एका सत्य घटनेवर आधारित… ;)
रोज संध्याकाळी टिंग्या… आई सोबत खेळतो…
आईचा हा थोडासा वेळ… फक्त त्याच्यासाठीच असतो…
पकडा पकडी दंगा मस्ती… रोज नवे खेळ खेळतो…
खेळता खेळता नेमका… कुठे ना कुठे धडपडतो…
परवा संध्याकाळी दोघे… असंच काहीतरी खेळत होते…
निवांत बसलेल्या आजीसमोर… एकमेकांच्या खोड्या काढत होते……
पडाल रे सांभाळून… आजोबा आतून ओरडत होते…
चालली होती मस्ती… दोघांचे तिकडे मुळीच लक्ष न्हवते…
घरभर इकडून तिकडे… पकडा पकडी खेळून झाली…
फेवरेट साँग लुंगी डान्सवर… स्टेप सुद्धा करून झाली…
लाडाने टिंग्याला उचलून घेताना… आई फरशीवरून घसरली…
अन त्याला सांभाळताना… नेमकी आईच आज धडपडली…
टिंग्याला लागलं नाही… पण आईचं डोकं भिंतीवर आपटलं…
त्यानेच पाडलं कि काय… म्हणून बाबाने टिंग्याला थोडं धोपटलं…
तेवढ्यातूनही आईने… त्याला मारापासून वाचवलं…
मग धावत जाऊन पिल्लुने… आईसाठी पाणी आणलं…
चांगलीच कळ आली होती… डोळ्यातून घळघळ पाणी आलं…
अन आईच्या डोळ्यांत पाणी बघून… पिल्लू कावरं बावरं झालं…
लागलं का ग आई तुला…? केवीलवाण होऊन विचारू लागलं…
आईच्या डोक्याला लावायला… तेलाची बाटली घेऊन आलं…
(टिंग्याला काहीही लागलं कि आजी लगेच तेल लावते ना म्हणून… :)
दोन बोट तेल लावून…म्हणे आई आता स्माईल कर…
भूर उडून जाईल कळ… फक्त एकदा छू मंतर कर…(हा आईचा ऊपाय असतो नेहमी… :)
थोडंस कसतरी हसली आई… म्हणाली टिंग्या आता बास कर…
स्वतः स्माईल करून दाखवत म्हणतो… अग आधी दात दाखवून हस तर…
आईने स्माईल केल्याशिवाय… टिंग्या ऐकायला तयार न्हवता…
आता नेहमीची close-up स्माईल दिल्याखेरीज… आईकडे पर्याय न्हवता…
तिची एकच स्माईल बघायला… पोरगा आतुर झाला होता…
डोळे पुसून ती छान हसली… तेव्हा जब्बर खुश झाला होता…
चांगलाच टण्णू आला होता… पण आईला हसणं भाग होतं…
डोक्यात उठणाऱ्या कळीपेक्षा… पिल्लूच हसणं महत्वाचं होतं…
नंतर त्याच्या नकळत… आईने हळूच औषध लावलं होतं…
दुखायचं तर तेव्हाच थांबलं… जेव्हा टिंग्याने तिला मिठीत घेतलं होतं…
चार दिवस होऊन गेले… आईला आजही दुखतंय विंचरताना…
पण टिंग्या नेमकं हे विसरतो… मुद्दामून तिचे केस ओढताना…
पापण्यामधून डोकावणारा एखादा थेंब… ती लपवते तोंडभर हसताना…
आणि सगळी कळ विसरून जाते… पुन्हा एकदा टिंग्याच्या मागे धावताना… :)
- टिंग्याची आई

No comments:
Post a Comment