Friday, January 1, 2016

सरत्या वर्षासोबत....

तुझ्या अश्रूंची वाट तू आजीबात अडवू नको…
कुठलंही दुःखं पापण्यांच्या आड दडवू नको…
कारण… तिथून ते सरळ आपल्याच डोक्यात जातं….
आणि मग मनात नको इतकं साचत जातं….

अशा दुःखाला बांध न घालता सरळ वाहू द्यावं….
नाहीतर आपण पुढे निघावं अन त्याला तिथेच राहू द्यावं….
मनातला सल जाणार नाही कदाचित, पण थोडं बर नक्की वाटेल….
अन तसंच राहू दिलं तर मात्र नको तेव्हा तुझ्या डोळा गळा दाटेल….

कुणासमोर चुकून कोसळलं तर आवरताना नाकी नऊ येईल….
अन कुणा आपल्या माणसासमोर मात्र सावरताना मुश्किल होईल….
वाहिलंच नाही तर साचून साचून सगळं मनच गढूळ होईल….
नको असलेल्या आठवणींचा नुसताच गाळ शिल्लक राहील….
तुझ्याच डोळ्यातला पाऊस नेहमी एकटं असताना गाठेल….
हजारोंच्या गर्दीतही तुला अगदी एकटं एकटं वाटेल….

म्हणून म्हणते….
होऊ देत निचरा प्रत्येक दुःखाचा त्याला डोळेभरून वाहू दे….
येणाऱ्या नव्या सुख दुःखांसाठी मनात जागा शिल्लक राहू दे ….
सरत्या वर्षासोबत अशा सगळ्याच सलणाऱ्या दुखांना कायमचा राम राम कर….
स्वच्छ आणि मोकळ्या मनाने एका नव्या वर्षाचं स्वागत कर….

बघ… तुला सांगता सांगता…
उगाचंच बोचणाऱ्या आठवणींना मीही नुकतंच मनातून वेगळं केलंय….
मनसोक्त वाहू दिलं आणि आत्ता कुठे जर मन मोकळं झालंय….
चल… नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नव्या विश्वासाने सज्ज होऊया….
एका नव्या आशेला सोबत घेऊन हसत हसत सामोरे जाऊया….

सुख आसपास बागडतंय दुःखाचाही हात हातात घेऊन….
पण आयुष्यातला प्रत्येक क्षण जावो काहीतरी समाधान देऊन….

- टिंग्याची आई
Wish you all the happiest new year... :)

2 comments:

  1. सरत्या वर्षासोबत अशा सगळ्याच सलणाऱ्या दुखांना कायमचा राम राम

    :)

    Happy new year

    ReplyDelete
  2. That's like a good girl... :)
    Happy new year...

    ReplyDelete