Friday, January 1, 2016

३१st चा काय प्लान आहे…??

आज ३१ डिसेंबर २०१५ …. (little late ;)

कुणीतरी विचारलं मला…. ३१st चा काय प्लान आहे…??
म्हटलं.. काहीच नाही… कारण दुसऱ्या दिवशी ऑफिस आहे…. :)

म्हटलं विचारावा हाच प्रश्न माझ्यातल्याच मला… 


होऊ देत खर्च म्हणून जाऊ म्हटलं एखाद्या ५-स्टार हॉटेलमध्ये
धुंद होऊन नाचावं जरा तिथल्या त्या डीम लाईटमध्ये
मॉकटेल, कॉकटेल सोबत २-४ पेगही रीचवावे म्हणतो
२०१५ मध्ये वाट्याला आलेले कटू क्षण त्यासोबत पचवावे म्हणतो
पण काय करणार… पटत नाही हो जीवाला हे असं काहीतरी करणं
अन परवडत नाही आमच्या खिशाला ही असली थेरं करणं

मग म्हटलं निदान जरा बाहेर जेवायला तरी जाऊ
मस्त कोल्हापुरी तांबडा-पांढरा आज पोटभरून खाऊ
पण आईच्या हातची चव कधीच कुठे मिळत नाही…
कितीही हाणला बाहेरचा मेवा तरी का कुणास ठाऊक मन भरत नाही
आणि ३१स्ट ला हॉटेलमध्ये फुल्ल झालेल्यांचीच गर्दी असेल
माझ्यासारख्या निरस लोकांची तिथल्या बेधुंद वातावरणाला गरज नसेल

राहिलं….
मग वाटलं मित्रांसोबत मिळून एक छान पार्टी करावी
वर्षभरात हरवलेली एक एक आठवण पुन्हा ताजी करावी
हौसेनं विचारलंच सगळ्यांना तर सगळे नको इतके बिझी असतील
आपापल्या काम-धंद्यात कदाचित खरंच खूप व्यग्र असतील
मग मी तरी जाऊन त्या कट्ट्यावर काय दिवे लावले असते
दुसऱ्या कुणी बोलावलं असतं तर मी तरी कुठे हो म्हटले असते?

कसं करावं सेलिब्रेट ३१ स्ट काहीच कळेनासं झालं
विचारात गुंतलेल्या मला जागं करत माझंच मन मला म्हणालं

३१-स्ट च्या रात्री watsapp च्या कट्ट्यावर एकटं का होईना जाऊन बसायचं
contact लिस्ट मधल्या प्रत्येकाला Happy New Year विष करायचं
२०१५ मध्ये गवसलेल्या आनंदी क्षणांना पुन्हा एकदा आठवायचं
अन वाट्याला आलेल्या दुःखाला आज जाणूनबुजून विसरायचं
जवळची लांबची सगळीच नाती या नव्या वर्षी पुन्हा जोडायची
नात्यांच्या आडवी येणारी… राग,द्वेष, अहंकाराची प्रत्येक भिंत तोडायची
हसत हसत राम राम करायचा मावळणाऱ्या २०१५ ला
नव्या आशेने नमस्कार करायचा उगवणाऱ्या २०१६ ला

आणि हो…
ठीक बारा वाजता… चांगली मग भरून कॉफी घ्यायची
२०१५ मधली प्रत्येक वाईट आठवण तिच्या तळाशी बुडवायची
खूपशा सुखद क्षणांची मधुर साखर त्यात घोळायची
नव्या आशेची फ्रेश क्रीम काठोकाठ त्यावर घालायची
विश्वासाच्या चमच्याने हि कॉफी मनसोक्त ढवळायची
आपलीच आवडती एखादी ओळ सोबत मोठ्यांदा गुणगुणायची
येणाऱ्या नव्या क्षणांसोबत निवांत एक एक घोट घ्यायचा
अनुभवाच्या या कॉफीचा कडू-गोड स्वाद समाधानाने चाखायचा

अशीच काहीशी २०१५ ची सांगता मलाही आता करायची आहे
एक नवी आशा अन नवी दिशा घेऊन २०१६ ची सुरुवात करायची आहे
पण तरीही…
जास्त काही करणार नाहीच… कारण
दुसऱ्या दिवशी ऑफिस आहे… :)

-टिंग्याची आई 

Happy New Year.... :)

No comments:

Post a Comment