एक मराठमोळा कोल्हापुरी पोरगा…
अन एक टिपिकल केरळी पोरगी…
कोणास ठाऊक कशी पण दोघांची अवचित जमली जोडी….
नकळत भेट घडली….
भाषेची अडचण अशी कधीच नाही पडली….
आंखो से इशारे और आंखोसेही इजहार हुआ….
like-wike करते करते न जाने कब Love हुआ… :)
त्याची बोली अस्सल कोल्हापुरी… "चा मारी" शिवाय जमत न्हवतं….
अन तिचं ते मल्याळी त्याच्या डोक्यात काही केल्या शिरत न्हवतं…
तिचं fluent इंग्लिश आणि त्याचं आपलं मिन्ग्लीश…
मनातलं सगळं सांगायला त्यांना तेवढंच पुरेसं होतं…
कधी कधी प्रश्न पडे त्याला….
"कसं सांगू प्रिये… मन कसं हवेत पाखरावाणी तरंगतंय….
क्षितिजावरच्या चांदणीचा तूच समजून… हळूच मुका घेऊन येतंय…
नजरेसमोर २४ तास… तूच तू असतेस…
झोपेचा तर पत्ताच नाही… पण स्वप्नात फक्त तूच दिसतेस…"
न सांगताच हे सगळंच… तिला अचूक कळायचं…
तिचंही मन प्रत्येक क्षणी त्याच्याच तर मागे पळायचं…
देश वेगळा, वेश वेगळा…
एकमेकांत गुंतलेला जीव सोडला, तर common असं काहीच न्हवतं…
दो दिल एक जान असं हे जोडपं, डिट्टो 'एक दुजे के लिये' होतं….
तिचा हात हातात घेऊन….
मनातलं सगळं तो धडाधड मराठीतच बोलून टाकायचा…
अन तिच्या डोळ्यांत नेहमीच….
सर्वकाही समजल्याचा भाव असायचा…
आपलं पहिलं वहिल प्रेम…
दोघे छान एन्जॉय करत होते…
रोज संध्याकाळी क्षितिजावर बसून…
चांदोबाशी प्रेमाच्या भाषेत गप्पा मारत होते…
निधड्या छातीने त्यानं हे प्रकरण…
आपल्या बापाला जाऊन सांगितलं…
अन तिने आपल्या घरच्यांवर…
अतिप्रभावी असं अश्रू-अस्त्र वापरलं…
नाही-होय करत दोन्हीकडचे तयार झाले…
केरळहून वऱ्हाड थेट कोल्हापूरला आले….
दोन संस्कृतींच्या मिलनाचा हा आगळा वेगळा सोहळा…
अगदी थाटामाटात पार पडला…
जगावेगळा कोल्हापुरी पाहुणचार…
केरळकरांना अगदी मनापासून आवडला….
आज बाप्पाच्या आशीर्वादाने… हे जोडपं सुखाने संसार करतंय…
चिमुकल्याच्या पावलांनी सुख… घरभर दुडूदुडू धावतंय…
सांगायचं एवढंच होतं…
प्रेम म्हणजे प्रेम त्याला कशाचेही बंधन नसते…
आपलं प्रेम व्यक्त करायला कधी कधी भाषेचीही गरज नसते….
- टिंग्याची आई
Specially dedicated to one member of our office महिला मंडळ…. :)




‘Chya Mari’ tula he sagala kasa kalala? J
ReplyDeleteThis is fantastic poem ‘Tingyachi Aai’ J
Prasanna
Thanks for the comment Prasanna (Hero of this Poem)
Awesome....
ReplyDelete- Madhura
Thanks Madhure for the comment... :)