या कवितेतील सर्व प्रसंग काल्पनिक आहेत.... छत्रपतीना सोडून बाकी सर्व काल्पनिक पात्र आहेत..... इतिहासातल्या कोणत्याही प्रसंगाशी जर साम्य आढळले तर तो एक योगायोग समजावा.... आणि काही चुका झाल्या असल्यास क्षमस्व..... :)
बाजीराव नावाचा महाराजांच्या सेनेतला एक मावळा होता.... त्याच्या मुलाची हि एक छोटीशी कथा.... बाजी तर शूर होताच पण आपल्या बापाचा आदर्श घेऊन त्याचा मुलगाही स्वराज्यासाठी लढला आणि त्याने आपल्या आयुष्याच सार्थक करून घेतलं.....
बाजीराव नावाचा महाराजांच्या सेनेतला एक मावळा होता.... त्याच्या मुलाची हि एक छोटीशी कथा.... बाजी तर शूर होताच पण आपल्या बापाचा आदर्श घेऊन त्याचा मुलगाही स्वराज्यासाठी लढला आणि त्याने आपल्या आयुष्याच सार्थक करून घेतलं.....
हर हर महादेव....!!!!!!!! जय भवानी... जय शिवाजी....!!!
भल्या पहाटे बाजीच्या घरी.... आज भलतीच गडबड उडाली....
सूर्याचे पहिले किरण घेउनि.... एका तान्हुल्याची किलकारी उठली.....
शिवबाचा मावळा घरामंदी आला... असा निरोप गडावर धाडला....
खुशीत येउनि जिजाऊनी नजराणा... संग मिठाईचा पाठीवला....
बानं स्वराज्यासाठी जीव वाहिला.... जसा होता शब्द राजांना दिला....
अन त्याच स्वराज्यासाठी... तो अखेर शहीद कि हो झाला....
आय बायांनी मिळून पोराला... बाच्या अंत्यदर्शना आणल...
तर चड्डीत खोचलेली तलवार सावरत... त्येन बाला "हर हर महादेव.." म्हणून दावल....
स्वराज्याचं बाळकडू आईन.. त्येला बालपणीच होत पाजलं...
पहिल्यांदा जावा भेटलं.... हे गुण तवाच महाराजांनी हेरलं...
पोरग स्वराज्यासाठी लढणार... वीर लढवैय्या होणार....
राजांची अनुभवी ती नजर.... अंदाज कसा चुकणार....!!
तलवार.. दांडपट्टा.. भाल... सगळ्यात पोरग तरबेज झालं...
सोळाव्या वर्षीच पठ्ठ्यान... फौजत नाव घातलं....
महाराजांसमोर घेतली शपथ... "गनिमाला पुरता ठेचीन..."
स्वराज्यासाठी जीव देईन.... तवाच वर जाऊन बाला तोंड दावीन....
गानिमिकाव्यात पोरग तरबेज झालं... प्रत्येक मोहिमेत आपला हुन्नर दाऊ लागल.. महाराजांना खात्री होती... बाजी परत येणार सर्जाच्या रुपान... अन तसंच झाल हुत....
एक दिवस....
शत्रून अचानक गडावर हल्ला केला.. महाराज मोहिमेवर होते... गडावर मोजकीच माणस होती....
असा कसा हो डाव टाकला.. राज नसताना हल्ला केला...
काय कराव कुणाला समजना.. तवा सर्जा लढाय पुढ झाला...
संग ५-५० ची एकच टोळी.. आज खरी कसोटी होती...
राजांचा आशीर्वाद शिरी.... अन ऊरात डोंगराएवडी हिम्मत होती...
आता उरला एकच उपाय.. गनिमीकावा... राज परिवाराला सुरक्षित स्थळी हलवून सर्जा आपल्या टोळी सोबत सज्ज झाला.... गडाच्या पायथ्याचा चप्पा चप्पा पोरांना ठाऊक होता.. तिथंच गनिमाला गाठला...
कड्याकपारीत गनीम गाठला.. जागच्या जागी ठार कि हो केला...
एकेकाची शिकार केली.. फौजचा पार चुराडा केला....
राजांची सेना नेटान लढत हुती.... शत्रूची सेना कापली जात हुती....
पण अचानक शत्रूची एक तुकडी मावळ्यांवर तुटून पडली.. धाडकन हल्ला झाला... मावळे धारातीर्थी पडू लागले.. काय झालं हे अचानक... अशी कशी बाजी पलटू लागली.... एक एक मावळा होऊ लागला....
सर्जान हे पाहिलं अन बाजी प्रभूंचं स्मरण करून लढायला सज्ज झाला....
दोनी हाताला घेतल्या तलवारी.. मग पुढ बांधल्या दोन ढाली...
महाराजांना मुजरा करुनी... हर हर महादेवची आरोळी ठोकली...
१०-१५ जनांनी त्येला घेरला... कोल्ह्यांच्या तावडीत एकटा सापडला...
एकेकाला उभा त्येन चिरला.. बाजी परत सर्जा बनून लढला.....
अखेरचा गनीम आडवा पडेपर्यंत सर्जा लढत राहिला... रक्तबंबाळ झाला.... फतेह झाली तवाच धरणीवर पडला... आज सर्जान गड वाचीवला....
राजांना वृत्तांत कळला.. पार भेटीसाठी वेळ नाही उरला...
सर्जान जगाचा निरोप घेतला.. रणांगणावर त्यान जीव सोडला...
स्वराज्यान आणखी एक मावळा गमवला.. अन हे ऐकून आमचा राजा... अंतरात ढसाढसा रडला.....
स्वराज्यान आणखी एक मावळा गमवला.. अन हे ऐकून आमचा राजा... अंतरात ढसाढसा रडला.....
राजांसाठी प्रत्येक मावळा म्हणजे जीव भावाचा सखा होता...
अशा प्रत्येक वेळी एकाच वाक्य त्यांच्या हृदयात आक्रोश करत असे...
"गड आला पण माझा सिंह गेला.. "
-- मराठमोळ्या टिंग्याची मराठमोळी आई
:)

No comments:
Post a Comment