असं काय रे बाबा…
सारखं कित्ती काम काम करतोस…
दिवसभर ऑफिसमध्ये…
आणि घरी आल्यावर अभ्यास करत बसतोस….
कामाशिवाय दुसर काहीच…
तुला सुचत कसं बर नाही…?
दिवसभर एवढा दमून येतोस…
मग माझ्याशी खेळत सुद्धा नाहीस… :(
ढिश्शुम ढिश्शुम वाले पिक्चर…
तुला कसे बरे आवडतात…?
WWE मह्डले सगळे फायटर्स…
सगळं तुझंच कसं काय ऐकतात…? (बाबाने आधीच नेट वर result पाहिलेले असतात ;)
तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं…
आता मला तोंड पाठ झालीआहेत …
तुला द्यायची कोणती आणि बाकीच्यांची कोणती…
मी अगदी बरोबर लक्षात ठेवली आहेत…. :P
बाबा… मला खरच खूप भीती वाटते…
जेव्हा तू माझ्यावर रागवतोस…
आणि खूप खूप मज्जा येते…
जेव्हा माझ्यासोबत आईला मम्माई म्हणतोस…
बाबा… एक दिवस माझ्यासाठी सुट्टी घे ना…
मग आपण दिवसभर मस्त खेळूया…
आईच्या सगळ्या कविता….
आपण दोघे मिळून वाचूया….
दिवसभर आपल्या T.V. वर…
छोटा भीम आणि Tom & Jerry बघूया…
LapPop वर गाणी लावून…
मस्त चिंता ता ता करूया… :) आमचं Favorite Song…
संध्याकाळी फक्त आपण दोघेच…
रिक्षातून बागेत खेळायला जाऊ…
परत येताना बाप्पाच्या इथे…
छान छान पाणीपुरी खाऊ…
चिनू दादा आणि काका-काकीलाही…
त्या दिवशी बोलवायचं का?
ऑफिसमुळे तू मिस केलेला माझा Happy BDay…
आपण पुन्हा Celebrate करायचा का…?
मग सांग बाबा… कधी सुट्टी घेणार…?
तुझ्या लाडक्या पोप्यासाठी… तुझा किती वेळ देणार…?
promise कर आधी…. आता आज्जीबात विसरायचं नाही…
विसरलास तर कट्टी… पुन्हा कध्धी कध्धी कडेवर चढणार नाही… :P
- टिंग्या (ची आई)

Mumma Please write the other side from Baba's point of view too.....................:)
ReplyDeleteWhy not... Surely I will... And that will b for u and tingyache baba.. :)
Delete