Thursday, March 26, 2015

हलक्या फुलक्या गप्पा…

प्रसंग: दोन मैत्रिणींच्या फोनवरच्या गप्पा
पात्रं: मी आणि माझी आवडती मैत्रीण (दोघीही खरोखर पात्रच आहेत… :)

ट्रिंग ट्रिंग…. ट्रिंग ट्रिंग…. (थोडासा sound इफेक्ट तर हवाच :)
मी: बोल ग म्हशे…. (हेलो म्हणायची पद्धतच नाहीये आमच्यात… :)
ती: तूच बोल म्हशे…
मी: मी पण म्हैस आणि तू पण म्हैस… हा हा हा…
      बरोबर आहे म्हणा… "तू अंगाने आणि मी रंगाने म्हैस.…"
ती: नालायक….
मी: Thanks for the Complement… :) पुढे बोल… आहेस वाटतं जिवंत… ?
ती: हो तर तुला सोडून इतक्या लवकर कशी जाईन….?
मी: ही ही… बर मग कुठे धडपडते आहेस???  ( सरळ बोलतील तर शप्पथ… :)
ती: सध्या कॅन्टीनमध्ये आहे… चरायला आली आहे… :)
मी: अग किती चरतेस… कमीक खा जरा… आमच्यासाठी पण ठेवा शिल्लक थोडं…
ती: खा कि मग…. तुला कुणी नको म्हटलंय…
मी: :) बर बर… सांग कशी काय आठवण झाली आज?
ती: अग आठवण रोजच येते पण कॉल आज केला…
मी: नशीब आमचं… बोल ना… कसं आहे पिल्लू आणि पिल्लूचे पप्पा?
ती: सगळेच एकदम मस्त… पिल्लूची तब्येत अधून मधून नरम गरम आणि पप्पाचा मूडही…
मी: चला म्हणजे एकंदर उत्तम चालू आहे… बाकी काय आणि तू कशी काय आहेस सांग?
ती: तू विचारलस ना आता एकदम छान… ;)
मी: आई शप्पथ डायलॉग???  बस कर पगली रुलायेगी क्या? (एकदम फिल्मी स्टाईल मध्ये… :)
ती: म्हशे कधीतरी सिरियस हो न ग…
मी: का? येणार आहेस हॉस्पिटल मध्ये भेटायला??? ;)
ती: नालायक…………………… गप्प बस… कायपण नको बोलू…
मी: बर बाई… कधी भेटायचं मग? येतेस घरी या वीकेंडला??
ती: नाही ग… नणंदेची मंगळा-गौर शनिवारी आणि महिन्याचा बाजार रविवारी… :(
मी: थोडक्यात… जमणार नाही… :) असू देत आपलं नेहमीचच आहे… :)
ती: बघू जमलं तर भेटू…
मी: हो नक्की…
ती: चल मग भेटल्यावर बोलू…
मी: हो का? :) आधी भेटू मग बोलू…. ;)
ती: चल मग ठेवू का ग म्हशे?
मी: बर ढोले… झालं वाटतं चरून…???
ती: होय जाडे…. चल ठेवते…
मी: ok bye…
ती: ऐक ना… तू बरी आहेस ना ग…?
मी: hhhmmmm….  भेटल्यावर बोलू…. :)  Bye ठेव आता बील नको वाढवू माझं….
      (फोन कुणीही केला तरी बील कुणाचंही वाढू शकत ;)
ती: हा हा हा…
मी: जा उडत… (सरळ bye म्हणायची पण पद्धत नाहीये या पोरींकडे)
दोघी असाच अधून मधून एकमेकीला फोन करतात आणि या हलक्या फुलक्या गप्पामधून हलका फुलका आनंद मिळवतात…
खरंच खूप खूप छान वाटतं अशा गप्पा मारून… :)
Thanks ढोले… :)

- टिंग्याची आई

Wednesday, March 11, 2015

प्रेम म्हणजे….

Valentine Special...
Valentine's डे दिवशी एक forward आला होता…
"What is Love?
Love is when my mom kisses me and says
mera bachha lakhon me ek hai...
…. "
त्यावरूनच सुचलेलं… "प्रेम म्हणजे…."
प्रेम म्हणजे….
तुमच्या गालावरून हात फिरवत कडाकडा बोटं मोडून आजीने मायेने घेतलेला मुका….
आजही बाजारातून येताना आजोबांनी न विसरता आणलेलं तुमचं फेवरेट चॉकलेट….

प्रेम म्हणजे…. 
दहावीचा निकाल कळण्याआधीच बाबांनी आणलेली नवी सायकल….
माहेरी आलेल्या लेकीसाठी न मागता आईने केलेली मेथीची भाजी अन भाकरी….
 
प्रेम म्हणजे…. 
लाडक्या सुनेला सासूबाईनी दिलेली नव्या पातळाची घडी….
औषधं वेळेवर घेतली का? म्हणून सासऱ्यांनी न चुकता करून दिलेली आठवण….
 
प्रेम म्हणजे…. 
जवळ जवळ वर्षभराने भेटल्यावर लाडक्या ताईने मारलेली घट्ट मिठी….
चूक तुमचीच आहे माहित असतानाही पाठीशी उभ्या दादाने वर्गातल्या पोरांना दिलेला दम….
 
प्रेम म्हणजे….
Onsite ला गेल्यावर स्काईप च्या एका कॉलसाठी बाबाने केलेली धडपड….
अन गावी गेलेल्या बाबासाठी पिलाने अर्धवट सोडलेली खाऊची वाटी….
 
प्रेम म्हणजे….
खूप वर्षं न भेटलेल्या प्रिय मैत्रिणीने कशी आहेस विचारायला Watsapp वर केलेला पिंग….
अन चार जिवलग मैत्रिणींनी मिळून ग्रुपवर मारलेल्या पोटभर गप्पा….

प्रेम म्हणजे….
ऑफिसमधून आल्या आल्या बायकोने हातात दिलेला फक्कड चहा….
लग्नाच्या वाढदिवशी न विसरता अहोंनी आणलेला मोगऱ्याचा गजरा….

प्रेम म्हणजे….
खोट खोट रुसलेल्या आईची पिल्लाने कान धरून मागितलेली माफी….
आणि ती हसल्यावर मारलेली गोड गोड मिठी….
 
प्रेम म्हणजे….
आपल्या माणसांनी आपल्या अन त्यांच्याही न कळत घेतलेली काळजी….
हे प्रेम व्यक्त करायला एका स्पेशल दिवसाची गरज नक्कीच नाहीये… 
ते समजायला आणि उमजायला काही क्षणच पुरेसे असतात….
आणि याच सोनेरी क्षणांना उजाळा देण्यासाठी Valentine Day साजरा करतात… :)

Happy Valentine's Day…(B'lated and In Advance :)

-टिंग्याची आई