Finally… एक पिल्लू आणि त्याची आई Onsite च्या गावाला राहणाऱ्या बाबाकडे पोचले… पिल्लू , आई आणि बाबा सगळेच एकदम खुश आहेत…. काय काय चालू असेल त्या चिमुकल्याच्या मनात…
एक छोटासा प्रयत्न त्या छोट्या पिल्लासाठी… :)
कित्ती वाट पहायला लावलीस रे बाप्पा….
आम्हाला Onsite च्या गावाला आणायला…
इतके दिवस एकट्या राहणाऱ्या बाबाच्या…
धावत जाऊन कुशीत शिरायला…. :)
अरे बाबा…
आज्जी आबा… मावशी आणि काका…
सगळेच आले होते आम्हाला एअरपोर्टवर सोडायला….
तुझ्याकडे येतोय म्हणून सगळेच Happy होते…
आणि आई मात्र लागली नेहमीसारखी रडायला… :(
त्या दिवशी प्रत्येकजण मला खूप खाऊ देत होता…
आबा पण सारखे सारखे कडेवर घेत होते…
आजी तर सारखी नुसती पापे घेत होती…
आणि काका छान एरोप्लेनच्या गोष्टी सांगत होते… :)
अरे बाबा… एरोप्लेनच्या वर बसत नाहीत कधी…
मी आणि मा… एरोप्लेनच्या आतच बसून आलो….
एवढं मोठ्ठ ढग्गाएवढं एरोप्लेन….
मी आणि पायलट काका… एका मिनिटात इथे घेऊन आलो…. :)
हे काय रे बाबा… कित्ती छोटुसा (बारीक) झाला आहेस… :)
माझी कंपनी नाही म्हणून दूध पितच नाहीस का?
जेवण करायला इथे आई नसते…
म्हणून पोटभर जेवत सुद्धा नाहीस का? :(
आलोय न मी इकडे… काळजी करू नकोस…
आता रोज दोघे मस्त मस्त दुधू पिऊ…
आईच्या हातचा मऊ मऊ वरण भात…
everyday ला आपण तिघे मिळून खाऊ… :)
आईचं तर कळतंच नाही… तिचं जरा वेगळंच चाललंय…
काही कारण नसलं तरी सारखी नुसती Smile करते…
येता जाता टेबलवरच्या बाप्पाकडे पाहून…
हळूच काहीतरी पुटपुटत… हात जोडत असते… :)
बाबा… कित्ती छान छान आहे रे इथे सगळं…
पण आजी आबा काका कोणीच इथे नाही…
एवढ्या मोठ्या बिल्डींग्स आहेत तुझ्या इथे…
पण इथे खेळायला आजीसारख अंगणच नाही… :(
खर सांगू बाबा…
सगळं मस्त आहे… पण नको आपल्याला इथलं काहीच…
तुझं काम संपव… मग आपण तिघे परत जाऊ…
सगळेजण आपली खूप खूप वाट पाहत असतील रे…
तू.. मी आणि आई…. आपल्या आज्जीच्या छोट्याशा घरीच राहू…. :)
- टिंग्याची आई

No comments:
Post a Comment