संध्याकाळी जेमतेम सातची वेळ होती...
ऑफीसमधून निघायची तिची धडपड सुरू होती...
नेहमीप्रमाणे आजही कॉल थोडा जास्त वेळ चालला...
घरी वेळेत निघायचा, तिचा नेम चुकला...
घड्याळाच्या सरकत्या काट्यासोबत तिची चलबिचल वाढत होती...
कसही करून साटकायची तिची धडपड चालूच होती...

"I have to leave" अस... Onsite ला एकदा दोनदा सांगून झाल...
तिची ही सगळी धावपळ... तिचा मित्र शांतपणे बघत होता...
तिच्या डोळ्यातल असहायपण... तो मूकपणे अनुभवत होता...
स्वताच मधे पडून... त्याने कॉल कसाबसा संपवून टाकला...
घरट्यात परतायला अधीर् तिने... सुटकेचा निश्वास टाकला...

"वाईट वाटत तुझ्याकडे बघून..." तो न राहवून म्हणाला...
"नाही वाटत मला..." तिने हसतच रिप्लाइ केला...
का करतेस इतकी घाई...? घरच्यांना सांगत का नाहीस...?
I.T. च्या जगात चालत अस... म्हणून समजावत का नाहीस...?
घर-ऑफीस सांभळतेस... मग तुलाही समजून घेतलच पाहिजे...
घड्याळाच्या काट्याच बंधन... थोड तरी शिथिल केल पाहिजे...

नुसतीच हसत होती... बाकी तिची गडबड सुरुच होती...
पार्किंगच्या दिशेने... ती झपाझप पावल टाकत होती...
काही क्षण शांततेत गेले... मग तीच स्वतःहून बोलली...
मनात साठवून ठेवलेल काहीतरी... सहजच सांगून गेली...

अरे उशीर झाला मला की घरच्यांना काळजी लागते...
मी सुखरूप पोहचावे फक्त एवढीच त्यांची इच्छा असते...
सासर्यांच्या दारापर्यंत... निदान दहा फेर्या होतात...
मी घरी पोहोचेपर्यंत... त्या तशाच चालू असतात...

जमेल तस हळूहळू... सासूबाई सगळा स्वैपाक करतात...
दिवसभर कंटाळून... गप्पा मारायला माझी वाट बघतात...
कधी येणार आई...? म्हणत पिल्लू सुद्धा दाराशी वाट पाहतो...
अन खेळण्याच्या नादात... वाट पाहायचीच विसरून जातो... :)
अजुन कशी आली नाही...? म्हणून "हे" सुद्धा वाट बघतात...
उशीर होऊन चालत नाही... मग उगीच टेन्शन घेतात...
म्हणून असते माझी धावपळ... लवकर घरी पोहचायची...
दिवसभर वाट पाहणार्या घरच्यांना... संध्याकाळी लवकर भेटायची...
कारण उशीर झाल्यावर...
कधी कधी "हे" राग धरून बसतात...
पोचेपर्यंत निदान दहा तरी मिस्कॉल असतात...
पिल्लू धावत कुशीत शिरत... पण बाबा रागावलेला असतो...
पटला नाही काही... तर तो असाच अबोला धरतो...
जळजळता कटाक्ष त्याचा... बर्याचदा सहन होत नाही...
सांगायला जाव काही... तर तो ऐकून सुद्धा घेत नाही...
उशिरा आल्याच अपराधीपण घेऊन... मी मुकाट घरात शिरते...
पिल्लाने मारलेल्या मिठीत... सगळ पुन्हा एकदा विसरून जाते...
बोलता बोलता सगळ... मनातल ती सांगून गेली...
अन् लवकर पोहचाव म्हणून... सुसाट वेगाने निघून सुद्धा गेली...
काय बोलाव यावर... त्याला सूचायला उशीर लागला...
पाठमोरया तिच्या आकृतीकडे... नुसताच कौतुकाने पाहत राहिला...

त्या दिवशी घरी काय झाल... ती काहीच नाही बोलली...
दुसर्या दिवशी नेहमीसारखी... हसतच ओफीसला आली...
असेल सगळ ठिकच... म्हणून त्यानेही काही विचारल नाही...
अन् रोज नव्याने लढणार्या मैत्रिनिला पाहून... आज त्याला मुळीच वाईट वाटल नाही... :)

- टिंग्याची आई

No comments:
Post a Comment