आजकाल शहरात मोठ्या मोठ्या सोसायटीज बनत आहेत... खूप काही प्रलोभने दिली जात आहेत बुकिंग वाढवण्यासाठी...
तर अशा बर्याच स्किम्स आम्हा माणसांसाठी बनत आहेत... मग विचार आला.. कुणीतरी भूत लोकांसाठी पण अस काहीतरी केल तर...?
अहो करतच असतील... भूतांच्या राज्यात सुद्धा अस होतच असेल की... म्हणून मग ही खास स्कीम भूताखेतांसाठी.... :)
हे सगळ सूचायलाही कारण आहेच... :) परवा ऑफिसला येताना एका पिंपळाच्या झाडावर एक जाहिरात लावलेली दिसली… १bhk, २bhk भाड्याने देणे आहे… कदाचित लावणार्याने जास्त विचार केला नसेल आणि आपलं काम संपवून रिकामा झाला असेल.… :)
पण आता भूत मंडळीसाठी पिंपळ आणि वड या दोन दिग्गज बिल्डर लोकांनी सिरीयसली एक नवीन स्कीम काढली आहे… बघा... आवडली तर तुमच्या ओळखीच्या भूतांना लवकर रेफर करा…
वड आणि पिंपळ आपल्या joint venture मधून सर्व भूत मंडळींसाठी सादर करीत आहेत एक आगळी वेगळी स्कीम…
दिवसेंदिवस वाढणाऱ्या सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या माणसांनी तुमची दिवसाची झोप आणि रात्रीचं चैन हिरावून घेतलं आहे का?
तर मग विचार कसला करताय आमच्या नव्या स्कीम मध्ये आजच एक फांदी किंवा पारंबी बुक करा…. आणि भरपूर अमेनिटीजचा फायदा घ्या…
भूतांकित मध्ये आपल्याला मिळतील खास तुमच्यासाठी बनलेल्या duplex पारंब्या किंवा apartment style फांद्या
तर हि आहेत आमची काही खास वैशिष्ट्ये…
१. ६६६ फांद्या असलेला १३ माजली उंचच उंच पिंपळ टॉवर
२. ३१३ duplex पारंब्यांनी दाटलेला भला थोरला वड
३. प्रत्येक फांदी आणि पारंबीला एक विचित्र आणि भयंकर interior देण्यात आलय…
४. अगदी पहाटेपर्यंत भरपूर आणि काळाकुट्ट अंधार…
५. मानवी वस्तीपासून ११ मैल दूर…
६. पूर्ण २४ तास सोसाट्याचा वारा विथ चित्रविचित्र आवाज
७. प्रत्येक फांदीवर उलट लटकण्याची उत्तम सोय
८. केवळ २ मिनिट अंतरावर जुनाट पडका वाडा जिथे नुकताच वेताळ शेठने एक मॉल सुरु केला आहे
९. विकेंड आउटिंग साठी शेजारच्या तीत्ठ्यावर ३०० वर्षं जूनी स्मशानभूमी…
१०. जेष्ठ भूत मंडळीसाठी वेतालेश्वराचे मंदिर सोसायटीच्या मधोमध
११. २४ तास जवळच्या पडक्या विहिरीतून पाण्याची सोय
१२. आठवड्याचे सातही रात्री पूर्ण लोड शेडींग
१३. फक्त काही कि. मि. अंतरावर भुताटकी या शिक्षण मंडळाची सर्व शिक्षण संस्था
स्पेशल ऑफर्स….
नुकत्याच भूत झालेल्या मंडळीसाठी registration चार्जेस पूर्णपणे माफ…
ग्रुप बुकिंग करा आणि मिळावा सेम फ्लोअर वरच्या फांद्या
national बँक ऑफ स्पिरीटवाडी यांच्या कडून ०% दराने कर्ज उपलब्ध। तुमचा पुन्हा जन्म होईपर्यंत कधी आणि कसेही हप्ते फेडा
Death Insurance Corporation (DIC) यांच्याकडून खास विमा योजना… In case of sudden Birth... संपूर्ण कर्ज माफी…
चला… मग आता विचार कसला करताय… आजच रात्री भेट द्या…
न मानसो न भूतकाळतः अशी हि अनोखी स्कीम…
"भूतांकित…." घराला घरपण देणारी भुतं… :)
साईट अड्रेस:
३,१३, पिंपळपान, भूत गल्ली,
वेताळ कॉलनी, स्पिरीटवाडी
नक्की या आम्ही वाट बघतोय… :)
हीं… हीं हीं हीं हीं… हीं.........................................
- टिंग्याची आई
भूत खरंच मागे लागून आली नाहीत म्हणजे पुरे…. :D

भूतांकित…
पिंपळ आयकॉन आणि बनयान विलाज…

No comments:
Post a Comment