Thursday, June 13, 2013

तुझ्यासाठी बाळा…


आईसारखी गोड अंगाई… 
त्याला कधी गाताच आली नाही… 
पण रोज तू निवांत झोपल्याशिवाय…
बाबाची पापणी सुद्धा कधी लवली नाही… 

तू आजारी पडलास कि… 
तुज्या उशाशी रात्र रात्र जागून काढतो… 
कोणाच्याही नकळत बाबा… 
बाप्पाच्या देवळात डोक टेकून येतो… 

आगाऊपणा करतोस तेव्हा… 
ओरडायचं काम बाबाकडेच असतं… 
फटके बसतात तुला… 
आणि मन  बाबाचं रडत असतं… 

यायचं असतं त्याला शाळेत तुझ्या… 
ऑफिसला दांडी मारून… 
लहान होऊन जगायचं असतं पुन्हा… 
सगळी सगळी Tensions बाजूला सारून… 

हवीअसते त्यालाही सुट्टी… 
तुझ्यासोबत वेळ घालवायला… 
तुझ्या इतकं लहान होऊन… 
तुझे चिमुकले खेळ खेळायला… 

सकाळी तू उठायच्या आधी… 
बऱ्याचदा त्याला निघावं लागतं… 
अन संध्याकाळी बाबा यायच्या आधी… 
पिल्लू वाट बघून झोपी जातं… 

तुझ्या नटखट करामतीवर…. 
आई छान छान कविता लिहिते… 
बिचाऱ्या बाबाला मात्र… 
सगळे मनातच साठवावे लागते… :(

हरवलेले कित्येक क्षण… 
आईच्या कवितांमध्ये शोधत असतो… 
मिस केलेला तुझा B'Day सुद्धा… 
Facebook वरच्या फोटोत रोज न चुकता Celebrate करतो… 

"दमलेल्या बाबाची कहाणी"
तुझा बाबा रोजच जगतोय…
चिमण्या डोळ्यातलं स्वप्न साकारायला … 

बाबा कणा कणाने झिजतोय… तुझ्यासाठी बाळा…

- टिंग्याची आई

4 comments:

  1. Dedicated specially to tingyache baba ani Kaka.. Chinu dadache baba... :)
    Thanks Kaka...

    ReplyDelete
  2. Fathers' day cha celebration chalu ahe vaatta... :)

    ReplyDelete
  3. This was the best compliment i have ever get,kaki....:)
    Baba always wants to be apart of his lil champs life more.. but due to his time constraint & some other responsibility he always miss the place in most of the home events.
    Very heart touching Poem...............Keep it up...

    ReplyDelete