एका जगावेगळ्या व्यक्तीसाठी…
एक वेगळा विषय…
दाटून आल्या आभाळागत होता… त्याचा रंग सावळा…
एका शांत डोहासारखा होता… तो एक जगावेगळा…
लहानपणापासूनच त्याच्यात… काहीतरी वेगळेपण होतं…
तोल सावरेपर्यंत… त्याचं त्यालाही उमगलं न्हवतं…
मैदानी खेळांत त्याचं मन… फारसं कधीच रमलं नाही…
मित्रांसोबत भांडण मारामारी… यातलं काहीच त्याला जमलं नाही…
आईच्या अवतीभवतीच… त्याचं चिमणं मन रमायचं…
छोटीच्या भातुकलीच्या खेळात… त्याला आपलं जग दिसायचं…
कळतही न्हवतं आणि वळतही न्हवतं… अशातच तो मोठा झाला…
मुळच्या अबोल लाजळूला… तारुण्याचा मोहोर आला…
मनाला पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची… उत्तरं हळू हळू सापडू लागली…
तरण्या पोरींच्या सहवासापेक्षा… पोरांशी सलगी आवडू लागली…
२-३ गर्लफ्रेंड्सच्या नाजूक स्पर्शाचा… अनुभव सुद्धा घेऊन पाहिला…
पण मित्राच्या चुकून झालेल्या स्पर्शापुढे… तो फारच फिका वाटू लागला…
हे सगळं पोटात साठवून होता… कोणाला काहीच ठाऊक न्हवतं…
आत गुदमरणार त्याचं मन… जगाला ओरडून सांगू पाहत होतं…
कोण कसा अर्थ घेईल… याचा काहीच अंदाज न्हवता…
या सोफेस्टीकेटेड समाजाला… तो म्हणावा तसा सुटेबल न्हवता…
कोणीच न्हवतं सोबतीला… मग कवितांची ओढ लागली…
मनातली सगळी गुपितं… लेखणी कागदावर फोडू लागली…
कथा, कविता, लेख… जमेल तसं सगळं लिहित गेला…
सोबत त्याला समजून घेईल… अशा आपल्या माणसाचा शोध सुरु झाला…
फेसबुकवर फेक अकाउंट… नेटवर अफेयर सुद्धा करून पाहिलं…
बऱ्याच पोरांच्या प्रेमात पडला… पण हाती काहीच नाही लागलं…
मुलींसारखं नटणं मुरडणं… असलं कधीच त्याने केलं नाही…
नॉरमल वागायचाही खुपदा प्रयत्न केला… पण तेही त्याला जमलं नाही…
सुनबाईची शोध मोहीम… आईने आधीच सुरु केली होती…
बाबांनीही त्याच्यामागे… संसार थाटायची घाई लावली होती…
असह्य झालं सगळंच… आणि घरी खरं खरं सांगून टाकलं…
भयंकर स्मशान शांततेने… सगळं घरंच जणू व्यापून टाकलं…
भोळ्या-भाबड्या आईला… समजावणं खूप कठीण होतं…
बाबांच्या तरी मनाला… हे सगळं कुठे पटलं होतं…
त्याच्या प्रत्येक गोष्टीवर… घरच्यांचं लक्ष वाढू लागलं…
ज्यांचा आधार मिळावा… त्याचं डोळ्यांनी संशयाचं काजळ घातलं…
घरंच वातावरण पार बदलून गेलं… आकांड-तांडव वाढत गेले…
पापण्यामधलं पाणी… हात मूकपणे लिहित गेले…
लिहिता लिहिता शेवटी… सूसाइड नोट पण लिहून गेला…
जे करायला नको होतं… नेमकं तेच तो करून बसला…
असेना का वेगळा… पण कोणालाच ते कळलं नाही…
कुशीत घेऊन कुरवाळणारं… त्याला शेवटपर्यंत कोणीच मिळालं नाही…
जगावेगळा तो न्हवता… तर त्याचंच एक वेगळं जग होतं…
त्याचं म्हणन समजून घ्यायला… त्याच्यासारखंच कोणीतरी हवं होतं…
आता समजून फायदा न्हवता… सगळा खेळच संपला होता…
या समाजाच्या नियमांपायी… आणखी एकाच बळी गेला होता…
एकटाच न्हवता तो… असे बरेच जगावेगळे आहेत…
समजाच्या मान्यतेची… ते आजही वाट पाहत आहेत…
आणि सगळाच गुंता वाढल्यावर… मरणापलीकडच जग जवळ करत आहेत….
- टिंग्याची आई

Changla vishay nivadlays shilpa... Veglach vishay.. Difficult ahe.. kharach.. Chhan dadhi sopi mandani... Pan bharpur kahi bolun jate..
ReplyDeleteThanks Mangya... I know vishay avghad ahe... ani kavita pan far mothi zaliye... pan sagal mandan garajech hota nahitar ardhvat vatli asti.. :)
DeleteThanks for your comments...
Kaay bolu mi? Thank you so much for understanding me,
ReplyDeleteDear.. Mazyakade kharach shabd nahit.. Ya kavitetlyasarkhach sampun javasa vaattay.. Ti ho mhanat nahi.. To ho mhanat nahi.. Kunich ho mhanat nahiye.. Paise, changla job he sagla kaay kamacha? Ratri thaklyavar kushit shirayla kuni aapla maanus nahi...
fakt kavita manun sodun de.. kahitari shevat hava mhanun ha lihila.. tujha shevat asa nakkich nahi honar.. :) I know..
DeleteDont worry... sagal thik hoil lavkarch.. :)
रोज सकाळी उठले कि तुझा ब्लॉग पहते. आज काही आहे का नवीन वाचण्यासाठी या विचाराने . सहसा कमेंट नाही करत पण आवडतात मला तुझ्या कवित. आहे की माहीत हे तुला . असो … आजही सकाळी वाचली तुझी ही कविता आणि वाटलं काहीतरी सांगावं तुला
ReplyDeleteतुझ्या गेल्या काही कवितांमधून हे आत्महत्या वैगरे वाचाल मी . पण एक सांगू का ???? कवितेचा शेवट नेहमी चांगला करत जा . वाचणाऱ्यालाही बंर वाटत आणि लिहिणारयालाही .
मी हि लिहिली होती अशीच एक कविता आणि मलाही कुणीतरी समजावलं हे फार छान . पटलही मला. कुणाच मरण आपल्या लेखणीतून का उतरवावं आपण ? आपल्याला छान छान येत की नाही लिहिता …मग सुंदर लिहावं आपण . विषय मांडायला हरकत नाही पण बोचली नाही पाहिजे आपली ओळ कोणाला . कुणीतरी असेल ज्याच्या कुटुंबात हे होऊन गेलय तो दिवसभर विचार करत राहील . आणि हे जर सत्य कथेवर आधारित असेल तर शेवट हा फार सुंदर लिही .
हे झालं माझं मत . पटाव असा आग्रह नाही
बाकी कविता छान झालीये
:)
Deleteमाझ्या कविता अगदी रोज वाचल्याबद्दल धन्यवाद माझीही होती अशीच सवय हल्लीच सुटलीये... बघू परत कधी लागतेय ती :)
आणि तुला अजूनही आवडतात माझ्या कविता हे ऐकून बर वाटलं… :) मलाही आवडतात तुझ्या…
आता या कवितेबद्दल… तुझा अभिप्राय आवडला मला… ज्याने कुणी तुला समजावलं आहे ते बरोबरच आहे… पण प्रत्येक वेळी नाही जमत तसं…
आणि हि कविता सत्य घटना आहे पण पूर्ण सत्य नाहीये… तो अजूनही लढतोय… तुझ्या reply च्या वरचा reply पाहिलास म्हणजे कळेलच :) शेवट जनरल ठेवयचा होता जेणेकरून समाजाला जाणीव व्हावी असा काहीतरी होतंय नियमांमुळे…
पुढच्या कवितेत हे नक्की लक्षात ठेवेन…
आणखी एक… जरा पुन्हा एकदा पाहून बघशील का? शंभराव्या कवितेनंतर अशी आत्महत्या वगैरे वर नाही लिहिलेल्या मी आणि जास्त सिरियस विषय पण नाहीत… कर जमलं तर रीविझीट… :)
आणि तुझ्याच एका कवितेत तू सांगितलं होतंस ना एखादी ओळ बोचली पाहिजे कविता जमली पाहिजे असं काहीतरी…. ;)
Anyways... Thanks for your comment and thanks for reading my blog daily... :)
जर तुला वरिल वर्णन केलेल्य लोंकांच समर्थन नैसर्गिक म्हणुन करत असशील तर मला Pedophilia..व..zoophilia असणारया लोंकांबद्द्ल..तुझ काय म्हणन आहे...हे सुदध नैसर्गिक समजायच का...?
Deleteमाझ मत विचारशील तर तु वर्णन केलेल्या व्यक्ति अणि मी सांगितलेल्या व्यक्ती या मानसिक विकार ग्रस्त आहेत...($hiva)
Pedophilia..व..zoophilia yavar kharach kadhi vichar kela nhavta.... ani tyavar mat dena chukich tharel as I have no exact idea about the same..
DeleteSamarthan asa nahi pan eka vyaktichya babtit je anubhavla janvla te lihav vatal hota... manun lihila.. :)
ani tujha mat thodya anshi nakkich patatay... :)
Thanks for reading and putting your views... $hiva...
must ha kase suchale tula he sagale...!!!!
ReplyDelete