नसे…. 
जग दोघांचे असे वसवू कि…. स्वर्ग त्यापुढे फिका पडे…. 
                                             देशील ना रे साथ सख्या…. :)

- टिंग्याची आई

Thursday, September 12, 2013

ये ग गौराबाई… Ladies Special :)

अंगणी तापित दुध… दुधावर पिवळी साई… 
ये ग गौराबाई… एवढ जेउनि जाई… 
आता काय जेऊ माय ग… दारी शंकर हाय ग… 
शंकर सोळा, राजा भोळा… नगर सोडून जाय ग…

आठवतंय का? हे किंवा असंच एखाद गौरीचं गाण? श्रावणमास सुरु झाला रे झाला कि गौरी-गणपतीचे वेध लागतात आम्हा लेकुरवाळ्या पोरींना… अगदी पंचमी पासूनच आम्ही पोरी शाळेत फेर धरायचो…. बरीच गाणी गायचो… त्यातलंच हे एक…
पहिले सोमवार किती… बाई मी महादेवाला जाते… 
हाती घ्या ग बेल पान… झिम्मा खेळू रानोमाळ…. 
माझं बालपण खेड्यात गेलं… अगदी बाळपण म्हणायला हरकत नाही… :) अगदी पहिलं पाऊल टाकायला लागल्यापासून आम्ही गौरीच्या खेळामध्ये रमायचो… आईलाही भारी हौस होती गौरीच्या खेळाची… तशी आईच्या घरी गौरी गणपती न्हवती बसत पण तिच्यासाठी तिच्या चिमण्या लेकीच गौराई होत्या आणि अजूनही आहेत… :) घरी गौरी न्हवत्या तरी आई त्यांचा सगळा स्वैपाक करायची अगदी शेपूची भाजी, वडी भाकरी आणि पुरणपोळी सुद्धा…
आईकडे असताना आम्ही गौरीचा खेळ खूप खेळायचो… बाबांचीही फूल परमिशन असायची… रात्री २-३ वाजेपर्यंत अंगणात खेळ रंगायचा… कॉलनीतल्या बऱ्यापैकी जाडजूड काकू सुद्धा घागर घुमवायला कोणाला ऐकत नसत… झिम्मा फुगडी पिंगा छीय्याफू… कित्ती कित्ती खेळावं… अगदी बेधुंद होऊन… आणि तशीच सूर धरून म्हटलेली गाणी…
घागर घुमू दे घुमू…  दे रामा पवा वाजू दे 
घागर घुमू दे घुमू…  देगवर माझी नाचू दे… 
ठेव ग हंडा पाणी… गवर माझी न्हाऊ दे… 
पिवळ पितांबरे… गवर माझी नेसू दे… 
भाजी-भाकरी… गवर माझी खाऊ दे…
माळी दादाला हाक मारून सांगावं… गौराबाईचा ववसा भरायचा आहे उठ पाटाला पाणी सोड…
उठ उठ माळीदादा… बैल जूप राटाला…
बैल जूप राटाला… पाणी जाऊ दे पाटाला…
पाणी जाऊ दे पाटाला रे… वाळकीच्या देठाला…
एवढी वाळक कशाला…? गौराबाईच्या ववशाला…
गौराबाईचा ववसा ग… फुलांनी दरवळला ग… उदांनी परमळला…
गौरीचे लाड करताना हौसेन तिला विचारावं…
गौरी तुझे डोहाळे कशा ग वरी…? 
हाय आंब्याच्या घसा ग वरी… 
आंब्याचा घस त्यावरी बस… ताट करीत्या चौरंगी बाया…
या गौरीचं लेकरूही सोबत असायचं… गणोबा… सगळ्या पाहुणचारात गौरीचं लक्ष सगळ आपल्या चीमुरड्याकडे… आणि गणू मात्र मस्ती करायला पसार… तेव्हा गौरी म्हणे…
साती शंकर बनामध्ये… एकला गणू माझा वनामध्ये… 
गणूच्या आईला सांगून धाडा… गणूने तोडं गमवलं… 
गमवलं तर गमवू दे… गणूला घरला घेऊन ये…
ही आणि अशी कित्येक गाणी आजही जश्शीच्या तशी आठवतात… आणि आठवणी पुन्हा मनात पिंगा घालू लागतात…
पोरी पिंगा ग… पोरी पिंगा ग… पोरी पिंगा ग… पोरी पिंगा…
तुझ्या पिंग्याने मला बोलीवली… रात जागवली पोरी पिंगा…. 
तसा फेर धरलाच नाही कधी पुण्यात राहायला आल्यापासून… हातातल्या जोडविच्या खणखणाटात घागर घुमली खरी  पण उंबऱ्याच्या आतच… भानुरा वाजला खरा गौरीचे कान उघडायला पण फक्त चार भिंतीतच… कसा का असेना पण माझ्या गौरीसाठी मी फेर धरते, मग तो फक्त चार हातांचाच का असेना त्यात गौरीचे चार हात मिळाल्याशिवाय राहणार नाहीत… :) परवा परदेशात राहणारी एक मैत्रीण म्हणत होती वरलक्ष्मी पूजा आणि हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या दिवशी वाटलंच नाही की आपण परदेशी आहोत… पण हल्ली इकडे तशी गोडी शिल्लक राहिलीये असं वाटत नाही… कधी कधी वाटत आपणच मग एखादा फेर धरावा ONLINE या सगळ्या मैत्रिणींना सोबत घेऊन… :)
पण हि खंत माझ्या गौराईला वाटून कशी चालेल? म्हणूनच कंबर कसून मी तयार आहे… तिची हौस पुरवायला… तिच्यासाठी झिम्मा फुगडीच्या खेळाने रात्र जागवायला… :)
लहान असताना कळायचं नाही का असत हे सगळं… शेजारच्या काकूंकडे गौरी सजवायला आईचा पदर धरून मागे मागे जायचं… बोलक्या डोळ्यांची गौराई काहीतरी सांगून जायची… तेव्हा कळत न्हवत… या बायका गौरीचा एवढा पाहुणचार का बर करतात? तिला खाऊ-पिऊ घालतात… तिच्या आवडीची आरास मांडतात… तिचे लाड करतात… तिची दृष्ट काढतात… आणि ती निघताना अगदी लेक सासरी निघाल्यासारख रडतात देखील… या सगळ्याचा अर्थ कळला…. माझं लग्न झाल्यावर… :)
         गौराईच्या रूपाने आईची लेक घरी येते… आई हौसेने तिचे सगळे लाड पुरवते… भाजी-भाकरी खाऊनच तिचं पोट भरत… पंचपक्वान नाही लागत तिला… माझही अगदी असंच होतं माहेरी गेल्यावर… कधी सहा तर कधी दहा महिन्यांनी माहेरी जावं… आईला कडकडून मिठी मारावी आणि आधीच तयार असलेली मेथीची भाजी-भाकरी पोटभर खाऊन घ्यावी… तिथेच समाधानाने पोट भरत माझं आणि आईचंही… :)
        माझ्या सासरी गौरी-गणपती दोन्हीही आहे… अगदी यथेच्छ सजवते मी माझ्या लाडक्या गौराई आणि गणोबाला… माझा लाडका गणू बाळही असतोच कि सोबतीला सगळी आरास मांडायला… सासूबाईच्या रूपाने आईच मिळाली आहे पुन्हा… त्यांनाही भारी हौस आहे गौरीची आरास मांडायची… आज मी माझ्या गौरीचे लाड करते… तिला डोहाळे विचारते… तिला न्हाऊ घालते… खाऊ-पिऊ घालते… तिची हौस-मौज करते… आणि खरंच तिची दृष्ट सुद्धा काढते… :)
         माझ्या घरची लेक म्हणावी कि माझी नणंद कि मी स्वतःच… पण तीन दिवस हळदी-कुंकवाच्या पावलांनी आलेली गौरी माझ्या घराचं नंदनवन करून टाकतात… पोरा-बाळांच्या पावलांनी आलेली गौराई माझ्या लेकराला निरोगी आयुष्याचा आशीर्वाद देऊन जाते… धन धान्याच्या पावलांनी आलेली गौराई माझ्या घरादाराला समधानाने भरून जाते… फेर धरला नसला तरी मन गौरीच्या अवती भवती गाणी गात नाचत राहतं… टींग्याशी खेळलेल्या फुगडी आणि झिम्म्याने घर गजबजून जाते… त्याच बोलक्या डोळ्यांनी आजही काहीतरी सांगून जाते… :)
          तिसऱ्या दिवशी ती सगळी आरास काढताना अन मुकुट उतरवताना आता माझ्याही डोळ्यांत पाणी येतं… का कुणास ठाऊक…? फक्त एवढंच म्हणावसं वाटतं…
लवकर ये ग गौराबाई… :)

Tuesday, September 10, 2013

वहायला हवं होतं…

टिंग्याच्या शाळेत जन्माष्टमी Celebration होतं आणि कृष्णासारखा टिंग्या खरच कृष्ण बनून जाणार होता… आईची खूप इच्छा होती त्याला छान नटवून पाठवायची तशी तयारीही केली होती तिने… पण अचानक आलेल्या एका महत्वाच्या कामामुळे तिला ऑफिसला लवकर जावं लागलं… मग टिंग्याला आजीनेच खूप छान नटवल आणि शाळेत पाठवलं….
पण आईने हे सगळं मिस केलं… दिवसभर तिचा जीव कावराबावरा होत होता पण का ते तिचं तिलाच कळत न्हवत… :) दिवस कसातरी ढकलला आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला संध्याकाळी अपोआप मिळाली… :)

खूप दिवसांनी आज…
आभाळ दाटून आलं होतं…
कधीचं साठलं होतं पाणी… 
वहायला हवं होतं…

राहून राहून सारखाच… 
आज हुंदका येत होता… 
का कुणास ठाऊक…
कंठ दाटून आला होता… 

न्हवती आली कुणाची आठवण… 
जिने जीव व्याकूळ व्हावा…
न्हवता लागला जीवघेणा ठसकाही… 
ज्याने श्वास आतल्या आत घुटमळावा… 

वाटत होतं धावत जाऊन… 
कोणालातरी मिठी मारावी… 
अश्रूंनी भरलेली घागर… 
त्याच्या ओंजळीत रिती करावी…

उभं होतं डोळ्यांत पाणी… 
आज गहिवरून आलं होतं… 
थांबवावं कि वाहू द्यावं… 
माझं मलाच कळत न्हवतं… 

कसातरी दिवस सरला… 
सांजवेळी बाळा तुझी ओढ लागली… 
प्रश्नांचा गुंता तसाच सोडून… 
थेट घरची वाट धरली… 

सगळी कालवाकालव शमली… 
तू धावत येउन मिठी मारताच… 
सगळे प्रश्न अपोआप सुटले… 
पिला तुला उराशी कवटाळताच… 

डोळ्यांत साचलेले ढग… 
क्षणात भूर पळून गेले… 
तुझ्या चिमण्या डोळ्यांत… 
आईला इंद्रधनू गवसले… 

तुझ्या कुशीत शिरून… 
पोटभर समाधान मिळालं…
का सैर भैर होत मन… 
तुला पाहिल्यावर कळालं… 

आई म्हणून घडताना… 
सुखाचे कितीतरी क्षण सुटून जातात… 
अन अशाच कधीतरी न राहवून… 
प्रत्येक आईला तिच्या भावना अनावर होतात… 

- टिंग्याची आई

Friday, September 6, 2013

तुझे सगळे विषय संपले कि काय आई…?

तुझे सगळे विषय संपले कि काय आई…?
खूप दिवस झाले काही लिहिलं नाहीस…
तुझ्या या लाडक्या टींग्यावर…
साधी चारोळी सुद्धा केली नाहीस…

घर असो वा स्कूल असो…
आता वाढल्यात ग माझ्या खोड्या…
मोबाईल गेम्स लागतात हल्ली…
चालत नाहीत मला रिमोटच्या गाड्या…  :)

आई ऑफिसमधलं काम तुझं…
खरंच खूप वाढलंय का…?
झालोय मी आता खूप मोठा…
सांग मला काही जमेल का…?

थांब…
तुझ्या कवितांचे सगळे शब्द…
मीच एकावर एक रचतो…
माझ्या लाडक्या मम्माई वर…
मी स्वतःच एक मस्त Poem करत…

मला थोडूस बर नसेल…
तर तोंड एवढूस करून बसतेस…
अन तुला कितीही ठीक नसलं…
तरी माझ्यासाठी कित्ती गोड हसतेस… या तुझ्या गोड Smile वर लिहीन… 

कितीही Tension असलं तुला…
तरी  मनापासून हसतेस…
सगळ्यांची काळजी घेताना…
स्वतःला मात्र नेमकी विसरतेस… या तुझ्या Style वर पण लिहीन…

ऑफिस, घर आणि घरातली सगळी माणस…
सगळं कसं व्यवस्थित सांभाळतेस…
जमेल तसा वेळ काढून…
छान छान कविता सुद्धा रचतेस… या तुझ्या Extra mile वर नक्की लिहीन… 

खर सांग आई जमेल का मला…?
तुझ्यासारखी मस्त कविता करायला…?
मायेने सगळ्यांना सांभाळणारी…
माझी आई शब्दांच्या धाग्यात बांधायला…?

यावर आईची गोड Smile पाहून टिंग्या म्हणतोय… 

ठाऊक आहे ग बाई मला… 
आईची माया कधी शब्दांत मावणार नाही… 
पण एखादी कविता लिहिल्याशिवाय…
टिंग्या तुझा पोरगा शोभणार नाही ;)
अन माझ्या या सगळ्या बाललीला पाहून…
तुझी लेखणी कध्धी कध्धी थांबणार नाही…

- टिंग्याची आई

Sunday, September 1, 2013

आज तू येणार होतीस…


एक जूनी आठवण आहे… मनात खोलवर साठवून ठेवलेली… एक रेशीमगाठ मनापासून बांधलेली…. 
एका मैत्रिणीवर निखळ प्रेम करणारी मैत्रीण म्हणतेय…. 
 
आज तू येणार होतीस… दिवस माझ्या चांगलाच लक्षात होता…
सकाळपासून छतावरचा कावळाही… तू येणार असल्याचं सांगत होता…

उगीचच मनाला वाटत होतं… निदान आज तरी नक्की येशील… 
सगळी बंधन स्वतः तोडून… धावत येऊन मला मिठी मारशील… 

पण माझ्या आजूबाजूच्या सर्वांना… अगदी न विसरता भेटलीस… 
जाता जाता मला साधी… हाक सुद्धा नाही मारलीस… 

काही नाही ग… 
फक्त तुझ्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पहायचा होता… 
नकळत ऐकू आलेल्या तुझ्या आवाजात… मी तो आधीच अनुभवला होता… 

मी अजूनही तशीच आहे ग… जणू कवितेच्या वहीत लपलेलं पान…
फांदीपासून वेगळं केलंस… तरी अजूनही जपून ठेवलयस छान… 

कधी आठवण आलीच तर… ते पान पालटून पाहतेस का ग?
कोपर्यावर साचलेला एक थेंब… कुणी पहायच्या आधी मागे सारतेस का ग?

खर सांगू… आज इतकंस खास काहीच नाही वाटलं… 
यावेळीही न भेटताच गेलीस… पण नेहमीइतकं वाईटही नाही वाटलं… 

तुझ्यासाठी पाहिलेलं प्रत्येक स्वप्न… आज सत्यात उतरत होत… 
तुला तुझ्या हक्काचा आनंद… आणि मला त्याचंच समाधान मिळत होतं…

भरल्या डोळ्यांनी अन हसर्या ओठांनी… माझी तुळस नेहमीच तुझी वाट पाहिल… 
आज ना उद्या क्षणभर का होईना… तुझं मन या साउलीत पुन्हा एकदा विसावा घेईल… 

- टिंग्याची आई