माझ्या चुलत सासरेबुवांची परवाच एकसष्ठी साजरी केली… सगळे जन जमलो होतो… मजा आली… :)
तर हे आमचे काका… हो मी त्यांना काकाच म्हणते… तर ते सातारला राहतात आणि आम्ही तसे एकत्र वगैरे फार कमी राहिलोय पण बाकीच्यांकडून मला त्यांच्याबद्दल काळात होतं… त्यातूनच मी त्यांना ओळखत गेले…
आज त्यांच्या वाढदिवशी हि माझ्याकडून सप्रेम भेट… :)
आज एकसष्ठीच्या निमित्ताने… म्हटलं आपणही काहीतरी करावं…
६० वर्षांचं हे व्यक्तिमत्व… आपल्या शब्दांत बांधावं…
फार कमी दिवस जरी… आपण एकत्र घालवले असले…
इतरांच्या गप्पामधून… मी तुम्हाला ओळखत गेले…
बाबा सांगतात…(माझे सासरे)
आमचा रवि म्हणजे… माणूस खरंच खूप नेक आहे…
छोट असो वा मोठ… त्याचं प्रत्येक काम चोख आहे…
धाकटा भाऊ म्हणून… ते आजही तुमच्यावर प्रेम करतात…
तुमची प्रत्येक आठवण… खूप अभिमानाने सांगतात…
आजही माझे पप्पा… तुम्हाला साहेब म्हणूनच हाक मारतात…
एक चांगला वरिष्ठ अधिकारी… म्हणून तुमचच वर्णन करतात…
(दोघे एकाच सरकारी खात्यात आहेत :)
आई म्हणतात…
माझ्या हातचे मटण वडे… भाऊजींना खूप आवडतात…
साधी चटणी भाकरी सुद्धा… ते तितक्याच आवडीने खातात…
तुमच्या रागाचे किस्से सुद्धा… त्यांनी बऱ्याचदा सांगितलेत मला …
आई-बाबांवर प्रेम करणारा मुलगाही… अनेकदा दिसलाय मला…
काकी आजी…
६० वर्षांच्या अर्जुन रथाचा… खरा सारथी काकी आजी आहे…
जे आजी म्हणते… तीच आजोबांचीही मर्जी आहे…
नेहमीच सांगतात त्या… तुम्ही कामाला कसं महत्व दिलं…
खंतही नकळत दिसते… कारण घरात लक्ष थोडं कमी दिलं…
घर सांभाळणारा हा हात होता… म्हणूनच तुमचं हे यश आहे…
आणि आजीची हौस पुरवणं… आता एवढंच काय ते शेष आहे… :)
कैलाश…. (माझे दीर)
हरवलेली कागदपत्र परत मिळवणारे पप्पा… मला हसत हसत सांगतो…
पण अशी जिद्द अन चिकाटी अशक्य… हे आम्ही सगळेच जाणतो…
रिटायरमेंट नंतरही कोर्सेस करायला… पप्पांना happily मदत करतोय…
कुठेना कुठे तो स्वतःही… तुम्हाला एक आदर्श मानतोय…
मेघा… (जाऊबाई जोरात ;)
सुनबाईकडून कळते… तुमची आवड वाचनाची…
कडक इस्त्रीच्या फुल शर्ट पेक्षा… एखादा हाफ शर्ट घालण्याची…
हुशार आहे आपली सुनबाई तशी… पण तिला तुमचाच आधार आहे…
"पप्पांचं आमच्या काही नसतं…" एवढा विश्वासच पुरेसा आहे…
शैलेश… (माझे अहो)
तुमच्याकडे बघूनच… शैलेश स्वतः इंजिनियर झालेत…
कामासाठीच एवढ डेडिकेशन… तुमच्याकडूनच शिकलेत…
तुमच्यासारखंच एक एक पुस्तक… त्यांनी अजून जपून ठेवलंय…
जणू सिविल च सगळं ज्ञान… तुम्हा काका-पुतण्याच्या कपाटातच दडलंय…
आशा अन स्नेहा आत्या कडूनही… बरंच काही जाणून घ्यायचं आहे…
पुढच्या सुट्टीमध्ये… खास एवढ्यासाठीच जायचं आहे… :)
चिन्मय, शौर्य
पिल्लांकडून कळलंय मला… आजोबा कशा छान छान गोष्टी सांगतात…
त्यांच्या इतकं लहान होऊन… गमतीचे खेळ खेळतात…
सिनेमाचं वेड तुमचं आणि बापुंसोबत घट्ट मैत्री… अशीच कधीतरी कळली होती…
तुमचं मालिका प्रेम आणि गप्पांची सवय… मीही बऱ्याचदा अनुभवली होती…
या दोन हातांनी… आजवर खूप काम केलं आहे…
पोराबाळांसाठी हे शरीर… आजवर झिजलं आहे…
असे हे आमचे लाडके काका आजोबा… सगळ्यांशी हसून खेळून वागणारे…
फेवरेट भरल्या वांग्यावर… खुशाल ताव मारणारे… :)
खूप काही लिहायचं होतं… पण तेवढा सहवास अजून लाभला नाही…
एकमेकांसोबत घालवायला… एवढा वेळच आपल्याला मिळाला नाही… :(
पुरे झालं इतरांकडून जाणून घेण… आता तुम्ही माझ्याकडे राहायला या…
तुमच्या धाकट्या सुनबाईला… सेवा करायचा चान्स द्या…
आज एकसष्ठीच्या निमित्ताने…
चिल्ली पिल्ली सगळे मिळून… एकच प्रार्थना करतोय…
आपल्या लाडक्या बाप्पाकडे… तुमचं उदंड आयुष्य मागतोय…
आजचा प्रत्येक क्षण… सगळे आनंदाने एन्जॉय करू…
तुमचा ७१ वा बडे सुद्धा… असाच मस्त सेलिब्रेट करू…
Happy Birthday काका आजोबा
- टिंग्याची आई

No comments:
Post a Comment