दोन प्रिय मैत्रीण... कधी जास्त बोलन नाही... गप्पा नाही... पण तरीही जिवलग.... :) खूप प्रेम होत दोघींचही एकमेकींवर... छान चालल होत सगळ... दोघीही संसारात सुखी होत्या..... अधून मधून काहीतरी चालायचं... पण तरीही सगळ ठीक होत.... :)
अचानक एक दिवस एकीने दुसरीला एक विचित्र शपथ घातली..... कधीही न भेटण्याची.. न बोलण्याची... खरच अगदी विचित्र शपथ.... दुसरीने प्रयत्न केला जाणून घेण्याचा.. पण छे... सगळेच प्रश्न अनुत्तरीत...
दोघीही वेड्या.. आजही झुरतात एकमेकीसाठी...... :)
कधी कधी वाटत.....
का घातलीस तू हि शपथ....
काय बर चूक झाली माझ्या हातून.....
तुझ्यावर प्रेम करून गुन्हा केला...
कि... माझ्यावर कधी तुझा विश्वासच न्हवता म्हणून.....
कधी कधी वाटत....
तसं बरंच झालं हे सगळ....
या शून्याला तुझ्या गणितात कधी किंमतच न्हवती....
सगळे गुन्हे माझ्या पदरात....
दुसऱ्या कोणाला चूक करायची संधीच मी दिली न्हवती....
कधी कधी वाटत....
काहीतरी कारण नक्कीच असेल....
म्हणून तर अशी हि जीवघेणी शपथ घातलीस......
चूक कोणाचीही असेना का...
माझ्याबरोबर स्वतःलाही हि शिक्षा द्यायला निघालीस.....
कधी कधी वाटत....
आत्ता येउन तुला गाठाव...
मनात उठणारे हजारो प्रश्न तुला विचारावे....
पण तेही नाही जमत.....
तुझ्याइतकं नाही... पण म्हटलं निदान हे तरी आपण सहन करावे....
कधी कधी वाटत....
बर झालं निदान कवितेचा आधार आहे.....
पण असं कवितेतून बोलण आणि किती दिवस चालणार....?
Unknown नंबरवरून Call करायचे....
अशाने भेटीची ओढ आणखीनच नाही का वाढणार...?
कधी कधी वाटत....
मोडून टाकावी हि शपथ....
आणि तडक तुझ्याकडे निघून यावं....
तुला घट्ट मिठी मारावी....
अन अगदी पोट भरून रडून.. मन मोकळ करावं.....
कधी कधी वाटत...
ज्या दिवशी शपथ घातली.. त्या दिवसापासूनचा हिशोब होता...
पण ६ कि ७.. गणित नक्की कुठे चुकतंय....
कशी म्हणावी हि रस्सीखेच...
जिथं माझ्या मायेचं माप नेहमी तुझ्याच बाजूला झुकतंय.....
कधी कधी वाटत.....
बाप्पाच्या त्याच मंदिरात....
माणसांच्या घोळक्यात अचानक समोर जेव्हा दिसशील.....
तेव्हा नजर चुकवून तशीच निघून जाशील...
की धावत माझ्या मिठीत येउन..... तूच तुझी शपथ मोडशील....
कधी कधी खरंच असं वाटत..... :)
- शिल्पा

Liked below lines
ReplyDeleteकाहीतरी कारण नक्कीच असेल....
म्हणून तर अशी हि जीवघेणी शपथ घातलीस......
चूक कोणाचीही असेना का...
माझ्याबरोबर स्वतःलाही हि शिक्षा द्यायला निघालीस.....
You got it ..
n 1 more thing .. God is great ..
Me too waiting for his miracle :)