टिंग्याचे काका आजोबा रिटायर झाले हल्लीच.. त्यांच्या छोट्याशा फेअरवेल पार्टी मध्ये आम्हा सर्वांच्या भावना अशाच काहीशा होत्या.... :)
आयुष्यात जेव्हा जेव्हा पडलो अडखळलो...
जगाच्या रीतीने चालताना अनेकदा धडपडलो.... प्रत्येक वेळी तुम्ही आधाराचा हात आम्हास दिला... संकटांचा डोंगरही कधी कधी त्या हातांनी सहज पेलला.. त्याच हातांमध्ये आता नातवांचे चिमुकले हात धरा.. पुरे झाल काम... आता थोडा आराम करा.... लेकाची कॉलेजची फी.. तर कधी पुस्तकं लेकीची .. कधी रात्री अपरात्री करावी लागलेली धावपळ औशाधासाठीची... आमच्या गरजा भागवल्या.. कष्ट सहन करून स्वता... आम्हा मुलांनाही होऊ दया थोडंस मोठ आता.... कुठे चुकलोच अजूनही.... तर कान मात्र नक्की धरा.... पुरे झाल काम... आता थोडा आराम करा.... आमच्या परीक्षांमुळे कितीतरी बेत कॅन्सल झाले... ट्रिपचे बरेचसे plan नुसतेच ठरत राहिले... जुने पुराने बेत आता पुन्हा आखायला बसू... आम्हा मुलांना पहायचय तुमच्या चेहऱ्यावरच छान हसू... आजीला घेऊन आता.. एक मस्त world टूर करा.... पुरे झाल काम... आता थोडा आराम करा.... आमच्या आवडी निवडींमध्ये तुमचे छंद कुठेतरी हरवले .. आनंदातच आमच्या... तुम्ही आपले समाधान शोधले... आयुष्यातल्या प्रत्येक स्पर्धेत तुम्ही आम्हाला cheer केले आहे... अजून जिंकलो नसलो तरी हरलेलो नाही याचंच मोठ समाधान आहे.. चला .. आता तुम्ही पण स्वतःमध्ये एक नवीन चार्म भरा.. पुरे झाल काम... आता थोडा आराम करा.... भर उन्हात चालताना तुम्ही आम्हाला सांभाळल... कधी स्वतःच चप्पल सुद्धा आमच्या पायात घातलं... तुमच बोट धरून चालणारं पिल्लू आता उंच झेप घेतंय... त्याच्या भरारी पुढे हे आकाश सुद्धा झुकतंय... पण तुमच्या प्रेमाची साऊली सतत त्याच्यावर धरा... पुरे झाल काम... आता थोडा आराम करा.... आमच्या आजारपणात जागून काढल्या कित्येक रात्री... आम्हाला नवीन आणि स्वतः मात्र वापरली तीच जुनी छत्री... आमच्या काळजीत घालवले कित्येक उन्हाळे अन पावसाळे... तुमच्यामुळेच मोठी होऊ शकलो आम्ही तुमची बाळे... आमची काळजी सोडून.. आता थोडी स्वतःचीही काळजी करा.. पुरे झाल काम... आता थोडा आराम करा.... छोटया छोटया गोष्टीत शोधू पुन्हा छोटी छोटी सुखं... कितीही मोठी असली तरी विसरून जाऊ सगळी दुखं... पिलांच्या बरोबर सोनेरी करूया आता एक एक क्षण.. रेशीम धाग्यांनी आणखी घट्ट करू ही नात्यांची वीण... सगळे मिळून जगूया.. आयुष्यातला हा आनंद खरा... पुरे झाल काम... आता थोडा आराम करा.... -- शिल्पा काकी |
Saturday, December 8, 2012
पुरे झाल काम... आता थोडा आराम करा....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment