मस्त आहे… आवडते मला तिची हि कविता….
तर यावरूनच सुचलेली माझी हि कविता….
मीही माझ्या सावलीला सुट्टी घे असं सांगतेय पण काही केल्या ती मला सोडून जायला तयार नाहीये…. ती शेवटपर्यंत माझ्या सोबतच राहील एखाद्या जिवलग मैत्रिणीसारखी… :)
मुक्ताच्या कवितेला कोणत्याही प्रकारे विरोध करायचा नाहीये मला…
हा आणखी एक वेगळा विचार मांडलाय इतकच…
एक दिवस म्हटलं माझ्याच सावलीला…
तू सुट्टी घे ग थोडे दिवस… मला माझाच शोध घ्यायचाय…
हरवलेला "स्व" पुन्हा एकदा शोधून आणायचाय…
इतकी वर्षं माझ्या सोबत फिरतेस… कंटाळली असशील तूही मला…
हरकत नाही सोडून जायला… त्याची आता जणू सवय झालीये मला…
सुख, दुःख, हसू, रडू… अगदी प्रत्येक क्षणी मला साथ दिलीस…
माणसांच्या गर्दीत जेव्हा एकटी होते… तेव्हा तूच माझ्या सोबत होतीस…
पण आज तू जा…
करू देत शोध एकटीलाच… अनंतापर्यंत….
वाटलं होतं इतकं सांगितल्यावर जाईल मला सोडून ती…
पण छे… अजूनही तिथेच होती ती…
माझ्या अस्तित्वाला चिकटलेली…
मग आणखी एकदा सांगून पाहिलं… दूर झटकून पाहिलं…
पण ती अजूनही तशीच…
एका नको असलेल्या आठवणीसारखी… नको म्हटलं तरी आठवत राहणारी…
जुन्याच एका जखमेसारखी… आजही क्षणोक्षणी ठणकणारी….
शेवटचा पर्याय म्हणून…
स्वतःभोवती मीच घोर अंधार करून घेतला…
अस्तित्वाचा कण न कण काळोखात झाकून टाकला…
सावलीवर आणि स्वतःवर… विजय मिळाल्याचा आभासही करून घेतला…
पण….
कुठूनसा एक किरण धाव घेत आला…
पुन्हा एकदा माझ्या सावलीवर प्रकाशझोत टाकून गेला…
ती होती… आहे तिथेच होती…
मला सोडून ती कधी गेलीच न्हवती…
तेव्हा जाणवलं….
माझा "स्व" तर माझ्या सावलीतच दडलाय…
आणि मी मात्र त्याला शोधण्याचा खेळ मांडलाय… :)
या सावलीनेच तर मला जगायला शिकवलंय…
कधी मोठं तर कधी स्वतापेक्षा छोटं व्हायला शिकवलंय… :)
तिच्याशिवाय माझा हा शोध… कदाचित पूर्ण झाला नसता…
हरवलेल्या "स्व"चा… कधीच माग सापडला नसता….
सावलीच माझी खास मैत्रीण झाली आहे…
या जुन्या मैत्रिणीशी पुन्हा एकदा गट्टी जमली आहे…
Thanks for always being with me Dear Shadow... :)
- टिंग्याची आई



No comments:
Post a Comment