पुणेरी पाटी न्हवे…. ;)
पोस्टचं नाव वाचून आली ना डोळ्यासमोर अशीच एखादी दगडी पाटी…?? कधी काळी लहानपणी वापरलेली…!!!
आजकाल आपण फार मॉड झालोय त्यामुळे पोरांच्या शाळेची सुरुवात डायरेक्ट वही आणि पेन्सिल नेच होते… आणि असलीच एखादी पाटी तर मग ती ग्लिटर वाली किंवा Magnetic स्लेट का काय म्हणतात तसली…. त्यामुळे आपली पाटी आता जर outdated झालीये म्हणे…
पण मला बाई पाटी फार आवडते आणि आजही तितकीच महत्वाची वाटते…
पाटी….
बालवाडीत असताना पहिल्यांदा पाटी आणली होती मला पप्पांनी… नवी कोरी पाटी… माझी पाटी…
आईने पहिलं अक्षर त्यावर लिहिलं होतं… ।। श्री ।।
अन सोबत छानसं "श्री गणेशा" अगदी कोरून काढल्यासारख…. :)
आणि दुसऱ्या बाजूला आमच्या शाळेची सुरुवात… "ग म भ न…" :)
सरकारी कॉलनीच्या एका रिकाम्या खोलीत भरायची आमची बालवाडी… तीच माझी पहिली शाळा… :)
तशी दिदीची जुनी पाटी बऱ्याचदा मिळायची काही बाही लिहायला पण त्यावेळी अक्षरांपेक्षा रेघोट्याच जास्त व्हायच्या… :)
असो…
तर पाटी मिळाली तो दिवस आजही आठवतो…. दगडी न्हवती पण दुसरी साधी पाटी… राजा पाटी… फ़ेमस ब्रांड… पत्र्याचे काठ असलेली… फार तर १०-१५ रुपयांना मिळायची तेव्हा… तिचा प्लास्टिक कव्हर फाडताना जाम भारी वाटलं होतं… सोबत पेन्सिल चा बॉक्सही मिळाला होता… पण एका वेळी एकच मिळायची… :(
खरतरं त्यातल्या खाल्ल्या किती लिहायला वापरल्या किती याचा हिशोब नाही…. ;)
नवीन पाटीचा तो विलक्षण सुगंध… वा… वा… निदान पहिले काही दिवस तरी काळाकुट्ट राहणारा तिचा रंग… पहिल्यांदा लिहिताना पेन्सिलचा तो पांढरट भुगा… सगळच अप्रतिम…
पाटीवर लिहायला मिळायचं म्हणून आम्हाला अभ्यासाची हौस… :) एक बाजू अभ्यास करून भरली कि दुसरी बाजू… तेही मागचं लिहिलेलं आजीबात पुसू न देता… आणि रात्रीदेखील फार जपून ठेवावी लागायची बर का…
आमची दप्तरं तरी काय हो… पप्पांच्या ड्रेस साठी सरकारी ऑफिसात खाकी कापड मिळायचं… त्याच्याच उरल्या सुरल्या तूकडयामधून पप्पा आम्हाला दप्तर शिवायचे…. आणि दादाची शाळेची चड्डीसुद्धा त्यातूनच भागवली जायची… :)
निव्वळ एक बंद तोच मानेत आणि दोन्ही खांद्यांमध्ये अडकून बरोबर पृष्ठभागावर दप्तर यायचं आणि ते उडवत उडवत आम्ही शाळा गाठायचो… मग तेव्हा पाटीवरचा अभ्यास पुसला जातोय कि नाही हे कुठलं लक्षात राहतंय आमच्या… ;)
शाळेत गुरुजींना जेमतेम अदुश्य झालेला अभ्यास दाखवला कि पुन्हा पती कोरी करून पुढचा अभ्यास सुरु… पाटी पुसायलाही सुरुवातीला फार कौतुकाने काही बाही केलं जायचं… ओलं कापड हवं पण ते दप्तरात ठेवणार कसं? म्हणून मग एक आयडिया… :) पप्पांच्या कामावरच्या जुन्या गाड्यांच्या सीटचा कापूस बऱ्याचदा कव्हर फाडून बाहेर डोकावायचा… मग त्यातलाच एक तुकडा घ्यायचा अन तो ओला करून एखाद्या डबीत ठेवून मिरवायचं… मग शाळेत सगळ्याचं लक्ष आमच्याकडेच… "कसलं मस्त आहे हे पाटी पुसायला…"आणि आम्ही मात्र तेवढ्यावरच किलोभर भाव खायचो… ;)
पण एवढ्याने पाटी पुसायचं काम संपत न्हवतं काही… त्या ओल्या पाटीला सुकवायला चिमणी आणि कावळ्याला बोलवावं लागायचं अन तेही अगदी सुरात…
चिमणी चिमणी वार घाल….
कावळ्या कावळ्या पाणी पी…
पण बऱ्याचदा हाताला सुटलेला घाम सुद्धा पाटी पुसायला पुरेसा असायचा… :)
किती सोप्प आहे ना पाटीवर खूप काही लिहिणं आणि ते सगळ पुसून पुन्हा नव्याने सुरुवात करणं… पण आपण आयुष्याची पाटी कोरी करायला कधीही धजावत नाही… हवं नको त्या सगळ्या क्षणांनी आपली पाटी नेहमीच गच्च भरलेली असते… कधी कधी वाटतं त्याच जुन्या कापसाच्या ओलाव्याने करावी हि पाटी स्वच्छ… आणि पुन्हा करावी नव्याने सुरुवात प्रत्येक नात्याची… पाटी कोरी असली कि लिहिलेलं जास्त ठळक दिसतं म्हणे… ठाऊक नाही कितपत जमेल किंवा जमेलही कि नाही… :)
तर मला दगडी पाटी फार आवडायची पण फुटायची भीती होती… म्हणून घेतलीच नाही कधी आईने… शाळेत आम्ही जमिनीवरच बसायचो मग दप्तरंही अशीच खाली विखुरलेली असायची… मधल्या सुट्टीत खेळताना एखाद्या दप्तरावर चुकून पाय पडला तर पाटी फुटलीच म्हणून समजा… असं रडू कोसळायच म्हणून सांगू… :( म्हणूनच मी दगडी पाटीचा मोह अगदी आजही आवरलाय… :)
तर अशी ही पाटी… अभ्यास करून करून… मागे पुढे लिहून पुसून कधी जुनी व्हायची कळायचंच नाही…
अशाच जुन्या पाटीचा पत्रा लागून झालेली जखम अगदी आजही आठवते… :)
पाटी जुनी झाली कि पेन्सिल त्यावर काही केल्या उठायची नाही… कशाने इतकी तेलकट व्हायची देव जाने… मग चुलीजवळचा काळा कुळकुळीत कोळसा घ्यायचा आणि दिवसभर ती पाटी घासायची… काय लॉजिक होत माहित नाही पण पाटी पुन्हा लिहिण्याजोगी व्हायची एवढं खर… :)
जुन्या पाटीला अशी नवी करता करता घासून घासून शेवटी तिचा पुठ्ठा दिसायला लागला कि समजायचं नवी पाटी घ्यायची वेळ आली आहे… पण तोवर आम्ही पाहिलीतून पार चौथीत येवून ठेपलेलो असायचो… आणि मग काय आम्हाला तर वही-पेन चे वेध लागलेले असायचे…
अवघ्या एक-दोन पाट्यामध्येच आमचं बालवाडी ते चौथीपर्यंत ५ वर्गांच शिक्षण पूर्ण व्हायचं अन आजकाल प्लेग्रुप ला सुद्धा ३-४ वह्या पुस्तकं ठरलेली असतात… :)
पुढच्या वर्गात गेलो म्हणून पाटी सुटली असं नाही ती होतीच सोबत अन आजही आहे… दहावीची गणितं सुद्धा पाटीवर सोडवल्याच आठवतंय मला… पाटीवर केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं आई म्हणायची म्हणून पाटी कधीच सोडली नाही आम्ही… अगदी बारावीचे derivative आणि Integration सुद्धा मी कधी कधी पाटीवर सोडवली होती… लक्षात राहणे वगैरे सगळ ठीक पण हा पाटीवरचा अभ्यास आवडायचा मला… मग इयत्ता कुठली का असेना पाटीवर अभ्यास ठरलेला… :)
आणि हो मी माझ्या लेकाच्या अभ्यासाची सुरुवातही पाटीवरच केली बर का… मण्यांची पाटी त्याची फेवरेट आहे… आई इतकं सुरेख नाही जमलं पण त्याच्या अभ्यासाची किंवा रेघोट्यांची सुरुवात मीही "श्री गणेशा" नेच केली….
आता त्यच्या वह्या पेन्सिली पेन drawing बुक्स पुस्तकं या सगळ्यांत बिचारी पाटी हरवून गेलीये हे खरं… पण निदान सुरुवात तरी या लाडक्या पाटीवर झाली याचं समाधान आहे…
कधी मलाच आठवण आली तर त्याची पाटी छान कोरी करून मीच काहीतरी लिहित बसते…
एखादं आवडीचं गान… कधीतरी सुचलेली, खुपलेली, आवडलेली एखादी ओळ अन बरच काही लिहून काढते….
आयुष्यातल्या काही हरवलेल्या क्षणांची गोळाबेरीज करते…
सुखांचा गुणाकार अन दुःखाचा भागाकार करून पाहते…
हरवलेली काही नाती पुन्हा एकदा जमा करते…
नको असलेले क्षण मुद्दामच वजा करून टाकते…
मग कधी क्षमेचा एखादा हातचा देऊन किंवा घेऊन बघते…
अशीच काही न सुटणारी अन काही सुटलेली गणितं मांडते…
अन दोन्ही बाजू गच्च भरून थोडंसं समाधान बाकी ठेवते….
आयुष्याचा अभ्यास तर करून झाला पण दाखवायचा कुणाला हा प्रश्न पडतो… चुका करणारी अन चुका काढणारी मीच असते… :)
अशी माझी भरलेली पाटी बघून मग टिंग्याच कुठून तरी ओलं कापड घेऊन येतो अन दोन्ही बाजू पुसून चिमणी आणि कावळ्याला त्याच सुरात बोलवून माझी पाटी पुन्हा एकदा कोरी करून देतो…. पुन्हा पुढची गणितं मांडायला…. :)
- टिंग्याची आई