कधी कधी जुन्या आठवणीत मन नकळत हरवून जात…
तेच ते वाळूच घरट पुन्हा एकदा भांधावस वाटतं…
मन म्हणत चल जाऊन बसू पुन्हा त्याच तळ्याकाठी…
पण…
तळ्यातलं ते पाणी... का कुणास ठाऊक आज अनोळखी भासतं …
हरवलेलं पाणी पुन्हा आपल्याच डोळ्यातून वाहायला लागतं…
तेव्हा डोळे पुसून म्हणावं… ते पाणी कधी वाहिलंच न्हवत आपल्यासाठी….
आजही जेव्हा वाटेवर पाऊल अडखळत…
मनही एखादा सावरणारा हात शोधत असत…
विश्वास आहे… येइलच कधीतरी तोच हात सावरण्यासाठी…
पण…
ठेच लागून पुन्हा एकदा तीच जखम भळभळते….
आसवांची धार धावत जाऊन... सरळ पायाखालच्या मातीला भिडते…
तेव्हा त्याच रंगात रंगून म्हणावं… सावरणारा तो हात न्हवताच कधी आपल्यासाठी…
कधीतरी चुकून कोणीतरी… एका जुन्या नावाने हाक मारतं…
सगळे घाव विसरून… मन पुन्हा एकदा डोलायला लागतं…
वाटू लागतं पुन्हा एकदा व्हाव्यात त्या हळव्या गाठी भेटी…
पण…
जेव्हा थोडं उशिराच कळत… आपलंच मन आपल्याला साद घालत होतं….
पुन्हा फिरून स्वतःलाच… ते प्रतिसाद देत होतं…
तेव्हा स्वतःलाच एक आर्त साद घालून म्हणावं… मनापासून घातलेली ती साद न्हवतीच कधी आपल्यासाठी….
हसऱ्या ओठांना या जेव्हा खळखळून हसावस वाटतं…
मायेच्या शांत साउलीत… क्षणभर निजावस वाटतं…
वेडं मन म्हणे… ओठावरच हसरं गाण अंगाई गाईल का माझ्यासाठी…?
पण…
थोडं उशीराच कळत… हक्क सांगायला ते क्षणांचं धन आपलं कधीच न्हवत…
मग हरवलेले मोती शोधण्याचा… मन का व्यर्थ प्रयत्न करतं…?
तेव्हा स्वतःच हरवून म्हणावं… हरवले होते ते मोती कदाचित परत कधीच न सापडण्यासाठी…
- शिल्पा

थोडं :)
ReplyDelete