काही दिवसापूर्वी जेव्हा पाऊस बिलकुल यायला न्हवता तेव्हा लिहिली होती… पण आत्ता ब्लॉगवर टाकताना मागे पावसाच्या सारी बरसत आहेत हे पाहून समाधान वाटतंय… आपल्यातल्या प्रत्येकाने विचार आणि कृती करावा असाच एक विषय… बघा पटला तर….
आलाय आता उन्हाळा हि कविता… हल्लीच मी लिहिली होती…

जाणवतच होता इतका कि… लेखणी आपोआपच बोलली होती…
वाटलं होतं पाऊस आल्यावर… अशीच एखादी कविता लिहायची…
शब्दांच्या टपोऱ्या थेंबांनी… पावसाची ओंजळ भरायची…
हौस म्हणून, त्रास बनून… उन्हाळा अजूनही सरतोच आहे…
करपून गेलंय शिवार… तरी उन्हाचा पारा चढतोच आहे…
पेरणीची वाट पाहून… बळीराजाही थकून गेलाय…
भेगाळली भुई सारी… पण पाऊस कुठे गेलाय…?
पंढरीच्या वारीला तरी… तो हजेरी लावेल वाटलं होतं…
माऊलीचा फसवा डाव… म्हणून परवा नुसतंच आभाळ दाटलं होतं…
एक एक करत प्रत्येक विहीर… कोरडी पडत चालली आहे…
पाण्यासाठी वणवण करून… घागर रिकामीच राहिली आहे…
पाणी पाणी करत… गाई-गुरेही जीव सोडत आहेत…
खारट पाण्याचे डोळ्यातले झरेही… आता हळू हळू आटत आहेत…
माऊली…
थेंब थेंब बरसून… पाऊस कधी आम्हाला दर्शन देईल…
व्याकूळलेला प्रत्येक कण… कधी बर तृप्त होईल… ?
वाट पाहून थकली धरणी… तू काहीतरी उपाय कर रे देवा…
कोरडा पडलाय विश्वाचा घडा… त्याला पावसाच्या थेंबांनी भर रे देवा…
एकट्या पाण्यामुळे… हे केवढं मोठ संकट ओढवलंय…
अवाजवी वापर करून… आम्हीच याचं स्वरूप वाढवलंय…
वाया गेलेल्या हजारो लीटर पाण्याचं… आम्ही कधीच वाईट वाटून घेतलं नाही…
Recycle करणं तर सोडाच… पण वाया जाणारही कधी वाचवलं नाही…
पाणी म्हणजे जीवन… हे पुस्तकापुरतच मर्यादित ठेवलं…
दुष्काळाचं विद्रूप स्वरूप… चित्रपटांना पुरस्कार देऊन व्यक्त केलं…
आमच्या नळाला २४ तास पाणी… म्हणून हवं तसं वापरत गेलो…
पाणीसुद्धा 'अमुल्य' आहे… अगदी सहजपणे विसरून गेलो…
पण देवा…
एका एका थेंबाची किंमत… आता आम्हाला कळली आहे…
पर्यावरण रक्षणाकडे… आत्ता कुठे आमची पावलं वळली आहेत…
चूक झाली माफ कर… लेकरांचे अपराध पोटात घालशील का…?
या पर्यावरणाला पुन्हा सावरण्याचा… फक्त एकच मोका देशील का…?
इथून पुढचा प्रत्येक थेंब… जमेल तसा साठवायचा प्रयत्न करू…
एकतरी नवा अंकुर… मातीत रुजवायचा प्रयत्न करू…
तुझी कृपा असेल तर… आभाळ पुन्हा एकदा भरून येईल…
आकाशातून झेप घेऊन… पाणी धरित्रीची गळाभेट घेईल…
साठवलेला एक एक थेंब… भविष्याचा आधार बनेल…
सुखाचा एक नवा अंकूर… या पर्यावरणाच्या छायेत वाढेल…
Save Water…Save Earth……
- टिंग्याची आई

No comments:
Post a Comment