पाणी आटलंय….
नदीचं न्हवं… तिचं पाणी तर कवाच आटून गेलंय….
भल्या मोठ्या तिच्या पात्राला कोरडेपणाच ग्रहण लागलंय…
आता नुसतीच दगडं उरल्यात त्येस्नीबी पाझर फुटना झालाय…
अन दगडातला देव पण आमाला पावना झालाय….
पाणी आटलंय….
झऱ्याच न्हवं… त्येन तर वाहायचं कधीच सोडून दिलंय…
त्येचं मंजुळ गाणं… काळाच्या पोटात कवाच हरीवलंय…
जुन्या गोड पाण्याविना झऱ्याचा घसाबी आता पार कोरडा पडलाय…
भेगाळलेल्या धरणीच्या कुशीत त्यो आता कायमचा दडलाय…
पाणी आटलंय….
विहिरीचं न्हवं… तिच्या तळाला तर आता गाळ पण सापडणा झालाय…
जीव द्यायाला सुदा तिचा उपेग हुईना झालाय…
पोराबाळांच्या घशासारकी ती बी आता कायमची कोरडी पडलीया…
परत कदी पान्हा फुटल ही आशाच आता तिनं सोडून दिलिया…
पाणी आटलंय….
धरणाचं न्हवं… साठणार न्हाई पाणी असा जणू शापच त्येला दिलाय…
त्यात साठवलेला थेंब न थेंब कवाच वाफ बनून निघून गेलाय…
दुष्काळान विटलेल्या गावावाणी धरण बी ओस पडत चाललंय…
थेंबभर पाण्यासाठी धरणाच एक एक दार जणू आसुसलंय…
पाणी आटलंय डोळ्यातलं….
व्हय…. पाणी आटलंय आमच्या पोराबाळांच्या पापण्यातलं…
पाणी आटलंय आमच्या बायाबापड्यांच्या रिकाम्या घागरीतलं…
पाणी पाणी करून आता आमच्या रक्ताचं पाणी झालंय…
मारताना सुदा दोन घोट पाणी कुणाला मिळना झालंय…
पुढ्यात जीव सोडणाऱ्या जनावराला बघून काळजाचं पाणी पाणी हुतंय…
मेलेल्या माणसांची राख वाहायला तरी इथं कुठं पाणी सापडतंय…
रोजच्याच या मरणाचं दुख… कितीदा तरी गळ्यात दाटतंय…
अन असंच कवातरी मग आमच्याच डोळ्यातलं पाणी आटतंय….
नदी, झरा, विहीर, धरण…. आता सगळच पाणी आटलंय…
म्हणूनच काळजात उठणाऱ्या हुंदक्याला… आज पापणीच्या उंबर्यावरच गाठलंय…
कधीच न मिळणाऱ्या पाण्यासाठी आता वणवण करायची इच्छा न्हाई…
अन त्या बिचाऱ्या परमेश्वराला बी दया यील अशी आशा ऱ्हायली न्हाई…
तरीबी…
शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायचं ठरीवलय…
आणि घोटभर पाण्यानंच आता ही तहान भागवायची असं ठरीवलंय…
- व्यथा एका दुष्काळग्रस्ताची
पाणी आटलंय खरंय… पण आपल्यातली माणुसकी पण आटली आहे का? कुठल्यातरी गावात कुठेतरी दुष्काळ पडलाय मग मी का पाणी वाचवायचं असं म्हणण्याइतपत आपली नैतिकताही आटली आहे का?
दुष्काळाच्या बातम्या वाचून हळहळणारे आम्ही पण साध एक वेळ नळ चालू न ठेवता ब्रश सुद्धा करत नाही… उन्हाळा आहे म्हणून आम्हाला कमीत कमी दोनदा तरी अंघोळ लागते… काल परवाच शिळं पाणी प्यायचं आमच्या जीवावर येतं… आणि कहर म्हणजे ते पाणी इतर कामासाठी न वापरता आम्ही ओतूनही देतो… आमचे कपडेही एकदा घातल्यावर धुतल्याशिवाय आम्ही परत हात लावत नाही… आणि भांडीसुद्धा नळाखाली खळखळून धुतल्याशिवाय स्वच्छ वाटत नाहीत…
पण निदान आता तरी विचार करायला हवा…
आज पाणी आहे म्हणून तुम्ही सधन आहात… पण हा साठा संपायला वेळ लागणार नाहीये… नंतरची भयानक परिस्थिती टाळता येणार नाही कदाचित पण थोडी लांबवता तरी येईल… जे आपले जीवाभावाचे शेतकरी आज पाणी संकटात आहेत… दुष्काळाचं रूप घेऊन आलेल्या मृत्यूच्या विळख्यात अडकले आहेत… त्यांच्यासाठी निदान थोडं तरी पाणी वाचवूया…
म्हणून म्हणते…
तुम्ही जर हंडाभर वाचवलंत तर त्यांच्यापर्यंत घागरभर तरी पोहचेल…
घागरभर वाचवलंत तर एखाद्याला कळशीभर तरी मिळेल….
कळशीभर वाचवलंत तर एखाद्या कोरड्या घशाला तांब्याभर तरी शांत करेल…
तांब्याभर वाचवलंत तर निदान वाटीभर तरी कुठेतरी पोचेल…
वाटीभर वाचवलंत तर निदान थेंबभर कुठंतरी त्यांच्यासाठी साचेल….
आणि वाहणारं थेंबभर पाणी जरी वाचवलंत तर त्यांच्या डोळ्यांतला एखादा थेंब तरी नक्कीच वाचेल….
चला… जमेल तितकं वाचवूया… जमेल तसं वाचवूया…. या पाण्यापायी जाणारा निदान एकतरी जीव वाचवूया….
Please Save Water…
- टिंग्याची आई

सुंदर आणि अर्थपूर्ण कविता..
ReplyDelete