तू निघताना डोळ्यात पाणी भरून उभी असलेली आई… कावरे बावरे होऊन एकटक तुझ्याकडे पाहणारे बाबा… डोळ्यातलं पाणी लपवायचा व्यर्थ प्रयत्न करणारा दादा… आणि एकाच वेळी आनंद आणि दुःख अनुभवणारी तू… जड अंतकरणाने तो क्षण सगळ्यांनीच निभावून नेला… तुझ्या माहेराला नेहमीच तुझी ओढ लागेली असेल… दारातली तुळस, देव्हार्यातला बाप्पा, सगळेच तुझी वाट पाहतील… या घराने पाहिलेलं तुझ्या सुखी संसाराचं स्वप्न आज सत्यात उतरतंय… भरल्या डोळ्यांनी अन हसऱ्या ओठांनी या घराने आज तुला निरोप दिलाय… "तुझ्या घरी तू सुखाने रहा" असा आशीर्वाद दिलाय….
उंबऱ्यावरच माप ओलांडून तुझ्या घरात पाहिलं पाउल टाकशील… त्याच क्षणी सासूबाईची लाडकी लेक होशील, नंदेची जिवलग मैत्रीण होशील, धाकट्या दिराची लाडकी वाहिनी होशील, सासरेबुवांची समजूतदार मुलगी होशील, जाऊबाईची जिवाभावाची बहिण होशील… अन तुझ्या लाडक्या राजाची राणी होशील…
सगळी नाती कशी नव्याने भेटतील… माहेरच्या मायेची उणीव काढतील… तुझ्या बोलक्या स्वभावाने सगळ्यांना आपलस करून घेशील… क्षणात त्या घराचं चैतन्य होशील… हौसेन सासूबाई तुकडा ओवाळून टाकतील… आपल्या लाडक्या सुनेला उराशी कवटाळतील… सासरेबुवा हळूच कोणाच्याही नकळत डोळ्यातला थेंब लपवतिल… तुझ्या लक्षात आलंय हे उमजून मनापासून हसतील… आशीर्वाद देताना म्हणतील "पोरी… हवं ते माग…" तेव्हा एवढंच सांग… "योग्य त्या वेळी आमचा कान धरा, पण धरू नका तुमच्या मुलीवर कधी राग…" :) खळखळून हसत सहज तथास्तु म्हणतील… "माझ्या मुलीची नीट काळजी घे" असा दम तुझ्या अहोंना देतील… :)
या सगळ्या नात्यांना तुला जीवापाड जपायचंय… एक एक धागा प्रेमाने बांधायचाय… या रेशीमगाठीत तुझं नव जग घट्ट विणायचंय… त्या क्षणी तुझा पती तुझ्यासोबत असेलच… त्याचा हात हातात घेऊन, पावलाला पाऊल जुळवून संसाराचं गोड गुलाबी स्वप्न सत्यात उतरवायचं आहे…
माहेरी आजही तुझी तितक्याच आतुरतेने तुझी वाट पाहिली जाईल… भरल्या ओटीने तुझी पाठवणी केली जाईल… या दोन कुटुंबांना जोडणारा दुवा तू आहेस… तुलाच सांभाळायची आहेत दोन्ही घर… तू समर्थ आहेस… आणि तुला या दोन्ही घरांची मायेची साउली अखंड लाभेलच… या आनंदाच्या क्षणी इतकंच म्हणावस वाटतंय…
दिल्या घरी तू सुखी रहा… :)
Specially dedicated to my dearest friend सौ. अस्मिता राजेंद्र साळोखे
:)
Thanks Shilpa.. its nice to see you spend so much time for that... We both love you..Heartly thanks...
ReplyDeleteFrom- Raj-Asmi.