Monday, May 25, 2015

बाबा आणि टी. व्ही....

 
बाबा आणि टी. व्ही. हे समीकरण कधीच जुळलं न्हवतं….
त्याच्या मते टी. व्ही. ला काडीमात्र महत्त्व न्हवतं….
फक्त बातम्या आणि क्रिकेट…. एवढंच काय ते तो बघायचा….
इतर वेळी टी. व्ही. आमचा…. नेहमीच गप्प बसायचा….


आम्हा मुलींना लागायचा टी. व्ही.…. पण बाबा घरी आला कि बंद….
अन बाबा घरात नसताना…. टी. व्ही. पाहणे हाच एकमेव छंद….
संध्याकाळी ७ च्या ठोक्याला…. टी. व्ही. बरोबर चालू व्हायचा….
अन Match असलेल्या दिवशी…. दिवसभर बंद नसायचा….
सिरियल वगैरेच खातं…. नेहमी आईकडेच असायचं….
दुपारचे रिपीट टेलिकास्ट बघूनच…. तिचं पोट भरायचं….

अभ्यास सोडून कार्यक्रम पाहिले…. तर चांगलीच पूजा व्हायची….
पुढचे २ दिवस टी. व्ही. ला…. फुल्ल रजा मिळायची….
टी. व्ही. मुळे मुलं भिघडतात…. बाबा असंच काहीतरी म्हणायचा….
पण आम्ही मात्र शनिवारी ४ चा पिक्चर…. काकूच्या घरी जाऊन पाहायचा….
बाबाचं हे म्हणणं…. आम्हाला कधीच न्हवतं पटत….
तो सिरियल वगैरे काही पाहील…. असं आजीबात न्हवतं वाटत….
इतकी वर्षं बाबाचा हा नियम…. अजूनपर्यंत चालू आहे….
भिंतीवरचा ४० इंची LED…. जणू नुसताच शोभेसाठी आहे…. :)

पण… 
परवा माहेरी गेल्यावर…. एक वेगळाच फरक जाणवला….
न बातम्यांची वेळ न Match…. तरीही बाबा टी. व्ही. समोर दिसला….
न राहवून आईला विचारलं…. हे ग काय नवल झालं….?
टी. व्ही. च या वेड शेवटी…. आपल्या बाबालाही लागलं….??
"नाही" म्हणाली आई…. बातम्यासोबत आता हा नवा कार्यक्रम add झालाय….
या वेळेसाठी ह्यांनी टी. व्ही. आणि रिमोट…. दोन्ही ब्लॉक करून ठेवलाय….
कुतूहल वाटलं फारच…. असा हा कोणता कार्यक्रम असेल….?
ज्याच्यासाठी इतक्या वर्षांचा नियम…. चक्क बाबाने मोडला असेल….?
मुद्दाम जाऊन पाहिलं…. आणि माझं क्षणभर हरपलं भान….
कारण बाबा पाहत होता…. बाप-लेकीची माया सांगणारं "कन्यादान"…. 
काय बोलावं सुचेचना…. मग बाबाच्याच कुशीत डोकं ठेवलं….
या सिरीयलच्या निमित्ताने…. बाबाचं प्रेम आज नव्याने कळलं…. :)
काळजी घेणारा, रागावणारा बाबा, 
प्रेम करणारा, ओरडणारा बाबा… 
तर कधी लेकीच्या आठवणीने रडणारा बाबा… 
बाबाची कितीतरी रूपं…. झरझर डोळ्यातून पाझरली….
हळव्या झालेल्या बाबाला लाडकी लेक…. पुन्हा त्याची चिमुरडी बनून बिलगली….
हल्ली बाबा आणि मी…. दोघेही कन्यादान रोज न चुकता बघतो….
बाप-लेकीच्या प्रेमाचे क्षण…. पुन्हा नव्याने जगतो….
-टिंग्याची आई 
I Love You Pappa.... :)

No comments:

Post a Comment