मला शिवाजी घडवायचाय….
पण त्यासाठी माझ्या मुलाने शिवारायांसारख वागण्यापेक्षा…
मी स्वतः जिजाऊ होणं जास्त गरेजचं आहे…. :)
उगीचंच मोठेपणा दाखवत एका भिकाऱ्याला
कधी न्हवे ते पन्नासची एक नोट दिली…
अन त्याने मात्र ती नोट पोत्याखालच्या १०० च्या नोटांमध्ये
निर्विकारपणे ठेऊन दिली… :)
नवी गाडी घेतली म्हणून सगळ्यांना सांगून झालं होतं
हल्लीच जॉगिंगला ओळख झालेल्या एक काकांना मुद्दामून गाडीतून फिरायचा आग्रह केला
त्यांनीही सहजच हसून होकार दिला
त्याच संध्याकाळी माझ्या गाडीतून फिरायला काका स्वतःच्या ऑडीतून आले…
आणि हो… दरवाजा ड्रायवरने लावला चक्क माझ्या तोंडावर… ;)
मोठ्या हौसेने त्याने बायकोला ५००० हजारांचं घड्याळ गिफ्ट केलं…
ती सहज हसून म्हणाली…
"या घड्याळासोबत तुमचा थोडा वेळही मिळाला असता तर बर झालं असतं… :) "
त्याच्या विचारांचे काटे उगीचच क्षणभर स्थिरावले….
माझ्या ब्लॉगवर पब्लिश केलेली १०० वि कविता तिला फार हौसेने दाखवली…
खूप कौतुक करत होती माझं….
इतक्यात unpublished कवितांनी गच्च भरलेली तिची डायरी माझ्या नजरेला पडली
आणि बरंच काही सांगून गेली… :)
- टिंग्याची आई

No comments:
Post a Comment