बघावं तिकडं हल्ली... सगळच Touch Screen झालंय...
फोन असो वा टी. व्ही.... सगळीकडे Touch Screen चं साम्राज्य आलंय...
कॉलेजची पोरं असोत किंवा ऑफिसमध्ये काम करणारी...
नेहमीच भला मोठा फोन... हातात घेऊन मिरवणारी...
Keypad वाला फोन हल्ली... Out Dated झालाय...
मार्केट मधून सुद्धा आजकाल गायब व्हायला लागलाय...
एवढंच काय... खेळण्यातले फोनसुद्धा iphone किंवा Galaxy असतात...
नेमकी कोणती बटन दाबायची... (सॉरी टच करायची) चिमुरड्यांना अगदी बरोबर कळतात...
तरण्या पोरांना तर या मोबाईलन... भारी वेड लावून ठेवलंय...
गल्लीत रोज भेटणाऱ्या मित्रांचही... Watsapp वरच Hi-Bye चाललंय...
गप्पा मारायलाही हल्ली... कोणाला लागत नाहीत मित्र ...
कट्ट्यावर बसणार्यांना... साधं विचारत नाही काळ कुत्र...
बसमध्ये असो वर रस्त्यावर... मोबाईल लागतो सगळी काम करताना...
दिसलेच ४ मित्र सोबत... तर मैत्रीची गाणीच नुसतीच ऐकतील स्क्रीन वर बोट नाचवताना...
Facebook, Watsapp, Twitter ने म्हणे सगळ जग जवळ आलंय...
पण या मित्रांच्यामधलं प्रेम... न जाणो कुठे गायब झालंय...
दोस्ताने कडकडून मारलेली मिठी... हल्ली दुर्मिळ झाली आहे...
बेस्ट फ्रेंडच्या लग्नाची पत्रिकाही... मेलवरच मिळाली आहे...
कुणाचं सुख असो दुखं... एखाद्या Comment वरच भागवलं जातं...
या इंटरनेट च्या जाळ्यात गुंतलंय... प्रत्येक जीवाभावाचं नात...
पण…
हा टच स्क्रीन चा टच... आपल्या हृदयाला स्पर्शून जाईल का...?
जीवापाड प्रेम करणाऱ्यांच्या वाट्याला... नुसतीच chatting वाली स्माईल का...?
स्क्रीन वरचा सिम्पल टच... तुमची आसवं पुसायला अपुरा पडेल...
खांदाच हवा असेल मित्राचा... जेव्हा मैत्रिणीच्या डोळ्यातलं आभाळ कोसळेल...
सोशल मीडियामुळे... तुमचं सोशल लाईफ मात्र गहाळ झालंय...
आजकाल तक्रार करते आईही... म्हणे पोरगं एकलकोंड झालंय...
एक मात्र आहे...
नुसतंच Chatting सोडून... याचे बरेचसे फायदे आहेत...
समाजाला जोडण्याचे... यात नक्कीच सामर्थ्य आहे...
एखादी बातमी तुमच्यापर्यंत... एका झटक्यात येऊन पोचते...
मदतीसाठी कुणी साद घालताच... सारी दुनिया धावत येते…
म्हणून म्हणते…
नसेल तुमच्याकडे TouchScreen Mobile... तर यावर्षी नक्की घ्या...
निव्वळ एक संपर्काचं साधन... इतकंच त्याला महत्त्व द्या...
Technology सोबत पुढे चला... पण मातीशी नाळ जोडलेली असू द्या...
जग जवळ नक्की करा... अन जिवाभावाच्या माणसांना जवळच राहू द्या...
- टिंग्याची आई





Heart Touching....;)
ReplyDeleteThankoo KAKA.... :)
Delete