'तो' आणि 'ती' जणू ... बाप्पाने एकमेकांसाठीच बनवलेले...
प्रेमाच्या एका गोड नात्यात... अगदी घट्ट बांधलेले....
इतके भासती वेगळे..... तरी एकमेकांसाठी जगणारे....
सुख-दुःखाचे मोती.... ओंजळीत समाधानाने झेलणारे....
तिचा चहा एकदम स्पेशल.. भरपूर दूध आणि साय वरून...
त्याचा मात्र Pure Black tea.. दूध चार हात लांब सारून..... :)
त्याच्या प्रत्येक बडे ला.. तिने नवीन नवीन गिफ्ट द्यावं....
तिचा बडे मात्र त्याने.. लक्षात असूनही विसरल्यासारख कराव....
पिल्लासाठी तर कधी स्वतःसाठी... तिने फुल टाईम गाण म्हणावं....
कधीतरी चुकुनच एखाद आवडीच गाण... त्याने नुसतच गुणगुणाव....
चुकून सुद्धा कोणाच्या तोंडात शिवी... तिला आज्जीबात सहन होत नाही....
आणि त्याच्या साईटवरच एकही काम... शीवीशिवाय होतच नाही....
तिची बडबड अखंड चालू.. शांत बसण जणू माहितच नाही....
त्याच्या गप्पा तशा मोजक्याच... वर Madam बोलायची संधीच देत नाही.....
तिच्या चेहऱ्यावर नेहमीच.. Close-Up Smile असते....
त्याच्या गालावरची कळी मात्र... फक्त तिला पाहूनच खुलते.....
तिने प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत... सुख शोधावं...
आणि त्याने मात्र.. तिच्या दुखांना आपल्या ओंजळीत लपवावं....
याच वेगळेपणात त्यांना... त्याचं खर प्रेम गवसलंय...
प्रेमाच्या अतूट रेशमी धाग्याने... त्यांना एकमेकांत घट्ट गुंफलय.....
या दोन टोकांनी मिळून... संसाराचा परीघ छान सांभाळलाय...
दुडूदुडू धावणारा बाल कृष्ण... त्याचा केंद्रबिंदू बनलाय.....
इथे अंगणातल्या तुळशीसोबत... पारिजातकही बहरलाय.....
चिमुकल्या या मनातल्या घरट्यात..... या पाखरांनी प्रेमाने संसार थाटलाय....
- टिंग्याची आई
For Someone Special... :)

No comments:
Post a Comment