जीवा-भावाच्या दोघीजणी...... तशा न्हवत्या जिवलग मैत्रिणी.... मन मोकळ करून कधी एकमेकींशी बोलल्याच नाहीत.... एकमेकिंवरच प्रेम कधी दाखवलंच नाही... एकीने दाखवलं तर दुसरीला ते पटलं नाही.... आणि दुसरीने प्रयत्न केला तर पहिलीला कळलंच नाही..... कोण जास्त प्रेम करतय ती कि मी... हीच वेडी स्पर्धा... त्यांची त्यांनाच कळली नाही कधी... एकमेकींच्या डोळ्यातलं पाणी दोघीनाही कळायचं.... मनातलं पहिलीच्या दुसरीला उमजायचं.. असं हे प्रेम दोघींचं.... एक धाग्याने घट्ट बांधलेलं.... कळेलच कधीतरी दोघींनाही.... :)
का कसे हे बंध जुळती.. कळे ना दोघींनाही....
ना कधी हे रंग जुळले.. तरीही जुळली नाती.... कळे ना दोघींनाही....
एकमेकींसाठी असल्या.. जरीही प्रश्न न सुटलेला....
नकळत तरी कसा हा.... जीवही जडला... कळे ना दोघींनाही....
सोडविण्या का व्यर्थ प्रयत्न.. कोडे न उलगडलेले...
डोळे भरुनी पाहण्या तरीही... का हे मन व्याकूळलेले ..... कळे ना दोघींनाही....
अप्रत्यक्षपणे दोघीजणीही... करिती सोबत क्षण क्षण...
अजूनही तिच्याच साठी का हे.... काळीज तुटते कण कण.... कळे ना दोघींनाही....
एक धागा अजूनही आहे.... अंतरातूनी घट्ट जुळलेला....
अनामिक हे नाते याचा.... अर्थ का अजूनही न कळलेला... कळे ना दोघींनाही....
पायवाटही एकच जरीही.... प्रवास विरुद्ध दिशेला.....
फिरुनी पुन्हा या वाटा जुळतील... वेडी का ही आशा जीवाला.... कळे ना दोघींनाही....
कधीतरी त्या दोघी भेटतील..... सुख दुःखाच्या गोष्टी करतील....
बालमैत्रिणी पुन्हा खेळतील..... खोटे हेवे-दावे विसरतील.....
तेव्हाच कदाचित..... हे नाते कळेल दोघींनाही..... :)
- टिंग्याची आई
एक गाण म्हणून सुचलं होत... सुचतील तसे शब्द गोवले आहेत.... :)

No comments:
Post a Comment