शाळेत असताना निबंध लिहायला लागायचा… दर सुट्टीत नवीन विषय…. हे नसतं तर… कधी ते नसतं तर… मी हा झालो तर… मी हि झाले तर… बरेच विषय… आमचा आपला एकच फंडा… कोणी का असेना फक्त महत्वाचे शब्द बदलायचे… बाकी सब कुछ सेम टू सेम… :) काय बरोबर आहे ना…?
तर परवा एकदा गप्पा मारता मारता विषय सुचला टी. व्ही. नसता तर…. लहान असताना बरंच काही लिहिलं असतं चित्र विचित्र पण आज इथे जे काही टिंग्याची आई म्हणून लिहिलंय तेवढंच काय ते सुचलं… बघा पसंत पडतंय का आणि पटतंय का… :)
टी. व्ही. नसता तर….
बाळ टी. व्ही. बघतोय तोवर…. आईला सगळी कामं आवरता आली नसती….
अन आई घरी नसताना…. टी. व्ही. वरची अंगाई ऐकत पिल्लूला झोप सुद्धा आली नसती….
सकाळी आई ऑफिसला निघताना…. रडणारा बाळ शांत झाला नसता….
इकडे तिकडे पळणारे Tom & Jerry दाखवत…. आईला ऑफिसला पळ काढता आला नसता….
टी. व्ही. नसता तर….
सर्कशितला भला मोठ्ठा हत्ती…. बाळाला रोज रोज पाहायला मिळाला नसता….
टी. व्ही. वर नाच रे मोरा बघत…. ताटातला वरण-भात फिनिश झाला नसता….
वाघाची डरकाळी, सिंहाची गर्जना…. पिल्लूला हुबेहूब जमली नसती….
उशिरा येणाऱ्या बाबाची…. डोळे ताणून टी. व्ही. बघत वाट पाहता आली नसती….
टी. व्ही. नसता तर….
पिल्लासाठी छान छान रेसिपीज…. आईला शिकता आल्या नसत्या….
बाबाच्या रोजच्या बातम्या…. कार्टूनच्या ब्रेकशिवाय पूर्णच झाल्या नसत्या….
रात्री छोटा भीम बघत बघत…. डोळ्यांची चिमुकली फुलं मिटली नसती….
अन तेच कार्टून बघत दमलेली आई…. बाबाच्या कुशीत विसावली नसती….
टी. व्ही. नसता तर….
आजीच्या सिरियल मधलं जानू-श्रीचं गाण… पिल्लाने सूर लावून म्हटलं नसतं….
अन लुंगी डान्सच्या तालावर…. छकुल ठेका धरून नाचलं नसतं….
Match सोडून बाबाचं सगळं लक्ष…. त्याच्या जेवणाकडे असतं….
आणि लाईटचं बील सुद्धा…. नक्कीच कमी झालं असतं…. :)
तरीही टी. व्ही. नसता तर…
टी. व्ही. च्या नादात मिस केलेलं…. बरंच काही खऱ्या अर्थाने जगता आलं असतं….
पण रिमोट साठी भांडणाऱ्या…. बापलेकाचं सुख तरी कुठे अनुभवता आलं असतं…
टी. व्ही. नसता तर… थोडंस अवघडच झालं असतं… :)
- टिंग्याची आई
Specially dedicated to Mahila Mandal member Madhura... :)

Mastye ekdum....mala wacchatanach watala agdi aaplya sathich lihiliye....khalchi coment wachun confirm zala ekdum
ReplyDeleteSahiye..thanku
Thamb tya pilachya babala pathwate
Tv nasata tar....
- Thanks for the best comment Madhura... :)
tv नसता तर..कखेत बसुन आई काम करत असताना
ReplyDeleteयेनरी roller coster सारखी मजा अनुभवता आली असती..
tv नसता तर आईच्या आवजतील ..लिंबोनीच्या झाडामाग कोन झोपले आहे ऐकत झोप लागली असती..
tv नसता तर..serial च्या charactars ऐवजी शिवाजी महाराज, अकबर-बिरबल पंच-तत्रातिल..प्राण्यांबरोबर गट्टी जमली असती..
tv नसता तर पिलुचे पपा अक्क्ड बक्ड ....चिमनी भुर्र्र..घोड्याला पानी पाजु का..सारखे खेळ विसरले..नसते....
True...
DeleteThe other side... :)
टी. व्ही. च्या नादात मिस केलेलं…. बरंच काही खऱ्या अर्थाने जगता आलं असतं….
Thanks for this lovely comment.. dear Anonymous....