आज खूप दिवसांनी ब्लॉग अपडेट करतेय…मलाही नाही जमत हल्ली ब्लॉग शिवाय पण सध्या अपडेट करायला जमतच नाहीये… वही कवितेने भरत चाललीये पण ब्लॉगवर यायला मुहूर्त सापडत नाही… :)
असो…
तर हि आहे एक नवी कोरी कविता… एकदम गुळमाट… :) एका गोड खाऊ आजीला diabetes झाल्यावर तिची आणि तिच्या मनाची झालेली अवस्था…. माझ्या हलक्या फुलक्या शब्दांत… :)
एक होती आजीबाई… इन मीन साठ वर्ष वयाची…
भरल्या गोकुळात रहात असे… आजी चिमुकल्या नातवांची…
खूप गोड होती आजीबाई… सगळ्यांशी गोड गोड बोलायची…
आपलं पारका कुणीही असो… प्रत्येकाशी मधाळ वागायची…
तोंडात जणू साखरच प्रत्…येक शब्द त्यात घोळलेला…
ऐकणारा प्रत्येकजण… नेहमीच आजीवर भाळलेला…
जितकं गोड बोलायची… ती तितकंच गोड खायची…
कधी आवडीनं कधी सवडीनं… निदान साखर तरी चाखायची…
मस्त गुळमाट चहानेच… तिचा दिवस सुरु व्हायचा…
कधी जिलेबी अन खीर… तर कधी आमरसाच्या वाटीत मावळायचा…
परवा अचानक आजीला… बसल्या बसल्या चक्कर आली…
सकाळच्यापारी घरच्यांची… भलतीच तारांबळ उडाली…
मग छोट्या मोठ्या बऱ्याचशा… काही बाही टेस्ट्स झाल्या…
अन आमच्या लाडक्या आजीबाई… सोबत diabetes च दुखणं घेऊन आल्या…
गोडधोड सगळं सगळं… अचानक बंद झालं…
जणू बिचाऱ्या आजीचं… हसणं बोलणंच हरवलं… :(
रोजची सकाळ हल्ली… बिन साखरेच्या चहाने सुरु होते…
समोर आलेली गोडाची ताटं… आजी स्वतःहून बाजूला सारते…
गोड खायची एवढी सवय… पण आता ते वर्ज्य होतं…
भाबड्या आजीच्या डोळ्यातून… जणू साखरेचंच पाणी वाहत होतं…
शिऱ्याच्या डिशकडे बघताच… तिचे डोळे नकळत भरून यायचे…
आजीला खायचं न्हवतं… म्हणून आजोबानीही सोडले गोड खायचे…
गोड खाणं गोड बोलणं… गोडाशिवाय जमत न्हवतं…
आमच्या गोड गोड आजीला… असं पाहणं आम्हाला अवघड होतं…
सुनबाई तिची लाडाची… मग एक सरप्राईझ घेऊन आली…
सपक चहाला गोड करणारी… जादूच्या गोळ्यांची डबी घेऊन आली…
डबडबल्या डोळ्यांनी आजी… ती डबी कौतुकाने बघू लागली…
आमच्या आजीची मधुर स्माईल… त्या चहाने लग्गेच परत आली…
sugar free ची डबी… आजी हल्ली फार सांभाळून ठेवते…
पूर्वीसारखीच आता आमची आजी… सगळ्यांशी खूप खूप गोड वागते…
कारण इथे diabetes ची भीती नसते….
- टिंग्याची आई

No comments:
Post a Comment