भांडी…आम्हा बायकांचा जिव्हाळ्याचा अन जीव घेणारा विषय… :) भांडी घ्यायची भारी हौस असते आम्हाला आणि तीच भांडी घासायचा जाम वैतागही येतोच …. भांडी झाली म्हणजे निम्म काम आवरल्या सारखं वाटतं आम्हाला… भांडी घासणे हे दिवसातलं किंवा रात्रीचं शेवटचं काम आणि मग आम्ही निवांत होतो… :)
तर आता भांडी हा काय लिहिण्यासारखा विषय नक्कीच नाहीये… पण काय करणार प्रत्येक गोष्टीत काहीतरी इंटरेस्टिंग शोधायचं आणि नावडतं काम सुद्धा आवडीने आणि चोख करायचं हा आमचा स्वभाव गुणधर्मच आहे मूळी… थोडासा भाव खाऊन बघावं म्हटलं… ;)
हल्ली प्रत्येक घरकामाला बाई म्हणजे कामवाली मिळते तशी भांड्यालाही मिळतेच पण तरीही आहेत अजूनही माझ्यासारख्या काही हौशी मेंबर ज्यांच्यासाठी भांडी घासणे हे दिवसातलं सगळ्यात शेवटचं काम आहे…
परवा रात्री खूपच जास्त कंटाळा आला होता कामाचा आणि मेन म्हणजे भांडी घासायचा… न्हवतेच घासणार आजीबात पण पुन्हा सकाळी उठून तीच भांडी घासायची म्हटल्यावर डबल वैताग… मग म्हटलं जाऊ देत तिकड घासून टाकू एकदाची… तेव्हाच भांडी घासता घासता एक विचार डोक्यात चमकला, या भांड्यांवरच म्हणजे या विषयावर काही लिहिलं तर….!!! आणि मग लिहून टाकला एक मस्त action सिनेमा रोज प्रत्येक घरात घडणारा…. :)
एन्ट्री…. भल्या मोठ्या घरात एक छानसं किचन… सुंदर फर्निचर, छान छान भांडी, छोटी मोठी बरीच कपाटात ऐटीत बसलेली… अन घरातल्या प्रत्येकाचं चहा पाणी, खाणं-पिणं, नाश्ता-जेवण या अन अशा हजार कामात… हळू हळू सिनेमाच्या पाट्या पडाव्यात तशी दिवसभर एकामागोमाग एक भांडी पडत राहतात…. सगळ्या पाट्या पडल्या कि मग बेसिनवर फोकस येतो आणि मोठ्या मोठ्या अक्षरांत स्क्रीनवर नाव पडतं आणि सुरु होतो रोजचीच संघर्षगाथा….
मग होते आपल्या हिरोईन ची एन्ट्री… नाही होय करत करत एकदाची ती भांडी घासायला तयार होते… आणि मग सुरु होते action… भांडी म्हणजे जणू व्हिलन्स… ते पण एवढे सगळे ज्यांच्याशी आपली हिरोईन एकटी लढणार असते… कुणी चिवट… कुणी तेलकट… कुणावर साचलेले थरच थर तर कुणी करपलेलं खंडीभर… या सगळ्यांशी टक्कर द्यायला ती एकटीच समर्थ असते… निव्वळ साबण आणि घासणी या दोनच हत्यारांच्या मदतीने ती या सगळ्या दुश्मनांचा फडशा पाडते… जसा साऊथ इंडियन सिनेमाचा हिरो एका दमात १०० गुंडांची वाट लावतो अगदी तस्सं… धिश्शूम ढीश्शुम आणि घसाघस…. एक एक करून सगळी भांडी हरून बेसिन मध्ये एकामागोमाग एक admit होतात… आणि उरलेलं शेवटचं भांडं घासून झाल्यावर आपल्याच विजयात स्वतावरच खुश होते आपली लाडकी हिरोईन… अन इतक्यात होते इंटरवल… एवढा मोठा संघर्ष केल्यावर थोडा ब्रेक तर हवाच ना… :)
पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…
अन आता भरलेल्या बेसिनवर फोकस टाकत पुन्हा सुरु होतो पुढचा सिनेमा…
व्हिलनला नुसतं मारलं म्हणजे सिनेमा कसा संपेल… आपली हिरोईन म्हणजे नुसती गुणीच न्हवे तर सद्गुणी आहे म्हणूनच त्या सगळ्या दुष्ट व्हिलन्सना धुवून स्वच्छ सुद्धा करते…. क्योंकी दुश्मन को भी इन्सान समझते है हम… डायलॉग… ;) तर अशा तऱ्हेने ती सगळी भांडी ती स्वच्छ धुवून छानपैकी जाळ्यात भरून ठेवते….
पण अजूनही काम संपलेलं नाही बर… एका सृजन योद्ध्या प्रमाणे तिला युद्धभूमी म्हणजेच तिचा किचन ओटादेखील स्वच्छ करावा लागतो… पिक्चरच्या शेवटी जसं सर्व काही छान आणि सुंदर घडत तसंच ती न विसरता सगळा ओटा चकचकीत करते… :)
आपल्या सिनेमाचा शेवटचा सीन तरी काय वर्णावा… सगळ आवरून पदराला हात पुसत ती किचनची लाईट बंद करते… आणि आता थोडीशी निवांत झोप घ्यायला ती समाधानाने बेडरूमकडे जाते…. आणि जाळ्यातली, कपाटातली सगळीच भांडी तिचं टाळ्यांच्या कडकडात अभिनंदन करत असतात पण आता तिला मात्र कशाचंच भान राहिलेलं नसतं…
आणि शांतपणे बेडरूमकडे जाणाऱ्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर झळकत आमचं The End चं पोस्टर….
तर असाच काहीसा सिनेमा रोजच तिच्या किचनमध्ये रंगतो… :)
ती भल्या पहाटे उठते जेव्हा घराला सुद्धा जाग आलेली नसते… पण सूर्यही तिने मारल्याशिवाय उगवत नाही यात ती आनंद शोधते…
घरातल्या माणसांची सगळी कामं ती करते, अगदी न कंटाळता सगळ्यांच्या हाकेला ओ देते…. अन तिच्याशिवाय घरात कुणाला करमत नाही ह्यातच ती खुश होते….
आपल्या पिल्लांची सगळी कामं, खाऊ-पिऊ, न्हाऊ-माखू, रडणं-खेळण सगळंच ती न थकता प्रेमाने करते… आणि आपल्या पाखरांची माउली व्हायचं भाग्य मिळालं ह्यातच समाधान मानते….
पतीदेवांचही प्रत्येक काम… अगदी डबा, रुमाल, पेन सगळ काही हातात देण्यापासून सर्वकाही ती हक्काने आणि प्रेमाने करते… अन तिच्याशिवाय त्याचं पानही हलत नाही म्हणून स्वतःचाच हेवा करते… :)
घर अन घरातल्या माणसांसोबत त्यांच्या मनाचीही काळजी ती सतत घेत असते… अनआपल्या माणसांच्या मनात एक हक्काची जागा निर्माण करता आली याच भावनेत ती तृप्त होते… :)
तसं पाहिलं तर ती कुठल्याच कामाला नाही म्हणत नसते… पण कधी कधी अशाच एखाद्या कंटाळवाण्या कामातसुद्धा ती आनंद शोधते…
Hats Off to Her.... :)
- टिंग्याची आई
त्या दिवसापासून रोज रात्री भांडी घासताना मीही हा सिनेमा जगते आणि the end झाल्यावर समाधानाने झोपी जाते… :)
तर आता भांडी हा काय लिहिण्यासारखा विषय नक्कीच नाहीये… पण काय करणार प्रत्येक गोष्टीत काहीतरी इंटरेस्टिंग शोधायचं आणि नावडतं काम सुद्धा आवडीने आणि चोख करायचं हा आमचा स्वभाव गुणधर्मच आहे मूळी… थोडासा भाव खाऊन बघावं म्हटलं… ;)
हल्ली प्रत्येक घरकामाला बाई म्हणजे कामवाली मिळते तशी भांड्यालाही मिळतेच पण तरीही आहेत अजूनही माझ्यासारख्या काही हौशी मेंबर ज्यांच्यासाठी भांडी घासणे हे दिवसातलं सगळ्यात शेवटचं काम आहे…
परवा रात्री खूपच जास्त कंटाळा आला होता कामाचा आणि मेन म्हणजे भांडी घासायचा… न्हवतेच घासणार आजीबात पण पुन्हा सकाळी उठून तीच भांडी घासायची म्हटल्यावर डबल वैताग… मग म्हटलं जाऊ देत तिकड घासून टाकू एकदाची… तेव्हाच भांडी घासता घासता एक विचार डोक्यात चमकला, या भांड्यांवरच म्हणजे या विषयावर काही लिहिलं तर….!!! आणि मग लिहून टाकला एक मस्त action सिनेमा रोज प्रत्येक घरात घडणारा…. :)
एन्ट्री…. भल्या मोठ्या घरात एक छानसं किचन… सुंदर फर्निचर, छान छान भांडी, छोटी मोठी बरीच कपाटात ऐटीत बसलेली… अन घरातल्या प्रत्येकाचं चहा पाणी, खाणं-पिणं, नाश्ता-जेवण या अन अशा हजार कामात… हळू हळू सिनेमाच्या पाट्या पडाव्यात तशी दिवसभर एकामागोमाग एक भांडी पडत राहतात…. सगळ्या पाट्या पडल्या कि मग बेसिनवर फोकस येतो आणि मोठ्या मोठ्या अक्षरांत स्क्रीनवर नाव पडतं आणि सुरु होतो रोजचीच संघर्षगाथा….
"गराडा….
भांड्यांचा…. एक संघर्ष गाथा…"
पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…
अन आता भरलेल्या बेसिनवर फोकस टाकत पुन्हा सुरु होतो पुढचा सिनेमा…
व्हिलनला नुसतं मारलं म्हणजे सिनेमा कसा संपेल… आपली हिरोईन म्हणजे नुसती गुणीच न्हवे तर सद्गुणी आहे म्हणूनच त्या सगळ्या दुष्ट व्हिलन्सना धुवून स्वच्छ सुद्धा करते…. क्योंकी दुश्मन को भी इन्सान समझते है हम… डायलॉग… ;) तर अशा तऱ्हेने ती सगळी भांडी ती स्वच्छ धुवून छानपैकी जाळ्यात भरून ठेवते….
पण अजूनही काम संपलेलं नाही बर… एका सृजन योद्ध्या प्रमाणे तिला युद्धभूमी म्हणजेच तिचा किचन ओटादेखील स्वच्छ करावा लागतो… पिक्चरच्या शेवटी जसं सर्व काही छान आणि सुंदर घडत तसंच ती न विसरता सगळा ओटा चकचकीत करते… :)
आपल्या सिनेमाचा शेवटचा सीन तरी काय वर्णावा… सगळ आवरून पदराला हात पुसत ती किचनची लाईट बंद करते… आणि आता थोडीशी निवांत झोप घ्यायला ती समाधानाने बेडरूमकडे जाते…. आणि जाळ्यातली, कपाटातली सगळीच भांडी तिचं टाळ्यांच्या कडकडात अभिनंदन करत असतात पण आता तिला मात्र कशाचंच भान राहिलेलं नसतं…
आणि शांतपणे बेडरूमकडे जाणाऱ्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर झळकत आमचं The End चं पोस्टर….
शेवट… पुन्हा उद्याची सुरुवात करण्यासाठी…
तर असाच काहीसा सिनेमा रोजच तिच्या किचनमध्ये रंगतो… :)
ती भल्या पहाटे उठते जेव्हा घराला सुद्धा जाग आलेली नसते… पण सूर्यही तिने मारल्याशिवाय उगवत नाही यात ती आनंद शोधते…
घरातल्या माणसांची सगळी कामं ती करते, अगदी न कंटाळता सगळ्यांच्या हाकेला ओ देते…. अन तिच्याशिवाय घरात कुणाला करमत नाही ह्यातच ती खुश होते….
आपल्या पिल्लांची सगळी कामं, खाऊ-पिऊ, न्हाऊ-माखू, रडणं-खेळण सगळंच ती न थकता प्रेमाने करते… आणि आपल्या पाखरांची माउली व्हायचं भाग्य मिळालं ह्यातच समाधान मानते….
पतीदेवांचही प्रत्येक काम… अगदी डबा, रुमाल, पेन सगळ काही हातात देण्यापासून सर्वकाही ती हक्काने आणि प्रेमाने करते… अन तिच्याशिवाय त्याचं पानही हलत नाही म्हणून स्वतःचाच हेवा करते… :)
घर अन घरातल्या माणसांसोबत त्यांच्या मनाचीही काळजी ती सतत घेत असते… अनआपल्या माणसांच्या मनात एक हक्काची जागा निर्माण करता आली याच भावनेत ती तृप्त होते… :)
तसं पाहिलं तर ती कुठल्याच कामाला नाही म्हणत नसते… पण कधी कधी अशाच एखाद्या कंटाळवाण्या कामातसुद्धा ती आनंद शोधते…
Hats Off to Her.... :)
- टिंग्याची आई
त्या दिवसापासून रोज रात्री भांडी घासताना मीही हा सिनेमा जगते आणि the end झाल्यावर समाधानाने झोपी जाते… :)

No comments:
Post a Comment