आई होणं हा जगातला स्वर्गीय अनुभव आहे असं बऱ्याच जणांनी म्हटलंय……… पण बाप होणंही तितकंच सुखद आणि स्वर्गीय असतं नाही का ?
ज्या दिवशी पिल्लाच्या येण्याची चाहूल लागते अगदी तेह्वा पासूनच तो पिलुच्या स्वागताच्या तयारीला लागतो……. आईची सगळेच काळजी घेतात……. काय हवं…काय नको …असं कर… असं करू नको सगळे Instructions देतात आणि वर बाबालाही ताकीद …. "काळजी घे बरं का हिची…… अजिबात त्रास देऊ नकोस हं"…. :) त्या सगळ्या Instructions लक्षात ठेवणारा बाबाच असतो ……. आईचं खाणं पिणं…… उठणं बसणं ……. हसणं खेळणं …… सगळं सगळं नीट सांभाळत असतो.…
आई होताना जसा एका स्त्री च्या मनात जसा बदल होत असतो तसाच बदल बाबा होताना पण चालू असतो……. आपल्या छकुलीच्या येण्याची वाट येण्याची वाट पहात बाबाचा प्रत्येक दिवस आणि रात्र सरत असते…. आईच्या पोटात वळवळ करणारी छकुली कशी असेल…… कशी दिसेल… मला काय म्हणेल? …… असे कितीतरी बालिश प्रश्न त्याच्या मनात नकळत घोळून जातात…… आपल्या लाडकीचा स्पर्श जाणवावा म्हणून कित्येकदा आईच्या गर्भाचा कानोसा घेणारा बाबा…… जितक्या निरागस पणे तो आपल्या येणाऱ्या पिल्लासाठी सगळ करत असतो ……. तितक्याच जबाबदारपणे त्या पिल्लाच्या भविष्याची तरतूद करायच्या आतापासूनच मागे लागतो……. स्वतःच्या जास्तीच्या खर्चावर आपोआप नियंत्रण घालतो…… LIC ची कुठली policy जास्त चांगली आहे ते अगदी कुठल्या school मध्ये admission करायला हवं वगैरे वगैरे…
या सगळ्यातच ९ महिने कसे सरतात दोघानाही कळत नाही.… बाळंतपणासाठी आई माहेरी जाणार असते… तेव्हा तर तिच्या आणि पिल्लाच्या काळजीने बाबा कावरा बावरा होऊन जातो…… आजपर्येंत आईपासून लांब रहायची सवय आणि इच्छा दोन्हीही नसताना देखील तो तयार होतो …अगदि दर आठवड्याला आईला भेटायाला आपल्या सासुरवाडीला येतो…… त्यालाही वाटतच असेल…… का हि सगळी बंधनं?…… सरळ office ला दांडी मारून आपणही पिल्लाची वाट पाहत घरी जावं … पण सगळा मनांतच….
अखेर तो दिवस उजाडतो ……. आई-बाबांच्या आयुष्यातला सोनेरी दिवस…पिल्लाचं आयुष्यातलं सोनेरी आगमन…
आपल्या चिमुरडीची भेट घ्यायला बाबा अगदी सात- समुद्र पार करून यायलाही मागे पुढे बघत नाही……. पिल्लाच्या जन्मावेळीच्या त्या घटिका सरता सरत नसतात …… आईला होणारा त्रास , अन पिल्लाची काळजी … प्रत्येक क्षण डोंगराएवढा मोठा होऊन बाबाला भीती दाखवत राहतो … पण पिल्लाचे बाबा एकदम धीट ……:) सगळ tension क्षणात जातं ……. जेह्वा अखं Hospital दणाणून टाकणारी किलकारी बाबाच्या कानाचा वेध घेत येते आणि सगळ्यांनाच सुखावून जाते… आईच्या कुशीत तोः चिमणा जीव आपले पहिले वहिले मोकळ्या हवेतले श्वास घेत असतो……. आणि इतके दिवस ज्याची वाट पाहिली त्या आपल्या पिल्लाला बाबा भरल्या डोळ्यांनी न्याहाळत असतो……
आजी आजोबा , काका काकू , मामा मावशी सगळ्यांच्या घोळक्यात बाबाचा मात्र शेवटचा नंबर… :)
पण आई आणि बाबांचा डोळ्यातच काय तो संवाद चालतो ……
"थकली असशील ना ग ?"
"नाही हो , बघा ना तुमची छकुली बोलावतेय तुम्हाला …. "
"अगं , तुझ्यामुळेच हे सुखं आयुष्यात आलंय …… "
"आणि तुमच्यामुळे सुखं हेच माझं आयुष्य झालंय …… "
शब्दांच्या बाबतीत आईपुढे नेहमीच हरणाऱ्या बाबांचं यावर फक्त एकच उत्तर आणि ते म्हणजे हरूनही जिंकलेलं त्याचं गोड हास्य…… :)
आजवर येवढ्या लहान बाळाला घ्यायची सवय नसतानाही बाबा आपल्या छकुलीला अगदी अलगद उचलून घेतो… आणि त्या नाजूक परीचा तो प्रथम स्पर्श अनुभवतो…… बाबांच्या कुशीत आल्यावर त्या चिमुरडीलाही कळतच की लगेच …… अगदी आरामात ती त्याच्या कुशीत विसावते … हातातल्या धडपडणाऱ्या बाळजीवाकडे पाहताना बाबा उगीचच हळवा होतो……. अन त्याचे डोळे त्या जीवावर वात्सल्याची मूक बरसात करतात…. आपल्या लाडकीचा तो प्रथम स्पर्श बाबाच्या आयुष्यभर लक्षात राहतो……
पुढे प्रत्येक वळणावर बाबा आपल्या लेकी साठीच जगतो…तिला आधार देतो…… तिची काळजी घेतो…. तिच्यावर जीवापाड प्रेम करतो…… तिचे सगळे हट्ट पुरवतो…… वेळ प्रसंगी आधार, मार्गदर्शन अन मदतही करतो …….सासरी चाललेल्या लेकीला निरोप देताना रडतोही ……… आणि नंतर तिच्या पिल्लानाही त्याच वात्सल्याने न्हाऊ घालतो……
आयुष्य पुढे सरकत राहत……. पण "बाप होताना" अनुभवलेले हे मंतरलेले क्षण मात्र कूपीतल्या अत्तरासारखे अगदी आयुष्यभर दरवळत राहतात …………
-----टिंग्याची आई

This is very nice write up....
ReplyDeleteThanks for considering Baba's points......:)
ReplyDeleteNo Words :) only few tears...!!! :)
ReplyDelete