तिच्या हातात हात गुंतवून...
मावळनाऱ्या सूर्याकडे पाहत..
क्षितिजापर्यंत चालत रहायचं...
आणि ते गवसलं नाही म्हणूनच..
एकटेच मंद अंधारात हरवायचं.... हे प्रेमही असच असत का....?
सागरकिनारी उभ राहून....
एकटक त्या लाटांकडे पहायचं....
पायाखाली वाळू सरकत असते....
अन आपणही नकळत त्याच्या कुशीत शिरायचं....
आणि त्याने मात्र शेवटी किनाऱ्यावरच ढकलायचं... हे प्रेमही असच असत का...?
पौर्णिमेच्या रात्री आकाशात...
चांदण्यांचा सडा पडला असताना...
चंद्राची लाडकी चांदणीही असते...
ती जोडी दुरून अगदी लोभस वाटते....
पण चंद्राच्या नशिबी येत ... फक्त वाट पहायचं.... हे प्रेमही असच असत का...?
एखाद्या उंच कड्यावर जाऊन...
स्वतःला खोल दरीत झोकून द्याव...
धरणीवर कोसळण्याच्या भीतीपेक्षा...
तरंगण्याचा आनंदच जास्त वाटावा....
पण शेवट मात्र अनपेक्षितच व्हायचा.... हे प्रेमही असच असत का...???
पण खर सांगू...??
तुझ्या प्रेमात पडल्यावरच मला कळलंय.....
क्षितिजाच्या पलीकडे एका नव्या जगाचा रस्ता जातो....
सागराच्या कुशीतच तर मोती दडलेला असतो....
दूर असला तरी.... चंद्र चांदणीच्या काळजात दडलेला असतो....
आणि कड्यावरून कोसळलो जरी... खाली सावरणारा तुझा हात असतो....
हे प्रेमही असंच असत... अगदी तुझ्या इतकंच छान असत.... :)
- टिंग्याची आई..

No comments:
Post a Comment