कारण नसताना काल अशीच घराबाहेर पडले...
तासभर शंभुच्य देवळात जाउन बसले...
डोळेभरून महादेवाचं दर्शन घेतलं....
आणि त्याच्या पुढ्यातच पद्मासन घातलं...
गाभार्यातला तो गारठा आणि मंद शांतता..
मी म्हटलेला ओम च फक्त तिला भेदत होता..
तेवणार्या नंदादिपासोबत.. तासभर तिथेच बसून राहिले...
हवे नको ते सगळे प्रश्न देवाला विचारले...
माहिती होत.. उत्तरं तर मिळणारच न्हवती...
पण मला सगळ सांगायला एक जागा हवी होती...
याहून चांगली जागा मिळणच शक्य न्हवत...
तू गेल्यापासून.... माझ ऐकून घेणारं दुसर कोणीच न्हवत...
तुझी आठवण आली होती म्हणूनच.. देवाचं दार होत गाठलं....
त्याच्या कुशीत डोकं ठेऊन.. थोडंस रडून... मन हलक करून घेतलं....
पुन्हा कधी फिरून आलीच तुझी आठवण.. तर परत त्याच्याच दारी जाईन...
रिकामी माझी ओंजळ.. तोच पुन्हा सुखाच्या थेंबांनी भरून देईल....
- शिल्पा

This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete