Thursday, February 19, 2015

सुनबाई कशी असावी….??

सूनबाई…घरातलं एक महत्वाचं माणूस… सगळ्यांना सहज आपलंसं करून घेणारी म्हणूनच सगळ्यांना आपलीशी वाटणारी व्यक्ती… पूर्वीच्या सुनबाई तशा घरीच काम करणाऱ्या पण आजकालची सुनबाई काळानुसार बदलली आहे सुनबाई कशी असावी या अपेक्षा आधीपण होत्या आजपण आहेत पण आज त्या अपेक्षांचं रूप खूपच बदललंय….
तर सुनबाई कशी असावी….??
सुनबाई कशी असावी….??
स्वतःच्या पायावर उभी… अन थोडफार कमावणारी असावी...
ऑफिस सोबत घरदार… छान सांभाळणारी असावी...
घरातली कामं आवरूनच… तिने ऑफिसला निघावं
रोज संध्याकाळी ६ च्या आतच… घरी परतही यावं
घरातल्या प्रत्येक माणसाची…  मर्जी तिने सांभाळावी
घराण्याची सगळी बंधन… स्वखुशीने पाळावी
घर खर्चाला नेहमी… तिचाच पगार वापरला जावा
आलीच काही पैशाची अडचण… तर तिनेच घराला आधार द्यावा

लग्नानंतर एक दोन वर्षांतच… तिने घराण्याला वारस द्यावा
चांगली गृहिणी असताना… उत्तम आई होण्याचाही वसा घ्यावा
पिल्लाची काळजी घेत… घर आणि ऑफिस सांभाळावं
कमीत कमी वेळेसाठी… पिल्लाला पाळणाघरात ठेवावं
प्रत्येक जबाबदारी… तिने पूर्ण पार पाडावी
अशी असेल सूनबाई… तरच सोयरीक जोडावी

पण मी म्हणेन…सूनबाई असावी… 
सगळ्यांवर प्रेम करणारी… आपलंसं करून घेणारी…
मन मोकळ बोलणारी… सासरच्या सुखात भर घालणारी…
मनापासून हसणारी… स्वतःच्या पायावर उभी असणारी…
स्वतःची जबाबदारी जाणणारी… सासरला आपलं घर मानणारी…
सूनबाई कशीही असो…
सासरच्या माणसांनी तिला लेकीसारखीच मानावी…
अन त्या घरातल्या माणसांना जोडणारी… सूनबाई अशीच असावी…. 

-टिंग्याची आई

There is always an other side of a coin.. ;)
अपेक्षा बदलल्या आहेतच पण सूनबाई सुद्धा बरीच बदलली आहे…. ;)

2 comments: