Monday, January 21, 2013

लवकर ये...

एका पिल्लाचे बाबा भूर गेलेत... पिल्लू आणि त्याची आई इथेच आहेत.. दोघांनाही बाबाची खूप आठवण येते.... म्हणूनच राहून राहून आई डोळ्यातून पाणी काढते.... बाबालाही पिल्लाची खूप खूप आठवण येते.... पिल्लाला घेऊन उभी आई त्याला रोजच समोर दिसते....
हा अनुभव माझा नसला  तरी.. फक्त एक प्रामाणिक प्रयत्न केलाय या भावना शब्दांत उतरवायचा... फक्त त्यांच्यासाठीच.... :)
नक्कीच जमलेला नाहीये ..... :)

आज उठल्यापासून पिल्लान..
नुसतं तुझंच नाव काढलंय...
कालपासून तुझ्या वाटेकडे..
अगदी डोळे लावून बसलंय.....

फुललेल्या प्रत्येक फुलामध्ये..
आज तुझच प्रेम दडलंय...
नात्यांच्या या सुंदर माळेत...
मी तुझंच नाव गुंफलय...

देव्हाऱ्यातल्या ज्योतीसोबत..
रोज माझ काळीज जळतय...
विसाव्यासाठी मनही माझ...
तुझीच साउली शोधतंय...


बघ आज कसं अचानक...
हे आभाळ दाटून आलंय...
तुझ्या डोळ्यातलं पाणी..
आज पुन्हा माझ्या डोळ्यातून वाहिलंय...


आकाशी उडत्या पाखरासोबत..
पुन्हा एकदा "परत ये" असा निरोप तुला धाडलाय....
कालचा विस्कटलेला भातुकलीचा डाव...
आज मीच पुन्हा मांडलाय....

तुझ्या विरहाच दुखं...
या पापण्यांमध्ये काठोकाठ साचलंय...
तुझ्यासाठी आणलेलं फुल..
माझ्या हातातच सुकलंय...

भरकटलेल प्राण पाखरू..
फक्त तुलाच शोधतंय...
तुझ्या आठवणींत गुंतलेल मन..
रात्र रात्र जागतय...

"बाबाला लवकर पाठवून दे... "
पिल्लू रोज बाप्पाकडे इतकंच मागतंय..
पिल्लाच्या डोळ्यात तूच दिसतोस...
तेव्हा काळजात खोलवर कुठेतरी दुखतंय...

तुझ्याविना... कसतरी...
पिलाने मला आणि मी त्याला सांभाळलय...
लवकर ये... तू आलास कि...
धावत येउन तुझ्या कुशीत शिरायचं...
असं आम्ही मायलेकरानी ठरवलंय...

- शिल्पा  :)

2 comments:

  1. Freaking awesome… :)
    Baryach divsaanni sur gavaslyasarkha distoy…

    पिल्लाच्या डोळ्यात तूच दिसतोस...
    तेव्हा काळजात खोलवर कुठेतरी दुखतंय...

    Remids me of the lines from that poem ‘Shree Rama Ghanshyama’…
    The line is ‘Balanchya ya rupe baghte tuzyach chimnya murti..’

    ReplyDelete