Friday, July 24, 2015

भूतांकित..... :)

आजकाल शहरात मोठ्या मोठ्या सोसायटीज बनत आहेत... खूप काही प्रलोभने दिली जात आहेत बुकिंग वाढवण्यासाठी...
तर अशा बर्‍याच स्किम्स आम्हा माणसांसाठी बनत आहेत... मग विचार आला.. कुणीतरी भूत लोकांसाठी पण अस काहीतरी केल तर...? 

अहो करतच असतील... भूतांच्या राज्यात सुद्धा अस होतच असेल की... म्हणून मग ही खास स्कीम भूताखेतांसाठी.... :)
हे सगळ सूचायलाही कारण आहेच... :) परवा ऑफिसला येताना एका पिंपळाच्या झाडावर एक जाहिरात लावलेली दिसली… १bhk, २bhk भाड्याने देणे आहे… कदाचित लावणार्याने जास्त विचार केला नसेल आणि आपलं काम संपवून रिकामा झाला असेल.… :) 
पण आता भूत मंडळीसाठी पिंपळ आणि वड या दोन दिग्गज बिल्डर लोकांनी सिरीयसली एक नवीन स्कीम काढली आहे…  बघा... आवडली तर तुमच्या ओळखीच्या भूतांना लवकर रेफर करा… 

वड आणि पिंपळ आपल्या joint venture मधून सर्व भूत मंडळींसाठी सादर करीत आहेत एक आगळी वेगळी स्कीम… 
भूतांकित…
पिंपळ आयकॉन आणि बनयान विलाज… 

दिवसेंदिवस वाढणाऱ्या सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या माणसांनी तुमची दिवसाची झोप आणि रात्रीचं चैन हिरावून घेतलं आहे का?
तर मग विचार कसला करताय आमच्या नव्या स्कीम मध्ये आजच एक फांदी किंवा पारंबी बुक करा…. आणि भरपूर अमेनिटीजचा फायदा घ्या…
भूतांकित मध्ये आपल्याला मिळतील खास तुमच्यासाठी बनलेल्या duplex पारंब्या किंवा apartment style फांद्या 

तर हि आहेत आमची काही खास वैशिष्ट्ये…
१. ६६६ फांद्या असलेला १३ माजली उंचच उंच पिंपळ टॉवर
२. ३१३ duplex पारंब्यांनी दाटलेला भला थोरला वड 

३. प्रत्येक फांदी आणि पारंबीला एक विचित्र आणि भयंकर interior देण्यात आलय…
४. अगदी पहाटेपर्यंत भरपूर आणि काळाकुट्ट अंधार…
५. मानवी वस्तीपासून ११ मैल दूर…
६. पूर्ण २४ तास सोसाट्याचा वारा विथ चित्रविचित्र आवाज
७. प्रत्येक फांदीवर उलट लटकण्याची उत्तम सोय 

८. केवळ २ मिनिट अंतरावर जुनाट पडका वाडा जिथे नुकताच वेताळ शेठने एक मॉल सुरु केला आहे 
९. विकेंड आउटिंग साठी शेजारच्या तीत्ठ्यावर ३०० वर्षं जूनी स्मशानभूमी… 
१०. जेष्ठ भूत मंडळीसाठी वेतालेश्वराचे मंदिर सोसायटीच्या मधोमध  
११. २४ तास जवळच्या पडक्या विहिरीतून पाण्याची सोय 
१२. आठवड्याचे सातही रात्री पूर्ण लोड शेडींग  
१३. फक्त काही  कि. मि. अंतरावर भुताटकी या शिक्षण मंडळाची सर्व शिक्षण संस्था

स्पेशल ऑफर्स….
नुकत्याच भूत झालेल्या मंडळीसाठी registration चार्जेस पूर्णपणे माफ… 

ग्रुप बुकिंग करा आणि मिळावा सेम फ्लोअर वरच्या फांद्या
national बँक ऑफ स्पिरीटवाडी यांच्या कडून ०% दराने कर्ज उपलब्ध। तुमचा पुन्हा जन्म होईपर्यंत कधी आणि कसेही हप्ते फेडा
Death Insurance Corporation (DIC) यांच्याकडून खास विमा योजना… In case of sudden Birth... संपूर्ण कर्ज माफी… 


चला… मग आता विचार कसला करताय… आजच रात्री भेट द्या…
न मानसो न भूतकाळतः अशी हि अनोखी स्कीम…
"भूतांकित…." घराला घरपण देणारी भुतं… :)

साईट अड्रेस:
३,१३, पिंपळपान, भूत गल्ली,
वेताळ कॉलनी, स्पिरीटवाडी

नक्की या आम्ही वाट बघतोय… :)
हीं… हीं हीं हीं हीं… हीं......................................... 

- टिंग्याची आई
भूत खरंच मागे लागून आली नाहीत म्हणजे पुरे…. :D

Tuesday, July 14, 2015

तितक सोप न्हवत...

आमच्या शेजारी एक आजी राहतात... त्यांनी कधीतरी गप्पा मारता मारता सांगितलेली त्यांचीच गोष्ट माझ्या शब्दांत...
आजोबा तसे लवकरच देवघारी गेले आणि त्यांच्या माघारी आजी ने घर आणि स्वताला कसे सावरले, सांभाळले याचीच ही गोष्ट... 



सगळच अधांतरी टाकून.... "साहेब" आम्हाला सोडून गेले....
संसाराचे सारे ओझे.... एकटीच्या दुबळ्या खांद्यावर आले....
बाहेरच्या जगाचा
.... मला साधा गंध सुद्धा न्हवता....
साहेब असताना
.... कधी काही करायचा संबंधच आला न्हवता....
म्हणायचे "ते"ही शेवटी.... आता तुझ कस ग होणार....?
तुझ्या एकट्या खांद्याना
.... हे ओझ कस बर पेलावनार....?
खरच... तितक सोप न्हवत...
एकटीने हा एवढा मोठा डोलारा संभाळन
....
नाजूक पावलांनी.... ही काटेरी पाउलवाट चालन....


मोठीच असली तरी.... तीन मुल मला बिलगलेलि....
थोरल्या लेकाच्या जान्याने.... अजूनही होती पापणी भिजलेली.... 
धाकटीचा लग्न सोहळा.... अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपलेला....
अन मोठीच्या घरचा पाळणाही
.... होता नुकताच हाललेला....
साहेबांच्या प्रदीर्घ आजाराने
.... धीर आधीच खचला होता....
तीन लेकरांच्या या आईचा
.... आधार कायमचा हरवला होता....
तितक सोप न्हवत...
दुखाने काटोकाट भरलेल्या अंतकरणाने
.... लेकीची पाठवणी करण.... 
डोंगराएवढ्या मोठ्या दुखावर.... हसून पांघरूण घालण....


आपला म्हटलेला प्रत्येकजण.... दूर निघून जात होता....
ज्यांनी आधार द्यावा तो एक-न-एक हात
.... केव्हाच सुटून गेला होता....
जवळच्या म्हणणार्‍या सार्‍यांनीच
.... कायमची पाठ फिरवली.... 
माझी उनी-दूनी काढन्यातच.... आपल्या माणसांना गोडी वाटली....
मायेन आधार देणार अस
.... कुणीच आम्हाला उरल न्हवत.... 
रोज नव्याने येणार दुख.... काही केल्या सरत न्हवत.... 
तितक सोप न्हवत...
आपल्या माणसाशिवाय
.... आयुष्याची ही प्रदीर्घ वाटचाल करण.... 
मनावर असंख्य वार झेलत.... स्वताशीच एक न संपणार युद्ध करण....


दाग-दागिने, पैसा-अडका.. साहेब मागे अमाप संपत्ती ठेऊन गेले....
पण सोबत पाहिलेले
.... प्रत्येक स्वप्न मात्र अर्धवट राहीले....
मुलांचा आधार बनायच होत
.... मग अश्रूंना मीच राम राम केला....
भळभळणार्‍या जखमेला
.... जुन्या आठवणींचा लेप दिला....
त्याच आठवणींनी भरलेल घरकूल
.... मायेची सावली देत उभ आहे....
माघारी एकट्या पडलेल्या माझ्यासाठी
.... पाठीरखा बनून उभ आहे....
तितक सोप न्हवत...
आपल्या घराला सावरण्यासाठी
.... स्वता घराबाहेर पाउल टाकन.... 
स्वताच अस्तित्व सिद्ध करायला.... या जगाशी चार हात करण....


इतकी वर्ष झाली.... बराच काळ लोटला....
दुखाचे दिवस सरुन
.... आता सुखाचा काळ आला....
पोरी-बाळी, लेकी-सुना... सगळे सुखाने नांदत आहेत
....
त्याच जुन्या घरकुलात
.... तुमच्या आठवणी जपत आहेत.... 
थकले आहे मीही.... आता फक्त विश्रांती घेते आहे....
लेकरांच्या सुख-समृद्धीची
.... ईश्वरचरणी प्रार्थना करते आहे....
पण खर सांगायच तर
....
तितक सोप न्हवत
....
तुमच्याविणा.... अस एकटीने आयुष्य जगण.... 
अन् तुमच्या आधाराशिवाय.... यातली प्रत्येक जबाबदारी पेलण....
- टिंग्याची आई
आजी खास तुमच्यासाठी... तुमचेच शब्द... माझ्या लेखणीतून.... :)