जीवघेणी एक शपथ घालून….
ती स्वतःच दूर निघून गेली होती…
जिवाभावाची मैत्री, प्रेम…
सगळंच झुगारून गेली होती…
चूक कुणाची कुणाचा दोष…
सगळ अनुत्तरीत ठेऊन गेली होती…
सहज बांधलेलं नातंही…
नुसतंच प्रश्नचिन्ह बनलं होतं…
उत्तरं शोधायचीच राहिली…
स्वतःभोवती प्रश्नांचच कुंपण घातलं होतं…
नकोसंच झालं होत इतकं…
तरी का बर रोज न चुकता आठवत होतं …
होईल का बर भेट पुन्हा…
म्हणून मन आस धरून बसतं…
बाप्पाकडेही त्याच भेटीचं…
मागणं मागत असतं…
तिकडूनही होत असेल अशीच प्रार्थना…
मनाला राहुन राहून वाटतं…
सगळं विसरून सावरलंय…
तरी वाटतं कदाचित भेट होईल…
माणसांच्या या गर्दीतून…
ती अचानक समोर येईल…
पण प्रश्न पडतो… आलीच चुकून समोर…?
तर माझं नक्की काय बर होईल…?
ती समोर आल्यावर….
आठवणींच्या सगळ्या क्षणांनी…
डोळे टच्च भरून येतील…?
कि मनावरच्या ओरखड्यानी…
अगदी कोरडे ठणठनीत राहतील…?
कि तिला समोर पाहूनही…
अगदीच न पहिल्यासारखं करतील…?
तिला आलेली पाहताच…
पावलं जागच्या जागीच थांबतील…?
कि क्षणात धावत जाऊन…
तिच्या पावलांसोबत वाट चालतील…
कि थोडी वाट वाकडी करून…
तिच्यापासून आणखी जरा दूर जातील…?
असहाय धडपडणारे दोन्ही हात…
तिला घट्ट मिठी मारतील…?
कि नुसतच एकमेकांत गुंतून…
तिला थांबवायचा प्रयत्न करतील…?
कि मनावरचे आठवणींचे थेंब…
अलगदपणे दूर झटकून टाकतील…?
खरतर… ती समोर आल्यावर…
भेटायला आसुसलेलं मन…
आनंदाने पार भरून येईल…
सगळी प्रश्नोत्तरे सोडून…
तिच्याशी हितगुज करायला अधीर होईल…
कि तिनेच मोडावी घातलेली शपथ…
म्हणून आजही तिची वाट पाहिल…?
ती समोर आल्यावर… खरंच काय बरं होईल…??
- टिंग्याची आई
ती स्वतःच दूर निघून गेली होती…
जिवाभावाची मैत्री, प्रेम…
सगळंच झुगारून गेली होती…
चूक कुणाची कुणाचा दोष…
सगळ अनुत्तरीत ठेऊन गेली होती…
सहज बांधलेलं नातंही…
नुसतंच प्रश्नचिन्ह बनलं होतं…
उत्तरं शोधायचीच राहिली…
स्वतःभोवती प्रश्नांचच कुंपण घातलं होतं…
नकोसंच झालं होत इतकं…
तरी का बर रोज न चुकता आठवत होतं …
होईल का बर भेट पुन्हा…
म्हणून मन आस धरून बसतं…
बाप्पाकडेही त्याच भेटीचं…
मागणं मागत असतं…
तिकडूनही होत असेल अशीच प्रार्थना…
मनाला राहुन राहून वाटतं…
सगळं विसरून सावरलंय…
तरी वाटतं कदाचित भेट होईल…
माणसांच्या या गर्दीतून…
ती अचानक समोर येईल…
पण प्रश्न पडतो… आलीच चुकून समोर…?
तर माझं नक्की काय बर होईल…?
ती समोर आल्यावर….
आठवणींच्या सगळ्या क्षणांनी…
डोळे टच्च भरून येतील…?
कि मनावरच्या ओरखड्यानी…
अगदी कोरडे ठणठनीत राहतील…?
कि तिला समोर पाहूनही…
अगदीच न पहिल्यासारखं करतील…?
तिला आलेली पाहताच…
पावलं जागच्या जागीच थांबतील…?
कि क्षणात धावत जाऊन…
तिच्या पावलांसोबत वाट चालतील…
कि थोडी वाट वाकडी करून…
तिच्यापासून आणखी जरा दूर जातील…?
असहाय धडपडणारे दोन्ही हात…
तिला घट्ट मिठी मारतील…?
कि नुसतच एकमेकांत गुंतून…
तिला थांबवायचा प्रयत्न करतील…?
कि मनावरचे आठवणींचे थेंब…
अलगदपणे दूर झटकून टाकतील…?
खरतर… ती समोर आल्यावर…
भेटायला आसुसलेलं मन…
आनंदाने पार भरून येईल…
सगळी प्रश्नोत्तरे सोडून…
तिच्याशी हितगुज करायला अधीर होईल…
कि तिनेच मोडावी घातलेली शपथ…
म्हणून आजही तिची वाट पाहिल…?
ती समोर आल्यावर… खरंच काय बरं होईल…??
- टिंग्याची आई


:)
ReplyDeleteMay your all dreams comes true. Wish you a very happy birthday
ReplyDeleteyou can complete one of them.. :)
ReplyDeletethanks a lot for your wishes..... :):)
जे आपण विसरलो
ReplyDeleteअसं वाटत असतं
कितिदा तेच आपल्या
डोळा गळा दाटत असतं ...............
Je tujhya manat..
ReplyDeleteTech majhya manat chalu asata...
kanth datun yeto tujha...
an pani majhya dolyant sathata....