कविता म्हणावं असं नाहीये... एक Write Up म्हणून वाचा हव तर.... :)
रोज सकाळी सकाळी ऑफीसच्या गडबडीत कसतरी आवरायचं....
आणि संध्याकाळपर्यंत झालेल्या अवतारातच... घर गाठायचं....
पण आज ठरवलंय मी... थोडंस का होईना आज नटायच आहे...
"अहो ऐकलंत का..?" आज तुमची सौ चक्क शृंगार करणार आहे.....
नेहमीसारख्याच आजही मी चांगल्या हातभर बांगड्या घालाव्या...
किती तो आवाज.. So Disturbing.. अशा Comment तू टाकाव्या.....
"काय नव्या नवरीचा चुडा भरलाय Madam नी.." असं हमखास म्हणावस...
आणि रात्री अचानक जाग आल्यावर.. माझ्या हातातल्या त्याच बांगड्याशी.. निरागसपणे खेळावस...
लांब सडक केसांची आज मुद्दामच वेणी मी घालावी...
न आवडून तू हि मग कप-बशी.. थोडी जोरातच आद्ळावी... :)
सगळ उमजून देखील... मी सुद्धा थोडेसे नखरे करावे.....
गजरा माळायच्या बहाणे.. हलकेच केस माझे.. तू पुन्हा मोकळे करावे....
कधी जाणून बुजून तर कधी अलगद... नेसलेल्या साडीला घडी पडावी...
(साडीला घडी पडली कि नवी साडी मिळते असा गोड समज असतो...)
मिस्कीलपणे मी विचारावं.. "अहो.. मला साडी घेताय कि काय नवी....??"
कुठे जायचं राणी सरकार... स्वामिनी.. वामा.. कासट.. कि चालेल हस्तकला...?
असाच काहीसा Dialogue मारशील.. साड्यांनी गच्च भरलेलं कपाट दाखवत मला....
साडीला Matching सेट शोधण्यात मी अख्खा तास घालवावा...
तुला विचारावं तर.. " होतोय कि Match.." हाच Reply प्रत्येक वेळी मिळावा....
अजिबात Match होत नसला तरी... शेवटी तू गिफ्ट दिलेला सेटच Final होतो..
पण दागिन्यांच्या एवढ्या पसाऱ्यात... माझ्या प्रिय मंगळसुत्राचाच पहिला नंबर लागतो... :)
पैजण, जोडवी, मेखला.. बाजूबंद.. अगदी काहीही शिल्लक ठेवलं नाही...
पण एवढ्या साज शृंगाराला.. कपाळावरच्या कुंकवाशिवाय शोभा नाही....
म्हणूनच मग एक छानशी चंद्रकोर... अन भांगात लाल चुटूक कुंकू भरावं....
कशाला हवाय आरसा... तुझ्या डोळ्यांतच माझं हे रूप मी न्याहाळाव....
नटून थटून उभ्या तुझ्या सौ कडे बघून तू छान Smile करावं...
अन तुझ्या डोळ्यातलं समाधान... आपसूक माझ्या डोळ्यांतून सांडाव...
ज्या हातांनी आजवर मला सावरलस... त्याच हातांनी ते दोन थेंब तू टिपावेस...
तुझ्या ओंजळीत माझा चेहरा घेऊन म्हणावस... "टिंग्याची आई.. आज खरंच खूप छान दिसतेस..."
- टिंग्याची आई
:)
Looking sweet :)
ReplyDeleteJust wanted to see you after your marriage specially in Sari :)