"सचिन रमेश तेंडूलकर…"
नुसतं हे नाव लिहून जरी पोस्ट टाकली असती तरी चाललं असतं असंच काहीसं सचिनचं वर्चस्व आणि प्रभाव आहे… आज हि पोस्ट इथे टाकताना मला आणि माझ्या ब्लॉगला धन्य झाल्यासारखं वाटतंय… :)
पोस्ट टायटल वाचताच समजलं असेल तुम्हाला कि कोणाविषयी लिहिलंय… खरतर सचिनविषयी लिहावं इतकी माझी लेखणी मोठी झालेली नाहीये पण तरीही हा एक छोटासा प्रयत्न सचिन काय आहे हे स्वतःलाच पुन्हा एकदा अभिमानाने सांगण्याचा… :)
"सचिन" नुसतं नाव घेतलं तरी छाती अभिमानाने फुलून येते आणि डोळे आदराने झुकतात… मी क्रिकेटची Die-Hard fan नसले तरी मी सचिनची fan नक्कीच आहे… क्रिकेट म्हणजे सचिन खेळतोय आणि शॉट वर शॉट मारतोय हीच काय ती आमची लहानपणापासून क्रिकेटची व्याख्या… गल्लीत मुलं क्रिकेट खेळायची तेव्हा आमचा रोल जास्तीत जास्त फिल्डरचा तोही Boundary पार जाणारा बॉल अडवायला… आम्हाला आयुष्यात कधी एखादा कॅच जमला नाही कधी चौकार जाणारा बॉल अडवायला जमलं नाही मग मुलं बोलिंग करून द्यायचा तर चान्सच नाही… त्या पोरखेळातूनच सचिनच्या गुगली शी आमचा परिचय झाला…. कधी चुकून अंधळा शॉट लागला आणि कोणाची बोल्ड उडालीच तर सचिनची गुगली तात्पुरती आमच्या नावावर रजिस्टर… :) हा कदाचित आपल्या सगळ्यांचाच अनुभव असावा… :)
C for Cricket आणि S for Sachin हे गणित कायमचं ठरलेलं… एकमेकांना पूरक अशी हि विधाने जणू एखाद्या प्रमेयाची सिद्धता… (ही गणिताची भाषाच मेली अवघड… ;)
पण आता या गणितातून सचिन वजा झाला तर काय होणार? क्रिकेटच्या Equation ची दुसरी बाजू अशी अधांतरी राहून कशी चालेल…? मग आमचा क्रिकेटचा देव रिटायर होऊन कसं बर चालेल? पण सचिनने निर्णय घेतला…. आणि आमचा देव रिटायर होतोय…………
आता सचिन नाही तर सगळीच समीकरणं बदलतील… आता इंडियाची batting चालू असताना लोक ऑफिसमध्ये चक्क काम करतील… सकाळी batting पाहायला अर्ध्या दिवसाच्या सुट्ट्या टाकल्या जाणार नाहीत… सचिनने किती केल्या? हा प्रश्न विचारला जाणार नाही… सचिनची Century व्हावी म्हणून उपास-तापास केले जाणार नाहीत… तो बरा होऊन खेळायला लवकर परत यावा म्हणून बाप्पाला कोणीही पाण्यात ठेवणार नाही… सचिन खेळतोय म्हणून गल्ल्या, रस्ते सुनसान दिसणार नाहीत… एखाद्या छोट्याशा दुकानातला छोटासा TV असो नाहीतर CCD मधला LCD असो… सचिनची batting पहायला त्यांच्यासमोर गर्दी होणार नाही…. दुसऱ्या टीमचे प्लेयर्स Batsman खेळायला आल्यावर आनंदाने स्वागत करणार नाहीत…. एखाद्या Batsman चा कॅच घेतल्यावर फिल्डारला इतकं वाईट कधीच वाटणार नाही… Winning match नंतर परत जाताना असा Guard Of Honor कोणालाही दिला जाणार नाही…. आणि कोणाच्याही स्पीच नंतर बघणाऱ्या आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत असं पाणी येणार नाही… ही सगळी समीकरणं पुन्हा बरोबर होतील ती फक्त सचिनमुळेच आणि सचिनसाठीच….
Needless to say… Yes…. Hats Off To You Dear Sachin…….
नुसताच खेळला असता तर कदाचित एवढा मोठा झाला नसता… कारण नुसतं खेळ खेळ खेळून माणूस मोठा खेळाडू होईल पण "मोठा माणूस" होत नाही… लहानपणापासून त्याने जसा आपल्यातला खेळाडू जपला त्याच चिकाटीने आणि जिद्दीने स्वतामाध्ला "माणूस" त्याने जपला…. हेच एकमेव कारण आहे ज्यामुळे आज तो आपल्या प्रत्येकाच्या घरातला हिरा आणि हिरो बनला आहे… आयुष्यात कधीही त्याने shortcut घेतला नाही… अगदी स्वच्छ चारित्र्याने जितक्या निरागसपणे त्याने या खेळात पदार्पण केलं त्याचं निरागसपणे तो आज रिटायर होतोय…. पण त्याच्यावर टीका झाल्याच नाहीत असंही नाही….
खुद्द श्रीरामावर लोकांनी टीका केल्या तिथे सचिनला कोणी कसं बर सोडेल? त्याच्यावर जमेल तेव्हा तेव्हा टीका झाल्या आणि दर वेळी त्याने आपल्या खेळातूनच योग्य ते उत्तर दिलं… तो खेळला ते खेळासाठी, आपल्या टीमसाठी आणि आपल्या देशासाठी…. I wish कि सचिन असाच खेळत रहावा lifetime… ;)
तो शेवटचा कसोटी सामना… आम्हीही पाहिला, तेही ऑफिसमध्ये allowed नसताना…. कसोटी सामन्याला खचाखच भरलेलं स्टेडियम आणि सचिनसाठीचा जल्लोष…. ह्या match मध्ये पहिल्यांदाच आपला प्लेयर आउट झाल्यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या कारण त्यांचा लाडका सचिन येणार म्हणून…. आणि तो आउट होणाराही आनंदाने pavilion मध्ये परतला… सगळंच अप्रतिम… झालंय का बर याआधी असं काही?
त्याच्या आगमनावेळी WI टीमने केलेलं त्याचं स्वागत आणि त्याच्या प्रत्येक स्ट्रोकला प्रेक्षकांनी दिलेला भरभरून प्रतिसाद…. सगळं कसं सोन्यासारखं, अगदी दृष्ट लागावी असंच…. शेवटच्या सामन्याचं आणि चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं सगळं व्यवस्थित सांभाळत तो खेळला…
हा हा म्हणता ७४ धावा केल्या…. अन तो शेवटचा बॉल ज्यावर Sammy ने कॅच घेतला आणि सचिन आउट झाला… :( आमच्या देवाचा एक अवतार संपला… Sammy सुद्धा हा कॅच Celebrate करू शकला नाही… Out होताच देवाने Pavilion चा रस्ता धरला…. तो आउट झाल्याचं डोंगराएवढं दुखं प्रत्येकालाच होतं… पण आज हे दुखं, तो आउट झाल्याचं न्हवतं… त्याचं शतक झालं नाही म्हणून पण न्हवत…. हे दुखं होतं क्रिकेटचा देव आपल्याला पुन्हा खेळताना दिसणार नाही याचं…देवाचं हे batting साठी सज्ज असलेलं रूप पुन्हा कोणत्याही मैदानावर उतरणार नाही याचं… त्याच्या bat चा चमत्कार पुन्हा बघायला किंवा ऐकायला मिळणार नाही याचं… एक एक पाऊल टाकत तो निघाला होता…. भरल्या डोळ्यांनी आणि जड पावलांनी… आज म्हणावसं वाटत होतं… "सचिन थांब… नको रे जाऊ आम्हाला आणि क्रिकेट ला सोडून…." वाटत होतं अम्पायरने निर्णय बदलावा आणि काहीतरी चमत्कार होऊन देवाने पुन्हा खेळावं… पण छे…!!!
match पुढे खेळली गेली… सचिन पुन्हा मैदानावर दिसला खरा पण त्याच्या Bat शिवाय… आपण match जिंकलो… झालं… आता फक्त प्रतीक्षा होती ती त्याच्या बोलण्याची… काय बोलणार कसा बोलणार कोणालाच ठाऊक न्हवतं… पण कान तरसले होते त्याचे शब्द ऐकायला…. त्यानेही तसंच साजेसं स्पीच दिलं…. कोणालाही विसरला नाही…. त्याच्या प्रत्येक वाक्याला पडणाऱ्या टाळ्या एवढंच म्हणत होत्या… "तू जाऊ नकोस…"
त्याचा शब्द न शब्द प्रत्येक चाहत्याच्या काळजाला भिडला… आणि हसत-रडत आणि आम्हाला रडवत सचिनने क्रिकेटला निरोप दिला… त्याच्यासोबत डायरेक्ट क्रिकेटला निरोप देणारेही पाहिलेत मी… काय म्हणावं बर या प्रेमाला…!!! खरंच आज देव रिटायर होताना माझ्याही डोळ्यांत आपसूक पाणी आलंय…
खर सांगू…? किती लिहू आणि किती नाही असं झालय… थांबायची इच्छा नाहीये पण थांबलं तर पाहिजेच… म्हणून शेवटी इतकंच म्हणावसं वाटतंय….
झाले बहु… होतील बहु… परी या सम हाच…!!!
माझी हि छोटीशी शब्दांजली त्या देवाच्या चरणी मनापासून अर्पण…
काही चूक-भूल झाली असल्यास क्षमस्व…
- टिंग्याची आई
And to complete the post... The best of his sentences....
"I left my 24 yrs in 22 yards pitch "
सचिन बद्दल बऱ्याच दिग्गजांनी म्हटलेली काही निवडक वाक्य इथे शेयर करतेय…
Peter Roebuck
"On a train from Shimla to Delhi, there was a halt in one of the stations. The train stopped by for few minutes as usual. Sachin was nearing century, batting on 98. The passengers, railway officials, everyone on the train waited for Sachin to complete the century. This Genius can stop time in India!!"
Dennis Lillee
If I've to bowl to Sachin, I'll bowl with my helmet on. He hits the ball so hard.
Glenn McGrath
I still think Tendulkar is the best batsmen in the world ahead of Steve Waugh and Lara.
Brian Lara
Sachin is a genius. I'm a mere mortal.
The best one is here... :)
Mathew Hayden:
"I have seen God, he bats at no. 4 for India"

Apratim shabdanjali..!! :)
ReplyDeleteThanks for the Apratim Comment... :)
DeleteOne incident to share -
ReplyDeleteSydney test Vs AUS, Sachin was out for 0 1 0 for last three games to the mcgrath gillespie, for off cutters so he decided to skip that cover drive in that innings and he gone on to score 241* in that innings w/o a single shot on cover drive
Thats Determination
He scored only 54 runs on the off side...
For this write up - very aptly said in simple language... :)
Thanks for the comment and sharing this incident too... :)
DeleteKarach Nad khula lihili aahes post....
ReplyDeleteMe pan lihite aahe kavita pan itakya chan aani nemakya shabdat mala jamnarach nahi!
Apratim ...!
kavita mhanje kavita aste g.. changli vait kahi nahi... ti apli aste ani nehmi changlich aste... :) Tulahi asach jamat chan chan... keep it up..
DeleteAnd Thanks for this lovely comment dear...
:)
ekdum zakas...maja ali :)
ReplyDeleteThanks a Lot Bhava... Vachun maja ali mhanhe My purpose solved..... ;-)
DeleteThank you so much... :)