अधून मधून टिंग्याची चेष्टा करायचा मूड येतो आईला… पर्व सहजच ऑफिसमधून गेल्यावर मजा केली… मी टिंग्याला ओळखतच नाही असं नाटक केलं… पिल्लू इतकं कावरं बावरं झालं… :( मम्माई म्हणून जवळ आला… तोंडावर हात फिरवून उगीचच हसून दाखवू लागला… एक अस्पष्ट प्रश्नचिन्ह डोळ्यात उभं होत त्याच्या… काय झालंय ग आई तुला? बघ ना पिल्लू हाक मारतंय… मलाही नाही सहन झालं… डोळ्यात दाटलेल्या पाण्याला वाट करून दिली आणि टिंग्याला घट्ट मिठी मारली… मग पिल्लू खुश आणि आई पण… :) Sorry टिंग्या…
तेव्हाच सुचलेलं काहीतरी…
बाबा काल मला सांगत होता…
आईला थोडं बर नाहीये….
आजी-आजोबा, बाबा अन पिल्लू…
कोणी कोणी तिला आठवत नाहीये….
कितीदा तरी सांगितलं होतं…
ऑफिसमधून घरी येताना घाई नको करू…
धडपडलीस ना त्या गाडीवरून…
विसरलीस सगळ… सांग आता आम्ही काय बर करू?
डॉक्टर काकांनी सांगितलंय मला…
तुला बिलकुल त्रास द्यायचा नाही…
आठवेल सगळं हळू हळू…
तोवर तुझं कुठलंच औषध चुकवायचं नाही…
लवकरच बर वाटेल ग तुला…
मी स्वतः तुझी काळजी घेईन…
रोज सकाळी न चुकता…
आपल्या बाप्पाला, दुधाची मोठ्ठी वाटी देईन…
खर सांगू? तसं बरचं झालं…
आता दिवसभर माझ्या जवळ राहशील…
सगळ्याबरोबर तुझी Tensions विसरून…
तुझ्या पिल्लुसोबत छान छान खेळ खेळशील…
रोज मीच तुला भातु भरवेन…
आपल्या Gallery त उभं राहून…
आठवेलच कि तुला काहीतरी….
माझ्या सगळ्या लीला पाहून…
आपण रोज करतो ती सगळी मज्जा…
मी जश्शीच्या तश्शी Repeat करेन…
रोज रात्री झोपताना, तुला कुशीत घेऊन…
तुझ्यासाठी आपली Favorite अंगाई म्हणेन…
खूप त्रास देतो मी तुला…
म्हणूनच माझ्यावर रागावलीस ना…?
कान पकडून Sorry म्हणतो ग…
मग तर माझं ऐकशील ना…?
बाबा म्हणतो… तू विसरलीस तुझ्या बाळाला…
मग मला पाहून तुझ्या डोळ्यात पाणी का येतंय…?
ठेच जरी लागली आज चुकून मला…
तर तुझं मन का कावरं बावरं होतंय…?
आजीने सांगितलंय… जास्त नाही… फक्त थोडेच दिवस…
मग माझी आई एकदम बरी होईल…
"टिंग्या………." म्हणून मोठ्यांदा हाक मारेल…
अन धावत येउन मला कुशीत घेईल…
पटापट माझे पापे घेऊन… स्वतःच पोटभर रडून घेईल… :)
आई… बाप्पाच्या आणि आपल्या बाबाच्या…
काल दोघांच्याही डोळ्यात मी पहिल्यांदाच पाणी पाहिलंय…
Please हो ना ग तू लवकर बरी…
बघ… तुझ्याविना आमच्या सगळ्यांचंच आयुष्य कसं जागच्या जागी थांबलंय…
बाप्पा लवकर बर कर माझ्या आईला…
नाहीतर रोज छान छान फूल कोण बर वाहील तुझ्या मूर्तीला… :)
- टिंग्याची आई
तेव्हाच सुचलेलं काहीतरी…
बाबा काल मला सांगत होता…
आईला थोडं बर नाहीये….
आजी-आजोबा, बाबा अन पिल्लू…
कोणी कोणी तिला आठवत नाहीये….
कितीदा तरी सांगितलं होतं…
ऑफिसमधून घरी येताना घाई नको करू…
धडपडलीस ना त्या गाडीवरून…
विसरलीस सगळ… सांग आता आम्ही काय बर करू?
डॉक्टर काकांनी सांगितलंय मला…
तुला बिलकुल त्रास द्यायचा नाही…
आठवेल सगळं हळू हळू…
तोवर तुझं कुठलंच औषध चुकवायचं नाही…
लवकरच बर वाटेल ग तुला…
मी स्वतः तुझी काळजी घेईन…
रोज सकाळी न चुकता…
आपल्या बाप्पाला, दुधाची मोठ्ठी वाटी देईन…
खर सांगू? तसं बरचं झालं…
आता दिवसभर माझ्या जवळ राहशील…
सगळ्याबरोबर तुझी Tensions विसरून…
तुझ्या पिल्लुसोबत छान छान खेळ खेळशील…
रोज मीच तुला भातु भरवेन…
आपल्या Gallery त उभं राहून…
आठवेलच कि तुला काहीतरी….
माझ्या सगळ्या लीला पाहून…
आपण रोज करतो ती सगळी मज्जा…
मी जश्शीच्या तश्शी Repeat करेन…
रोज रात्री झोपताना, तुला कुशीत घेऊन…
तुझ्यासाठी आपली Favorite अंगाई म्हणेन…
खूप त्रास देतो मी तुला…
म्हणूनच माझ्यावर रागावलीस ना…?
कान पकडून Sorry म्हणतो ग…
मग तर माझं ऐकशील ना…?
बाबा म्हणतो… तू विसरलीस तुझ्या बाळाला…
मग मला पाहून तुझ्या डोळ्यात पाणी का येतंय…?
ठेच जरी लागली आज चुकून मला…
तर तुझं मन का कावरं बावरं होतंय…?
आजीने सांगितलंय… जास्त नाही… फक्त थोडेच दिवस…
मग माझी आई एकदम बरी होईल…
"टिंग्या………." म्हणून मोठ्यांदा हाक मारेल…
अन धावत येउन मला कुशीत घेईल…
पटापट माझे पापे घेऊन… स्वतःच पोटभर रडून घेईल… :)
आई… बाप्पाच्या आणि आपल्या बाबाच्या…
काल दोघांच्याही डोळ्यात मी पहिल्यांदाच पाणी पाहिलंय…
Please हो ना ग तू लवकर बरी…
बघ… तुझ्याविना आमच्या सगळ्यांचंच आयुष्य कसं जागच्या जागी थांबलंय…
बाप्पा लवकर बर कर माझ्या आईला…
नाहीतर रोज छान छान फूल कोण बर वाहील तुझ्या मूर्तीला… :)
- टिंग्याची आई



